TechRepublic Blogs

Saturday, November 16, 2024

संकटमोचन

 पू.श्री.संत तुलसीदास म्हणतात " श्री.रामा मी तुझी विनवणी करतो. हे सेवक सुखदायक,सर्वसमर्थ, संकटमोचन, कमलनयन श्रीरामा! मी तुझ्यावरून मला ओवाळून टाकतो. मी तुझे नाम मनापासून जपतो. तू माझ्यावर कृपादृष्टी करावी.

 श्रीरामा! माझे हृदय हे खरे तुझे धाम आहे. तेथे अनेक चोरांनी , षडविकारांनी  ठाण मांडले आहे. त्यांना टाळणे कठीण जाते.मला ते सतत चिकटलेले असतात." पुढे श्री.तुलसीदास जानकी मते कडे अर्ज करतात आणि म्हणतात *" माते कधी तरी योग्य प्रसंग पाहून श्रीरामाला माझी आठवण द्यावी. त्यामुळे माझे काम होईल. श्रीरामाला सांगावे की एक अगदी शूद्र माणूस आपला दास म्हणवतो. आपले नाम घेऊन तो पोट भरतो. यावर श्रीरामाने विचारले की तो कोण आहे ?

 तर माझे नाव व अवस्था सांगावी. माते तू असे केलेस तर श्रीरामाचे गुणगान करून मी भवसागर तरून जाईन. मला स्वप्नांत देखील मनवचन कर्मानी श्रीरामाहून अन्य आश्रय नाही. श्रीरामा सारखा खरा व मोठा कोण आहे ? आणि माझ्यासारखा खोटा व शूद्र कोण आहे ? पण मी खरा नसून जग मला रामाचा गुलाम मानते."*

No comments:

Post a Comment