*पलूस तालुक्यातील तिर्थक्षेत्र औदुंबर येथे स्पेशल सहज समाधी ध्यान योग शिबिर* 🌅🧘♂️🧎♂️🏃♂️
*परमपूज्य गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग* या संस्थेच्या वतीने स्पेशल सहज समाधी ध्यान योग शिबिर तिर्थक्षेत्र औदुंबर येथे आयोजित केले आहे. *तज्ञ प्रशिक्षिका पुनमजी कुलकर्णी, तज्ञ प्रशिक्षक अजयजी किल्लेदार कोल्हापूर या शिबिरासाठी मार्गदर्शन करणार आहेत*.पलूस तालुक्यातील तीर्थक्षेत्र औदुंबर मंदिर येथे दिनांक 19 ते 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हे शिबिर होणार आहे .या शिबिराविषयी बोलताना पूनमजी कुलकर्णी म्हणाल्या
*"सहज" एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. समाधी ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची अवस्था आहे. सहज समाधी ध्यान म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय.*
*हे ध्यान दररोज केल्याने शांती ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते
*योगा बरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो.
*गहन विश्रांती चा अनुभव येतो
*मनात पुन्हा पुन्हा येणारे विचार निघून जातात.
*जेव्हा मन शांत होते तेव्हा सर्व तणाव निघून जातात आणि मनाची एकाग्रता वाढून तुम्ही तणावमुक्त होता.
अजयजी किल्लेदा म्हणाले सहज समाधी ध्यान शिबीर केल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि सजगता यामध्ये वाढ होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते.
योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो.
ध्यान आपल्या मनाची स्थिती संतुष्ट आणि शांत करते, ज्यामुळे आपल्या भावनात्मक आणि शारीरिक आरोग्य संतुलीत आणि चांगले होते.
पण ध्यान करायला आणि मन केंद्रीत करायला कठीण वाटतं.
त्यासाठी मंत्राचा उपयोग करून समाधी च्या स्थितीला पोहचणं सोपं आणि सरळं शक्य आहे. म्हणून हे टेक्नीक शिकणं आजच्या काळाची गरज आहे. सहज समाधी ध्यानात सामील व्हा*
*शिबिराचे संयोजन श्री दत्त सेवाभावी मंडळ (ट्रस्ट), आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवक करीत आहेत* .
No comments:
Post a Comment