श्रीरामरक्षा प्रश्नमंजुषा
*१. रामरक्षेचे रचयिता कोण आहेत?*
उत्तर-बुधकौशिक..विश्वामित्र ऋषी
*२.रामरक्षेत राम हा शब्द किती वेळा येतो?*
उत्तर-८०
*३.मंत्र म्हणजे काय?*
मननात त्रायते इति मंत्र..ज्याचे मनन केले असता तो तारुन नेतो तो मंत्र होय.मंत्र म्हणजे एक ध्वनी,एक शब्द,एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समुह...ज्यांच्या पुनरूच्चारणाने भौतिक ,आत्मिक व अध्यात्मिक उन्नती होते.म...हे अक्षर..मानवी मनाचे प्रतिक आहे.जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम बनवते व त्र म्हणजे संरक्षण करण्याची ताकद ज्या मंत्रात आहे .ज्याच्या उच्चाराने पवित्र उर्जा स्पंदने निर्माण होतात व आत्मिक सुख मिळते
*४.रामरक्षा कवचाचे नाव काय?*
उत्तर-रामरक्षा ...रक्षा म्हणजेच कवच होय
*५. रामरक्षा कवचात किती आणि कोणकोणत्या अवयवांचा उल्लेख आला आहे?*
उत्तर-२२
शीर,भाळ,डोळे,कान,नाक,मुख जिव्हा,कंठ,खांदा,भूज,टाळू,हृदय,छाती,
पोटाचामध्यभाग(पाणथरी),नाभी,कंबर,हात,गुढघे,जांघा,पोटऱ्या,पाऊल,मांड्या ...इ.
*६.तुम्हाला समजलेली रामरक्षा सारांश रुपाने लिहा.*
उत्तर--भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितलेली रामरक्षा सर्व पापांचा नाश करणारी,भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण करणारी आहे,सर्व अवयवांचे रक्षण करणारी आहे.या रामरक्षा कवचाने पठण कर्ता सुखी,पुण्यवान,विजयी विनयी होऊन सर्व कार्य सिद्धीस जाणार असून त्याला मुक्ती मिळणार आहे.
रामरक्षारुपी संरक्षक कवचामुळे सर्वत्र मंगलमय होते.
सतत पुढे जाणारा ,कधिही न संपणारा बाण व भाता ज्यांच्या जवळ आहे असे श्रीराम आपले रक्षण करण्यासाठी सतत आपल्या सवे असणार आहेत...तेच मार्गदर्शक आहेत.
दुःख,संकटांचा नाश करणाऱ्या,सुख समृद्धी देणाऱ्या श्रीरामांच्या रामरक्षेचे कवच सदा सर्वकाळ आपले रक्षण करेल.
🙏श्रीराम🙏
*७. रामरक्षेत रामाशिवाय आणखी किती कोणकोणत्या व्यक्तींचा उल्लेख आला आहे?*
उत्तर-२२.....
सीता,हनुमान,
लक्ष्मण,दशरथ,
कौसल्या,विश्वामित्र(बुधकौशिकऋषी),
सौमित्रिवत्सल(सुमित्रा तीचे पूत्र )शत्रुघ्न,भरत,सुग्रीव,जाम्बुवंत,बिभिषण,रावण,
शंकर(आदिष्टवान),वाल्मिकी,परशुराम(जमदग्नी पुत्र)दुर्वात्मज,पद्माक्ष,पितवासकं,सत्यसंध,लक्ष्मण ,रघुकुलतिलकम्
*८. रामरक्षेतील तुम्हाला आवडलेला श्लोक कोणता?*
उत्तर-श्लोक-
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयो नमाम्यहम् ।।३५।।
*९. रामरक्षेच्या ध्यान श्लोकाच्या आधारे रामाचे ध्यान कसे करता येईल?*
उत्तर-- ध्यान ही अष्टांग योगाची शेवटची अवस्था होय.रामरक्षेच्या ध्यान श्लोका नुसार मन स्थिर,निर्विचार करण्यासाठी विष्णूचा ७वा अवतार असलेल्या अजानुबाहू,पद्मासनात असलेल्या,पितवस्त्र परिधान केलेल्या सूर्यविकासी कमलदलासारखे नेत्र असलेल्या,ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे अशा श्रीरामचंद्रांची मूर्ती अंतःचक्षुंसमोर आणून प्रज्ञावान अशा श्रीरामरक्षेचे दररोज, नियमित ,प्रसन्न अशा प्रातःकाळी, दिवेलागणीच्या शुभ समयी अथवा दिवसांच्या कोणत्याही प्रहरी,अडचणीत असताना,अनाकलनीय भितीने मनाला ग्रासले असताना,एकांतवासात असताना रामरक्षेचे पठण करावे. रोज ११वेळा करावे .ते करत असताना तटस्थ राहून दृष्टी विशाल होण्यासाठी निःशंक मनाने,,व पूर्ण आत्मनिष्ठेने...नकारात्मकतेला मनात स्थान न देता एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करुन श्रीरामाचे ध्यान करणे...नव्हे तर ही एकाग्रता म्हणजेच ध्यान व ध्यानाचे फळ होय...अथ ध्यानम्🙏
*१० रामरक्षेत रामसाठी आलेली विशेषणे कोणती त्यापैकी एकाचे स्पष्टीकरण करा.*
जितेंद्रिय,
लोकाभिराम,
रणरंगधीर,
राजीवनेत्र,
रघुवंशनाथ,
कारुण्यमूर्ती,
करूणाकर,
पुराणपुरुषोत्तम,
जानकीवल्लभ,
रामभद्र,रामचंद्र,
प्रजापती,रघुनाथ,
भरताग्रज,रघुनंदन,
,माता,पिता,
स्वामी,मीत्र,
अजानुबाहू--
अक्षयाशुगनिषङ्गगशङ्गिनौ--
अक्षय-कधिही न संपणारा
+आशुग -पुढेपढे जाणारा बाण
निषङ्ग संङ्गिनौ भाता जवळ असलेले असे श्रीराम.(सहलक्ष्मण)
*११. रामरक्षेचा छंद कोणता?*
उत्तर-अनुष्टुप छंद
*१२.रामरक्षेतील कोणत्या श्लोकात राम या शब्दाची सर्व विभक्ती रूपे आली आहेत?*
उत्तर-
रामो राजमणीः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं।
रामे चित्तलयः सदा भवतु भो राम मामुद्धरः।।३७।।
*१३. रामरक्षेचा प्रचार व्हावा म्हणून तुम्ही काय कराल?*
उत्तर-
पाठांतरक्षम वयापासून शिबीर
सामुदायिक पाठांतर
*नियमित संथा देणे
*पाठांतर स्पर्धा आयोजन
*१४. रामरक्षेत एकुण श्लोक किती, कोणत्याही एक श्लोकाचा अर्थ लिहा.*
उत्तर-३८ श्लोक
श्लोक...वज्रपन्ञरनामेदं तो रामकवचं स्मरेत।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्।।१४।।
अर्थ...श्रीरामरक्षा हे रामकवच वज्राच्या..(लोहाच्या) पिंजऱ्या प्रमाणे संरक्षक आहे.म्हणूनच त्याला वज्रपंजर म्हटले आहे.जो रामकवचाचे नित्य स्मरण करील त्याची आज्ञा (ईच्छा)कधीही अमान्य केली जाणार नाही.🙏श्रीराम.🙏
No comments:
Post a Comment