TechRepublic Blogs

Thursday, November 14, 2024

उद्दिष्ट


              श्रीराम,

         मानसपूजेमध्ये सगुणाचा आधार घेत त्याच्यावर प्रेम करत त्याच्या स्वरुपापर्यंत जायचे, हेच मूळ उद्दिष्ट आहे. महाराज म्हणतात - दृश्य वस्तूंवर आपले प्रेम असते, जे दिसते ते सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते.

 म्हणून आपणच कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट झाला पाहिजे. राम सर्व करतो 'आणि' राम माझा दाता आहे 'ही भावना ज्याची स्थिर झाली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली आणि त्याच्या जन्माचे सार्थक झाले. मानसपूजेच्या माध्यमातून आपल्या जन्माचे सार्थक आपल्याला करून घ्यायचे आहे.

                मानसपूजेचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याने आपले मन सुदृढ होते. आजकाल मानसिक आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. परमार्थाचा अभ्यास करतात आणि डिप्रेशन ची औषधे पण घेतात. 

ह्याचाच अर्थ त्यांचे मन कमकुवत आहे. जोपर्यंत मन मजबूत होत नाही, तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी, मनाला उभारी देणाऱ्या कल्पना, भावना व विचार यांचे खतपाणी घालण्याची गरज असते.

           मानसपूजेत आपण देवाला अर्थात सद्गुरूंना त्या साऱ्या गोष्टी देतो. ज्या वास्तविक आपल्याकडे नाहीत आणि आज रोजी आणताही येत नाहीत पण मनात मात्र आणता येतात.. आणि मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येते.

                    ||श्रीराम |¦

No comments:

Post a Comment