*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*पुष्कळ मंडळी जमली होती , त्या सर्वांशी बोलणे होऊन श्रीमहाराज थांबतात; तेवढ्यात एक गृहस्थ तेथे पोचले व झटकन् पुढे होऊन त्यांनी श्रीमहाराजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना काही बोलण्याचा अवसर न देताच श्रीमहाराजांनी स्वतःच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले ,
" एक वैद्य होता. त्याच्याकडे पुष्कळ रोगी येत. औषधांनी भरलेल्या बाटल्या त्याच्या कपाटात होत्या त्यातून ज्याला जे योग्य ते औषध तो काढून देई. एके दिवशी त्याच्या मुलाचीच तब्येत बिघडली. तेव्हा वैद्याने मुलाला हाक मारून सुंठेची चिमूटभर पूड त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाला , ' ही खाऊन टाक.'
तसे आतापर्यंत पुष्कळांना पुष्कळ सांगितले, तुम्हाला थोडक्यात सांगतो , रामनाम घ्या त्यात सारे काही आले. "*
*||श्रीराम जय राम जय जय राम||*
No comments:
Post a Comment