प.पु.श्री डोंगरे महाराज हे प्रकांड पंडित, व्यासंगी व प्रसिद्ध भागवत कथाकार होते तसेच ते संत पदाला पोहोचलेले अधिकारी पुरुष होते. ते मालाडला प.पु.श्रीगोंदवलेकार महाराजांच्या दर्शनाला येत असत.
असेच ते एकदा दर्शनाला आले असता त्यांनी आपल्या मनातील खंत श्री गोंदवलेकर महाराजांकडे व्यक्त केली. ते म्हणाले *" मी इतक्या लोकांना नामाचे महत्व सांगतो पण माझ्याकडून हवे तितके नामस्मरण होत नाही."* त्यावर श्रीमहाराज म्हणाले " तुमची कथा ऐकायला किती लोक येतात?"
त्यावर हे म्हणाले " पन्नास साठ हजार " असे त्यांनी उत्तर दिले. त्यावर श्रीमहाराज म्हणाले *"तुम्ही कथेमधे इतक्या लोकांकडून नामगजर करवून घेता तेव्हा तितके लोक नाम घेतात व त्यांना नामाचे महत्व समजते.
घरी बसून काही एक तास जप करण्यापेक्षा अनेकांनी लक्षावधी रामनाम जपाचा डोंगर रचला जाणे महत्वाचे आहे , नाही का ? आपण नाम घेणे हे पुण्याचे काम आहे त्यामुळे उपासनेस तेज येते.
आपण नाम घेणे हे स्नान करण्यासारखे आहे , ज्यामुळे वैयक्तीक स्वच्छता होते ; पण इतरांना नामाला लावणे हे घर स्वच्छ करण्यासारखे आहे. ज्याचा लाभ आणि प्रसन्नतेचा अनुभव घेणाऱ्या प्रत्येकाला मिळतो."* हे ऐकून पु.श्रीडोंगरे महाराजांच्या मनातील खंत गेली व नामाला समाधानाची जोड मिळाली.
No comments:
Post a Comment