TechRepublic Blogs

Friday, November 15, 2024

विश्वमन

 साधन करण्यासाठी एकाग्र होण्यासाठी एकाठिकाणी बसावं , अंतःकरण एकाग्र करावं आणि गुरूंच स्मरण करून साधन करावं. गुरूंच स्मरण नसेल तर यश नाही. याचं कारण असं की जे विश्वमन आहे ते सबंध विश्व चालवते , त्याचं जर देहांमधे अवतरण असेल तर गुरू आहे. देहाच्या दृष्टीने गुरू म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मविद्या साकार झालेली व्यक्ती.

 परमार्थामध्ये व्यवहाराच्या उलट असते. रात्रंदिवस ज्याची कृपा व्हावी म्हणून तळमळ करायची त्याची आज्ञा प्रमाण. आपली देहबुद्धी मारायची असेल तर आपल्या गुरूचं ऐकायला पाहिजे. सद्गुरूस्मरण  हे फार महत्वाचे आहे.

 श्री.ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंच्या  संमतीनेच समाधी घेण्याचा निर्णय घेतला असणार. जर ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूसमोर इतके नम्र होतात तर तुमची आमची काय कथा? एकदा श्रीविवेकानंदांना विचारलं की " 

तुमच्या गुरूला सही सुद्धा करता येत नाही आणि तुम्ही इतके त्यांच्यामागे का लागला आहात." त्यावर श्रीविवेकानंद म्हणाले "त्यांच्यामध्ये एकच शक्ती आहे. कोणीही माणूस असेल तर त्या माणसाच्या मनाला वाटेल तो आकार ते देऊ शकतात." 

 दुसरं अस की या जगात अत्यंत पवित्र, पवित्र जर काही असेल तर तो सद्गुरू असतो. तो प्रत्यक्ष परमात्माच असतो. म्हणून म्हणतात "सद्गुरू स्मरण अनुभविजे."

No comments:

Post a Comment