नाम हे मुखाने घेतले जाते. वाणीला प्राणांचा आधार आहे. नामस्मरणाने प्राणांवर नियमन येते. म्हणजे प्राणायाम साधतो. नाम घेता घेता एक लय येते व नामात रस येतो.हा रस लौकिक रसापेक्षा वेगळा असतो. ह्या रससेवनेने प्रत्याहार साधतो. नामाची धारणा तयार होते व ध्यान आणि समाधीही साधतात.
एकदा पु.श्री.बेलसरे यांनी श्री. गोदवलेकर महाराजांना विचारले की नाम घेणाऱ्या सर्वांनाच नाद, प्रकाश इत्यादी अनुभव का येत नाही. श्रीमहाराज म्हणाले गुहागरला जायला दोन मार्ग आहेत. एक मोटारीने व दुसरा बोटीने. मोटारीने जाताना मैलाचे दगड लागतात, पण बोटीने जाताना तसे होत नाही.
आपला मार्ग हा बोटीचा आहे. एका साधकाने एकदा श्रीमहाराजांना विचारले की नाम घेताना आपल्या प्रतिमेचे ध्यान करावे की पादुकांचे म्हणजे मन एकाग्र होईल? श्रीमहाराज म्हणाले " एकीकडे नाम आणि एकीकडे प्रतिमेचे ध्यान करताना चित्त एकाग्र कसे होईल.एकाग्र चित्त फार पुढची गोष्ट आहे. नामात मी आहे ते सोडून अन्य गोष्टी कशाला ? नामातच मला पाहावे."
No comments:
Post a Comment