TechRepublic Blogs

Saturday, November 30, 2024

भावना

 #प्रार्थना म्हणजे ती नाही.

जी आपण हात जोडून, 

 देवाकडं काहीतरी,

मागण्यासाठी केलेली असते. 

प्रार्थना तीच असते,

जी सकारात्मक विचार करून, लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं... ही खरी प्रार्थना !!

जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी, 

अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता,

ती प्रार्थना असते !!

जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना,

त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो.. ती प्रार्थना असते !! 

जेंव्हा आपण आपली ऊर्जा, आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो... ती प्रार्थना असते !!

जेव्हा आपण कोणाला तरी,

मनापासून माफ करतो... ती प्रार्थना असते !!

प्रार्थना म्हणजे कंपन असतात. एक भाव असतो.

एक भावना असते.

एक विचार असतो.

प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो..

मैत्री, निखळ नाती, हे सगळं...  म्हणजे प्रार्थनाच तर असते... !!

Friday, November 29, 2024

अक्षय्य तृतीया

 अक्षय्य तृतीया 10 मे रोजी येत आहे. असे मानले जाते की त्या दिवशी आपण जे काही देवासमोर ठेवतो आणि पूजा करतो ते अनेक पटींनी वाढते.  ऑफलेट लोक सोने चांदी वगैरे ठेवतात आणि प्रार्थना करतात.

 पाण्याची आजची गरज आहे.  पाण्याअभावी अनेकांचे हाल होत आहेत.  मोठ्या पात्रात पाणी ठेवूया आणि चांगला पाऊस पडावा, नद्या आणि तलाव भरून जावे, परिणामी सर्वत्र हिरवळ आणि चांगली शेती होऊन आनंद व आनंद पसरावा यासाठी प्रार्थना करूया.  ही आमची कळकळीची विनंती आहे.

 भारतातील अनेक भागांमध्ये आणि इतरत्र आजची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा संदेश वेळेत पसरवू शकता.

 पाण्याशिवाय मानव जात नाही.  भवानी देवीचा जयजयकार.  🙏

उत्तम

 *नामाच्या नादात शरीर कष्ट जाणवत नाहीत !*


*एक प्राथमिक शिक्षक गोंदवल्यास रहात असत. त्याची नेमणूक तेथून सुमारे चौदा-पंधरा किलोमीटर दूर असलेल्या गावी होती. रस्त्यात कित्येक चढउतार, त्यातला काही भाग निव्वळ कच्चा गाडीरस्ता, एका दिशेने जोराचा उलट वारा, अशाही स्थितीत ते रोज सायकलवरून ये-जा करीत. 

त्यांना एकाने विचारले, "गुरुजी तुमचे वय सेवानिवृत्तीच्या जवळ आलेले आहे. तुम्ही वरिष्ठांकडे अर्ज केला तर इथल्याच शाळेत बदली करून घेणे काही अवघड नाही. तुम्ही तसे करून तुमचे हे रोजचे कष्ट का वाचवित नाही ?"*

  *गुरुजींनी उत्तर दिले,"तसा अर्ज करण्याचा माझा विचार नाही. याला कारणे दोन. एक असे की, असा अर्ज करणे श्रीमहाराजांना पसंत नसे. प्रत्येक गोष्ट रामाच्याच इच्छेने घडते अशी दृढ श्रद्धा असेल तर वेगळी काही गोष्ट त्यांच्यापाशी मागण्याने या श्रद्धेला बाधा येईल.

 दुसरे महत्वाचे कारण असे की रोज हा प्रवास करताना सायकलवर बसलो की, मी नामस्मरण सुरु करतो. त्या नादात चढउतार, उलटा वारा, खराब रस्ता वैगेरे माझ्या फारसे ध्यानात येतच नाही. केलेल्या प्रवासाचा शिणही जाणवत नाही. रोज अडीच-तीन तासाचे नामस्मरण आपसूकच होते. 

गोंदवल्यास बदली करून घेतली तर हा वेळ वाचेल खरा पण तो नामस्मरणाकडे न लागता प्रापंचिक गोष्टींसाठी, करमणुकीसाठी, किंवा उचापती, निंदा नालस्ती यातच खर्च होणार ! तेंव्हा आहे हेच उत्तम आहे."*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*

Thursday, November 28, 2024

कृपासिंधू


      श्रीराम,

   गणगोत बंधु तूच कृपासिंधू, सदोदित वंदू पाय तुझे |2

      भगवंता तूच सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय मला कोणी नाही. असे मनापासून म्हणता आले पाहिजे. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा परमेश्वराची आठवण येते आणि तूच मला तारणारा आहेस असे म्हणून त्याचे पाय धरतो. नवस बोलतो आणि अडचण गेली की मग संसारातील व्यक्ती आपल्यासाठी आपले सर्वस्व होतात.

          समर्थ सांगतात - नव्हे सार संसार हा घोर आहे |घोर म्हणजे भयंकर. संसार अशाश्वत आणि दुःखदायक आहे. तसेच संसारातील कोणीही आपल्या साठी थांबत नाही. संसार द्वंद्वमय घोर आहे तर द्वंद्वातीत जीवनात फक्त आनंद आहे. या द्वंद्वातीत असलेल्या निरपेक्ष आनंदाची प्राप्ती मानसपूजेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. त्यासाठी ईश्वराचे चरणकमल दोन्ही हाताने घट्ट धरून तूच मला हवा आहेस.. बाकी कोणी नको, असे आर्ततेने म्हटले तरच त्याचे आपल्याकडे लक्ष जाईल.

       पण एका हाताने त्याचे चरणकमल धरायचे आणि एका हाताने संसार धरून ठेवला तर मात्र या द्वंद्वमय जीवनातच गटांगळ्या खात राहू.. आणि मग तो कृपासिंधू आपल्याला या गटांगळ्या मधून बाहेर काढत राहिल पण मानसपूजेसाठी मात्र येणार नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे आपण मानसपूजा करत आहोत असा फक्त भ्रम होत राहील.

सामान्य माणूस

 *सामान्य माणूस*

महिना पगार *60,000/-* (एवढा पण नसतो)

म्हणजे वर्षाला *7,20,000/-*

*२५* वयापासून *६०* वयापर्यंत काम, म्हणजे *३५* वर्षे काम.

7,20,000X35= 2,52,00,000/- 

म्हणजे आपण *आयुष्यभर* काम करून *3 करोड* पण नाही कमवत. अजून त्यातून टॅक्स, GST च्या माध्यमातून निम्मे सरकारला परत करतो.

*राजकारण्यांची मुलं पहा ...*

*रा.दानवेंचा मुलगा* २५ कोटी

*पार्थ पवार:-* ७१ कोटी... 

*आदित्य ठाकरे:-* ११६ कोटी... 

*रोहित पवार:-* २७ कोटी..

*अमित शहाचा मुलगा* २०७ कोटी..

*सुशिलकुमार शिंदे ची मुलगी* ९३ कोटी

*शरद पवारांची मुलगी १०५ कोटी..*

*एकनाथ शिंदेंचा मुलगा* १२३ कोटी

*देवेंद्र फडणवीसांची मुलगी* १०५ कोटी

किती काम करतात ही *पोरं....*

ह्या कामदार *पोरांचा आदर्श* घेतला पाहीजे.

पहा *कमी वयात किती पैसा* कमवतात. 

आणि आपण बसतो *पोस्टर चिटकावीत* आणि या *नेत्यांची हांजी हांजी* करत..

यांच्या नावाने आपल्याच *मित्रांशी, नातेवाईकांशी* भांडत..


*उदाहरण..*

एका व्यक्तीने दुसऱ्या *व्यक्तीचा डोक्यात दगड* घालून *खून* केला.

*मरणारा* तर मेलाच नंतर *मारणाराही* मेला.

पण तो *" दगड "* मात्र तिथेच पडलाय.

जगाला ओरडून सांगतोय की *मी किती मोठा पराक्रम* केला आहे. 

दोघांचाही जीव घेतला.

             

*सावधान...*

समाजात असे काही *दगड* आहेत जे *आपल्याला भांडायला* लावतात.

एकमेकांची *डोकी* फोडायला लावतात.

*नुकसान* आपले होते,

*बरबाद* आपण होतो

 आणि

*दगड* मात्र बाजूला होतात.

          

*भारत देश* हा जगातील एकमेव असा देश आहे की, इथल्या *तरुणांना* आणि *जनतेला* आपल्या *स्वतःच्या भविष्यापेक्षा* या दळभद्री *नेत्यांच्या भविष्याचीच* जास्त चिंता आहे.


मला एक माहिती आहे की, *कोणीही कितीही जवळचा निवडून आला* तरी *आपली आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी* आपल्यालाच भरायची आहे.

*एक नागरिक*🙏

Wednesday, November 27, 2024

वास्तुशास्त्र

 *घराचे वास्तुशास्त्र...*


     --जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते.     

--  *साखर, लिंबू, मीठ* हे सारे पदार्थ *आपापल्या* आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते *एकमेकांत मिसळतात,* तेंव्हाच विलक्षण *मधुर चवीचे* सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला *कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते.

-- * पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल.

--आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात.

--मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.*

अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे  शक्य आहे का.?!!! 

*तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 

--ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा. 

*रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.

   --मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे.

--घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे. 

--पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.

 *अशी राहते समाधानी वास्तु!* 

म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !!

--घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ  शकतं.

🪷🪷🪷🪷🪷🪷

Tuesday, November 26, 2024

निरोप

 दिवस तो आजचा, सारे अक्कलकोट रडले होते,


कुणी विचार केला न्हवता, असे काही घडले होते..


माझा स्वामी राजा, निरोप घेऊन चालला होता,


अलौकिक शक्तीने, जो साऱ्या ब्रह्मांडात गाजला होता...


काय वर्णू त्याची ख्याती, जो या विश्वाचा बाप होता, अनावर झाले होते अश्रू, जेव्हा त्याने निरोप हा घेतला होता...


क्षणात सारे अक्कलकोट स्तब्ध झाले होते, स्वामींना निरोप द्यायला साक्षात पंच महाभूते आले होते..


पोरके करून निघाला, साऱ्या ब्रह्मांडाचा हा राजा,


क्षणात शांत झाला, माझ्या स्वामींचा गाजावाजा..


संबंध अक्कलकोट हा, दुःखात असा बुडाला,


स्वामींच्या नंतर कोण शोभणार होत त्या वडाला..


पालखीत बसून स्वारी, आली चोळप्पा च्या घरी, शेवटच्या श्वासापर्यंत, ज्याने केली स्वामींची हो चाकरी..


लागली समाधी, माझ्या स्वामी राजाची क्षणात, खंत राहून गेली देवा सोबत राहण्याची, प्रतेकाच्या अंतःकरणात..


आजही आहेत स्वामी माझे, त्याच अक्कलकोटात, चैतन्य रूपात बसले आहेत, प्रत्येक ठिकाणच्या मठात..


आजही हाकेला धाऊन येतात माझे स्वामी, तु आमुची आई, तुझे अजान लेकरू आम्ही..


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनाला जागले माझे स्वामी, आधार आहेत आज प्रत्येकाचा, नतमस्तक आहोत सदैव चरणी आम्ही..!!!    

   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥       

146 व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏                                                                                     🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

आता पाहू आपले घर

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 

                गोंदवल्यात येणार्‍या लोकांना जागा कमी पडते म्हणून महाराजांनी देऊळ बांधायचे ठरवले. स्वतःच नकाशा काढला. गवंडी, सुतार लोक गावातलेच होते. फारसा पैसा नव्हता. पण दर्शनाला येणारे लोक पैसे ठेवत. बांधकामाचा त्यातूनच खर्च चालत. एकदा गाव जेवण घातल्यामुळे, महाराजांच्या जवळचा पैसा संपला. आठवड्याची  मजुरीलाही पैसा नव्हता. मजुरांना म्हणाले, आज आठवड्याचा बाजार. तुम्ही इथेच जेवा. रामावर विश्वास ठेवा. त्याला काळजी आहे.

           आणि दुपारी माने नावाचे गृहस्थ आले. त्यांना उसाचे पीक चांगलं झाल्यामुळे त्यांनी रामा समोर पैसे ठेवून निघून गेले. मजुरीही दिल्या गेली व काही सामानही आणले गेले. मंदिर बांधून होत आल्यावर लोक विचारायचे, महाराज, मूर्ती कुठे आहे? महाराज म्हणाले, मंदिर रामाचे आहे. त्यालाच काळजी आहे. तोच येईल इथे चालत.

          इकडे तडवळे गावी कुलकर्णीनी मंदिर बांधायला घेतले. राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती आणल्या. व वाड्यावर ठेवल्या. एकदा वाड्याला आग लागली. आगीची झळ त्या मूर्तीनाही लागली होती. कुलकर्णीच्या स्वप्नात येऊन मूर्ती म्हणाली, आम्हाला इथे किती दिवस कोंडून ठेवणार आहेस? गोंदवल्याला ब्रह्मचैतन्याकडे पोहचवा.

           त्या दिवशी रविवार होता. जमलेल्या लोकांना महाराज म्हणाले, आज आपल्याकडे कोणीतरी मोठे पाहुणे येणार आहेत. आज आपण उपवास करू. भजन करू. नामस्मरण करू. सर्वांना थोडेसे फराळाचे देऊन दुपारी एक वाजता महाराज भजनास उभे राहिले. दोन तासानंतर महाराजांनी दोघांना रस्त्यावर उभे केले.

               दोन गाड्यांमधून मूर्ती आल्याचे कळताच, महाराज सामोरे गेले. नामाचा जयघोष करीत सर्वजण आदराने रामरायला घेऊन आले. 

           सात दिवसापूर्वीच  महाराजांनी देवापुढे नारळ ठेवून अखंड नामस्मरण, भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला होता. सिंहासन करून घेतले होते. रामरायाच्या मूर्तीची स्थापना केली तो दिवस होता शके १८१३ म्हणजे (सन १८११.)  खूप मंडळी जमली होती. महाराजांनी सर्वांना प्रसाद म्हणून काही ना काही दिले. सुवासिनींच्या ओट्या भरल्या. भरपूर अन्नदान झाले. सर्व वातावरण राममय झाले.

         महाराजांनी अत्यंत प्रेमाने रामरायाकडे पाहिले. त्यांचे डोळे डबडबले होते. ते रामाची करुणा भाकू लागताच त्यांच्या ओंजळीत रामाच्या गळ्यातील गुलाबाची फुले पडली. महाराज मूर्तीला मूर्ती न समजता प्रत्यक्ष रामरायाच समजत असत.

           एकदा महाराज जमलेल्या लोकांबरोबर गप्पा मारत होते. प्रत्येक जण आपापली समस्या महाराजांना सांगत होते. महाराज म्हणाले, तुमची सर्वांची स्थिती किती खरंच काळजी करण्यासारखी आहे. पण मला काही काळजी दिसत नाही. मला मूलबाळ नाही. बायको आंधळी. पैसा तर नाहीच नाही. तरी पण मला काळजी वाटावी असे काही तुम्हाला वाटत असेल तर, सुचवा..

             एक गृहस्थ म्हणाले, महाराज, आपण अन्नदानासाठी प्रसिद्ध आहात. महाराज म्हणाले, अहोऽ, पण आज घरात तिखटा-मिठाशिवाय काहीच नाही. तरी पण तो गृहस्थ म्हणाला, उद्या शंभर जोडप्यांना जेवायचे आमंत्रण द्यावे. बघा काळजी वाटते की नाही? महाराजांनी दुसऱ्या दिवसासाठी शंभर जोडप्यांना जेवणाचे आमंत्रण दिले.

        दुसऱ्या दिवशी माणसे भजन कीर्तनाला बसले. महाराजांनी कीर्तनाला अभंग घेतला...

" आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो रे"

           सुरुवातीला निरूपण चांगले रंगले. नंतर मात्र सर्वांची चुळबुळ सुरू झाली. कोणी म्हणे, निदान म्हातारी माणसे, व मुलांना तरी काही खायला मिळायला हवे. दुपारचे बारा वाजून गेले तरी, सारे शांत होते. एक मुलगा आईजवळ जेवण मागू लागल्यावर, ती म्हणाली, जा महाराजांना सांग. तो मुलगा महाराजां जवळ येऊन भूक लागली म्हणू लागला. महाराज म्हणाले, जा.. रामाला सांग..मुलगा

 रामा जवळ जाऊन जेवण मागू लागला. आणि काय आश्चर्य ?

      सामानाने भरलेली एक गाडी आली. स्वयंपाकाची सगळी तयारी होती. मालक महाराजां जवळ येऊन म्हणाला, महाराज मला मुलगा झाल्यावर २०० मंडळींना जेवण घालण्याचा संकल्प केला होता. तेव्हा कृपया या सामानाचा स्वीकार करावा.

         महाराजांनी रामनामाचा गजर करत रामरायाला दंडवत घातला. लगेच स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाक झाला. नैवेद्य झाला. जेवणं झाले. सर्वजण तृप्त झाले. महाराज म्हणाले खऱ्या अर्थाने शुद्ध मनाने निष्ठापूर्वक रामावर भार टाकला तर, तो काही कमी पडू देत नाही.

           सकाळी महाराजांनी एकदम भजनाला सुरुवात केली. अभंग घेतला....

 "त्रेपन्न वर्षे भूमीभार। आता पाहू आपले घर।

   देह मर्यादा सरली। मागे भक्ती करा भली। 

   दीनदास आनंदला। राम बोलावतो मला।।"

             महाराज म्हणाले, आता मी नैमिष्यारण्यात जातो. ऐकताच लोक दचकले. लोक त्यांना न जाण्याबद्दल गयावया करू लागले. पण ते कोणाचेच ऐकत नव्हते. टांगा तयार करायला सांगितला. सर्व लोक साश्रूनयनांनी महाराजांच्या पाया पडले.

          क्रमशः

 संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Monday, November 25, 2024

_जिलेबी_

 ❄️❄️❄️❄️❄️🍥❄️❄️❄️❄️❄️ 


*_जिलेबी_* 🌀


मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे मी क्लार्क आणि सेवक यांचे काम 10 पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे  ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे साधारणपणे डबा खाणार्या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे बिस्किट वेफर्स चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगे  त्यांचे वाढीचे वय आहे.

तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई आमचा एक घास घ्या ना असा आग्रह करीत त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे सोलापुरात विशेषतः तेल चटणी पोळी देण्याची पद्धत आहे गरीब माणसांचे ते जेवण आहे त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल चटणी पोळी वाला घास घेत 

असे हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या आणि मी एका मुलीचा एक घास घेतला तेव्हा मुलीने ओळखले बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही मी म्हणाले चल असं कुठे असता का ?ती म्हणाले बाई तीला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे आणि ती मुलगी रडायला लागली इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले मी ऑफिसत गेले एसएससी बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते 

मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसुन हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला मी कामात बिझी होते मी दरवाज्यावरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली म्हणाले शिवा काय चाललय कोण रडतय तेव्हा ते म्हणाले बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे ठीक आहे पाठवा मग तीच ती मुलगीआत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही मला खरंच वाटायला लागलं----- मी म्हणलं काही हरकत नाही तुला ती जिलबी खायची होती का? मी अगदी सहज म्हणाले आणिअग जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खाव बाळा त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं ती म्हणाली बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते त्यांच्या घरी आज काही कार्य होते त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती पण त्याला भात लागलेला होता त्यामुळे ते खरकट्यासारखं वाटत होतं मला न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली मलाही ही गोष्ट ऐकून डोळे भरून आले इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला मी खुर्चीवरून उठले समोरच्या खुर्चीवर गेले त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत पण मन लावून अभ्यास कर आणि काहीतरी बनण्याची जिद्द ठेव नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले मला जाणवले की तिला लक्षात येत होते कुणीतरी वाढून दिलेला ताटातल अन्न आपण खातो आहोत एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून  बसली त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती गाणी मनातली या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना प्रसंग हे सांगणे असा तो कार्यक्रम होता त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमांमध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला का आवडली असे प्रसंग  सांगितले त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर  नव्हे मुन्ना बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है हे गाणं लावण्याची मी विनंती केली त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरा पर्यंत मला लोकांचे फोन येत होते किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे आम्ही रडलो असं लोक सांगत होते कार्यक्रम खूपच छान झाला होता त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला ते मला म्हणाले तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाचे पावती ठरलं त्यानंतर या प्रसंगावरती  एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते आणि सुमारे 14 /15 वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि जिलबी नावाचा लघु चित्रपट तयार झाला त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यानी मुख्याध्यापकाची भूमिका केली आणि विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे डोळेही भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती या लघुपटाचे काम पूर्ण झाले त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली त्यातल्या कथेला पारितोषक मिळालं मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषक मिळालं दिग्दर्शकाला पारितोषिक मिळाल आणि फिल्मला पारितोषक मिळाल किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली मेलबॉर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भाव विश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपट आला खूप गौरवण्यात आले वृत्तपत्राने याच्यावरती भरभरून लिहिले 

अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला प्रसंग खूप घडत असतात टिपणारा माणूस हवा इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.



Sunday, November 24, 2024

परस्परपूरक

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


                     

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

             *परंपरा सांगणाऱ्या*

                 *लोकगीताची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                                                                                                                


        *भारतीय संस्कृती परंपरा जपणारी. या समाजव्यवस्थेत इतरांच्या तुलनेत नित्य गरजा जास्त. मग बांगड्या.. दागदागिने असोत वा कुंकू. अर्थात आज विज्ञान त्याची उपयोगीता मान्य करतंय. आज प्रगत तंत्रज्ञानाने.. औद्योगिकीकरणाने या गोष्टींची कमतरता नाही. याउलट बाजार तुडुंब भरलेत. अमिष दाखवून विक्री होतेय.*                      

        *पण औद्योगिकीकरण झाले नव्हते तेव्हाही समाजाला कुठल्याही वस्तूंची कमतरता नव्हती. घरातील नित्य गरजेच्या.. शेतीसाठी लागणाऱ्या या सर्वच वस्तू स्वकष्टाने घरीच तयार करणारे.. पुरविणारे उत्कृष्ट कारागीर होते. समाज व्यवस्था परस्परपूरक.. एकमेकांवर अवलंबून होती. या सर्व वस्तू पुरविणारे आणि समाजाचे पिढ्यानपिढ्या स्नेहाचे संबंध होते. काही वस्तू घरोघरी फिरुन विकल्या जायच्या. तर मोठ्या प्रमाणात वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे गावोगावच्या जत्रा.. उरुस. यामुळे सर्वांनाच कमीजास्त प्रमाणात अर्थप्राप्ती व्हायची. पण एकमेकांच्या साथीने सारेच आनंदाने जगत होते.*

        *अनेक महिला घरोघरी वस्तू विकायला यायच्या, घरोघरी त्यांची आस्थेने विचारपुस व्हायची. गुळपाणी दिले जायचे. ती पण घरच्यांची आपुलकीने विचारपुस करायची.*       

        *अशीच घरोघरी जाऊन वस्तू विकणारी ही एक महिला. हिच्या मोठ्या टोपलीत दातण, कुंकू.. काळे मणी, सुया इ. वस्तू विक्रीस आहेत. यातील दाभण तर शेतकऱ्यांना पोती शिवायला.. महिलांना गोधड्या शिवायला फारच गरजेचा. ही स्त्री वस्तूंची विक्री करण्यासाठी मिश्किल पण उपयुक्तता दर्शवणारी जाहिरात.. खरेदीसाठी आवाहन आपल्या सुरेल स्वरात करतेय.*     

        *कधी चकण्या राधाबाईला काजळ.. तर आखूड केसांच्या गोदाताईला गंगावन घ्या म्हणतेय. तान्हुल्या बाळासाठी काळ्या मण्याचे मनगटी वाळे अन् दृष्ट लागू नाही म्हणून माळा घ्या म्हणतेय. सोन्याच्या तुलनेत नगण्य किमतीचे हे काळे मणी आहेत. पतीचे महत्त्व सोन्यापेक्षाही जास्त, काळ्यामण्याच्या पोतीच्या स्वरुपात त्याचे दर्शन घडते. सोन्याला जीव लावून जपता त्यापेक्षाही याचे महत्त्व जास्त आहे असे ही महिला सांगतेय. या काळ्या पोतीने घरधन्याचे आयुष्य वाढणार आहे. हे मंगळसुत्र अगदी सती सावित्री.. माता रुख्मिणीही घालायची एवढे याचे महत्त्व आहे. याची जणीव करून देतेय.*       

        *आजकाल मॉल संस्कृती वाढलीय तरीही अशा लहानसहान वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मंडळीकडून भाव न करता आवर्जून वस्तू विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे एक सुसंस्कृत समाजाचे लक्षण. चार पैसे त्यांना मिळावेत ही उदात्त भावना.*                      

        *कसारा येथे राहणारे सुप्रसिद्ध लोकगीतकार कवी प्रकाश पवार यांनी लिहलेले हे गाजलेले भारुड लोकगीत. सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्या कुटुंबातील रंजना शिंदे यांनी १९७४ साली सुरेल गात अजरामर केले आहे.*


🌹⚜️🌸🥀🎶🥀🌸⚜️🌹


  *बाई सुया घे गं दाभन घे..*

  *दाताच दात्वन घ्या गं कुणी*

  *कुंकु घ्या कुणी काळं मणी*

  *बाई सुया घे गं दाभन घे..*


  *चकण्या डोळ्याच्या राधाबाई*

  *तुम्हा काजळ शोभा देई*

  *आखूड केसांच्या गोदाताई*

  *तुम्ही केसाळी वापरा बाई*

  *टकमका बघतील साऱ्याजणी*


  *खाली बसा ओ बाईसाब जरा*

  *डोकं खाजवू नका खरखरा*

  *भांगाभांगात पावडर भरा*

  *उवा लिखांचा नायनाट करा*

  *उवांची घ्या ही बारीक फणी*


  *तुमच्या तानुल्या गोजिऱ्या बाळा*

  *घ्या मनगटी पायात वाळा*

  *तो गोरा असो की काळा*

  *दृष्ट मण्यांच्या घ्या ह्या माळा*

  *पोपट बाहुली घ्या चिमणी*


  *जीव लाविता जसा सोन्याला*

  *जपा बायानो काळ्या मण्याला*

  *माग आयुक आपल्या धन्याला*

  *काळी पोत घ्या बारा आण्याला*

  *सावित्री अव: रुक्मिणी*

 

🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : प्रकाश पवार*  ✍  

  *संगीत : मधुकर पाठक*

  *स्वर : रंजना शिंदे*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧




🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

Saturday, November 23, 2024

कर्तव्यकर्म

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩* 




*अभिमान  न  धरता  कर्तव्यकर्म  करावे .*


'मला कळत नाही' असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने, 'मला सर्व समजते' असे मानून जगात वावरत असतो. खरोखर, अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल; कारण हरळी वाढली तर ती दिसते, आणि म्हणून ती उपटून तरी टाकता ह्येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गांत मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे; आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्‍गुरूला अनन्यभावाने शरण जाऊन, अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय.


चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न, बी उत्तम असणे जरूर आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित्‌ आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली. तरीपण पुढे असे अनुभवाला येते की, काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात्‌ फळे मिळायची बंद होतात, आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की, आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की, ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ करून देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल ? 'कोणतीही नाही' असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही, असे म्हणावे लागते. याकरिताच, भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे, हाच सुखाचा मार्ग आहे, आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की, 'हे देवा, तुझी भक्ति तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर.' त्या दृष्टीने आपणही प्रयत्‍न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो, आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ति करता करता, भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणार्‍या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत्प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.


*१२६ .  खरे  सुख  हे  कायम  टिकणारे  पाहिजे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

असंख्य स्त्रिया

 बायका इतरांशी बोलत नाहीत पण कितीतरी लाख पटीने त्या स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलत असतात. काय बरं बोलत असतील त्या ? बघू तरी....


*सकाळी झोपेतून उठताना..*

आत्ता पावणेसहा वाजले आहेत. सहा वाजता उठेन. पंधरा मिनिटे जरा पडून राहते नाहीतर दिवसभर तेलाच्या घाण्याला बैल जुंपली जातात तसेच दिवसभर मी कामाला जुंपलेलीच असते. तेवढीच पंधरा मिनिटे मला गादीचा सहवास मिळेल. दिवसभर दोघींनाही एकमेकांचा विरह सहन करावाच लागतोच. हा घड्याळाचा काटा कसा दमत नाही कोण जाणे... वाजले सहा.. आता मात्र मला उठावेच लागेल.


*दात घासताना..*

कोणती भाजी करावी. फ्रिजमध्ये तीन भाज्या असतील. कोबी मला आवडत नाही, वांगं ह्यांना आणि कारलं मुलांना.. जाऊ दे,कोबीचीच भाजी करते. असंही आपल्याला आवडीनिवडी राहिल्याच कुठे?


*गॅसजवळ गेल्यावर..*

मस्तपैकी चहा टाकते. गॅसजवळ किती बरं वाटत आहे या थंडीच्या दिवसांत. तेल संपत आले आहे. लवकरच त्याची पूर्तता करावी लागणार.. कढईत जरा तेल जास्त झालेल दिसतंय.. थोडं काढून ठेवते नाहीतर "भाजीत तेल खूप झालं" येईल फोन ह्यांचा.. असंही तेल कमीच पाहिजे. माझी दीदी तर फोडणीचे दाणे भिजतील एवढेच तेल वापरते!


*आंघोळीला जाताना..*

कोणता ड्रेस घालू? कालच पिवळा ड्रेस घातला होता. आज बांधणीचा घालते. कुठे गेली ओढणी? सापडत नाही. नेहमी असेच होते.. कितीही कपडे नीट ठेवले तरी वेळेवर सापडत नाही. पिवळा ड्रेसच अडकवते आता!


*डबा भरताना..*

तीन पोळ्या घेऊ का एखादी कमी करू? वजन वाढतच चालले आहे. थंडीचे दिवस आहेत, भूक खूप लागते. तीनच पोळ्या घेते. भाजी कशी झाली देव जाणो.. चटणीची वाटी राहू दे बाजूला. वेळ झाली, निघायला हवं लवकर..


*कूलुप लावताना..*

गॅस, गिझर ,लाईट बंद केले ना मी? पुन्हा बघावे तर वेळ जाईल.. सगळे चेक केलेले असते पण कुलूप लावताना नेहमी अशीच द्विधा अवस्था होते माझी..


*गाडी चालू करताना...*

ये बाई तू नको नखरे करुस.. माहित आहे मला थंडी खूप आहे. तू जर वेळेत चालू झाली नाहीस तर नक्कीच लेट मार्क लागेल. गणपती बाप्पा मोरया!!! चालू हो गं बाई लवकर...


*गाडी चालवताना..*

श्रीराम जय राम जय जय राम 

श्रीराम जय राम जय जय राम....  खूप लोड आहे कामाचा. आजच्या आज मला करावीच लागणार आहेत..


*पंचिंग करताना..*

हूश्य!!!.. झालं गं बाई वेळेत पंचिंग... पडला आजचा दिवस पदरात.. लेट मार्क लागला नाही ते बरं झालं.. अजून वीस बावीस दिवस जायचे आहेत.. कधी काय अडचण येईल आणि लेट मार्क लागेल सांगता येत नाही.. वेळेतच आलेलं बरे...


*जेवताना..*

भाजी मस्त झाली आहे आज.. ह्यांना नक्कीच आवडेल, फोन किंवा मेसेज येईलच ह्यांचा..


*चार वाजता चहा घेताना..*

कधी यायचा बाई चहा.. आज मात्र चहाची खूपच गरज आहे. चहा टाळायला पाहिजे.. बसून काम आणि त्यात साखरेचे सेवन.. वजन वाढायला तेवढेच पुरेसं. कमी होताना होतं की 100 ग्रॅम 200 ग्रॅमने आणि तेही खूप खूप मेहनतीने.. किती मन मारू.. घेते बाई चहाचा आस्वाद..


*संध्याकाळी स्वयंपाक करताना..*

कोणती भाजी करू? कंटाळा आलाय.. करते नुसती मुगाच्या डाळीची खिचडी, कढी किंवा टोमॅटोचे सार.. नको नको.. नुसत्या खिचडीवर नाही भागायचे. करतेच सगळा स्वयंपाक..


*किचन ओटा आवरताना..*

पडली तेवढी भांडी धुवून टाकते.. जेवण झाल्यावर जाम कंटाळा येतो भांडी घासायला..


*झोपताना..*

बघते जरा थोडावेळ मोबाईल.. (स्टेटस बघत असताना) किती एन्जॉय करतात या बायका.. कसा वेळ मिळतो यांना देव जाणो. मला कुठे बाहेर जायचं म्हणलं की किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात.. त्यापेक्षा बाहेर पडायला नको असं वाटतं.. हीच्या भावाचं लग्न झालेलं दिसतंय.. गळ्यात काय सुंदर दागिना घातलाय..  बघते जरा  झूम करून. ही गेलेली दिसते बाहेर कुठेतरी फिरायला. मस्त दिसते जिन्समध्ये... हीच्या घरी झालेलं दिसते हळदी कुंकू, मला नाही बोलावले... पुढचे फोटोच नको बघायला... अरे बाबा कशाला लटकतोय ट्रेनमध्ये.. जरा जाऊन बस की आत! कशाला शायनिंग मारतोय..


*झोप आली असताना..*

चला झोपा लवकर आता उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचंय..


*मध्यरात्री जाग आली असताना..*

आत्ताशी तीन वाजले आहेत. मला वाटले सहा वाजले. अजून तीन तास झोपायला मिळेल आपल्याला...


आनंदित होऊन रग ओढून गाढ झोपून जाणारी मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया..                      🌸🌸🌸

Friday, November 22, 2024

कलंक

 *ना कलंक लग जाए…*


कोणातरी देशाचा एक राजा होता. बरेच वर्ष राज्य त्याने भोगले. केस पांढरे झाले, वय झाले तरीही त्याने राज्याचा त्याग केला नव्हता. त्याच्या राज्यरोहण समारंभाच्या दिनानिमित्त त्याने एक उत्सव करायचे ठरवले. देशोदेशीच्या सर्व राजांना व आपल्या गुरूंना आमंत्रणे पाठवली. उत्सवाची सांगता आणि मुख्य आकर्षण होते एक जगप्रसिद्ध नर्तकीचा नृत्याविष्कार.


राजाने या उत्सवा निमित्ताने आपल्या गुरूंना जरा जास्तच दक्षिणा दिली जेणे करून जर गुरुजींना नर्तकीला काही बक्षीस द्यावेसे वाटले तर त्यांच्याकडे पुरेसे पैसे असावेत.


संपुर्ण रात्रभर नर्तकी नृत्य करीत होती. प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन नृत्य पहात होता. इतक्यात त्या नर्तकीचे लक्ष आपल्या तबलजी कडे गेले आणि तिच्या लक्षात आले की तो पेंगत आहे आणि त्याला सावधान करणे गरजेचे आहे नाहीतर आत्तापर्यंत केलेल्या सर्व अविष्कारावर पाणी पडेल, प्रेक्षकांचा रसभंग होईल आणि राजा शिक्षा करेल ते वेगळे. त्याला जागे करण्यासाठी ती एक दोहा म्हणते


_*बहू बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई।*_

_*एक पल के कारने, ना कलंक लग जाए॥*_


या दोह्याचा उपस्थितांनी आपल्या आपल्या पद्धतीने अर्थ काढला…


▪️तबलजी सावधान झाला व त्याने आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले.


▪️ गुरुजींनी राजाने त्यांना दिलेली सर्व संपत्ती त्या नर्तकीच्या चरणी अर्पण केली.


▪️ राजकुमारी ने आपल्या गळ्यातील अतिशय मूल्यवान हार त्या नर्तकीला दिला.


▪️ राजपुत्राने आपल्या शिरावरील मुकुट त्या नर्तकीला दिला.


राजा आश्चर्यचकित झाला. गेली संपूर्ण रात्र ही नर्तकी नाचत आहे पण या एका दोह्यात असे काय आहे? की या सर्वांनी आपल्या कडील अतिशय मूल्यवान वस्तू त्या नर्तकीला समर्पित केल्या.

राजा त्या नर्तकीला म्हटला की "एक सामान्य नर्तकी असूनही  एका दोह्याने तू या सर्वांना जिंकलेस. असे या दोह्यात आहे तरी काय" 

मित्रांनो पुढील प्रसंग आता लक्षपूर्वक वाचा


▪️राजाचे गुरुदेव उभे राहिले आणि अश्रू भरल्या डोळ्याने म्हणाले *"हे राजा हीला सामान्य नर्तकी म्हणून हीन लेखू नकोस. ती आता माझी गुरू आहे कारण या एका दोह्याने तिने माझे डोळे उघडले आहेत. तिने मला सांगितले की इतकी वर्षे सर्व उपभोग सोडून तू तपश्चर्या केलीस आणि आता शेवट जवळ आला असताना या ऐहिक गोष्टींत का अडकलास? एका नर्तकीचे नृत्य पाहून आपली साधना का नष्ट करीत आहेस? हे राजा मी निघालो."* असे म्हणून गुरुजी मार्गस्थ झाले.


▪️राजकुमारी म्हणाली *"इतके वर्ष झाली पण राज्याच्या धुंदीत आपण विसरलात की माझे लग्नाचे वय निघून चालले आहे त्यामुळे मी आजच आपल्या सेवका बरोबर पळून जाणार होते परंतु हिच्या या दोह्याने मला सद्बुद्धी दिली की उतावळी होऊ नकोस. तुझे लग्न कधी तरी होणारच आहे. मग आजच आपल्या वडिलांना का कलंकित करते आहेस?"*


▪️राजपुत्र म्हणाला  *"आपण वृद्ध झाला आहात तरीही राज्याचा त्याग न केल्यामुळे मी राज होऊ शकत नाही, म्हणून आजच मी माझ्या सैनिकांद्वारे आपली हत्या करणार होतो. हिच्या दोह्याने मला समजावले अरे मूर्खां राजा काही अमर नाही त्यामुळे कधीतरी हे राज्य तुझेच आहे मग कशाला पितृहत्येचा कलंक लावून घेतो आहेस. थोडा धीर धर"*


आता जेंव्हा हे सर्व राजाने ऐकले तेंव्हा त्यालाही आत्मज्ञान झाले. त्याच्या मनात वैराग्य दाटून आले. त्याने लगेचच आपल्या राजपुत्राला राज्याभिषेक करविला. मुलीला उपस्थित राज्यांमधील योग्य राजाची निवड करायला सांगून तिचे लग्न लावून दिले. स्वतः आपल्या राणी सह वनात आपल्या गुरुजींकडे निघून गेला.

आता हे सर्व बघून त्या नर्तकीने विचार केला की *"माझ्या एका दोह्याने इतक्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले, परंतु माझे काय?"* आणि मग तिनेही ठरविले आणि तिने आपल्या या निषिद्ध वृत्तीचा त्याग केला व देवाची प्रार्थना केली _*"हे प्रभो! माझ्या पापांची मला क्षमा करा. यापुढे मी  फक्त तुझ्या नावाचे  गुणगान कारेन व उर्वरित आयुष्य तुझ्या सेवेत घालवेन"*_


वाचकहो,  उपरोक्त कथा या परिस्थितीत आपणासही लागू नाही का होत?

_*बहू बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई।*_

_*एक पल के कारने, ना कलंक लग जाए॥*_


 

संगत

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री ‌ ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*सत्संगतीत  राहावे .*


नेहमी संतांची संगत करावी. परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्याजवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार ? त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात, ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषयलालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का ? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का ? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते; आणि भेट झाल्यावर, जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात.


एकजण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे, कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे, सदा मुद्रा खिन्न असे. कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्‍गुरु म्हणाले, "माझा तो वेडा कुठे आहे ? तो आज का आला नाही ?" हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला, आणि जो तिथून निघाला तो पुनः आलाच नाही ! तो कशाला येईल ? गुरूने एकदा आपल्याला 'आपले' म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले, आणि म्हणून त्याचे काम झाले. गुरू तुम्हाला 'तुम्ही माझे झाला' असे म्हणत असतानासुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता, आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. 

या‍उलट, गुरू तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर आज विश्वास बसायचा नाही; पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते.


मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी; त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील; ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते.


*१२५ .   संत  सांगतील  तेच  करणे  हीच  त्यांची  खरी  सेवा  होते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, November 21, 2024

नामगजर

 प.पु.श्री डोंगरे महाराज हे प्रकांड पंडित, व्यासंगी व प्रसिद्ध भागवत कथाकार होते तसेच ते संत पदाला पोहोचलेले अधिकारी पुरुष होते. ते मालाडला प.पु.श्रीगोंदवलेकार महाराजांच्या दर्शनाला येत असत. 

असेच ते एकदा दर्शनाला आले असता त्यांनी आपल्या मनातील खंत श्री गोंदवलेकर महाराजांकडे व्यक्त केली. ते म्हणाले *" मी इतक्या लोकांना नामाचे महत्व सांगतो पण माझ्याकडून हवे तितके नामस्मरण होत नाही."* त्यावर श्रीमहाराज म्हणाले " तुमची कथा ऐकायला किती लोक येतात?" 

त्यावर हे म्हणाले " पन्नास साठ हजार " असे त्यांनी उत्तर दिले. त्यावर श्रीमहाराज म्हणाले  *"तुम्ही कथेमधे इतक्या लोकांकडून नामगजर करवून घेता तेव्हा तितके लोक नाम घेतात व त्यांना नामाचे महत्व समजते. 

घरी बसून काही एक तास जप करण्यापेक्षा अनेकांनी लक्षावधी रामनाम जपाचा डोंगर रचला जाणे महत्वाचे आहे , नाही का ? आपण नाम घेणे हे पुण्याचे काम आहे त्यामुळे उपासनेस तेज येते. 

आपण नाम घेणे हे स्नान करण्यासारखे आहे , ज्यामुळे वैयक्तीक स्वच्छता होते ; पण इतरांना नामाला लावणे हे घर स्वच्छ करण्यासारखे आहे. ज्याचा लाभ आणि प्रसन्नतेचा अनुभव घेणाऱ्या प्रत्येकाला मिळतो."* हे ऐकून पु.श्रीडोंगरे महाराजांच्या मनातील खंत गेली व नामाला समाधानाची जोड मिळाली.

प्राणायाम

 नाम हे मुखाने घेतले जाते. वाणीला प्राणांचा आधार आहे. नामस्मरणाने प्राणांवर नियमन येते. म्हणजे प्राणायाम साधतो. नाम घेता घेता एक लय येते व नामात रस येतो.हा रस लौकिक रसापेक्षा वेगळा असतो. ह्या रससेवनेने प्रत्याहार साधतो. नामाची धारणा तयार होते व ध्यान आणि समाधीही साधतात. 

एकदा पु.श्री.बेलसरे यांनी श्री. गोदवलेकर महाराजांना विचारले की नाम घेणाऱ्या सर्वांनाच नाद, प्रकाश इत्यादी अनुभव का येत नाही. श्रीमहाराज म्हणाले गुहागरला जायला दोन मार्ग आहेत. एक मोटारीने व दुसरा बोटीने. मोटारीने जाताना मैलाचे दगड लागतात, पण बोटीने जाताना तसे होत नाही.

 आपला मार्ग हा बोटीचा आहे. एका साधकाने एकदा श्रीमहाराजांना विचारले की नाम घेताना आपल्या प्रतिमेचे ध्यान करावे की पादुकांचे म्हणजे मन एकाग्र होईल? श्रीमहाराज म्हणाले " एकीकडे नाम आणि एकीकडे प्रतिमेचे ध्यान करताना चित्त एकाग्र कसे होईल.एकाग्र चित्त फार पुढची गोष्ट आहे. नामात मी आहे ते सोडून अन्य गोष्टी कशाला ? नामातच मला पाहावे."

मानसपूजा


             श्रीराम,
   मानसपूजेत ईश्वराला म्हणावे, आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे आणि फक्त तूच तू पुरावे ||म्हणजे ईश्वरा किंवा सद्गुरू नाथा 'तुमच्या शिवाय मला कोणी नाही, अशा अनन्य भावनेने शरणागत होऊन मानसपूजा करावी. बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्व समर्पण युक्त केलेली देवतेची पूजा म्हणजे मानसपूजा.
              आपण रोज घरी देवपूजा करतो, पण त्यात आपले मन क्वचितच रमते. नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती खरंतर एक औपचारिकता झालेली असते. वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने बाह्यकर्म, पूजा अर्चा जमत नाही तिथे चित्ताची बैठक किंवा स्थिरता कशी निर्माण होणार?
                सगुणाचेनि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे' असे समर्थ म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्गुण अवस्थेपर्यंत पोहचण्याइतपत सातत्य आणि निष्ठा आपल्याकडे नसते. अशावेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा होय. ह्यात मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते.
        सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा.
                          ||श्रीराम ||

Wednesday, November 20, 2024

अर्पण

 श्री महाराजांना अर्पण  ----

      श्रीमहाराजांचा प्रत्येक अनुयायी म्हणतो की श्रीमहाराजांनी आमच्या लायकीपेक्षा जास्त आम्हाला दिले आहे. आम्ही श्रींनी सांगितल्याप्रमाणे वागत नाही तरीही श्रीमहाराज आमचे एवढे लाड कसे करतात हेच समजत नाही. श्रीमहाराज म्हणतात," एखादे सात-आठ महिन्यांचे सुंदर, बाळसेदार मूल असते, आईच्या अंगावर पीत असता आईला लाथा मारते. खरे म्हणजे मुलाने आईला लाथा मारू नयेत, पण ते आईला लाथा मारते तेव्हां आईला त्याचे आणखीच प्रेम येते.  तसे मी ज्याला माझा म्हटला, त्याची त्याला जाणीव नसली तरी मला त्या आईसारखे होते."

      श्रीमहाराजांचे उतराई होण्यासाठी त्यांची सेवा करायचा विचार केला तर श्रीमहाराज म्हणतात," तुम्ही सर्वजण म्हणता की आम्ही तुमची सेवा करण्यास आलेलो  आहोत, परंतु मलाच तुमची सेवा करावी लागते. माझी सेवा तुम्ही जी केली ती आपल्या देहबुद्धीची केली.तुम्हाला जे पसंत पडेल, तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे."

      आम्हाला नामस्मरण करणे काही  नीट जमत नाही, मग श्रीमहाराजांना काही अर्पण केले तर ! श्रीमहाराज म्हणतात,"ज्याच्याजवळ जी वस्तू नाही ती दिली तर त्याला आनंद होईल." अगदी खरं आहे. एखाद्या भिकारीला शंभर रुपये दिले तर तो खुष होईल, पण तेच जर एखाद्या लक्षाधिशाला दिले तर त्याला आनंद होईल का ? मग श्रीमहाराजांना काय बरे द्यावे ? ---------


महाराज तुम्हा वाटे द्यावे काही ।

 परि काही नाही मजपाशी।। धृ ।।

जमविले धन ठेवुनिया ध्यान। 

असे नामधन तुम्हापाशी ।। १।।

देऊ बघू घर असे हे सुंदर। 

अवघा संसार तुम्हा हाती ।।२।।

अर्पावे हे तन अपुले चरण। 

नाही खात्री क्षण तुम्हा ठाव।।३।।

माझा अहंकार घ्यावा तो सत्वर । 

नाही कणभर तुम्हापाशी।।४।।

' *मना* ' वाटे आज सोडवावा माज। 

नामाचिया काज तुम्हासंगे।।५।।

               ----- डॉ. मनोहर वर्टीकर

सियालकोट

 *मतदान न करण्याची शिक्षा*

            *सियालकोट* 

*लम्होने खता की थी, सदियों ने सजा पाई l*

 नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे आणि आता लगेच दुसऱ्या टप्प्याचे मतदान समोर उभे आहे. नंतर आणखी पाच टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले म्हणून इतिहासातील एका घटनेची आठवण करून द्यावीशी वाटते. मतदान केले नाही तर त्याची शिक्षा किती पिढ्यांनी भोगली आणि देशाने त्याची किती मोठी किंमत मोजली हे या घटनेवरून लक्षात येईल. 

ही घटना आहे १९४६ मधील, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व फाळणीच्या अगोदरची. सियालकोट, पाकिस्तान मधील पंजाब प्रांतचा एक जिल्हा. लाहोर पासून याचे अंतर १३५ किलोमीटर आहे आणि जम्मू पासून फक्त ४२ किलोमीटर. गोपीनाथ बारडोलोई हे आसाम मधील आणि देशाचे मोठे नेते होते. सियालकोट हे फाळणीच्या वेळी भारतामध्ये राहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. सियालकोट हा त्यावेळी हिंदू बहुल प्रदेश होता. तरीही असे ठरले की जनमत संग्रह घेऊन निकालाच्या आधारावर सियालकोट भारतात राहील का पाकिस्तानात जाईल हे ठरवायचे होते. जनमत संग्रहाची तारीख, वेळ आणि प्रक्रिया सर्व ठरले. मतदानाचा दिवस उजाडला. सकाळपासून मतदान सुरू झाले. मुसलमान सर्वात आधी सकाळी लवकर उठून मतदानासाठी रांगा लावून मतदान करू लागले. मोठ्या रांगा लागल्या. हिंदू निवांत उठले. जेवण वगैरे करून दुपारी मतदानासाठी आले. बघतात तर समोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही हिंदू रांगा बघूनच मतदान न करता घरी निघून गेले. काही हिंदू रांगेत उभे राहून कंटाळून घरी परत निघून गेले. 

मतदानाचा निकाल आला. आणि ५५,००० मतांनी सियालकोट पाकिस्तानात सामील होण्याचा प्रस्ताव पास झाला. कारण एक लाख हिंदूंनी मतदान केले नाही. १९४१ च्या जनगणनेनुसार सियालकोटची एकूण हिंदू संख्या दोन लाख एकतीस हजार होती. पैकी एक लाख हिंदूंनी मतदान केले नाही. मुसलमान संख्येने कमी असूनही सर्वांनी मतदान केल्यामुळे सियालकोट पाकिस्तानात सामील करायचे ठरले गेले .

यानंतर १६ ऑगस्ट १९४६ चा काळा दिवस उजाडला. जिन्नांनी "डायरेक्ट ॲक्शनची" घोषणा केली. त्याचा प्रहार सियालकोट वर पण झाला. मोठ्या प्रमाणावर हिंदू स्त्रियांची अब्रू लुटून हत्या करण्यात आली आणि हिंदू मुले आणि पुरुषांची कत्तल करण्यात आली. मतदानाच्या दिवशी जे आराम करून घरी विश्रांती घेत राहिले ते कायमच्या विश्रांतीसाठी देवाघरी पाठविले गेले.

त्यानंतर १९५१ च्या जनगणनेनुसार सियालकोटची हिंदू संख्या केवळ दहा हजार राहिली. सन २०१७ मधे ही संख्या आता फक्त पाचशे एवढी राहिली आहे. आज सियालकोट मधे एक तरी हिंदू राहिला असेल असे वाटत नाही. १९४६ ला जर हिंदूंनी मतदान केले असते तर सियालकोट भारतात राहिला असता आणि सर्व हिंदू पिढ्या दिमाखात राहिल्या असत्या. आपले एक मत न देण्याने काय होते याचे इतिहासातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सियालकोट. हिंदू, त्यातल्या त्यात शहरी हिंदू, हा राष्ट्रीय निष्ठेला कमी जागरूक आहे. शहरी हिंदू मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून मजेत दिवस घालवतो आणि मतदान न करता सर्व कामे सरकारने करावीत ही अपेक्षा ठेवतो. या उलट ग्रामीण लोकसंख्येने अशिक्षित असून सुद्धा मतदान करून लोकशाही अजून जिवंत ठेवली आहे. अजूनही जर प्रत्येक हिंदू मतदाता जागरूक होणार नसेल तर भारताचे सियालकोट होण्याला उशीर लागणार नाही. आणि इथून पुढील हिंदू पिढींना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल हे इतिहास आणि सियालकोटच्या घटनेने दाखवून दिले आहे.

*जागे व्हा आणि मतदान अवश्य करा*


*सागर आफळे*

Tuesday, November 19, 2024

नियम

 *मानवी सवय...*

*(एक खरी गोष्ट)*


पुण्यातील एक महिला   *पेइंग गेस्ट* ठेवते. तिचे स्वतःचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये १०-१२ मोठ्या खोल्या आहेत. 

प्रत्येक खोलीत ३ बेड ठेवले आहेत. त्यांच्याकडे रुचकर जेवणही उपलब्ध आहे, जे तेथील प्रत्येकाला आवडते.

 बरेचसे नोकरदार लोक व विद्यार्थी त्यांच्या *PG* मध्ये राहतात.

प्रत्येकालाच सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळते, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवणही पॅक करुन मिळते.


पण त्या बाईंचा एक विचित्र नियम आहे. तिथे प्रत्येक महिन्यात *फक्त 28 दिवसच* अन्न शिजवले जाते.

उरलेले २-३ दिवस सगळ्यांना बाहेर खावे लागते. तेथील किचनमध्येही शिजवू दिले जात नाही.

 किचन सुद्धा फक्त 28 दिवस खुले असते. उरलेले दिवस बंद !


मी त्यांना विचारले, हे असे का? किती विचित्र नियम आहे हा ! तुमचे किचन फक्त २८ दिवसच का सुरू असते ?


त्या म्हणाल्या, आम्ही फक्त 28 दिवसांसाठी जेवणाचे पैसे घेतो. म्हणून किचन फक्त २८ दिवसच चालते.


मी म्हणालो, हा विचित्र नियम तुम्ही बदलत का नाही ? 


त्या म्हणाल्या, नाही, नियम म्हणजे नियम !


पुन्हा एके दिवशी मी त्यांना चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावरुन.


त्यादिवशी त्या म्हणाल्या, "तुला माहित नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने स्वयंपाक करून यांना खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमीच असमाधानी, नेहमी टीका करणार...


त्यामुळे वैतागून २८ दिवसांचा हा नियम केला. २८ दिवस इथे खा आणि उरलेले २-३ दिवस बाहेर खा.

*त्या ३ दिवसांत त्यांना बरोबर नानी आठवते..!*

मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि निकृष्ट अन्न मिळते हे कळते..


माझी *किंमत त्यांना या ३ दिवसांतच कळते.* त्यामुळे आता उरलेले २८ दिवस ते सुतासारखे सरळ राहतात.

 जास्त आरामाची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.


 *अशीच परिस्थिती सध्या देशात राहणार्‍या काही जणांची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक गोष्टीत नेहमीच काही ना काही उणिवा दिसतात.*


*अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक होत नाहीये आणि होणारही नाही.*


 *अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावेत, म्हणजे त्यांची बुद्धी ताळ्यावर येईल व या देशाचे महत्त्व त्यांना कळेल !*

Monday, November 18, 2024

किमया

 सूत्रधाराची किमया


तो शनिवार होता. हॅाटेल ओबेरायमध्ये प्रसिध्द उद्योगपती रत्नपारखी ह्यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी ऐन रंगात आली होती. उंची वेष धारण केलेले पुरूष आणि उंची वेषाबरोबरच दागिन्यांनी आणि प्रसाधनांनी नटलेल्या स्त्रीया हातात मद्याचे चषक घेऊन गटागटाने टेबलाभंवती बसून किंवा उभ्यानेच मनमोकळ्या गप्पांचा आनंद लुटत होते. 

श्रीयुत साळुंके, एक यशस्वी बिझनेसमन आपल्या दोन मित्रांबरोबर एका टेबलाशी बसले होते. त्यांनी परिधान केलेला गर्द निळा सूट, त्यांच्या बोटांतील अनेक अंगठ्या, कोटाच्या खिशात ठेवलेल्या घड्याळाची कोटावर रूळणारी चेन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांची श्रीमंती दाखवत होत्या. त्यांचे घट्ट मिटलेले ओठ, बारीक तपकिरी डोळे, पेन्सिलीने आंखल्यासारख्या वाटणाऱ्या त्यांचा कोरीव मिशा, ह्या सर्वांतून त्यांचा धूर्तपणा जाणवत असला तरी रुबाबदार व्यक्तीमत्वाची छाप पडल्याशिवाय रहात नसे. त्यांचा कंबाला हीलवर फ्लॅट होता आणि त्यांच्याकडे दोन कार होत्या, एवढे भांडवल त्यांना मुंबईच्या “हाय सोसायटीत” वावरायला पुरेसे होते.


श्री साळुंके शेजारी बसलेल्या इन्कम टॅक्स एक्सपर्ट कोतवालांच्या म्हणण्याला मान डोलावत होते पण त्यांचे कोतवालांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. साळुंकेंचे डोळे त्यावेळी मिसेस पंजवानींवर खिळलेले होते. मध्यम वय उलटलेल्या पंजवानी दिसायला जेमतेमच होत्या. त्यांत आता त्यांच्या देहाचा विस्तार त्यांच्या आवाक्यांत राहिला नव्हता पण ह्या सर्वांची कमतरता त्यांनी बहूमूल्य अलंकार घालून भरून काढली होती. त्यांतही त्यांनी गळ्यात घातलेला हारही सर्वांचीच नजर खेंचून घेत होता.   साळुंके तर अशा वस्तुंचे दर्दी. मिसेस पंजवानीकडे, विशेषत: त्यांच्या गळ्यातील हारा कडे पहातां पहाता ते मनांत त्या हाराची किंमत ठरवत होते आणि त्यांच्या मनांत एक योजना तयार होत होती. 

जनरल इन्शुरन्स, इंम्पोर्ट-एक्स्पोर्ट, हे जरी साळुंक्यांचे दाखवायचे व्यवसाय असले तरी कमी श्रमांत जास्तीत जास्त पैसा कमाविण्याच्या अनेक व्यवसायांशी होता. फोर्ट मार्केट येथील घोगा स्ट्रीटवरील त्यांच्या ॲाफिसांमघ्ये अशा अनेक योजनांचे आराखडे तयार होत. स्वत:चा प्रत्यक्ष  संबंध न येऊ देता, ते अशा योजना आपल्या हस्तकांकरवी पार पाडत असत.


छगनलाल मारवाडी हा त्यापैकीच एक. त्याचं जव्हेरी बाजारात दुकान होतं. मुख्य धंदा अर्थातच चोरीचा माल विकत घेणं हाच होता. त्याचा अनेक चोरांशी नियमित संबंध येत असे. उच्चभ्रू समाजात वावरून मिळवलेल्या माहितीच्या जोरावर साळुंके चोरीच्या, घरफोडीच्या योजना आंखून त्या छगनलालला कळवत. साळुंक्यांकडून माहिती आली की छगनलाल योग्य व्यक्तीवर कामगिरी सोंपवत असे. तो साळुंक्याना प्रत्यक्ष ओळखत  पण त्यांनी फोनवर कळवलेली माहिती अचूक असते आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे कामगिरी पार पाडल्यास मोठा लभ्यांश पदरी पडतो, ह्याची त्याला खात्री पटली होती. आणि अशाच मोजक्या पण मोठ्या चोऱ्या आंखून साळुंके लक्षाधीश बनले होते. 

मिसेस पंजवानींचे अलंकार आणि त्यांतही त्यांचा हिरेजडित हार पाहून साळुंक्यांच्या डोक्यांतील योजनाकार काम करू लागला होता. त्यांच्या आणि पंजवानींच्याही ओळखीच्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीचा विवाह दोनच दिवसांनी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी होता. त्या विवाहाला मिस्टर आणि मिसेस पंजवानी हजर रहाणार होते. अर्थात आपले अलंकार मिरविण्याची अशी संधी मिसेस पंजवानी सोडणचं शक्य नव्हतं. म्हणजे मंगळवारपर्यंत ते अलंकार बॅंकेच्या लॅाकरमध्ये न जाता पंजवानींच्या घरीच रहाणार होते. तेव्हां सोमवारीच ते दागिने त्या हारासह पंजवानींच्या जीवन सोसायटीतील पांचव्या मजल्यावरील फ्लॅटमधून चोरीला जायची व्यवस्था करायला हवी होती. 

पार्टीहून परतताना साळुंके धुंदीतच होते पण मद्याच्या नव्हे तर आपल्याच योजनेच्या. रात्री बिछान्याला पाठ लागेपर्यंत त्यांची योजना मनांत तयार झाली होती. पंजवानीच्या फ्लॅटची रचना आणि घरांतील मंडळी ह्यांची त्यांना माहिती होती. पंजवानी उद्योगी आणि कर्तबगार कारखानदार होते. मिसेस पंजवानी हौशी समाजकार्यकर्त्या होत्या. दर सोमवारी नियमाने त्या आनंद अनाथाश्रमाला भेट द्यायला जात असत. आनंद अनाथाश्रम चालवणाऱ्या ट्रस्टच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याशिवाय पंजवानींच्या घरी त्यांची कॅालेजांत शिकणारी कन्या डॅाली आणि स्वैंपाकीण अशा दोन व्यक्ती होत्या. 

मिसेस पंजवानी बाहेर गेल्यानंतर घरांत संध्याकाळी सातपर्यंत स्वैपाकीण एकटीच असणार. सोमवारी दुपारी तीन साडेतीनची वेळ नामी होती. पंजवानींच्या घरांत प्रवेश मिळवणं कठीण नव्हतं. त्यांच्या लघुउद्योगापैकी एका औषधनिर्मितीच्या कारखान्यांतून औषधे पाठवली आहेत, असं सांगून ती आंत ठेवायला सहज प्रवेश मिळणार होता. सगळी योजना मनाशी पक्की झाल्यावरच सांळुंक्याना झोप लागली. 


दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी नऊ वाजता सांळुंके घराबाहेर पडले. चर्चगेट स्टेशनकडे येऊन त्यांनी गाडी दूरवर पार्क केली. स्टेशनवरील पब्लिक बूथमधील टेलिफोनवरून त्यांनी छगनलालचा नंबर फिरवला. सांकेतिक भाषेंत ओळख देताच छगनलाल कान टवकारून ऐकू लागला. साळुंक्यांनी त्याला बारीकसारीक तपशीलासह आपली योजना समजावून सांगितली. दागिन्यांच वर्णन आणि अदमासे किंमत ऐकून छगनलालचे हिशेबी डोळे लकाकले. फोनवरचे बोलणे ऐकता-ऐकता त्याच्या डोळ्यासमोरून सराईत चोरांची, टोळ्यांची नांवे सरकत होती. सीताराम नांवाच्या, तोपर्यंत एकदाच पकडला गेलेल्या, अट्टल चोराचं नांव तेव्हाच त्याने मनाशी नक्की केलं. 

पंजवानी कुटुंबात सोमवार नेहमीप्रमाणे उजाडला. बरोबर आठ वाजता पंजवानी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर मात्र नेहमीच्या वेळापत्रकांत बदल करणारी गोष्ट घडली. स्वयंपाकीणबाईने अकरा ते सहा बाहेर जाण्याची परवानगी मागितली.  थोडसं कुरकुरत कां होईना पण मिसेस पंजवानीना तिला परवानगी द्यावी लागली. त्याचवेळी डोकं दुखू लागल्यामुळे डॅालीने कॅालेजमध्ये न जाण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. मिसेस पंजवानीना ही गोष्ट पथ्यकरच वाटली. अकरा वाजतां स्वयंपाकीण बाहेर पडली तर दोन वाजतां दुसऱ्या कारने मिसेस पंजवानी अनाथाश्रमाकडे गेल्या. 

स्वयंपाकीणबाई दुपारी घरी नसणारं हे ध्यानात येतांच डॅाली धूर्तपणे डोकं दुखण्याचं निमित्त करून घरी राहिली होती. खरं म्हणजे दुपारच्या एकांताचा तिला पुरेपूर फायदा घ्यायचा होता. सकाळीच मिसेस पंजवानींची नजर चुकवून तिने तिच्या सध्याच्या दोस्ताला, सुरेशला फोन करून दुपारी अडीचला बोलावून घेतले होते. दुपारी बेल वाजतांच डॅाली दार उघडायला धावत गेली. सुरेश तिच्या शब्दाला मान देऊन तिला सोबत द्यायला हजर झाला होता. वेळ मजेत जाणार होता. 


सुरेश ज्यावेळी पंजवानींच्या घरी आला, बरोब्बर त्याच वेळी सीताराम जीवन सोसायटीच्या समोरच्या फूटपाथवर हजर झाला होता. थोडा वेळ तिथेच उभे राहून त्याने जीवन सोसायटीची टेहळणी केली. त्याला पाहून कोणालाही कसलीच शंका येणार नव्हती. त्याचे कपडे एखाद्या कंपनीच्या शिपायासारखे होते. तो सडपातळ आणि सर्वसाधारण उंचीचा होता. त्याचा चेहराही सामान्य होता. वेळप्रसंगी जलद हालचाली करण्याचा चपळपणा त्याच्यात होता. त्याच्यांत असं कुठलेच वैशिष्ट्य नव्हतं की ज्यामुळे त्याच्याकडे लक्ष जावं. तो फार हुशार होता. तिजोऱ्या उघडण्यात त्याची बरोबरी करणारे फारच थोडे होते. 

फूटपाथवर थोडा वेळ काढून सीतारामने जीवन सोसायटीत प्रवेश केला. सुरेशने पंजवानींच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर पंधरा मिनिटांनीच, हातांतली औषधांची, खरं तर हत्त्यारांची, बॅग सांवरत सीतारामने पंजवानींच्या दारावरची बेल वाजवली. 

बेलच्या आवाजासरशी डॅाली दचकली. सुरेशबरोबर ती नुकतीच तिच्या खोलीत गेली होती. बेल वाजताच सुरेशपासून दूर होत ती दरवाजा उघडायला गेली. सुरेशच्या उपस्थितीबद्दल काय सांगायचं ह्याचा ती विचार करत होती. दाराच्या झरोक्यांतून तिला परका माणूस दिसताच तिचा जीव भांड्यात पडला. 

तिने दरवाजाला सेफ्टी चेन लावून दार थोडे उघडले आणि सीतारामला “क्या चाहिये?” म्हणून प्रश्न केला. छगनलालने पुरवलेल्या माहितीप्रमाणे वयस्कर स्वयंपाकीण असणार, असं सांगितलं असतांना ही तरुण मुलगी पाहून सीताराम किंचित गांगरला. तिथूनच परत फिरावं असंही त्याला वाटलं. पण एवढा वेळ पाठ केलेले शब्द सहज त्याच्या तोंडून बाहेर पडले, “पंजवानीसाबने दवाईयां भेजी है!” डॅालीचा पटकन त्यावर विश्वास बसला. मुख्य म्हणजे घरातलंच कोणी आलेलं नाही, हे पाहून ती इतकी निर्धास्त झाली होती की “अच्छा! तो रख दो दवाईंया अंदर!” असे म्हणत, सेफ्टी चेन काढून तिने पटकन दार उघडले. 

सीताराम बॅग सांवरत आंत आला. त्यांने आपल्या तीक्ष्ण कानांनी कानोसा घेतला आणि बॅगेतून औषधे काढण्याच्या निमित्ताने त्याने चटकन क्लोरोफॅार्मचा बोळा काढून  बेसावध डॅालीच्या नाकावर दाबला. डॅाली कांही आवाज न करतांच बेशुध्द पडली. 

सीताराम दबकत पुढे सरकला. तिजोरीची खोली पॅसेजच्या उजव्या हाताला दुसरी आहे, असे त्याला सांगितले होते.  तो त्या खोलीच्या दाराशी पोहोचला न पोहोचला तोंच समोरच्याच डॅालीच्या खोलींतून सुरेश बाहेर आला. क्षणभर दोघे एकमेकांकडे पहातच राहिले. तेवढ्यांत दाराशीच आडव्या पडलेल्या डॅालीकडे सुरेशचे लक्ष गेले. त्याचं तरूण रक्त सळसळलं आणि त्याने सीतारामच्या अंगावर झेप घेतली. 

सुरेशच्या अनपेक्षित हल्ल्याने सीताराम चकीत झाला पण त्या त्वेषपूर्ण हल्ल्याला तोंड देतांना त्याचाही हिंस्त्र स्वभाव जागृत झाला. त्याच्या हातांत मोठा पाना होता. दांत ओठ खाऊन त्याने त्याचे दोन जोरदार फटके सुरेशच्या डोक्यावर मारले. सुरेश गतप्राण होऊन खाली पडला. त्याचा जीव गेल्याचे ध्यानांत येताच मुरब्बी सीतारामने डॅालीला जिवंत सोडण्यांतला धोका ओळखून गळा दाबून तिचाही जीव घेतला. 

त्यानंतर त्याने पंजवानींच्या खोलीत शिरून सहजपणे तिजोरी उघडली. तिला तो हार व इतर अलंकाराबरोबरच भरपूर रोख रक्कम सांपडली, तिचा हिशोब त्याला छगनलालला द्यायची गरज नव्हती. तो सर्व ऐवज बॅगेत भरून जणू कांहीच घडले नाही, अशा आविर्भावांत तो जीवन सोसायटीतून बाहेर पडला. 

चारच्या सुमारास सीताराम छगनलालकडे पोहोंचला आणि रोख रक्कम सोडवू सर्व ऐवज त्याने त्याच्या स्वाधीन केला. सीतारामने ह्या कामांत दोन खून करावे लागल्याचे सांगून छगनलालकडून जास्त पैशांची मागणी केली. खून झाल्याचे ऐकताच छगनलालचे पाय लटपटले पण त्या मौल्यवान हाराचा आणि अलंकाराचा मोह होताच. सीतारामची मागणी पुरी करून त्याला दुसऱ्या लांबच्या राज्यांत पळून जायला सांगून तो दागिन्यांची व्यवस्था करायला लागला. 


ठीक साडेसहा वाजतां श्री साळुंके आपल्या ॲाफिसमधून सी.टी.ओ. मध्ये आले आणि तिथल्या पब्लिक फोनवरून त्यांनी छगनलालला फोन केला. छगनलालने दिलेली बातमी विशेष चांगली नव्हती. छगनलालच्या माणसाने कामगिरी पार पाडली होती पण त्याच्या हातून दोन खून घडले होते. म्हणजे पोलिस आता ह्या प्रकरणाचा कसोशीने पाठपुरावा करणार होते. छगनलालने त्यांच्या वाटणीची रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा करायचे मान्य केले. ते त्यांच्या ॲाफिसमध्ये परत येऊन बसले, तेव्हा स्वत:शीच हंसत होते. एका भलत्याच नांवाने ठेवलेल्या त्या अकाउंटमधली रक्कम काढून घेण्याची व्यवस्था केली की त्यांचा ह्या प्रकरणातील संबंध संपणार होता. 

पंजवानीच्या घरी कुणाचे खून झाले असतील, ह्याबद्दल त्यांनाही कुतुहल होते. त्यांच्या योजनेप्रमाणे त्यावेळी फक्त स्वयंपाकीणबाई त्यावेळी घरांत असायला हवी होती. मग तिचा आणि मिसेस पंजवानींचा खून झाला की तिचा आणि ….. पण कांही असो. ते स्वत:च्या मनाची समजूत घालत होते. 

त्यांचा त्या खूनांशी कांहीच संबंध नव्हता. पोलीसांचे हात, सूत्रधारापर्यंत, त्यांच्यापर्यंत  कधीच पोहोचणे शक्य नव्हते. 

एवढ्यांत त्यांचा फोन घणघणला. त्यांनी चटकन् फोन उचलून कानाशी धरला व म्हणाले, “साळुंके स्पिकींग” पलीकडून गंभीर आवाज आला, “मी इन्सपेक्टर साळवी बोलतोय. साळुंके साहेब, आपण जरा तांतडीने जीवन सोसायटीतील मिस्टर पंजवानींच्या घरी या.” “मी.. मी.. माझे काय काम आहे तिथे पंजवानींकडे?” साळुंक्याना दरदरून घाम फुटला. त्यांना कांहीच सुचेना. 

तेवढ्यांत इन्सपेक्टर साळवींचा आवाज परत त्यांच्या कानांत घुमला, “साळुंके साहेब, बातमी अतिशय दु:खद आहे. पंजवानींची मुलगी डॅाली आणि तुमचा मुलगा सुरेश, ह्या दोघांचा पंजवानींच्या फ्लॅटमध्ये खून झालाय. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या.” 


श्री साळुंक्याच्या हातून एव्हांना फोन गळून पडला होता. चोरीच्या अनेक निर्दोष योजना आंखणाऱ्या सूत्रधार साळुंक्यांना जगाच्या खऱ्या सूत्रधाराच्या किमयेची जाणीव होऊन ते खुर्चीत कोसळले, ते कायमचेच. 


अरविंद खानोलकर

पूर्व प्रसिध्दी- लोकप्रभा आणि माझा कथासंग्रह “ऋण फिटतां फिटेना” (१९९१).

Sunday, November 17, 2024

ईश्वरी शक्ती

 *मंदिरात दोष पाहु नयेत* *साधकांसाठी महत्वाचे* 


एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता


 "कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले."


प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण  पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले.


तेंव्हा *श्री टेंबे स्वामी*  फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.


पुजा संपल्यावर,

 *"श्री गुरु दत्तात्रेयांना"  गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले.*


 त्यानंतर तीन दिवस त्यांना *श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही.*

 ते बैचेन झाले.  ऱ्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार!


तेव्हा *श्री टेंबे स्वामी* सरस्वतींच्या डोळ्यातून *अश्रू वाहू लागले.* तसेच त्यांच्या मुखातून *करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले.*


 "शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।।


"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।। 


*करुणा ञिपदीचे* हे बोल ऐकून *श्री गुरु दत्ताञेय* 

श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.


तेव्हा *श्री टेंबे स्वामी म्हणाले,* "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. *तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".*


तेव्हा *श्री गुरु दत्ताञेयांनी* प्रश्न केला, *"इथे सत्ता कोणाची?*

 " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, *"देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ".* 

त्यावर *श्री गुरु दत्ताञेय* म्हणाले, अरे, *तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले.*


 त्यात तुझे काय गेले ? 


*त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.*


या *अध्यात्मिक मार्गात* प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची *देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.*


*टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते*.

 एका रागामुळेत्यां ची ही अवस्था झाली. 


*आपण तर सामान्य माणस* आपण जर राग आवरु शकलो नाही तर, 

*आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.*


*आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी,*

*त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये.* 

तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते.


 *"मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते".*


*ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते*

 तेथे सामान्य माणसाने फक्त *ईश्वरी इच्छेचा आदर करावा.*


*।।श्री गुरुदेव!*श्री स्वामी समर्थ।।

परमेश्वरम्

 *🌹विचारपुष्प🌹*


*प्रश्न - देवदर्शनानंतर मंदिराच्या  पायऱ्यांवर अथवा ओट्यावर थोडावेळ बसावे असे म्हणतात, परंतु असे थोडावेळ का बरे बसावे?*

 *उत्तर*  - एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर आपण बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांजवळ काही क्षण विसावतो, असे परंपरेने चालत आले आहे परंतु यामागील कारण आपणांस माहीत आहे का?

ही प्राचीन परंपरा काही विशिष्ट उद्देशाने बनवली गेली आहे.

किंबहुना अशाप्रकारे शांतपणे मंदिराच्या पायऱ्यांशी बसले असताना  एका श्लोकाचे पठण करावे आजच्या काळात लोकांना या श्लोकाचा विसर पडला आहे. या श्लोकावर चिंतन करा आणि तो पुढील पिढीपर्यंतदेखील अवश्य पोहोचवा 

श्लोक पढीलप्रमाणेआहे~


              *अनायासेन मरणम् ,*

            *विना दैन्येन जीवनम्।*

            *देहान्त तव सानिध्यम् ,*

            *देहि मे परमेश्वरम्॥*

 

*अर्थ* ~   

*अनायासेन मरणम् ,*

म्हणजे आपल्याला सहजपणे त्रासरहित मृत्यू आला पाहिजे, आजारी पडून, अंथरुणाला खिळून राहू नये, व्यथित होऊन मरू नये...  

तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वसाधारण दिवशी आपण जसे वावरतो तसेच मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे.

*विना दैन्येन जीवनम्।*

म्हणजे आपले जीवन कोणावर अवलंबून नसावे. कोणाजवळ असहायपणे आधाराची याचना करायला लागू नये. 

*देहान्ते तव सानिध्यम् ,*

 म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो परमेश्वराच्या सान्निध्यात यावा.त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा.

*देहि मे परमेश्वरम्*

हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे.

.

परमेश्वराची प्रार्थना करत असताना वरील श्लोकांचे पठण करावे.

नोकरी, गाडी, बंगला, कन्या, पुत्र पती-पत्नी, घरदार, पैसाअडका इ. (म्हणजे ऐहिक वस्तू) मागू नका. 

तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर त्या स्वतःहून देत असतो. म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वस्थचित्ताने बसून ही प्रार्थना करावी. ही प्रार्थना आहे, विनंती अथवा याचना नव्हे. घर  नोकरीधंदा मुलगा मुलगी ऐहिक सुखे संपत्ती यांसाठी प्रार्थना नसते. अशा प्रकारच्या लौकिक गोष्टींची मागणी करणे म्हणजे भीक मागणे होय.


'प्रार्थना' या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....

'प्र' म्हणजे विशेष, सर्वोत्तम सर्वोच्च आणि 'अर्थना' म्हणजे विनंती.

अशा रीतीने प्रार्थना म्हणजे 'विशेष आणि सर्वोच्च विनंती.' 

मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे. काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला?

तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पाहा, त्याच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या. त्या सर्वांगसुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पाहा.

अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्थ बसाल, तेव्हा बंद डोळ्यानी, तुम्ही पाहिलेल्या या रूपाचे ध्यान करा आणि जर ध्यानात परमेश्वर येत नसेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा दर्शन घ्या.



*अप्रतिम व सुंदर लेख...*

पेन्शन

 (अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,या कवितेवरून)

-------------------------- 

(प्रत्येक ओळीत 16 शब्द असतील असा प्रयत्न केला आहे)

-------------------------------   


अरे पेन्शन पेन्शन,जसा मिळतो पगार

आधी घेतले कष्ट ,मरे पर्यंत नाही घोर।।


अरे पेन्शन पेन्शन, उगा कधी माजू नये 

कामधेनूच्या दुधाला, कमी कधी म्हणू नये।।


अरे पेन्शन पेन्शन ,आहे आनंदी आनंद 

माऊलीरुपी बँकेचे, रतीबाचे आहे दूध।


अरे पेन्शन पेन्शन ,खिसा नेहमी गरम 

पोटापाण्याची असे सोय, नाही कसला गम।


अरे पेन्शन पेन्शन, तोट्याचा नाही विचार

सहा महिन्यांनी डीए,खात्रीने तो मिळणार।


अरे पेन्शन पेन्शन ,तारीख ती सत्तावीस

कॅलेंडर वर नजर,फिकीर ना जीवास।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जिवांचा विचार,

देतो सुखाला होकार, अन् दुखाला नकार ।


अरे पेन्शन पेन्शन, नित्य रविचा उदय।

अखंडित वाहे झरा, कशाला उरते भय।?


अरे पेन्शन पेन्शन, तोट्याचा नाही विचार

संसारी गाडा चाले न कधी करी कुरकुर।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जीवांचे आरोग्य 

नेहमी नगद,औषध उपचाराचे भाग्य। 


अरे पेंशन पेंशन जशी भिशीची ती भेळ

दोस्तांचा गप्पा टप्पा आनंद मिळतो निखळ।


अरे पेन्शन पेन्शन,दोन जीवांचा संवाद

माय ती एसबीआय, परमेश्वर ती निर्विवाद।


अरे पेन्शन पेन्शन,आहे भारी जादूगार 

दोन जीवांचा तो मंत्र,त्याच्यावरती मदार।


अरे पेन्शन पेन्शन,आधी एसबीआय थोर

माझ्या दैवाला नमून, नाही त्याचा विसर।।


अशोक कुलकर्णी


Saturday, November 16, 2024

संकटमोचन

 पू.श्री.संत तुलसीदास म्हणतात " श्री.रामा मी तुझी विनवणी करतो. हे सेवक सुखदायक,सर्वसमर्थ, संकटमोचन, कमलनयन श्रीरामा! मी तुझ्यावरून मला ओवाळून टाकतो. मी तुझे नाम मनापासून जपतो. तू माझ्यावर कृपादृष्टी करावी.

 श्रीरामा! माझे हृदय हे खरे तुझे धाम आहे. तेथे अनेक चोरांनी , षडविकारांनी  ठाण मांडले आहे. त्यांना टाळणे कठीण जाते.मला ते सतत चिकटलेले असतात." पुढे श्री.तुलसीदास जानकी मते कडे अर्ज करतात आणि म्हणतात *" माते कधी तरी योग्य प्रसंग पाहून श्रीरामाला माझी आठवण द्यावी. त्यामुळे माझे काम होईल. श्रीरामाला सांगावे की एक अगदी शूद्र माणूस आपला दास म्हणवतो. आपले नाम घेऊन तो पोट भरतो. यावर श्रीरामाने विचारले की तो कोण आहे ?

 तर माझे नाव व अवस्था सांगावी. माते तू असे केलेस तर श्रीरामाचे गुणगान करून मी भवसागर तरून जाईन. मला स्वप्नांत देखील मनवचन कर्मानी श्रीरामाहून अन्य आश्रय नाही. श्रीरामा सारखा खरा व मोठा कोण आहे ? आणि माझ्यासारखा खोटा व शूद्र कोण आहे ? पण मी खरा नसून जग मला रामाचा गुलाम मानते."*

इमानदारी


एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते. 

गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"


आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"

मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"


ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "


सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते. 


तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "


सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"


राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."


सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात. 


महत्वाचे  : इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !!


म्हणून महत्वाची इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!


 सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो तेव्हा

 तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,,

तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,

आणि कर्म हा हिरा आहे,

*हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, 

तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!!*


_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*


Friday, November 15, 2024

विश्वमन

 साधन करण्यासाठी एकाग्र होण्यासाठी एकाठिकाणी बसावं , अंतःकरण एकाग्र करावं आणि गुरूंच स्मरण करून साधन करावं. गुरूंच स्मरण नसेल तर यश नाही. याचं कारण असं की जे विश्वमन आहे ते सबंध विश्व चालवते , त्याचं जर देहांमधे अवतरण असेल तर गुरू आहे. देहाच्या दृष्टीने गुरू म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मविद्या साकार झालेली व्यक्ती.

 परमार्थामध्ये व्यवहाराच्या उलट असते. रात्रंदिवस ज्याची कृपा व्हावी म्हणून तळमळ करायची त्याची आज्ञा प्रमाण. आपली देहबुद्धी मारायची असेल तर आपल्या गुरूचं ऐकायला पाहिजे. सद्गुरूस्मरण  हे फार महत्वाचे आहे.

 श्री.ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंच्या  संमतीनेच समाधी घेण्याचा निर्णय घेतला असणार. जर ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूसमोर इतके नम्र होतात तर तुमची आमची काय कथा? एकदा श्रीविवेकानंदांना विचारलं की " 

तुमच्या गुरूला सही सुद्धा करता येत नाही आणि तुम्ही इतके त्यांच्यामागे का लागला आहात." त्यावर श्रीविवेकानंद म्हणाले "त्यांच्यामध्ये एकच शक्ती आहे. कोणीही माणूस असेल तर त्या माणसाच्या मनाला वाटेल तो आकार ते देऊ शकतात." 

 दुसरं अस की या जगात अत्यंत पवित्र, पवित्र जर काही असेल तर तो सद्गुरू असतो. तो प्रत्यक्ष परमात्माच असतो. म्हणून म्हणतात "सद्गुरू स्मरण अनुभविजे."

Thursday, November 14, 2024

शरणागती

 श्रीराम समर्थ


               *शरणागतीचें पहिलें चिन्ह*


          नामस्मरण, सदाचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताला शरण अशीं नामसाधनेचीं चार महत्वाचीं अंगें आहेत. नामस्मरणाइतकेंच सदाचरणाला महत्व आहे. 

नामाचा अभ्यास करणाऱ्यानें माणुसकीला शोभेल असे वागायला हवें. त्याचे आचरण सर्व दृष्टींनीं नीतिधर्माला अनुसरून हवें. मनांत आलें तरी शरीरानें दुष्कर्म न होईल एवढी खबरदारी बाळगावी. दुसऱ्याला फसवून पैसा घेणें, अनिर्बंध कामवासाना भोगण्याच्या मागें लागणें, दुसऱ्याची उगीच निंदानालस्ती करणें, वाईट खाणें व पिणें आणि दुर्वाक्यें बोलणें या गोष्टी नामधारकानें सोडल्याशिवाय गत्यंतर नाहीं.


          तसेच एखाद्याच्या हातून विशेष पापकर्म घडलें असेल तर तें त्याने मनानें भगवंताला निवेदन करावें आणि तें पुन्हा आपल्याकडून घडणार नाहीं अशी खबरदारी बाळगावी. 

*नाम घेणारा मनुष्य अत्यंत सदाचरणीं पाहिजे. कारण नामात गुप्त असणारी भगवंताची शक्ति अंतःकरणांत प्रकट होण्यास विकारच आड येतात.*


           विकार वासनारूपानें व्यक्त होतात. प्रथमावस्थेमध्यें सामान्य मनुष्य आपल्या वासना भगंवंतावर लादतो. भगवंतानें त्या तृप्त केल्या तर त्याच्याशीं संबंध राखतो; नाहींतर तो तोडतो. 

*वासना पुर्ण करण्याच्या अनेक साधनांपैकीं भगवंत हे एक साधन समजलें जातें. नामाचा अभ्यास चालूं केल्यावर हें बरोबर नाहीं असें आपोआप कळूं लागतें. तरीपण वासना कांहींं सुटत नाहींत.* 

म्हणून येथेंं शिकण्याची गोष्ट अशी कीं, भगवंत आपला मालक आहे असे समजून आपल्या वासना तृप्त करण्याची प्रार्थना रोज त्याला करावी. 

*मागावयाचें तर भगवंतापाशींच मागावयाचें, तो देईल अगर न देईल, दिलें तर बरेंच झालें पण न दिलें तर त्याचाच नांवानें रडावें, कांहीं केल्या त्याला सोडूं नये  अशी वृत्ती शरणागतीचें पहिलें चिन्ह समजावें.* 


       

संदर्भः *नामसाधना हे त्यांचेच पुस्तक पान ४२*

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

उद्दिष्ट


              श्रीराम,

         मानसपूजेमध्ये सगुणाचा आधार घेत त्याच्यावर प्रेम करत त्याच्या स्वरुपापर्यंत जायचे, हेच मूळ उद्दिष्ट आहे. महाराज म्हणतात - दृश्य वस्तूंवर आपले प्रेम असते, जे दिसते ते सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते.

 म्हणून आपणच कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट झाला पाहिजे. राम सर्व करतो 'आणि' राम माझा दाता आहे 'ही भावना ज्याची स्थिर झाली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली आणि त्याच्या जन्माचे सार्थक झाले. मानसपूजेच्या माध्यमातून आपल्या जन्माचे सार्थक आपल्याला करून घ्यायचे आहे.

                मानसपूजेचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याने आपले मन सुदृढ होते. आजकाल मानसिक आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. परमार्थाचा अभ्यास करतात आणि डिप्रेशन ची औषधे पण घेतात. 

ह्याचाच अर्थ त्यांचे मन कमकुवत आहे. जोपर्यंत मन मजबूत होत नाही, तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी, मनाला उभारी देणाऱ्या कल्पना, भावना व विचार यांचे खतपाणी घालण्याची गरज असते.

           मानसपूजेत आपण देवाला अर्थात सद्गुरूंना त्या साऱ्या गोष्टी देतो. ज्या वास्तविक आपल्याकडे नाहीत आणि आज रोजी आणताही येत नाहीत पण मनात मात्र आणता येतात.. आणि मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येते.

                    ||श्रीराम |¦

Wednesday, November 13, 2024

असावे...

 *वेद ही असावे...*

*मंत्र ही असावे..*

*असावे सखोल ज्ञान...*

*परी असले जरी हे काही...*

*तरीही म्हणावे..*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*धनही असावे...*

*असावी श्रीमंती...*

*असावा सर्वत्र सन्मान...*

*परी असले जरी हे काही..*

*तरीही म्हणावे..*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*कामही असावे...*

*"श्रमही असावे...*

*मिळवावे कष्टाचे दाम...*

*परी असले जरी हे काही..*

*तरीही म्हणावे..*

*"!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*सुंदर असावे...*

*सुंदर दिसावे...*

*असावा साज श्रृंगार ...*

*परी असले जरी हे काही.."*

*तरीही म्हणावे..*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*ओढ असावी...*

*असावी जवळिक..*

*असावे सदैव प्रेम..*

*परी असले जरी हे काही..*

*तरीही म्हणावे..*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*संसार असावा...*

*असावी गोडी...*

*असावे समाधान...*

*परी असले जरी हे काही..*

*तरीही म्हणावे..*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*गोधन असावे*

*दुधा तुपात रहावे*

*गोसेवा भरपूर करावी*

*गोठा असावा छान* 

*परी असले जरी हे सर्व काही*

*तरीही म्हणावे*

*!! श्रीराम जय राम जय जय  राम !!*


*वृक्ष असावी...*

*असावी फळे ही...*

*असावा बगीचा ही छान...*

*परी असले जरी हे काही..*

*तरीही म्हणावे..*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*असावे नेता...*

*वा अभिनेता...*

*असावा सर्व जगी बहुमान...*

*परी असले जरी हे काही..*

*"तरीही म्हणावे..*

*"!! श्रीराम जय राम जय जय राम !!*


*हे सगळे वैभव आहे केंव्हा..*

*आहे ..ह्रदयी जोवर राम..*

*सद्गुरुंचा करा जय घोष...*

*!! श्रीराम जय राम जय जय राम !!*

Tuesday, November 12, 2024

विनवणी

 पू.श्री.संत तुलसीदास म्हणतात " श्री.रामा मी तुझी विनवणी करतो. हे सेवक सुखदायक,सर्वसमर्थ, संकटमोचन, कमलनयन श्रीरामा! मी तुझ्यावरून मला ओवाळून टाकतो. मी तुझे नाम मनापासून जपतो. तू माझ्यावर कृपादृष्टी करावी. श्रीरामा! माझे हृदय हे खरे तुझे धाम आहे. तेथे अनेक चोरांनी , षडविकारांनी  ठाण मांडले आहे. 

त्यांना टाळणे कठीण जाते.मला ते सतत चिकटलेले असतात." पुढे श्री.तुलसीदास जानकी मते कडे अर्ज करतात आणि म्हणतात *" माते कधी तरी योग्य प्रसंग पाहून श्रीरामाला माझी आठवण द्यावी. त्यामुळे माझे काम होईल. 

श्रीरामाला सांगावे की एक अगदी शूद्र माणूस आपला दास म्हणवतो. आपले नाम घेऊन तो पोट भरतो. यावर श्रीरामाने विचारले की तो कोण आहे ? तर माझे नाव व अवस्था सांगावी. माते तू असे केलेस तर श्रीरामाचे गुणगान करून मी भवसागर तरून जाईन. मला स्वप्नांत देखील मनवचन कर्मानी श्रीरामाहून अन्य आश्रय नाही. 

श्रीरामा सारखा खरा व मोठा कोण आहे ? आणि माझ्यासारखा खोटा व शूद्र कोण आहे ? पण मी खरा नसून जग मला रामाचा गुलाम मानते."*

Monday, November 11, 2024

तीर्थ

 *श्रीराम समर्थ*


*कांकडआरतीचें तीर्थ*


*[ मालाडचे जेष्ठ साधक डा वा रा अंतरकर यांनी सांगितलेली गोष्ट]* 


श्री तात्यासाहेब केतकर गोंदावलेस श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाकरतां गेले म्हणजे एक दिवस सकाळी मंदिरांतील कांकडआरतीचा कार्यक्रम झाल्यावर त्या वेळीं तेथें असलेले [कै] श्री. बळवंतराव पाठकमास्तर यांचे घरी जावयाचेंच असा दर वर्षाचा प्रघात होता. डिसेंबर १९५५ मध्यें मी [डा अंतरकर] श्री.  तात्यासाहेबांच्या बरोबर गेलों होतों व श्री. तात्यासाहेबांच्याच खोलीत उतरलों होतों व म्हणून त्यांनी सांगितल्यावरुन त्यांचेबरोबर श्री. पाठकमास्तरांकडे गेलों होतों. सकाळी ७|| ची वेळ होती. श्री. तात्यासाहेब व मी [डा अंतरकर] समोरासमोरच्या भिंतींना टेकून बसलों होतों. थोड्याच वेळांत  सर्वांना पानांवर उपीट दिलें गेलें. मी [डा अंतरकर] स्नानसंध्या झाल्याशिवाय कांहीं खात नसें व त्यामुळें आता काय करावे या विचारांत होतों. श्री. तात्यासाहेबांना हे माहीत होतें व तेहि माझेकडे पाहात होते. त्यांनी सुरुवात केल्याशिवाय तेथें जमलेले इतर लोक सुरू करणे शक्य नव्हते. शेवटी तात्यासाहेब मला म्हणाले, 'तुमचें कसें काय ? तुम्हीं सुरू केल्याशिवाय मला सुरुवात करतां येणार नाही.' मी [डा अंतरकरांनी] म्हटलें, 'तुम्ही सांगाल त्याप्रमाणें मी करीन.' तेंव्हा आंघोळ झाली आहे का, विचारलें असतां 'नाही' म्हणून सांगितलें. तेंव्हा श्री. तात्यासाहेब म्हणाले ' तुम्ही सकाळीं कांकडआरतीचें श्रीमहाराजांचे तीर्थ घेतलें आहे ना? मी 'होय' म्हटल्यावर 'मग स्नान झाल्यासारखेंच आहे. खाण्यास हरकत नाही' असे त्यांनी सांगितले. 'तुम्ही सांगितलेत म्हणजे मला खाण्याला हरकत नाही' असे मी म्हटले व मग खाण्यास सुरवात झाली. स्नाना पूर्वी खाण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. 


संदर्भः मालाडचे थोर सत्पुरुष श्री. रामचंद्र चिन्तामणि तथा तात्यासाहेब केतकर यांचे जीवनचरीत्र या डा वा रा अंतरकर यांच्या पुस्तकातून


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

Sunday, November 10, 2024

विचारपुष्प

 *🌹विचारपुष्प🌹*


*प्रश्न - देवदर्शनानंतर मंदिराच्या  पायऱ्यांवर अथवा ओट्यावर थोडावेळ बसावे असे म्हणतात, परंतु असे थोडावेळ का बरे बसावे?*

 *उत्तर*  - एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर आपण बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांजवळ काही क्षण विसावतो, असे परंपरेने चालत आले आहे परंतु यामागील कारण आपणांस माहीत आहे का?

ही प्राचीन परंपरा काही विशिष्ट उद्देशाने बनवली गेली आहे.

किंबहुना अशाप्रकारे शांतपणे मंदिराच्या पायऱ्यांशी बसले असताना  एका श्लोकाचे पठण करावे आजच्या काळात लोकांना या श्लोकाचा विसर पडला आहे. या श्लोकावर चिंतन करा आणि तो पुढील पिढीपर्यंतदेखील अवश्य पोहोचवा 

श्लोक पढीलप्रमाणेआहे~


              *अनायासेन मरणम् ,*

            *विना दैन्येन जीवनम्।*

            *देहान्त तव सानिध्यम् ,*

            *देहि मे परमेश्वरम्॥*

 

*अर्थ* ~   

*अनायासेन मरणम् ,*

म्हणजे आपल्याला सहजपणे त्रासरहित मृत्यू आला पाहिजे, आजारी पडून, अंथरुणाला खिळून राहू नये, व्यथित होऊन मरू नये...  

तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वसाधारण दिवशी आपण जसे वावरतो तसेच मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे.

*विना दैन्येन जीवनम्।*

म्हणजे आपले जीवन कोणावर अवलंबून नसावे. कोणाजवळ असहायपणे आधाराची याचना करायला लागू नये. 

*देहान्ते तव सानिध्यम् ,*

 म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो परमेश्वराच्या सान्निध्यात यावा.त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा.

*देहि मे परमेश्वरम्*

हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे.

.

परमेश्वराची प्रार्थना करत असताना वरील श्लोकांचे पठण करावे.

नोकरी, गाडी, बंगला, कन्या, पुत्र पती-पत्नी, घरदार, पैसाअडका इ. (म्हणजे ऐहिक वस्तू) मागू नका. 

तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर त्या स्वतःहून देत असतो. म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वस्थचित्ताने बसून ही प्रार्थना करावी. ही प्रार्थना आहे, विनंती अथवा याचना नव्हे. घर  नोकरीधंदा मुलगा मुलगी ऐहिक सुखे संपत्ती यांसाठी प्रार्थना नसते. अशा प्रकारच्या लौकिक गोष्टींची मागणी करणे म्हणजे भीक मागणे होय.


'प्रार्थना' या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....

'प्र' म्हणजे विशेष, सर्वोत्तम सर्वोच्च आणि 'अर्थना' म्हणजे विनंती.

अशा रीतीने प्रार्थना म्हणजे 'विशेष आणि सर्वोच्च विनंती.' 

मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे. काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला?

तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पाहा, त्याच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या. त्या सर्वांगसुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पाहा.

अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्थ बसाल, तेव्हा बंद डोळ्यानी, तुम्ही पाहिलेल्या या रूपाचे ध्यान करा आणि जर ध्यानात परमेश्वर येत नसेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा दर्शन घ्या.



*अप्रतिम व सुंदर लेख...*

Saturday, November 9, 2024

सगुण

 

              श्रीराम,

         मानसपूजेमध्ये सगुणाचा आधार घेत त्याच्यावर प्रेम करत त्याच्या स्वरुपापर्यंत जायचे, हेच मूळ उद्दिष्ट आहे. महाराज म्हणतात - दृश्य वस्तूंवर आपले प्रेम असते, जे दिसते ते सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते. म्हणून आपणच कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. 

आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट झाला पाहिजे. राम सर्व करतो 'आणि' राम माझा दाता आहे 'ही भावना ज्याची स्थिर झाली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली आणि त्याच्या जन्माचे सार्थक झाले.

 मानसपूजेच्या माध्यमातून आपल्या जन्माचे सार्थक आपल्याला करून घ्यायचे आहे.

                मानसपूजेचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याने आपले मन सुदृढ होते. आजकाल मानसिक आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. परमार्थाचा अभ्यास करतात आणि डिप्रेशन ची औषधे पण घेतात. ह्याचाच अर्थ त्यांचे मन कमकुवत आहे. जोपर्यंत मन मजबूत होत नाही, तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी, मनाला उभारी देणाऱ्या कल्पना, भावना व विचार यांचे खतपाणी घालण्याची गरज असते.

           मानसपूजेत आपण देवाला अर्थात सद्गुरूंना त्या साऱ्या गोष्टी देतो. ज्या वास्तविक आपल्याकडे नाहीत आणि आज रोजी आणताही येत नाहीत पण मनात मात्र आणता येतात.. आणि मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येते.

                    ||श्रीराम |¦

Friday, November 8, 2024

विनवणी

 पू.श्री.संत तुलसीदास म्हणतात " श्री.रामा मी तुझी विनवणी करतो. हे सेवक सुखदायक,सर्वसमर्थ, संकटमोचन, कमलनयन श्रीरामा! मी तुझ्यावरून मला ओवाळून टाकतो. मी तुझे नाम मनापासून जपतो. तू माझ्यावर कृपादृष्टी करावी. 

श्रीरामा! माझे हृदय हे खरे तुझे धाम आहे. तेथे अनेक चोरांनी , षडविकारांनी  ठाण मांडले आहे. त्यांना टाळणे कठीण जाते.

मला ते सतत चिकटलेले असतात." पुढे श्री.तुलसीदास जानकी मते कडे अर्ज करतात आणि म्हणतात *" माते कधी तरी योग्य प्रसंग पाहून श्रीरामाला माझी आठवण द्यावी. त्यामुळे माझे काम होईल. 

श्रीरामाला सांगावे की एक अगदी शूद्र माणूस आपला दास म्हणवतो. आपले नाम घेऊन तो पोट भरतो. यावर श्रीरामाने विचारले की तो कोण आहे ? तर माझे नाव व अवस्था सांगावी. माते तू असे केलेस तर श्रीरामाचे गुणगान करून मी भवसागर तरून जाईन. 

मला स्वप्नांत देखील मनवचन कर्मानी श्रीरामाहून अन्य आश्रय नाही. श्रीरामा सारखा खरा व मोठा कोण आहे ? आणि माझ्यासारखा खोटा व शूद्र कोण आहे ? पण मी खरा नसून जग मला रामाचा गुलाम मानते."*

Thursday, November 7, 2024

चित्तशुद्धी

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*  


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*निश्चयपूर्वक  नामस्मरण  आणि  चित्तशुद्धी .*


मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. 'हे परमेश्वरा, आता तुझ्याकरिताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,' असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. 

'नामस्मरण होत नाही, कारण वयामुळे मन थकले,' हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल, कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे; परंतु मन थकले, हे मात्र सयुक्तिक नाही. 

मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची. परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना, त्यापूर्वी केव्हाही, मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. 

पूर्वी सहा-सहा तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल, हे मान्य आहे; पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा, सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे.

 पैसाअडका, प्रपंचातल्या गोष्टी, यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन.


पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा, माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. 

तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे, त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.


धर्माचरण, भगवद्‌भक्ति, नामस्मरण, आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की, आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना होणे. ही भावना वाढण्यासाठी, 'सर्व जग सुखी असावे' अशी प्रार्थना करण्याचा परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत्‌कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.


*१२४ .   नामाशिवाय  जगात  दुसरे  सत्य  नाही  अशी  दृढ  भावना  करावी .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, November 6, 2024

रामनाम

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


     *पुष्कळ मंडळी जमली होती , त्या सर्वांशी बोलणे होऊन श्रीमहाराज थांबतात; तेवढ्यात एक गृहस्थ तेथे पोचले व झटकन् पुढे होऊन त्यांनी श्रीमहाराजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना काही बोलण्याचा अवसर न देताच श्रीमहाराजांनी स्वतःच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले , 

" एक वैद्य होता. त्याच्याकडे पुष्कळ रोगी येत. औषधांनी भरलेल्या बाटल्या त्याच्या कपाटात होत्या त्यातून ज्याला जे योग्य ते औषध तो काढून देई. एके दिवशी त्याच्या मुलाचीच तब्येत बिघडली. तेव्हा वैद्याने मुलाला हाक मारून सुंठेची चिमूटभर पूड त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाला , ' ही खाऊन टाक.' 

तसे आतापर्यंत पुष्कळांना पुष्कळ सांगितले, तुम्हाला थोडक्यात सांगतो  , रामनाम घ्या त्यात सारे काही आले. "*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Tuesday, November 5, 2024

संधी

 ■■  बोधकथा : संधी  ■■


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण गावातील शेतकऱ्याच्या मुलीवर प्रेम करू लागला. तो तरुण त्या मुलीला भेटण्यासाठी वारंवार गावात येऊ लागला. हळूहळू ही गोष्ट त्या मुलीच्या वडिलांपर्यंत पोहोचली. 


त्या मुलीचे वडील खूप समंजस होते. त्यांनी ठरवलं की, या मुलाची योग्य पारख करून मुलीचं लग्न त्या मुलाशी करावं की नको याचा निर्णय घेऊ. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला भेटायचं ठरवलं.


दुसऱ्याच दिवशी हा तरुण शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. शेतकऱ्याने त्याला विचारलं, तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस? तरुण बोलला, हाे करतो. 


तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे? तरुण बोलला, हाे. 


शेतकरी बोलला, मग तुला एक परीक्षा द्यावी लागेल. तरुण बोलला, मला याच्या साठी काय करावे लागेल?


शेतकरी बोलला, मी एक-एक करून तीन बैल मोकळे सोडून देईन. जर तू तीन पैकी एकाही बैलाची शेपटी पकडली तर तू या परीक्षेत पास होशील. पण जर तुला हे करता आलं नाही तर तुला परत जावं लागेल. 


शेतकरी त्या तरुणाला शेताकडे घेऊन गेला. शेतकऱ्याने आधी एका बैलाला सोडले. त्या मोठ्या बैलाला पाहून तरुण घाबरून गेला. तरुणाने विचार केला, याची शेपटी पकडायला नको, दुसऱ्या बैलाची शेपटी पकडू. 


दुसरा बैल समोर आला तर तो आधीच्या बैलापेक्षा मोठा आणि शक्तिशाली होता. त्याची टोकदार शिंग बघून तो तरुण घाबरला आणि विचार केला की, यापेक्षा पहिला आलेला बैलच योग्य होता. पण संधी निघून गेली होती. आता तो तिसऱ्या बैलाची वाट बघू लागला. तोपर्यंत तिसरा बैल बाहेर आला. तरुणाने पाहिलं, तो बैल अगदी कमजोर होता. त्या तरुणाला आनंद झाला. पण बघतो तर काय, त्या बैलाला शेपूटच नव्हते. 


आता त्या तरुणाकडे कोणताच पर्याय उरला नाही निराशेने तो तरुण गावातून निघून गेला आणि पुन्हा कधीच गावात परत आला नाही. आपण नेहमीच चांगल्या संधीची वाट बघत आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतो. पण अशामुळे आपल्याकडे पश्चात्ताप करण्या शिवाय कोणताच पर्याय उरत नाही.


*बोध.....*

अनेक जण चांगल्या संधीची वाट बघत समोरून आलेल्या संधी सोडून देतात. ज्याला ते चांगली संधी समजतात ती संधी नसतेच......!

        ~●●○○○●●~



Monday, November 4, 2024

मम चित्ता शमवी आता

 *मंदिरात दोष पाहु नयेत* *साधकांसाठी महत्वाचे* 


एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता


 "कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले."


प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण  पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले.


तेंव्हा *श्री टेंबे स्वामी*  फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.


पुजा संपल्यावर,

 *"श्री गुरु दत्तात्रेयांना"  गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले.*


 त्यानंतर तीन दिवस त्यांना *श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही.*

 ते बैचेन झाले.  ऱ्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार!


तेव्हा *श्री टेंबे स्वामी* सरस्वतींच्या डोळ्यातून *अश्रू वाहू लागले.* तसेच त्यांच्या मुखातून *करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले.*


 "शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।।


"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।। 


*करुणा ञिपदीचे* हे बोल ऐकून *श्री गुरु दत्ताञेय* 

श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.


तेव्हा *श्री टेंबे स्वामी म्हणाले,* "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. *तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".*


तेव्हा *श्री गुरु दत्ताञेयांनी* प्रश्न केला, *"इथे सत्ता कोणाची?*

 " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, *"देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ".* 

त्यावर *श्री गुरु दत्ताञेय* म्हणाले, अरे, *तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले.*


 त्यात तुझे काय गेले ? 


*त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.*


या *अध्यात्मिक मार्गात* प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची *देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.*


*टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते*.

 एका रागामुळे

त्यांची ही अवस्था झाली. 


*आपण तर सामान्य माणस* आपण जर राग आवरु शकलो नाही तर, 

*आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.*


*आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी,*

*त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये.* 

तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते.


 *"मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते".*


*ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते*

 तेथे सामान्य माणसाने फक्त *ईश्वरी इच्छेचा आदर करावा.*


*।।श्री गुरुदेव!*श्री स्वामी समर्थ।।

Sunday, November 3, 2024

एकाग्र

 

           श्रीराम,

                अनेकदा नामात मन एकाग्र होत नाही. मानसपूजेने मन एकाग्र व्हायला मदत होते. कारण कल्पनेने आपण फक्त एका भगवंताचा विचार करत असतो. हळूहळू त्या विचाराने आपण आपल्या आराध्य दैवताच्या प्रेमात गुंतुन जातो.. त्यामुळे अवांतर विषय कमी होतात. 

त्याने रजोगुण कमी होतो आणि सत्वगुण वाढीला लागतो. मन शांत आणि प्रसन्न होऊ लागते. माझा देव माझ्या बरोबर आहे या विचारांनी मनातील सुप्त भय कमी होते आणि हळूहळू निर्भयता प्राप्त होऊ लागते.

 सर्व कर्ता करविता तो आहे, असा अनुभव यायला लागला की आपसूकच कर्तृत्व भोक्तृत्व कमी होऊ लागते. 

             सृष्टीच्या सार्वभौम राजाबरोबर जवळीक आहे असे मानसपूजेने जाणवायला लागले की आपोआप सुख समाधान वाढीला लागते. मानसपूजेने संवेदनशीलता वाढते. मानसपूजा हे अनुसंधानाचे उत्तम साधन आहे, कारण डोळे मिटून एकावरच लक्ष केंद्रित केल्याने बहिर्मुख जगातील नामरुपे नाहीशी होतात. 

           सुरवातीला भगवंत माझ्या आत आहे आणि मी त्याची पूजा करत आहे असा विचार करताना, एक दिवस मी आणि भगवंत एकच आहे, इथपर्यंत पोहचणे. म्हणजेच मी म्हणजे देह नसून मी भगवंत आहे.. या पायरीपर्यंत येणे आणि नंतर मी ब्रह्म आहे.. अहं ब्रह्मास्मि चा अनुभव घेणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय. 

              साधनचतुष्टय संपन्न अधिकारी शिष्य मानसपूजेने, ध्यानाने आत्मनिवेदन साधू शकतो. 

                 ||श्रीराम ||

Saturday, November 2, 2024

पुण्यसंचय

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा : आज सकाळी एक गृहस्थ आले होते. ते म्हणाले की साडेतीन कोटी जपाच्या संकल्पाचे उदक सोडावे असे मनात येते; काय करू? मला सत्पुरुषाचा छत्तीस वर्षे सहवास लाभला. 

त्यामुळे याबाबतीत काय सांगावे, कसे वागावे ते समजू लागले आहे. श्रीमहाराज सांगत तेच मी त्यांना सांगितले. मी म्हणालो की एकट्याने संकल्प करण्यापेक्षा नवरा-बायको दोघांनी मिळून संकल्पाचे उदक सोडा. 

श्रीमहाराज म्हणत की यामधे दोन गोष्टी साधतात. १) घरातून विरोध राहात नाही आणि २) जपात भागीदारी (sharing) होते. मी त्यांना रोजचे व्यवहार सांभाळून सुरुवातीला प्रत्येकजण रोज पाच हजार जप करा म्हणून सांगितले. म्हणालो, फार हिशोब करू नका. दोघांचा मिळून रोज दहा हजार जप झाला तरी साडेतीन कोटीला अंदाजे दहा वर्षे लागतील.*


*साडेतीन कोटी जपसंख्या देतांना श्रीमहाराज म्हणत की यामुळे तीन गोष्टी साधतात. १) देह व मन शुद्ध होतात. २) नामाच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो आणि ३) पुण्यसंचय होतो. पुण्यसंचयाची अतिशय गरज आहे.*


*श्रीमहाराजांनी डॉ. कूर्तकोटींना गोंदवल्याच्या नदीपलीकडच्या भीमाशंकराच्या देवळात चाळीस दिवस जप करायला सांगितले होते. शेवटच्या दिवशी श्रीमहाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवताच त्यांची समाधी लागली पण ती पाऊण-एक तासच टिकली. तेव्हां श्रीमहाराज म्हणाले की पुण्यसंचय कमी आहे. अद्यापि लौकिकाची वासना शिल्लक राहिली आहे.*


*विवेक आणि वैराग्याचा आश्रय घेऊन देह आणि मन शुद्ध केल्याखेरीज नाम स्थिर होणार नाही. नामात रस येणार नाही.*


*-- अध्यात्म संवाद*

Friday, November 1, 2024

भंजन

 संत श्री.कबीर स्वतःविषयी म्हणतात " मी जन्मापासूनचा अपराधी आहे. मी नखशिखांत विकारांनी भरलेला आहे. पण तू उदार दाता आहेस. तू दुःखाचे भंजन करतोस. 

तू माझा सांभाळ कर.तुझ्यासमोर मी अवगुणांचे आचरण करतो. तुला मी कसा आवडेन ? कोणत्या तोंडाने तुला विनवू ? माझ्या मनाला लाज वाटते. माझे अवगुण अगणित आहेत.

 शिवाय ते अवाच्य आहेत. पण तू अपराध्यांचा दयाळू आहेस. मी कुपुत्र आहे खरा पण तुला माझी लाज आहे. मी अवगुण आचरतांना थकलो, हरलो नाही. आता तू वाटेल ते कर या दासला जवळ कर नाहीतर मारून टाक. तुझ्या मनास येईल ते कर. हे स्वामी !

 तू समर्थ आहेस. माझा हात घट्ट धर आणि मला शेवटपर्यंत पोचव. मध्येच हात सोडू नकोस. माझा अंतर्यामी असा तू माझ्या जीवाचा आधार आहेस. मी तुला भुक्ती व मुक्ती मागत नाही. मला फक्त भक्तीचे दान दे. ते मी इतर कोणापाशी मागणार नाही.

 मी सगुणाची सेवा करतो व निर्गुणाच ज्ञान करून घेतो. मी देवाला म्हणतो की भगवंता , मी केले असे काहीं  नाही. जे जे मी केले ते तूं केलंस. मी जे केलें म्हणतो ते सारे तुझ्या आधीन आहे."