TechRepublic Blogs

Friday, November 29, 2024

उत्तम

 *नामाच्या नादात शरीर कष्ट जाणवत नाहीत !*


*एक प्राथमिक शिक्षक गोंदवल्यास रहात असत. त्याची नेमणूक तेथून सुमारे चौदा-पंधरा किलोमीटर दूर असलेल्या गावी होती. रस्त्यात कित्येक चढउतार, त्यातला काही भाग निव्वळ कच्चा गाडीरस्ता, एका दिशेने जोराचा उलट वारा, अशाही स्थितीत ते रोज सायकलवरून ये-जा करीत. 

त्यांना एकाने विचारले, "गुरुजी तुमचे वय सेवानिवृत्तीच्या जवळ आलेले आहे. तुम्ही वरिष्ठांकडे अर्ज केला तर इथल्याच शाळेत बदली करून घेणे काही अवघड नाही. तुम्ही तसे करून तुमचे हे रोजचे कष्ट का वाचवित नाही ?"*

  *गुरुजींनी उत्तर दिले,"तसा अर्ज करण्याचा माझा विचार नाही. याला कारणे दोन. एक असे की, असा अर्ज करणे श्रीमहाराजांना पसंत नसे. प्रत्येक गोष्ट रामाच्याच इच्छेने घडते अशी दृढ श्रद्धा असेल तर वेगळी काही गोष्ट त्यांच्यापाशी मागण्याने या श्रद्धेला बाधा येईल.

 दुसरे महत्वाचे कारण असे की रोज हा प्रवास करताना सायकलवर बसलो की, मी नामस्मरण सुरु करतो. त्या नादात चढउतार, उलटा वारा, खराब रस्ता वैगेरे माझ्या फारसे ध्यानात येतच नाही. केलेल्या प्रवासाचा शिणही जाणवत नाही. रोज अडीच-तीन तासाचे नामस्मरण आपसूकच होते. 

गोंदवल्यास बदली करून घेतली तर हा वेळ वाचेल खरा पण तो नामस्मरणाकडे न लागता प्रापंचिक गोष्टींसाठी, करमणुकीसाठी, किंवा उचापती, निंदा नालस्ती यातच खर्च होणार ! तेंव्हा आहे हेच उत्तम आहे."*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*

No comments:

Post a Comment