TechRepublic Blogs

Thursday, February 29, 2024

pure soul

 आपण जो गोंदवल्यास किंवा घरी आपण एक  काकड आरती म्हणतो.."उठी उठी बा महाराजा 'ही आरती परम पूज्य ती तात्यासाहेब केतकर यांनी लिहिलेली आहे.

 पू तात्या साहेब केतकरांकडून वाणी रूप आविष्कार झाला. म्हणजे तात्या पेटीवर बसत आणि महाराज त्यांच्या मुखातून बोलत. पू तात्या अतिशय लीन आणि नम्र आणिअत्यंत  शुद्ध अंतःकरणाचे होते. जर त्यांना कोणी नमस्कार केला तर त्यांचे पाय आत मध्ये आकुंचित व्हायचे. हे सर्व सन्कोचाने व्हायचे. 

नेहमी ते दुसऱ्याना पण नम्र होऊन नमस्कर कारवायास तत्परतेने तैयार असत. आता सांगायचे हेच की जी काकड आरती म्हणतो त्यात शेवटच्या कडव्यात पू तात्या म्हणतात ''ब्रह्मानंद आनंद सागर तुमचे चरणी झाले स्थिर  (महाराजांच्या )चरणी स्थिर यांचे चरणीचा (म्हणजे ब्रहम्नन्द बुवा  आणि आनंद  सागर)यांचा किन्कर दर्शन   सूख प्रार्थतसे. ह्यात त्यांनी स्वतःचे नाव गुंफले नाही. केवढी ही लीनता. 

त्या मूळे काकड्यात म्हटले जाणारे हे पद pure soul असणाऱ्या पू तात्या साहेब केतकरांनी लिहीलं आहे हे खुप लोकांना माहीत नाही. 


*🌸 नाम पुष्प 🌸*


🙏🏻🌹 श्रीराम समर्थ 🌹🙏🏻

Wednesday, February 28, 2024

झाड

 मारल्याशिवाय 

झाड कधीच मरत नाही

फुल फळ सावली दिल्याशिवाय

झाड उगाचच ढळत नाही.

कोणतेच झाड माणसाला

कधीच छळत नाही

झाडाशिवाय माणसाचं

पानही हालत नाही.

दुर्दैव हे माणसालाच कळत नाही.

चुलीत सरपण हवे

यज्ञात अर्पण हवे

चिता जाळायलाही शेवटी 

एक झाडच हवे. 

झाड झुल्यासाठी हवे

झाड सावलीसाठी हवे

पावलो पावली एक झाड हवेच.

फळ फुल हे तर हवेच हवे

झाडांवरच उडतील

पक्षांचे थवे.

एक झाड मरताना

कधीच रडत नाही

कितीही क्रुर वागा तुम्ही

झाड अंश पेरणे विसरत नाही. 

झाड पाणी देते

झाड गाणी देते

तुमच्या कुर्हाडीच्या दांड्यालाही

झाडाचेच लाकूड लागते. 

झाड तुमचे सारे काही ऐकते 

कधीतरी झाडाशी बोलून तर पहा

झाड नकळत खूप काही सांगते. 

एक झाड लावताना

मनात काही शंका नको

झाड उगवतेच कसेही कुठेही

फक्त लावल्याशिवाय ते उगवत नाही

आणि मारल्याशिवाय

झाड कधीच मरत नाही.


©️ शैलेन्द्र

Tuesday, February 27, 2024

सप्तरंग

 *तुमचं गाणं ऐकत-ऐकत प्राण सोडायचाय....*


*हृदयनाथ मंगेशकर.*


बांगलादेशाच्या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी *लता मंगेशकर* यांनी अत्यंत तळमळीनं कार्यक्रम सादर केले होते. या कार्यक्रमांत त्यांना साथ दिली होती *पंडित हृदयनाथ मंगेशकर* यांनी. तो रोमांचकारी, तसंच हृदयद्रावक अनुभव पंडितजींनी खास *‘सप्तरंग’* च्या वाचकांसाठी शब्दबद्ध केला...


‘‘सन्माननीय! आपल्याला सूचना देण्याचं काम माझ्याकडं देण्यात आलं आहे...या विमानात आसनं नाहीत, फक्त लोखंडी पट्ट्या आहेत...त्यांवर आपल्याला बसावं लागेल...आधारासाठी एक लोखंडी साखळी आहे...तिला धरून बसावं...खिडक्या उघड्या आहेत...बाहेर डोकावू नये...प्रवास फक्त अर्ध्या तासाचा आहे...आत कोकाकोला मिळेल...’’

एवढं बोलून तो जवान बाजूला झाला. कलाकार विमानात बसू लागले. *सुनील दत्त, नर्गिस, माला सिन्हा, दीपक शोधन, दीदी, मी, नारायण नायडू* असे एकेक कलाकार त्या लोखंडी बारवर बसले. समोर लटकलेली साखळी घट्ट धरून मी एका जवानाला विचारलं  *‘‘या खिडक्या उघड्या का?’’*


*‘‘गोळ्या झाडण्यासाठी.’’*

*‘‘थंडी वाजत नाही?’’*

*‘‘जीव वाचवण्यात थंडी लागत नाही,’’* निर्विकार उत्तर. मी गप्प.

विमान एका मैदानात उतरलं. छोटासा रंगमंच...पडदा नाही. समोर पाच ते सात हजार जवान. एक कर्कश माईक. बस्स. ‘कार्यक्रम सुरू करा’

कार्यक्रम सुरू झाला. सुनील दत्त यांनी निवेदन केलं. नर्गिस यांनी जवानांचे आभार मानले. माला सिन्हा यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या. पुढं काय? मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे नायक-नायिकांनी रंगमंचावर येणं, जवानांना नमस्कार करणं, शुभेच्छा देणं...बस्स. असा मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. जवानांमध्ये चुळबुळ सुरू होण्याआधीच सुनील दत्त यांनी दीदीचं नाव घोषित केलं. दीदी रंगमंचावर आली. पाहिलं आणि जिंकलं. जवानांमध्ये नवा जोश आला.


*‘भारतमाता की जय...’ ‘लतादीदी झिंदाबाद...’*

*आणि टाळ्यांचा कडकडाट...*


*कोई सिख, कोई जाट-मराठा*

*कोई गुरखा, कोई मदरासी*

असे वेगवेगळ्या जातींचे-प्रांतांचे-भाषांचे ते जवान आपापल्या भाषेत दीदीचा जयजयकार करू लागले. कुणी दीदीच्या पाया पडतंय...कुणी रडतंय...कुणी शुभेच्छा देतंय...कुणी फर्माईश करतंय...संगीताच्या अमोघ शक्तीचा साक्षात्कार घडत होता. दीदीवर रसिक किती निरपेक्ष प्रेम करतात याचा प्रत्यय येत होता. कुठलाही देश, कुठलेही रसिक, कुठलीही परिस्थिती असो; पण संगीताशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. कारण, संगीत ही प्रत्यक्ष संवेदना आहे. दीदीनं गायला सुरुवात केली.

एकदा माझ्याकडं बघून मिष्किलपणे हसली. नायडूला खूण केली आणि तिनं गायला सुरवात केली. युद्धभूमीवर अत्याचार, किंचाळ्या, विव्हळणं, गोळीबाराचे आवाज यापेक्षा एक ईश्वरी सूर त्या हिंसाचारी भूमीवर घुमू लागला.


तृषार्त भूमीवर *‘बरखा ऋतू’* रिमझिम बरसू लागली. ते जवान, ती रणभूमी पावन झाली. दीदी जीव लावून प्रत्येक रसाची गाणी गात होती. न थकता, न दमता. आणि, शेवटच्या गाण्याची तिनं सुरुवात केली...


*ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी*

*जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी*

*जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली*

*जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली*

*थे धन्य जवान वो अपने थी धन्य वो उन की जवानी*

*जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी...*


कार्यक्रम संपला. आम्ही मेसमध्ये आलो. दुसऱ्या दिवशीही कार्यक्रम होता. सर्वजण थकले होते. आराम करत होते. तोच एक अधिकारी दीदीला भेटायला आले. त्यांनी दीदीचे खूप आभार मानले आणि शेवटी म्हणाले : ‘‘इथं खूप मराठी जवान आहेत. त्यांच्यासाठी एक तरी मराठी गाणं गा...’’

दीदी म्हणाली : ‘‘अगदी आनंदानं...उद्याच्या कार्यक्रमाची सांगता मी मराठी गाण्यानं करणार.’’

अधिकारी आनंदानं दीदीचे आभार मानून गेले.


दुसऱ्या दिवशी एका शेतात रंगमंच लावून कार्यक्रम सुरू झाला. जे काल घडलं होतं तसंच आजही घडत होतं.

मध्येच मी दीदीला म्हणालो : ‘‘काल तू ‘मराठी गाण्यानं कार्यक्रमाची सांगता करणार’ असं म्हणालीस; पण पसायदानसारख्या प्रार्थनेनं सांगता करू नकोस. ही समरभूमी आहे.’’

‘‘मला हे शिकवण्याची आवश्यकता नाही. कुठं काय गावं हे मला बाबांनी शिकवलं आहे. ऐक, मी काय गाते ते!’’ दीदी म्हणाली.

कार्यक्रमाच्या शेवटाला दीदीनं जवानांना मनोगत सांगितलं  ‘ *‘ऐ मेरे वतन के लोगो...’* या गाण्यानं मी आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार नाही. *‘ऐ मेरे वतन के लोगो...’* हे फार लोकप्रिय आहे. फार हृद्य आहे...पण ते पराभवानंतर केलेलं सांत्वनगीत आहे.


मी ज्या गाण्यानं सांगता करणार आहे ते गाणं तुम्ही ऐकलेलं नसेलही. तुम्हाला ते कळणारही नाही; पण तुम्हाला त्या गाण्यातून जयध्वनी ऐकू येईल. पराजयाचा डाग पुसून तुम्हाला त्यात जयाची छबी दिसेल. विजयाचा जयजयकार ऐकू येईल...’’

सारे जवान, कलाकार अधिकारी शांत झाले. प्रत्येकाच्या मनात एक पाल चुकचुकत होती...*‘ऐ मेरे वतन के लोगो...* ’सारखं हुकमी गाणं सोडून लतादीदी हे अनामगीत का गात आहेत...सगळे कुतूहलानं ऐकत होते. दीदीनं गायला सुरुवात केली 


*हे हिंदुशक्तिसंभूत दिप्तितम तेजा*

*हे हिंदुतपस्यापूत ईश्वरी ओजा*

*हे हिंदुश्रीसौभाग्यभूतीच्या साजा*

*हे हिंदुनृसिहा प्रभो शिवाजी राजा*

*प्रभो शिवाजी राजा...*


काव्याचा एक शब्दही कुणालाच कळला नाही. कळलं एकच की, ही शिवस्तुती आहे. *‘प्रभो शिवाजी राजा’* हा शब्द आला आणि श्रोत्यांमध्ये *‘छत्रपती’* अशी आरोळी उठली. सारं वातावरण शिवमय झालं. *हिंदुपदपादशाही...शिवाजीमहाराज छत्रपती...सारं वातावरण भगवं झालं. गर्जा जयजयकार क्रांतीचा...गर्जा जयजयकार...*


छत्रपती शिवाजीमहाराज, राणा प्रताप, भगतसिंग, मदनलल धिंग्रा, सुखदेव, सावरकर या साऱ्या क्रांतिवीरांच्या जयघोषानं सारं वातावरण भरलं-भारलं. ‘‘दीदी! काय गाणं शोधून काढलंस तू! सारं वातावरणच बदलून गेलं.’’ ‘‘काय आहे बाळ...माझं सारं बालपण क्रांतिकारकांबरोबर गेलं. का कुणास ठाऊक; पण नेमस्तांपेक्षा मला क्रांतिकारक जवळचे वाटतात...’’

दीदी! आम्ही तुमचं मुंबईमध्ये स्वागत करतो. बांगलादेशात जवानांसाठी तुम्ही वीस दिवसांत बावीस कार्यक्रम केले. आम्ही जवानांतर्फे आपले आभार मानतो. एक विनंती आहे, ‘सारे जखमी जवान इथं ‘अश्विनी हॅास्पिटल’मध्ये आहेत. त्यात एक जाधव नावाचा जवान खूप गंभीर अवस्थेत आहे. तो सारखी तुमची आठवण काढतो. तुम्हाला भेटण्यासाठी त्याचे प्राण अडकले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की, आपण ‘अश्विनी हॅास्पिटल’ला भेट द्यावी.’


दुसऱ्या दिवशी दीदी हॅास्पिटलमध्ये गेली. अतिशय उदास होती. घाबरली होती.

*‘‘बाळ, तो जवान माझ्यासमोर मृत्यू पावला तर? माझ्या मनाला फार लागेल ते...’’*

प्रत्येक जखमी जवानाशी बोलत, सांत्वन करत, कधी धीर देत दीदी त्या जाधव नावाच्या जवानापाशी पोहोचली. जवान अगदी खरोखरच जवान होता. पांढऱ्या कापडानं त्याचं शरीर झाकलेलं होतं. दीदीला बघून तो मनमोकळं हसला.

*‘‘दीदी, माझं काही खरं नाही, माझी एकच इच्छा आहे, ‘आपलं गाणं ऐकत ऐकत प्राण सोडावा...* आपण माझ्यासाठी गाणं गाल ना?’’

मला वाटलं, दीदी आता तणावानं कोसळणार; पण दीदी स्तिथप्रज्ञासारखं म्हणाली : ‘‘कोणतं गाणं आपल्याला ऐकायचं आहे...?’’


तो हसला  *‘‘आ जा रे परदेसी...’’*

दीदीनं गायला सुरुवात केली. ती इतकी सहज गात होती की, जणू तालीमच चालली आहे.


*मैं तो कब से खडी उस पार*

*के अखियाँ थक गई पंथ निहार*

*आ जा रे ऽऽ परदेसीऽऽ*


आणि आश्चर्य...दीदी आणि ऐकणारे सगळे जण प्रसंग काय हे विसरून गाण्याशी एकाकार होऊ लागले. तेवढ्यात डॅाक्टरांनी दीदीला थांबवलं.


*सारं संपलं होतं. जखमी जवान साऱ्या यातनांमधून मुक्त होऊन ‘उस पार’ गेला होता. दीदी शांत होती; पण हात धरून चालत होती...*

Sunday, February 25, 2024

नामप्रभात

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*




    *रामचरित्र सर्वांगसुंदर आहे. रामाचे सर्व गुण आपण आत्मसात करण्यासारखे आहेत. असामान्य पितृभक्ती , निर्लोभता , कर्तव्यनिष्ठा , एकपत्नीव्रत , बंधुप्रेम , सहिष्णुता , अत्यंत प्रेमळपणा , शौर्य या प्रत्येक गुणाचा आपण विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा. राम हा दयामूर्ती आहे त्याचा क्रोधही दयास्वरूपच. रामाने शत्रूला मारले पण मरणान्त उद्धार केला. रामाचा कोपही कल्याणकारक; म्हणूनच रामचरित्र गोड. आपल्याला जुळणारे असेच रामचरित्र आहे. प्रापंचिकाला ते आदर्शरूप आहे म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे.*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

*🌞🙏श्री राम नवमी व*

*श्री रामदास स्वामी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🌞*

Saturday, February 24, 2024

अबोल

 फांदी वरच्या पिवळ्या पानांना, तोडू नका,

एक दिवस ती आपोआप गळून पडतील.


बसत जा घरातील वडीलधारी मंडळीं बरोबर, बोलत राहा,

एक दिवस ती आपोआप शांत होतील.


होवू द्या त्यांना बेहिशेबी, खरचू द्या, मनासारखं वागू द्या,

एक दिवस ती आपोआप तुमच्या साठी, इथेच सर्व सोडून जातील.


नका टोकू त्यांना सारखं सारखं, तेन तेच बोलत राहतात म्हणून,

एक दिवस तुम्ही तरसून जाल, त्यांचा आवाज ऐकायला, जेव्हां ती अबोल होतील. 


जमेल तेव्हढा आशिर्वाद घ्या त्यांचा, वाकून, पाया पडून, 

एक दिवस ती आपोआप जातील वर तसबीर बनून, 

अर्थ नाही मग तुमच्या माफीला, नतमस्तक होऊन, कान धरून. 


नका बोलू चार चौघात त्यांना, खाऊ दे थोडे, मनासारखं, 

मग बघा येणार पण नाही जेवायला, 

भले करा श्राद्ध, सारखं  सारखं. 🙏🏻



कवी............ के. यशवंत. 🙏🏻❤️

Friday, February 23, 2024

वेडा.

 *मनस्पर्श वेडा....!*

👌👌👌👌👌👌🙏


*त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता. आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले. सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.*


*रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत.* 


*स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर FM ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे.... किती छान ना.*


*हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा. ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो ...काहीच नाही.*


*कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही, तर हे सगळे येणार कुठून? हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्सचा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा.... काही वाचून तर काही न बघता, न उघडता.* 


*ऑफिसमधेही याचा 'वेडे'पणा संपायचा नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती.* 


*त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिसमधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत "ताईला बाळ झालंय ना, तिला द्या" म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत, काय म्हणून सांगावा.*


*तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी सोशल मिडीयातून मित्रांशी संवाद साधायचे, तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती.* 


*हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणांसोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःखं काहीशी वेगळी असतात, याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही, म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने 'वेडा' म्हणायची.* 


*त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता. त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती.* 


*एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली, म्हणून हळू हळू चालत जाऊनज त्याने दरवाजा उघडला, तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच "काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?" म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी "अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बडबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले" अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते.* 


*ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळख असेल, याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.*


*त्याचे मित्र "फ्रेंड्स लिस्ट" वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा 'वेडा' खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा.*

त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी "टच" मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांच्या *"मनाला स्पर्श"* करायला आवडायचे.

तो लोकांच्या मनाला *स्पर्श* करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात, तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. 


*केवळ मनस्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.*

*एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं...*


*_"आज प्रत्येकाच्या ठायी असे स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे व आपापसातील संवाद कमी व वादच जास्त वाढत चालले आहेत तरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक रोज एका लहान मुलाशी व एका वयस्कर माणसाशी संवाद साधायला हवा.मुलांशी बोलताना आपण लहान होतो व चार चांगल्या गोष्टी त्याला हक्काने सांगता येतात व वयस्कर माणसाशी संवाद साधल्यावर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते. ही गोष्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या दैनंदिनीत समाविष्ट करा._*


जीवन खुपच सुंदर असते, आहे, ते आनंदात जगा, *"वेडे"* होऊन जगा...!!"...

👌👌👌👌👌👌👌


साभार...!

*विजय तारा नामदेव*

Thursday, February 22, 2024

संधी

 एकदा एका साधकाने श्री.गोंदवलेकर महाराजांना (हे सर्व सद्गुरु मंडळीना लागू आहे ) विचारले आपण एव्हढा परोपकार करीत राहूनही त्या पासून अलिप्तता राखणे आपल्याला जमते तरी कसे? त्या वर श्री.महाराज म्हणाले " परोपकार करणाऱ्या माणसांचे पाच प्रकार आहे." पहिल्या प्रकारची माणसे परोपकार करण्या आधीच त्याची वाच्यता करतात.

 प्रत्यक्षात ती सावकाशीने करतात. दुसऱ्या प्रकारात परोपकार करतात. केल्या बरोबर लगेच आणि वारंवार त्याचा उच्चार करतात. तिसऱ्या प्रकारात केल्याचा बोलबाला करीत नाही पण ती व्यक्ती समोर आली की त्याच्या मनात येते की आपण केले याची जाण ठेऊन वागावे तसे नाही दिसले तर त्याच्या विषयी  तुच्छता वाटते. दुसरा आणि तिसरा हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल. चवथा प्रकारात माणसे दुसऱ्या साठी काही करण्याची संधीच पहात असतात.

 संधी आली की दवडत नाही आणि केलेल्याचा उच्चार ही करत नाही. हा सत्वगुणी परोपकार. साधकाने या प्रकाराला साजेसे वागत जावे. पाचव्या प्रकारची माणसे परोपकार अहर्निश करीत असतात. ते करताना अशी भावना बाळगतात की हे सर्व भगवंताच्या इच्छेने घडत आहे.

 मी फक्त नावापुरता आहे. यात कर्तेपण टाकल्यामुळे व ते भगवंतासाठी असल्याच्या जाणीवेमुळे उपकराचे भानही त्यांना नसते. स्नानाच्या वेळी माणूस सर्व हाताने अंग चोळतो त्यावेळी मी या शरीरावर उपकार करतो आहे असे हाताला वाटत नाही. तसेच हा माणूस  दुसऱ्याला भगवतस्वरुपात पहात असतो म्हणून उपकार हा शब्द ही त्याला आठवत नाही.

Wednesday, February 21, 2024

औदुंबर

 *पलूस तालुक्यातील तिर्थक्षेत्र औदुंबर येथे स्पेशल सहज समाधी ध्यान योग शिबिर* 🌅🧘‍♂️🧎‍♂️🏃‍♂️


 *परमपूज्य गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग* या संस्थेच्या वतीने स्पेशल सहज समाधी ध्यान योग शिबिर तिर्थक्षेत्र औदुंबर येथे आयोजित केले आहे. *तज्ञ प्रशिक्षिका पुनमजी कुलकर्णी, तज्ञ प्रशिक्षक अजयजी किल्लेदार कोल्हापूर या शिबिरासाठी मार्गदर्शन करणार आहेत*.पलूस तालुक्यातील तीर्थक्षेत्र औदुंबर मंदिर येथे दिनांक  19  ते 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हे शिबिर होणार आहे .या शिबिराविषयी बोलताना पूनमजी कुलकर्णी म्हणाल्या 

*"सहज" एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. समाधी ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची अवस्था आहे. सहज समाधी ध्यान म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय.*

 *हे ध्यान दररोज केल्याने शांती ऊर्जा आणि दिवसभर टिकणारी सजगता निर्माण होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते

 *योगा बरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो.

 *गहन विश्रांती चा अनुभव येतो

 *मनात पुन्हा पुन्हा येणारे विचार निघून जातात.

 *जेव्हा मन शांत होते तेव्हा सर्व तणाव निघून जातात आणि मनाची एकाग्रता वाढून तुम्ही तणावमुक्त होता.

        अजयजी किल्लेदा म्हणाले सहज समाधी ध्यान शिबीर केल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि सजगता यामध्ये वाढ होऊन आयुष्याची गुणवत्ता सुधारते.

योगाबरोबर हे ध्यान केल्याने उत्तम आरोग्य आणि शांत मनाचा लाभ होतो.

ध्यान आपल्या  मनाची स्थिती संतुष्ट आणि शांत  करते, ज्यामुळे आपल्या भावनात्मक आणि शारीरिक आरोग्य संतुलीत आणि चांगले  होते.

पण ध्यान करायला आणि मन केंद्रीत करायला कठीण  वाटतं.

त्यासाठी मंत्राचा उपयोग करून समाधी च्या स्थितीला पोहचणं सोपं आणि सरळं शक्य आहे. म्हणून हे टेक्नीक  शिकणं आजच्या काळाची गरज आहे. सहज समाधी ध्यानात सामील व्हा* 

*शिबिराचे संयोजन श्री दत्त सेवाभावी मंडळ (ट्रस्ट), आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवक करीत आहेत* .

 


Monday, February 19, 2024

भावार्थ

 *॥श्रीहरिः॥* 


सातव्या अध्यायाची सांगता करताना(२९ व ३० श्लोक) भगवंतांनी ब्रह्म, अध्याय, कर्म, अधिभूत, अधिदैव,अधियज्ञ या सहा संज्ञांचा उल्लेख केला आणि त्यांचे ज्ञाते मला येऊन मिळतात असे सांगितले.


अर्जुन विचक्षण श्रोता असल्यामुळे त्याने या सर्वांचा अर्थ आपल्याला नेटका उलगडावा म्हणून भगवंतांना प्रश्न केला


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोऽध्यायः 


*अर्जुन उवाच*

*किं तद्ब्रह्म किमध्यात्मं* 

*किं कर्म पुरुषोत्तम ।*

*अधिभूतं च किं प्रोक्तम-*

*-मधिदैवं किमुच्यते ॥* 

*॥८.१॥*


*अधियज्ञः कथं कोऽत्र* 

*देहेऽस्मिन्मधुसूदन ।*

*प्रयाणकाले च कथं* 

*ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥*

*॥८.२॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.१ व ८.२)


*भावार्थ :-अशा तऱ्हेने भगवंताचे वचन न समजलेल्या अर्जुनाने विचारले -* 


*हे पुरुषोत्तमा ! ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म म्हणजे काय ? सकर्म म्हणजे काय ? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहे? हे कृपया मला सांगा.* 


*हे मधुसूदना! यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो ? भक्तीमध्ये युक्त असलेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात ?* 


या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्प्राप्तीचा संदेश दिला आहे. 


यालाच *'अक्षरब्रह्मयोग'* असं देखील नाव दिलेलं आहे. 


अर्जुनाने या योगाचा अनुभव घ्यावा, गीतेचे श्लोक आत्मसात करावेत, ते जगावेत यासाठी भगवंतांनी अर्जुनाच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. 


संपूर्ण ज्ञान आणि शंकारहित मनाचा मालकच भगवद्प्राप्तीसाठी सुपात्र ठरू शकतो. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला सगळ्या प्रश्नांची उचित उत्तरं दिली. 


 *अर्जुनाचे सात प्रश्न -*


१. ब्रह्म म्हणजे काय ?

२. अध्यात्माचा अर्थ काय आहे?

३. कर्म कशाला म्हणतात ?

४. अधिभूत म्हणजे काय ?

५. अधिदैव कशाला म्हणतात ?

६. अधियज्ञ कोण आहे ?

७. मृत्यूसमयी भक्तीमध्ये लीन राहणारे भगवान श्रीकृष्णाला कशा प्रकारे ओळखतात ?


*या प्रश्नांची उत्तरे देणारा महात्मा केवळ भगवान श्रीकृष्णच होय.*


'ब्रह्मकर्माधिभूतादि 

विदुः कृष्णैकचेतसः ।

इत्युक्तं ब्रह्मकर्मादि 

स्पष्टमस्पष्ट उच्यते ।।'


एकमात्र भगवान् श्रीकृष्णच असे आहेत की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, इत्यादींना पूर्णपणे जाणतात. सातव्या अध्यायात

त्याचा उल्लेख झाला. तेच आता आठव्या अध्यायात भगवंत स्पष्ट रूपाने उलगडत आहेत. 


भगवंतांचे अर्जुनावर किती प्रेम होते पहा. म्हणूनच ही गूढविद्या ते प्रगट करत आहेत. 


*ज्ञानोबा म्हणतात,*

जैं कृष्णाचेया होईजे आपण ।

कृष्ण होय आपुलें अंतःकरण। 

तैं संकल्पाचें आंगण । 

वोळगती सिद्धी ।। 


परि ऐसें जें प्रेम । 

तें अर्जुनींचि आथि निस्सीम । 

म्हणऊनि तयाचे काम । 

सदा फल ।।

(ज्ञाने. ८.१०-११).


श्रोतेहो, आपण जेव्हा श्रीकृष्णरूपाशी अनन्यभावनेने एकरूप होतो तेव्हाच आपले हृदय श्रीकृष्णमय होऊन जाते. मग आपल्या संकल्पाच्या मनअंगणात अष्ट महासिद्धी येतात आणि आपली सेवा करू लागतात. हे जे अपूर्व प्रेम आहे ते भक्तश्रेष्ठ अर्जुनापाशी अपरंपार होते. म्हणून अर्जुनाची प्रत्येक इच्छा भगवंत फलद्रूप करत असे.



श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर. 

सार्थ श्रीज्ञानेश्वरी. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

Sunday, February 18, 2024

Rules

 Personal Finance Rules💰


Spare a few minutes on holiday to read some useful & very important rules of personal finance ⬇️


1. Rule of 72 (Double Your Money)

2. Rule of 114 (Triple)

3. Rule of 144 (Quadruple) 

4. Rule of 70 (Inflation)

5. 50-30-20 Rule

6. 3X Emergency Rule

7. 40℅ EMI Rule

8. Life Insurance Rule


1. Rule of 72:

No. of yrs required to double your money at a given rate, U just divide 72 by interest rate

Eg, if U want to know how long it will take to double your money at 8% interest, divide 72 by 8 and get 9 yrs


At 6% rate, it will take 12 yrs

At 9% rate, it will take 8 yrs


2.Rule of 114:

No. of years required to triple your money at a given rate, U just divide 114 by interest rate.

For example, if you want to know how long it will take to triple your money at 12% interest, divide 114 by 12 and get 9.5 years

At 6% interest rate, it will take 19yrs


3.Rule of 144:

No. of years required to, quadruple your money at a given rate, U just divide 144 by interest rate.

(For eg, if you want to know how long it will take to quadruple your money at 12% interest, divide 144 by 12 and get 12 yrs

At a 6% interest rate, it will take 24yrs


4. Rule of 70:

Divide 70 by the current inflation rate to know how fast the value of your investment will get reduced to half its present value. 

The inflation rate of 7% will reduce the value of your money to half in 10 years.


5. 50-30-20 Rule:Allocation

Divide your income into

50℅ - Needs - Groceries, rent, EMI

30℅ - Wants - Entertainment, vacations, etc

20℅ - Savings - Equity, MFs, Debt, FD, etc

At least try to save 20℅ of your income.

You can definitely save more


6. 3X Emergency Rule:

Always put at least 3 times your monthly income in Emergency funds for emergencies such as loss of employment, medical emergency, etc. 

You can have around 6 X Monthly Income to be on a safer side


7. 40℅ EMI Rule:

Never go beyond 40℅ of your income into EMIs. 

Say you earn, 50,000 per month. So you should not have EMIs of more than 20,000.

This Rule is generally used by Finance companies to provide loans. You can use it to manage your finances.


8. Life Insurance Rule:

Always have Sum Assured as 20 times of your Annual Income



Saturday, February 17, 2024

ज्ञानपीठ

 *चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.

याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे, जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.


त्यांनी लिहिले-

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.


- मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असे सांगा.


- जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.


- त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.


- तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.


- आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.


- त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.


- कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.


- किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.


- मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.


- तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.


- त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.


- त्यांना काही लोकगीते वाजवा.


- तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.


- तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.


- त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफ आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.


- तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.


पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.


तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत, ज्यामुळे आपण स्वतः आनंदी आहोत... सुट्ट्या...👍



_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



Friday, February 16, 2024

रचयिता

 श्रीरामरक्षा प्रश्नमंजुषा


*१. रामरक्षेचे रचयिता कोण आहेत?*

उत्तर-बुधकौशिक..विश्वामित्र ऋषी

*२.रामरक्षेत राम हा शब्द किती वेळा येतो?*

उत्तर-८०

*३.मंत्र म्हणजे काय?*

मननात त्रायते इति मंत्र..ज्याचे मनन केले असता तो तारुन नेतो तो मंत्र होय.मंत्र म्हणजे एक ध्वनी,एक शब्द,एक अक्षर किंवा अनेक‌ शब्दांचा एकत्रित समुह...ज्यांच्या पुनरूच्चारणाने भौतिक ,आत्मिक व अध्यात्मिक उन्नती होते.म...हे अक्षर..मानवी मनाचे प्रतिक आहे.जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम बनवते व त्र म्हणजे संरक्षण करण्याची ताकद ज्या मंत्रात आहे .ज्याच्या उच्चाराने पवित्र उर्जा स्पंदने निर्माण होतात व आत्मिक सुख मिळते

*४.रामरक्षा कवचाचे नाव काय?*

उत्तर-रामरक्षा ...रक्षा म्हणजेच कवच होय

*५. रामरक्षा कवचात किती आणि कोणकोणत्या अवयवांचा उल्लेख आला आहे?*

उत्तर-२२

शीर,भाळ,डोळे,कान,नाक,मुख जिव्हा,कंठ,खांदा,भूज,टाळू,हृदय,छाती,

पोटाचामध्यभाग(पाणथरी),नाभी,कंबर,हात,गुढघे,जांघा,पोटऱ्या,पाऊल,मांड्या ...इ.

*६.तुम्हाला समजलेली रामरक्षा सारांश रुपाने लिहा.*

उत्तर--भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितलेली रामरक्षा सर्व पापांचा नाश करणारी,भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण करणारी आहे,सर्व अवयवांचे रक्षण करणारी आहे.या रामरक्षा कवचाने पठण कर्ता सुखी,पुण्यवान,विजयी विनयी होऊन सर्व कार्य सिद्धीस जाणार असून  त्याला मुक्ती मिळणार आहे.

रामरक्षारुपी संरक्षक कवचामुळे सर्वत्र मंगलमय होते.

सतत पुढे जाणारा ,कधिही न संपणारा बाण व भाता ज्यांच्या जवळ आहे असे श्रीराम आपले रक्षण करण्यासाठी सतत आपल्या सवे असणार आहेत...तेच मार्गदर्शक आहेत.

     दुःख,संकटांचा नाश करणाऱ्या,सुख समृद्धी देणाऱ्या  श्रीरामांच्या रामरक्षेचे कवच सदा सर्वकाळ आपले रक्षण करेल.  

🙏श्रीराम🙏

*७. रामरक्षेत रामाशिवाय आणखी किती कोणकोणत्या व्यक्तींचा उल्लेख आला आहे?*

उत्तर-२२.....

सीता,हनुमान,

लक्ष्मण,दशरथ,

कौसल्या,विश्वामित्र(बुधकौशिकऋषी),

सौमित्रिवत्सल(सुमित्रा तीचे पूत्र )शत्रुघ्न,भरत,सुग्रीव,जाम्बुवंत,बिभिषण,रावण,

शंकर(आदिष्टवान),वाल्मिकी,परशुराम(जमदग्नी पुत्र)दुर्वात्मज,पद्माक्ष,पितवासकं,सत्यसंध,लक्ष्मण ,रघुकुलतिलकम्

*८. रामरक्षेतील तुम्हाला आवडलेला श्लोक कोणता?*

उत्तर-श्लोक-

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।

लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयो नमाम्यहम् ।।३५।।

*९. रामरक्षेच्या ध्यान श्लोकाच्या आधारे रामाचे ध्यान कसे करता येईल?*

उत्तर-- ध्यान ही अष्टांग योगाची शेवटची अवस्था होय.रामरक्षेच्या ध्यान श्लोका नुसार मन स्थिर,निर्विचार करण्यासाठी विष्णूचा ७वा अवतार असलेल्या  अजानुबाहू,पद्मासनात असलेल्या,पितवस्त्र परिधान केलेल्या सूर्यविकासी कमलदलासारखे नेत्र असलेल्या,ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे अशा श्रीरामचंद्रांची मूर्ती अंतःचक्षुंसमोर आणून प्रज्ञावान अशा श्रीरामरक्षेचे दररोज, नियमित ,प्रसन्न अशा प्रातःकाळी, दिवेलागणीच्या शुभ समयी अथवा दिवसांच्या कोणत्याही प्रहरी,अडचणीत असताना,अनाकलनीय भितीने मनाला ग्रासले असताना,एकांतवासात असताना रामरक्षेचे पठण करावे. रोज ११वेळा करावे .ते करत असताना तटस्थ राहून दृष्टी विशाल होण्यासाठी निःशंक मनाने,,व पूर्ण आत्मनिष्ठेने...नकारात्मकतेला मनात स्थान न देता एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करुन श्रीरामाचे ध्यान करणे...नव्हे तर ही एकाग्रता म्हणजेच  ध्यान व ध्यानाचे फळ होय...अथ ध्यानम्🙏

*१० रामरक्षेत रामसाठी आलेली विशेषणे कोणती त्यापैकी एकाचे स्पष्टीकरण करा.*

जितेंद्रिय,

लोकाभिराम,

रणरंगधीर,

राजीवनेत्र,

रघुवंशनाथ,

कारुण्यमूर्ती,

करूणाकर,

पुराणपुरुषोत्तम,

जानकीवल्लभ,

रामभद्र,रामचंद्र,

प्रजापती,रघुनाथ,

भरताग्रज,रघुनंदन,

,माता,पिता,

स्वामी,मीत्र,

अजानुबाहू--

अक्षयाशुगनिषङ्गगशङ्गिनौ--

अक्षय-कधिही न संपणारा 

+आशुग -पुढेपढे जाणारा बाण

निषङ्ग संङ्गिनौ भाता जवळ असलेले असे श्रीराम.(सहलक्ष्मण)

*११. रामरक्षेचा छंद कोणता?*

उत्तर-अनुष्टुप छंद

*१२.रामरक्षेतील कोणत्या श्लोकात राम या शब्दाची सर्व विभक्ती रूपे आली आहेत?*

उत्तर-

रामो राजमणीः सदा विजयते रामं रमेशं भजे।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं।

रामे चित्तलयः सदा भवतु भो राम मामुद्धरः।।३७।।

*१३. रामरक्षेचा प्रचार व्हावा म्हणून तुम्ही काय कराल?*

उत्तर-

पाठांतरक्षम वयापासून शिबीर

सामुदायिक पाठांतर

*नियमित संथा देणे

*पाठांतर स्पर्धा आयोजन

*१४. रामरक्षेत एकुण श्लोक किती, कोणत्याही एक श्लोकाचा अर्थ लिहा.*

उत्तर-३८ श्लोक


श्लोक...वज्रपन्ञरनामेदं तो रामकवचं स्मरेत।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्।।१४।।

अर्थ...श्रीरामरक्षा हे रामकवच  वज्राच्या..(लोहाच्या) पिंजऱ्या प्रमाणे संरक्षक आहे.म्हणूनच त्याला वज्रपंजर म्हटले आहे.जो रामकवचाचे नित्य स्मरण करील त्याची आज्ञा  (ईच्छा)कधीही अमान्य केली जाणार नाही.🙏श्रीराम.🙏 


Thursday, February 15, 2024

एकाने

 *तसे पाहिल्यास* 

*"  श्रीराम " आणि " श्रीकृष्ण "*

 *हे  दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !!* 

*एकाने "अयोध्या ते रामेश्वर" पर्यंतचा*

 *तर दुसऱ्याने "द्वारका ते आसाम" पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत. गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!*

*तस तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे नाही कां?.* 

*एकाने जन्म घेतला तो  रणरणत्या उन्हात आणि तो ही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो  ही मध्यरात्री !!* 

*एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात !!*

*साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिनीच.....*  

*एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!* 

*शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे  हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.* 

*ज्यांच्यामुळे यांच्या चारीत्र्याला वेगळे वळण लागले त्यादोघी म्हणजे  कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या...*

*ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यां दोघांनी ही आनंदाने स्वीकारले.!!* 

*एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !*

*एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!!* 

*एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.*

*एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.*

*एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.*

*एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.*

*एकाने झाडामागुन बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.*

*पहिला  Theory.... आहे. तर...दुसरा Practical  आहे.!!* 

*दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे*

 *"दीपस्तंभ" बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.!!*

*जय श्रीराम ... जय श्रीकृष्ण !!*

🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏

Wednesday, February 14, 2024

वंदना

 *श्रीराम वंदना*

शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं..!!!


*नादातुनी या नाद निर्मितो*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*नाद निर्मितो मंगलधाम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*परब्रम्हांततआहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*चैतन्यात आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सत्संगाचा सुगंध राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*आनंदाचा आनंद राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*त्रिभुवनतारक आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सुखकारक हा आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*श्रद्धा जेथे तेथे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*शांती जेथे तेथे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सबुरी ठायी आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*चैतन्याचे सुंदर धाम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*पुरुषोत्तम परमेश राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*भक्तिभाव तेथे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*निर्गुणी सुंदर आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*लावण्याचा गाभारा*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*कैवल्याची मूर्ती राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*चराचरातील स्फूर्ती राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*अत्म्याठायी आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*पर्मात्माही आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सगुणातही आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*निर्गुणी सुंदर आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*जे जे मंगल तेथे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सुमंगलाची पहाट राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सृष्टीचे ह्या चलन राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*कर्तव्याचे पालन राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*दु:ख निवारक आहे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*स्वानंदाच्या ठायी राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सुंदर सूर तेथे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*शब्द सुंदर तेथे राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सकल जीवांच्या ठायी राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*वात्सल्याचे स्वरूप राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सुंदर माधव मेघश्याम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*दशरथ नंदन रघुवीर राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*अयोध्यापती योद्धा राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*रघुपती राघव राजाराम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*रामनाम सुखदायक राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सकल सुखाचा सागर राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*चराचरातील जागर राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*रामभक्त नीत स्मरतो राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*कुशलव गायिणि रमतो राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*हनुमंताच्या हृदयी राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*जानकी वल्लभ राजस राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*चराचरातील आत्मा राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*समर्थ वचनी रमला राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

कुलभूषण रघुनंदन राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*राम गायिणि रमतो राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*स्वरांकुरांच्या हृदयी राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*भक्तीरंगी खुलतो राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*दाशरथी हा निजसुखधाम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*कौसल्यासुत हृदयनिवास*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*राजीवलोचन पुण्यनिध्य हा*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*सीतापती कैवल्य प्रमाण*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*पत्नीपरायण सीताराम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*लक्ष्मण छाया दे विश्राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*आदर्शांचा आदर्श राम*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

*एक वचनी हा देव महान*

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

 *जय गजानन माऊली जय साईराम*🌹🌹🙏🙏

Tuesday, February 13, 2024

साधक

 एकदा एका साधकाने श्री.गोंदवलेकर महाराजांना विचारले की " महाराज अनुसंधान साधण्यासाठी मौनाची फार जरुरी आहे असे वाचनात आले , हे आम्हां प्रापंचिकांना जमावे कसे? श्री.महाराज म्हणाले "ही गोष्ट दोन - तीन टप्पांनी सहज साधण्यासारखी आहे. प्रथम असे करावे की स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याचा दोष याबद्दल बोलायचे नाही. कुठल्याही व्यक्तीबद्दल कसलीही रिकामटेकडी चर्चा करावयाची नाही असा निश्चय करायचा. या बाबत फार जागरूक रहावे लागते. एव्हढे सांभाळले तरी आपले बोलणे पन्नास टक्यांनी कमी होईल. नंतर काही बोलावेसे वाटेल तेव्हा मनात विचार करावा की हे बोललेच पाहिजे का ? हा विचार करत गेलात की आणखी चाळीस टक्के बोलणे वाचेल. अशा प्रकारे नव्वद टक्के वेळ आणि लक्ष नामाच्या अनुसंधनाच्या कामी लावता येईल. बाकी दहा टक्के आगदी आवश्यक असेल तसे बोलणे होईल त्याने मौन भंगेल असे प्रापंचिकाने मानण्याचे कारण नाही."

Monday, February 12, 2024

परमार्थ

 🙏


      *परमार्थाची प्रक्रिया जर योग्य दिशेनं झाली नाही तर गुंता वाढतो. परमार्थ हा 'मी'चा निरास करण्यासाठी आहे, हे भान सुटलं तर परमार्थाची दिशा चुकते. मग 'मी'ची गाठ सुटण्याऐवजी पारमार्थिक 'मी'ची गाठ अधिकच पक्की होते. त्यासाठी प्रपंचाप्रमाणेच परमार्थातही अवधान पाहिजे. आपल्याला कृती करण्याची सवय आहे, वृत्ती बनवायची नाही. बाहेरून पारमार्थिक कृती, बाहेरून पारमार्थिक वेषभूषा, बाहेरून पारमार्थिक वावर आपल्याला पटकन जमतो पण वृत्ती तशी नसते! तोंडी उच्च ज्ञान आहे पण कृती विपरीत, यामुळे त्या परमार्थाबद्दलच लोकांना शंका येते. पारमार्थिक मुखवटा घातलेल्या मला अहंकाराबद्दल तिटकारा असतो, पण तो दुसऱ्याच्या! मलाही आसक्ती आवडत नाही, पण ती दुसऱ्याला असलेली. तेव्हा मी अहंकारी, आसक्त असताना सर्व जग राममय आहे, असं नुसतं बोलत असेन तर काय उपयोग? परमार्थ करणारे जे लोक दिसतात किंवा परमार्थाच्या नावाखाली जे व्यवहार होत असतात त्यांच्याकडे पाहिले असता खऱ्या परमार्थाच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही.*


                                 🙏🙏

Sunday, February 11, 2024

काशी'त

 गोस्वामी तुलसीदास जेव्हा #काशी'त वास्तव्यास होते तेव्हा ते तुलसी घाटावर राहत असत. त्यांच्या नावावरूनच त्या गंगा घाटाला 'तुलसी' हे नाव दिले गेले आहे. त्यांनी आपल्या काशी वास्तव्यात कधीही नैसर्गिक विधी काशीत केले नाहीत. मलमूत्र विसर्जन करण्यासाठी ते नावेने गंगा पार करून पलिकडे जात आणि विधी उरकून परत येत. 


एकदा असेच तुलसीदास नैसर्गिक विधी उरकून परत जात असताना तिथे एक प्रेत प्रकट झालं आणि म्हणालं की मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझी इच्छा सांग. तेव्हा तुलसीदास म्हणाले की, पण मी तुला कधी प्रसन्न करून घेतलं ? त्यावर प्रेत म्हणालं, मी अपवित्र पाण्यावर जगतो. तुम्ही तुमचे विधी झाल्यावर उरलेलं पाणी या बाभळीच्या झाडाला टाकता, त्या पाण्यावरच मी जगत आलो आहे आणि आता तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. यावर तुलसीदास म्हणाले की ठीक आहे, पण माझी कुठलीच इच्छा नाहीये, मला फक्त श्रीराम यांचं दर्शन घ्यायचं आहे. यावर ते प्रेत म्हणालं की हे सामर्थ्य माझ्यात नाही, पण हे दर्शन तुम्हाला कसं घडू शकेल हे मी सांगू शकतो. 

तुम्ही रोज रामकथा करता. तुमच्या कथेला दररोज हनुमान येतात. हनुमानाचे पाय धरा. तुम्हाला श्रीरामांचं दर्शन घडेल. त्यावर तुलसीदास म्हणाले की मी कसा हनुमानाला ओळखणार ? यावर ते प्रेत म्हणालं की कथेला सर्वात पहिल्यांदा हनुमान येतात. अगदी शांत बसून राहतात. अतिशय मळके कपडे घालून येतात आणि जेव्हा कथा संपते तेव्हा तिथलीच माती कपाळाला लावतात आणि जातात. यावरून तुम्ही मारुतीरायाला बरोबर ओळखू शकाल. 


तुलसीदास यांनी पुढच्या कथेला बघितलं की मळके कपडे घातलेला एक वृद्ध सर्वात आधी कथेसाठी येऊन बसला. कथा झाल्यावर सगळे निघून गेल्यावर तो उठला आणि तिथलीच माती कपाळाला लावून तो तिथून जाऊ लागला. हे बघताच तुलसीदास आनंदी झाले आणि त्या वृद्धाच्या मागे जाऊ लागले. "प्रभू आता तरी थांबा..." करीत तुलसीदास त्या वृद्धाचा पाठलाग करू लागले. पुढे तो वृद्ध आणि मागे तुलसीदास. इकडे वृद्धाने आपल्या चालण्याचा वेग वाढवला, तिकडे तुलसीदासांनीही वेग वाढवला. आपल्या मागे तुलसीदास येत आहे आणि त्याने आपल्याला ओळखलं आहे हे हनुमंताला समजलं होतं.

 तुलसीदास यांना टाळण्यासाठी हनुमान जंगलात शिरले. पण आता मात्र हनुमान आणि तुलसीदास यांच्यातील अंतर वाढलं. तुलसीदास यांच्या हनुमानाला थांबवण्यासाठी मारलेल्या हाकांचा आवाज क्षीण होत गेला. म्हणता म्हणता हनुमान जंगलाच्या मध्य भागात आले आणि तेवढ्यात तुलसीदास यांनी येऊन त्या वृद्धाचे पाय धरले. तुलसीदास म्हणाले, प्रभू थांबा. मारुतीराया माझ्यावर दया करा. मला श्रीराम यांचं दर्शन द्या. 


मारुतीरायाने एका झटक्यात तुलसीदास यांचे हात आपल्या पायापासून दूर केले आणि म्हणाले की मी मारुती नाहीये. माझी वाट अडवू नकोस. मला जाऊ देत. तुलसीदासांनी परत त्यांचे पाय धरले आणि म्हणाले की मी तुम्हाला ओळखलं आहे. तुम्ही जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. प्रभू मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन द्या. तुलसीदास विनवण्या करीत राहिले. शेवटी हनुमानाने तुलसीदास यांना त्यांचं प्रत्यक्ष दर्शन दिलं. ज्या ठिकाणी तुलसीदास यांना हनुमानाचं हे दर्शन घडलं, तिथेच आज काशीचं अतिशय प्रसिद्ध 'संकट मोचन हनुमान मंदिर' आहे. या मंदिरात हनुमानाचं प्रत्यक्ष चैतन्य जाणवतं. 


हनुमान पुढे म्हणाले की तुला जर श्रीराम यांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुला चित्रकूट येथे जायला हवे. तिथे स्वामी नित्य येतात. तिकडे गेल्यावर तुला अतिशय सुंदर अशा दोन सुकुमारांचं दर्शन घडेल. तुलसीदास चित्रकूट येथे गेले. तिथे श्रीराम भक्तीत लीन झाले. एकदा ते चित्रकूट परिक्रमा करीत असताना त्यांना घोड्यांवर स्वार झालेले अतिशय सुंदर असे धनुष्यबाण घेतलेले दोन तरुण दिसले. त्या दोघांना बघून तुलसीदास त्यांच्यावर असे मोहून गेले की ते त्या दोघांना ओळखू शकले नाहीत. ते दोघे जसे आले तसेच तुलसीदास यांच्या जवळून निघून गेले. तेवढ्यात तिथे हनुमान आले आणि म्हणाले की प्रभू त्यांच्या धाकट्या भावाबरोबर येथे आले होते. तुला भान राहिलं नाही, पण हरकत नाही. उद्या सकाळी परत एकदा तुला प्रभूंचं दर्शन घडेल. 


दुसर्‍या दिवशी मौनी अमावस्या होती. तुलसीदास राम घाटावर आसनस्थ होऊन श्रीराम यांची वाट बघू लागले. तेवढ्यात तिथे एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, मला चंदन हवं आहे. तुम्ही द्याल का मला चंदन ? त्या लहान मुलाच्या मोहक मुखाकडे तुलसीदास बघतच राहिले. तुलसीदासांचं भान हरपलं आहे, हे हनुमानाने जाणलं आणि म्हणून हनुमानाने एका पोपटाचं रुप धारण केलं आणि म्हणाले, 

"चित्रकूट के घाट पर, भई संतन की भीर,

तुलसीदास चंदन घिसे, तिलक करे रघुवीर।|" 


तुलसीदास लगेच भानावर आले. त्यांनी श्रीराम यांना ओळखलं. तेव्हा रामजी त्यांच्या प्रत्यक्ष रुपात आले, तुलसीदास यांनी प्रभू श्रीराम यांना चंदनाचा टिळा लावला आणि प्रभू श्रीराम यांनीही तुलसीदास यांना चंदनाचा टिळा लावला आणि मग श्रीराम तिथून अंतर्धान पावले. 


श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻


- मंजुषा जोगळेकर


संत

 

           श्रीराम,

       काम, क्रोध, लोभ, मत्सर इ. विकार आपल्या मनातून कसे काढून टाकायचे ह्याचे मार्गदर्शन संत आपल्याला करतात. जगातले विषय आले की त्यांच्याबरोबर अपरिहार्यपणे विकार येतातच. जसे देह आणि दुःख कायम एकत्र असतात त्याप्रमाणे विषय वासना आणि विकार देखील एकमेकांना सोडून रहात नाहीत.

               वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा होय. जेव्हा देव हवा असे वाटते ती देवाची बुद्धी असते. तर विषय हवा असे वाटते ती देहाची बुद्धी असते. ही देहाची बुद्धी जाण्यासाठी सर्व विषय वासना सोडून एका भगवंताला शरण जावे. देहबुद्धी गेली की जीवनातील समूळ दुःखाचा नाश होतो.. तसे मनातील विषय गेले की विकार लोप पावतात.

                क्रोध, संताप कधीही आला तरी तो खेदकारीच असतो.

         संतापाचे काही प्रकार बघुया. 

१)प्रतिक्रिया म्हणून आलेला. 

२)आवश्यकता म्हणून आणलेला संताप 

३)गिळलेला संताप. ह्यात संताप तर आला आहे पण व्यक्त करता येत नाही. 

आपण ज्याठिकाणी कार्यरत असतो, तेथील वातावरण बिघडू नये यासाठी काहीवेळा संताप गिळावा लागतो.

 अशा प्रकारे सोसणे सहन करणे किंवा गिळणे साधकासाठी समर्थनीय नसते. त्याऐवजी संतापाचे कारण शोधून संताप येऊच नये अशी व्यवस्था करणे अधिक लाभदायी ठरते.

                      ||श्रीराम ||

Saturday, February 10, 2024

शाळा

 साबळे सरांची एका शाळेवरुन दुसऱ्या शाळेवर बदली झाली. ते गावं, ती शाळा कधीच पाहीलेली नसल्याने आता त्या गावात जाऊन शाळा शोधावी लागेल म्हणून साबळे सर जरा लवकरच घरातून बाहेर पडले. 


मुख्य रस्ता सोडुन चार किमी आत नागमोडी वळण घेत घेत गाव होतं. जराश्या दुरूनच, गावातल्या मंदिराचा कळस दिसला. तस सरांच्या जीवाला बरं वाटल. 'मोकळं' व्हायचं होत म्हणून सरांनी थोडीशी झाडी पाहुन गाडी थांबवली व मोकळे व्हायला आडोश्याला गेले.....


झुडपाच्या मागे,  एक छोटस तळं होत. त्या तळ्यावर तीन चार म्हशी पाणी पित होत्या. तर बाजूला साधारण तेरा चौदा वर्षाचा मुलगा, हातात काठी घेऊन उभा होता. आज पहिलाच दिवस असल्याने शाळेत गेला नसेल असा सरांच्या मनात विचार आला. त्यालाच शाळा नेमकी कुठे आहे हे विचारावं म्हणून त्या पोराला सरांनी आवाज दिला.


"काय रे पोरा.. गावची शाळा कुठे आहे..?''


त्याने मंदिराच्या कळसाकडे बोट दाखविलं.


''अस तुम्ही गावातून सरळ गेलात की मंदिर लागेल, तिथून डावीकडे वळलात की लगेच समोरच शाळा दिसेल. तुम्ही कोण साहेब आहेत का..?"


''नाही रेऽ मी ह्या गावातला नवीन शिक्षक आहे. तू कोणत्या शाळेत आहे..?''


इतक्यावेळ त्याच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव भितीमध्ये बदलले. तो, काहीच न बोलता त्याच्या म्हशीकडं पळून गेला. सरही जास्त लक्ष न देता गाडीवर गावाकडे निघून गेले.


मंदिरापासून डावीकडे वळले तेच त्यांना समोर तारेचं कुंपण व वर्गखोल्या दिसल्या. पटागंणात साधारण पुरूष उंचीचे चार लिंबाचे झाड दिसले. त्याच्या बाजूला एक पूर्ण वाळलेले पुरूषभर उंचीच 'बदाम'च्या झाडाचा सापळा दिसला. वाळलेल्या झाडाखाली पानांचा लवशेष सुद्धा नव्हता, ह्याअर्थी ते वाळून भरपूर दिवस झाले असतील असं त्यांना वाटलं. 


तो दिवस जाँईन होणं, साफसफाई व सरांना पहायला आलेल्या लोकांना बोलण्यातच गेला. लेकराची ओळख, नाव वगैरे विचारताच आलं नाही. 


जाताना सर परत त्या तलावाजवळ आले. ह्यावेळीही तो मुलगा तिथेच म्हशीला पाणी पाजत होता. एक म्हैस पाण्यात थांड मांडुन बसली होती. तर बाकीच्या तीन बाजूला चरत होत्या. सरांची व त्या पोराची जशी नजरानजर झाली तसा तो पोरगा उठला व काही कळायच्या आतच, पाण्यात बसलेल्या म्हशीला मारायला लागला. त्याच्या दोनचार फटक्याचच ती म्हैस उठली तरी त्याचं तिच्यावर सपासप मारणं चालूच होतं. सरांनी जास्त लक्ष न देता गाडी पुढे नेली. सहज गाडीच्या काचात बघितलं, तर आता तो पोरगा शांतपणे सराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता.


दुसऱ्या दिवशी सर सातवीचे वर्गशिक्षक झाल्याने वर्गात गेले.  गुडमाँर्निंग वगैरे झाल्यावर हजेरी काढली. लेकराचं नाव घेतल की 'येस सर' म्हणत हजेरी चालू होती. सर नाव घेऊन जो 'येस सर' म्हणेल त्याच्याकडुन त्याच्या कुटूंबाची माहीती गोळा करत होते.


'अविनाश दिपक पंडीत' अस दोनदा तीनदा नाव घेऊनही कोणीही येस म्हणालं नाही. तेव्हा एका मुलाने,


''सर तो शाळेत येत नाही.'' अस उत्तर दिलं.

''का रे..?''

''सर, तो खूप आगाऊ आहे म्हणून त्याच्या वडीलांनी त्याला म्हशीमागे लावलं.''


''अस का..? त्याच्या वडीलांना कोण बोलवून आणतं रे..?''

कुणीच हात वरी केला नाही. उलट


''सर, त्याचे वडील त्याला बोलवायला गेलो की आम्हालाच हुसकावून लावतात.''


सरांनी पुढच्या लेकराच नाव घेऊन त्याच्या कुटूबांची माहीती गोळा करायला सुरवात केली. सर्व वर्गाची माहीती  घेऊन एक छानशी गोष्ट सांगून पहिल्या दिवसाची सुरवात केली. 


त्या दिवशीही, साबळे सर त्या तळ्याजवळ आले तेव्हाही तो पोरगा तिथेच म्हशी घेऊन दिसला. काल सारखचं त्याने सरांची नजरानजर होताच म्हशीला प्रसाद द्यायला सुरवात केली.


अरे.. काल पाण्यातल्या म्हशीला मारलं. आज चरत असलेल्या म्हशीला मारलं..? सराच ह्या गोष्टीकडे लक्ष गेल. पण हा केवळ योगायोग असेल म्हणून दुर्लक्ष केलं. 


तिसऱ्या दिवशी परत जेव्हा 'अविनाश पंडीत' नाव आलं त्यावेळी त्यांना सहजच तळ्याजवळील पोरगं लक्षात आलं. कदाचित तोच अविनाश असेल म्हणून त्यांनी विचारणा केली तर तोच 'अविनाश' होता हे पक्क झालं. आपल्या वर्गातील मुलगा वर्गात आला पाहीजे ह्याचा विचार त्याच्या मनात आला. आज जर तो तळ्याजवळ दिसला तर त्याला बोलायच असं त्यांनी ठरवलं.


त्यादिवशीही जाताना सर तळ्याजवळ आले. तेव्हा 'अविनाश' एका झाडाला काट्याच कुंपन करत पाठमोरा बसला होता. तो काम करत असताना एवढ्या तंद्रीत होता की पाठीमागे आलेल्या साबळे सराचां, त्यांच्या गाडीच्या आवाजाकडे त्याचं लक्षही नव्हतं.


'अविनाशऽ' सरानी आवाज दिला.


एका क्षणात त्याची तंद्री तुटली. तसं, त्याने मागे वळून पाहीलं. सरांना पाहताच तो धूम ठोकून पळून गेला.


सरांनी त्याला दोन चार आवाज दिले. 'थांब थांब' म्हणाले. पण त्यांच्या प्रत्येक हाकेवर तो दुर दुर जात होता.


सरांनी त्याचा पिच्छा सोडला. तो ज्या झाडाजवळ बसुन काम करत होता त्याच्यावर सरांची नजर गेली तर ते 'बदामाच रोपटं' होत. जंगलात बदामाच झाड कधीच पाहील नव्हतं. म्हणजे हे नक्किच आपोआप आलेल नाही हे सरांना लगेच लक्षात आलं. दुर जाऊन गाडीच्या काचामध्ये पाहील तर तो म्हशीला मारत होता.


तो दिवसही तसात गेला. अस जवळपास दहा बारा दिवस चालल होतं. सर जवळ जायचे, बोलायचा प्रयत्न करायचे तसा अविनाश पळून जायचा. रोपट्याला पालवी फुटली होती. आता तो पाठमोरा सापडला तर आवाज द्यायचाच नाही. पहिल्यांदा त्याला पकडायच व नंतरच बोलायच हे त्यांनी ठरवल. पण लगेच लक्षात आल की त्या दिवसापासून तो तसा पाठमोरा सापडलाच नव्हता. तो ही हुशार झाला होता.


'काय कराव म्हणजे तो आपल्याला बोलेल..?'


सर त्या दिवशी शाळेत जातानाच तळ्याजवळ आले. सर  तळ्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या ह्या बाजूला खाली उतरले. त्यांच्याजवळ 'बदामाचं रोपट' होत. ते त्यांनी ह्या बाजूला लावलं. आज सरांनी मुद्दामहुन अविनाशवर लक्षच दिलं नाही. रोपटं लावून सर शाळेत निघून गेले. शाळा सुटल्यावर जाताना पाहिल तर त्या रोपट्याच्या बाजूला काट्याच छोटस कुंपन केलेल सरांना दिसलं. अविनाशनेच केलं असणार. बाण बरोबर निशाण्यावर लागल्याच समाधान घेऊन, परत एकदा अविनाशकडे दुर्लक्ष करुन सर निघून गेले.


सर, रोज येता जाताना त्या ठिकाणी थांबायचे व त्यांनी लावलेल्या रोपट्याकडे पहायचे. कधी त्याच्या बाजूच गवतं उपटलेल, तर बाजूची जागा स्वच्छ केलेली दिसायची. रोज रोपट्याच आळ चिखलाने भरलेल दिसायच. ह्याचा अर्थ अविनाश नित्यनियमाने झाडाला पाणी टाकत होता.


एकदिवस, शाळेत जाताना रोजच्या जागेवर थांबले. तर अविनाश त्यांना दुरवरुन पाहताना दिसला. सर काही बोलत नाहीत, काही विचारत नाहीत म्हणून त्याची भिती कमी झाल्याने तो पळाला नाही. सर त्यांनी लावलेल्या रोपट्याजवळ गेले व बाजूला खोदायला सुरवात केली. 


''काय करताय सर..?'' पाठीमागून, बऱ्याच अंतरावरुन आवाज आला. तो पळुन जायला सोप्प पडेल अशा सुरक्षित ठिकाणी उभा होता. सरांनी त्याचा आवाज 'बरोबर' ओळखला व तो स्वत:हुन बोलला ह्याचा त्यांना आनंद झाला. पण चेहऱ्यावर अजिबात न दाखवता ते म्हणाले,


''हे झाड शाळेच्या पटांगणात लावणार आहे.''


''नका लावू. जगणार नाही.''


सर अवाक् झाले. ''का नाही जगणार..?''


''शाळेत, चार पाच फुटावरच खडक आहे. त्यामुळे पाणीच नाही मिळणार झाडाला..''


सराच्या नजरेसमोर पटांगणातल वाळलेल बदामच झाड आलं. 


ह्याच्यापेक्षा ते लिंबाच झाड लावा. त्याला पाणी कमी लागतं व एकदा टिकल की ते लवकर मरत नाही.


सर एकदम आश्चर्यचकित झाले. वनस्पती व गावच्या भूगोलाचा चांगलाच अभ्यास असल्याच पाहुन ते आश्चर्यचकीत झाले. निसर्गाने किती शिकवलं त्याला.. आपल्याला जी गोष्ट लक्षातच आली नाही ती त्याला किती लवकर समजली..


''अरे, पण आता माझी पंधरा दिवस ट्रेनिंग लागली. मी येणार नाही तेव्हा झाडाची काळजी कोण घेईल...?''


''मी घेईल..!''


''ठिक आहे. जर तू पंधरा दिवस ह्या झाडाची काळजी घेतली तर, मी तुला चित्रकलेची वही बक्षीस देईल.''


त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आलं.


सर पंधरा दिवसाने आले तेव्हा त्याच्या रोपट्याने चांगलच अंग धरलेल दिसलं. सर खुश झाले. त्यांनी दुरवर उभं राहुन आपल्याला पाहणाऱ्या अविनाशकडे पाहीलं. तो काही जवळ येणार नाही म्हणून त्यांच्याजवळची 'चित्रकलेची वही' त्यांनी रोपट्याच्या बाजूला ठेऊन निघून गेले.


दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना त्याच रोपट्याजवळ तीच वही होती. त्यांनी वही हातात घेऊन पहिल्या पानावर पाहील तर, त्याच्यावर एक चित्र होत. एक मुलगा काढला होता. त्याच्यावर ढगात (म्हणजेच स्वप्नात) झाडांनी नटलेली शाळा, लेकरं व एका पोराला मारताना मोठा माणूस काढला होता.


सरांनी त्याच्यावर 'गुड' लिहील. तसच हाताने 'सुंदर' म्हणून त्याला खुणावलं. त्याचा चेहऱ्यावर एक सुरेख हास्य दिसलं.


तो रोज एक चित्र काढायचा. सर पाहायचे. चित्र अजिबात चांगले नव्हते पण सर प्रत्येक वेळी गुड, छान लिहुन त्याला न चुकता सुंदर आहे असं खुणवायचे. 


आता अविनाशची हळुहळु भिती कमी होऊ लागली. सराच्या जवळ असताना तो अंतर ठेऊन म्हणा किंवा पळून जाण्याच्या तयारीत नसायचा. 


''तू शाळेत का येत नाहीस..?''


''वडील नको म्हणतात.''


''घरी कोण कोण असत..?"


''दोन बहिणी, आई, वडील व मी..!"


''अच्छा, तुला अभ्यास करायला आवडत का..?''


''हो!'' अगदि हळू आवाजात. त्याचा जो झाडाबद्दल आत्मविश्वास होता त्याचा लवलेशही हे उत्तर देताना नव्हता.


''बरं, आता उद्या तुला मी वही पुस्तक देतो. आपण चित्रासारखचं करत जाऊ. मी येता जाता पाहील. चालेल..?''


चेहऱ्यावर एकदम स्मित करत तो 'हो' म्हणाला. ह्यामुळे वडीलांनाही काही अडचण होणार नव्हती. व शिकताही येणार होत ह्यामुळे तो अतिशय आनंदी दिसत होता.


सरांनी पुढे काही दिवस रोज पाढे लिही, शुद्धलेखन लिही, शब्द लिही असा अभ्यास देत गेले. सुरवातीला त्याचं खूपदा चुकलं. पण सरांनी कधीच त्याला रागावलं नाही की चूकलयं ह्याची जाणीव होऊ दिली नाही. 'फक्त तु ह्यापेक्षा ह्या पद्धतीने करुन पहा,' चुकले किती ह्यापेक्षा बरोबर किती आले ह्याचा आकडा लिहुन, बरोबर आलेल्यांसाठी त्याची प्रशंसा करत राहीले.


हळुहळू दोघातलं अंतर कमी होऊ लागलं. तो आता चांगलाच धीट झाला. सरही शाळा सुटल्यावर अर्धा एक तास मुद्दामहुन त्याला वेळ देऊ लागले. तोही सरांची आता आतुरतेने वाट पाहु लागला. 


बदामाचे दोन्ही रोपट्याच झाडात रुपांतर होऊ लागलं. झाड व अविनाश झपाट्याने वाढू लागले. मधल्या काळात सरांची अजून दोन तीन गावात बदली होऊन सर निवृत्तही झाले.


एकदिवस सरांच्या घरी पोस्टमनने पार्सल आणून दिलं त्यात,


''सर, मी अविनाशऽ.. तुमच्या लक्षातही आहे की नाही कोण जाणे..? पण मला तुम्ही लक्षात आहात. मी तूम्हाला विसरणं शक्यच नाही. ढोरामागच्या पोराला, खोड्या करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध पोराला तुम्ही माणसात आणलं. आज मी एसटीआयची परिक्षा पास झालो. आज माझे सत्कार वगैरे होत आहेत पण तुमच्या शिवाय सत्कार मला नकोच आहे. त्यामुळे मी सर्व सत्कार टाळत आहे. ह्या सत्कारापेक्षा तुमचे दोन शब्द माझ्यासाठी अमूल्य अाहेत. मला माहीत आहे की तुम्ही नक्कीच मला पत्र पाठवून माझी ईच्छा पूर्ण करणार.. एक सांगू.. आता जेव्हा मी त्या वह्या पाहतो त्यावरच तुम्ही तपासताना मुद्दाम चूकीच्या उत्तराकडे दुर्लक्ष केलेल कळतं. पण त्याचमुळे मला 'चूकीचं सोडुन द्यायच, चांगल ते घ्यायचं' हे कळालं. त्या जोरावरच मी आज ईथपर्यंत आलो. तुम्ही गेल्यावर मी ते दोन्ही बदामाचे झाड वाढविले. त्याच 'बदामाच्या सावलीत' मला परत एकदा तुमच्याकडुन 'सुंदर' म्हणवून घ्यायच आहे.. याल का..?


आणि हो.. तुम्हाला आठवत का की म्हशीला मारायचो... ते मी तुम्हाला पाहुन त्यांना मारायचो. तुमच्या अगोदरच्या सरांनी कधीच मला समजून घेतल नाही. त्यांचा राग मी म्हशीवर काढायचो. 'शिक्षक' म्हटलं की मला त्यांचाच चेहरा समोर यायचा व म्हशीला 'शिक्षक' समजून बदडायचो..!  चूकल्यावर 'चूक' म्हणून जेव्हा ते मारायचे तेव्हा त्यांना वाटायच कि मी सुधारेल.. पण मी त्यांच्यापासून दूर जात होतो ते त्यांना कळलचं नाही. पण तुम्हीच शिकवलं ना चांगल ते घ्यायच.. तेव्हा त्या सराबद्दलही माझ्या मनात काहीही द्वेष नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. नाही का..?"


"सोबत, तुमच्या झाडाचे दोन बदाम पाठवत आहे.!!


- अग्रेषित.

Friday, February 9, 2024

उद्देश

 *॥श्रीराम॥*


*"नारद - श्रीराम संभाषण"*   

*"आपण पृथ्वीवर का आलो आहोत"*

 


मनुष्याच्या मनात नेहमीच आपल्या जन्माविषयी अनेक प्रश्न निर्माण होत असतात. 


*जसं,* 

'मी पृथ्वीवर का आलो, मानवी जीवनाचा उद्देश काय...?' 


कधी तर तो हताश होऊन ईश्वराला तक्रार करतो, 


*"इतकं दुःखच द्यायचं होतं तर मला जन्मालाच का घातलं..."* इत्यादी.  



*प्रस्तुत कथेत* या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रभू श्रीरामांनी परम भक्त नारदाला दिली आहेत. मनुष्याचा जन्म म्हणजे किती मोठी संधी आहे आणि पृथ्वी त्याच्या विकासात कोणती भूमिका पार पाडतेय, हे त्या दोघात झालेल्या संभाषणातून आपल्याला समजून येईल. 



*शबरीच्या* सांगण्यावरून प्रभू श्रीराम लक्ष्मणाबरोबर पंपा सरोवरावर पोहोचले. सरोवरातील थंड पाण्यात स्नान करून एका झाडाच्या सावलीत ते बसले असताना तिथे नारदमुनी आले. 


श्रीरामांना सीतेच्या वियोगात आणि शोध कार्यात चिंतित झालेलं पाहून नारदमुनी खूप दु:खी झाले. त्यांना पश्चात्ताप होऊ लागला, त्यांनी दिलेल्या शापामुळेच आज प्रभूंची अशी अवस्था झाली होती. 


*नारदांचा भगवान विष्णूंना शाप :-*


एकदा नारदमुनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे गर्विष्ठ झाले होते.

तेव्हा अहंकारमय झालेले नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवल्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले.


तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली. वैकुंठाहून परत येत असताना नारदमुनींनी एका सुंदर नगरीच्या भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी (विश्वमोहिनी) पाहिली आणि तिच्यावर मोहित झाले. राजकन्येशी लग्न करण्याच्या इच्छेने, ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू, जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल.


असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरांसारखे केले. नारद मुनी, स्वतःच्या रूपाबद्दल अनभिज्ञ होते, तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्येच्या महालात पोहोचले, जिथे इतर राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते. नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले आणि राजकन्येनेही नारदमुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घातली.


तेव्हा नारद मुनींनी पाण्यामध्ये त्यांचा चेहरा पाहिला आणि आपला वानरसारखा चेहरा पाहून त्यांना भगवान विष्णूंचा खूप राग आला आणि ते वैकुंठाला पोहोचले, जिथे तीच राजकुमारी भगवान विष्णूंसोबत बसली होती. तेव्हा नारद मुनींनी क्रोधित होऊन भगवान विष्णूंना शाप दिला की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तुम्हाला तेव्हा वानरांची मदत लागेल. तुमच्यामुळे मला माझ्या प्रिय स्त्रीपासून दूर व्हावे लागले, त्यामुळे तुम्हाला देखील पत्नी वियोग सहन करावा लागेल. असे मानले जाते की नारद मुनींच्या शापामुळे भगवान विष्णूंनी श्रीरामांच्या रूपात मानव जन्म घेतला.



*नारदमुनींना* ही कथा आठवली आणि ते प्रभू श्रीरामांजवळ गेले. आपल्या परमभक्ताला पाहून प्रभू श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले. नारदानं त्यांच्याजवळ क्षमायाचना केली आणि अखंड भक्तीचं वरदान त्यांना मागितलं. 


त्यानंतर नारदानं उत्सुकतेनं विचारलं, 

‘प्रभू, आपण आपल्याच मायेनं  माझ्या मनात विश्वमोहिनी सुंदरीबद्दल आकर्षण निर्माण केलं. शिवाय आपणच तिचा विवाह माझ्यासोबत होऊ दिला नाही. तेव्हा कृपा करून, या लीलेचं कारण मला सांगा.’  


*त्यावर श्रीराम हसून म्हणाले,* 

‘हे नारदा, ऐक! मी माझ्या भक्तांसोबत आईप्रमाणे वागत असतो. मूल जेव्हा छोटं असतं, तेव्हा त्याला सत्य-असत्याची जाण नसते. अशावेळी मी एका आईप्रमाणेच त्यांचं रक्षण करतो. त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या भल्यासाठी कधी रागवतो, तर कधी त्यांचे लाड करतो. कधी त्याला शिकवण देण्यासाठी त्याची परीक्षाही घेतो. अशा समयी भक्ताला वाईट वाटतं, तो दुःखी होतो. परंतु जेव्हा त्याला समज प्राप्त होते, तेव्हा तो स्वत:च म्हणतो, ‘हे दु:ख देऊन ईश्वरानं माझ्यावर कृपाच केलीय. कारण या दुःखद घटनेमुळेच माझा विकास झाला आणि मी सत्याच्या मार्गावर पुढे वाटचाल करू शकलो.’ 


*प्रभू श्रीराम पुढे म्हणाले,* 

‘भक्त जेव्हा ज्ञानाने परिपूर्ण बनतो तेव्हा मला त्याची काळजी नसते, कारण आता तो चांगले-वाईट निर्णय स्वतः घेऊ शकतो. सत्याचं रक्षण तो स्वत: करतो. असा भक्त मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे आहे, जो आत्मनिर्भर, परिपक्व झाला आहे. ज्ञानाच्या तलवारीनं तो आपल्या विकाररूपी शत्रूंना नष्ट करण्यास स्वत: समर्थ असतो. पण ज्या भक्ताचं मन अजूनही चंचल आहे, विकारांनी घेरलेलं आहे आणि ज्ञानाच्या उच्चावस्थेपर्यंत पोहोचलेलं नाही, त्याची मी छोट्या मुलाप्रमाणे काळजी घेतो, देखभाल करतो. कारण तो माझ्यावर अवलंबून असतो. त्याच्या विकाररूपी शत्रूंचा नाश करण्याची जबाबदारी माझी असते. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठीच मी अशी लीला रचतो.’ 


*‘हे नारदा!* 

तू माझा भोळा भक्त आहेस म्हणून मला लहान मुलासारखा प्रिय आहेस. कामदेवाला जिंकल्याचा अहंकार जेव्हा तुझ्या मनात जागृत झाला, तेव्हा तुला आवश्यक असलेला धडा शिकवण्यासाठी तुझी परीक्षा घेतली. त्या परीक्षेदरम्यान तुझे इतर विकार, इंद्रियसुखांची कामना, लोभ, कपट, राग इत्यादी उफाळून वर आले. हे विकार प्रकाशात आणण्यासाठीच मी ती सारी लीला रचली होती. ज्यायोगे त्या विकारांपासून मुक्त होण्यासाठी योग्य पावलं तू उचलावीत. तसं पाहिलं तर ती घटना तुझ्या विकासासाठी आणि भल्यासाठीच होती. आता राहिली गोष्ट तुझ्या शापाची, तर तू त्याचा विचार करून दुःखी होऊ नकोस. कारण संसारात ज्या काही घटना घडतात ती माझीच तर लीला आहे.’ 


*यानंतर श्रीरामांनी नारदाला काही मार्गदर्शन केलं, हे नारदा, लक्ष देऊन ऐक.* 


"मनुष्याची इच्छा, कामना हेच सर्व दुःखांचं मूळ आहे. तेच माणसाच्या गुलामीचं आणि अधःपतनाचं कारण आहे. अहंकार आणि इंद्रियांचं सुख हेच भौतिक इच्छांचं मूळ आहे, जे त्याच्याकडून चुकीचं कार्य आणि कपट करून घेतं. एखादी कामना पूर्ण झाली, तर ती लोभ आणि मोह वाढवते आणि पूर्ण नाही झाली तर राग आणि निराशा निर्माण करते. या दोन्ही गोष्टी हानिकारकच आहेत."


"मनुष्यानं हीच गोष्ट ज्ञानाच्या प्रकाशात समजून घेऊन, भक्तीचं बळ वापरून त्यापासून मुक्त राहिलं पाहिजे.’ श्रीरामांचं हे मार्गदर्शन ऐकून नारदमुनींना आनंद झाला. त्यांना अंंतर्यामी समाधान वाटलं, ‘प्रभूंना माझी किती काळजी आहे... माझ्या भल्यासाठी त्यांनी आपल्या माथी शाप घेतला..नारदमुनी कृतकृत्य झाले."



*आपण पृथ्वीवर का आलो आहोत:-* 


ईश्वर आपल्या भक्ताच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कसं कार्य करतो,  हे प्रस्तुत प्रसंगात स्पष्टपणे सांगितलं आहे. ईश्वराची ही पद्धत समजण्या आधी काही अन्य रहस्यंही समजून घेतली पाहिजेत. 


*उदाहरणार्थ,* 

आपण जर या जगात जन्माला आलोय तर केवळ आरामदायी, सुखसमृद्धी, मनोरंजनानं भरलेलं सुखी जीवन जगून, परत 

जाण्यासाठीच का? की त्यामागे इतर काही उद्देश आहे?पृथ्वीवरचं आयुष्य म्हणजेच संपूर्ण जीवन आहे का? मृत्यूनंतरही जीवन असतं का? 


*अशाप्रकारे मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचे दोन भाग करता येतील.* 


*पहिला* म्हणजे पृथ्वीवरील जीवन, ज्याला आपण *‘पार्ट वन’* म्हणूयात. यालाच स्थूल जगतही म्हणता येतं. कारण इथं सर्व वस्तू स्थूल किंवा भौतिक रूपात असतात. माणसाचं शरीरदेखील स्थूल रूपात असतं.      


*दुसरा म्हणजे* 

मृत्यूनंतरचं जीवन-ज्याला *'पार्ट टू'* असंही म्हणता येईल. यालाच सूक्ष्म जगत म्हटलं जातं. स्थूल शरीराचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य याच सूक्ष्म जगात वावरतो, जिथं त्याचं शरीर सूक्ष्म स्वरूपात असतं. आपण स्वतःला शरीरापासून वेगळं करून पाहिलंत, तर जे शिल्लक राहिलं असतं ज्याच्यासोबत, आपलं भौतिक शरीर (पार्ट वन) संपल्यावरही पुढील यात्रा चालू राहते. अर्थात आपलं मन, विचार, बुद्धी, विवेकशक्ती, विकार, सवयी, वृत्ती आणि चेतना  हे सर्व एकत्र आल्यावर सूक्ष्म शरीर बनतं.


"*कॉम्प्युटरच्या* भाषेत सांगायला गेलो तर शरीराचं हार्डवेअर म्हणजे स्थूल शरीर आणि सॉफ्टवेअर पार्ट म्हणजे जे आपण पाहू शकत नाही, ज्याला स्पर्श करू शकत नाही, फक्त त्याचा अनुभव घेऊ शकतो ते म्हणजे सूक्ष्म शरीर."


*मनुष्याचा* ‘पार्ट वन’ म्हणजे त्याचं पृथ्वीवरील जीवन हे त्याच्या संपूर्ण जीवनाचा एक अगदी छोटासा हिस्सा आहे. त्याचं खरं आणि विस्तृत जीवन म्हणजे ‘पार्ट टू’ होय. ‘पार्ट टू’ हा चेतनेच्या सात स्तरांमध्ये विभागलेला असतो. मनुष्याची चेतना जशी असेल, त्यानुसार त्याला चेतनेचा स्तर मिळतो. 


*एखादा* तामसी, अहंकारी, रागीट, तिरस्कारानं भरलेला मनुष्य खालच्या, निम्न स्तरावर जाईल. 

*तर* पृथ्वीवरच आत्मसाक्षात्कार झालेला मनुष्य चेतनेच्या उच्च स्तरावर जातो. 


*म्हणजेच* ‘पार्ट टू’ मध्ये वरच्या स्तरावर जाण्यासाठी मनुष्याला आपल्या अंतर्यामी सद्गुणांची वाढ आणि विकास करायला हवा. आपल्या वाईट सवयी, कुसंस्कारांतून मुक्त व्हायला हवं. 


*‘पार्ट टू’* चे जीवन अतिशय वेगवान आहे, कारण तिथं स्थूल जगताच्या मर्यादा (लिमिटेशन्स) नाहीत. तिथं केलेला विचार ताबडतोब प्रत्यक्षात येतो. 


*उदाहरणार्थ,* 

आपण एखाद्या ठिकाणी जाण्याचा विचार केला तर त्याठिकाणी  लगेच पोहोचतो. पृथ्वीवर मात्र कुठलीही गोष्ट करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण नीट विचार करून, वाहनांची, मुक्कामाची, खाण्या- पिण्याची सोय करून मगच जातो. 


आपण नीट विचार केलात तर लक्षात येईल, पृथ्वीवर (पार्ट वन) विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यावर पुन्हा विचार करण्यासाठी काही कालावधी मिळतो. हा कालावधी आपल्या सद्गुणांच्या विकासासाठी आणि वाईट सवयींतून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असतो. समजा, आपलं एखाद्या मित्राबरोबर काही कारणानं भांडण होतं. त्या आवेशात आपण त्याला नाही नाही ते बोलतो, त्याच्याबद्दल वाईट विचार करत राहतो. थोड्या वेळानं राग शांत झाल्यावर आपली चूक आपल्या लक्षात येते. आपण म्हणतो, ‘जाऊ दे, तो माझा मित्रच आहे... मैत्रीत बर्‍याचदा असे गैरसमज होतात...’ मग आपण आपल्या मित्राची माफी मागतो, त्यानंतर परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होते. 


*आता जरा विचार करा,* 

हेच भांडण जर ‘पार्ट टू’ मध्ये झालं, रागाच्या आवेशात आपण जे काही चुकीचे विचार केले, तेच प्रत्यक्षात घडले तर काय कराल?


*अनवधानानं नकळत आपण दोघांचंही नुकसान करतो...!*

हेच तर पृथ्वीवरील (पार्ट वन) जीवनाचं वैशिष्ट्य आहे. इथं मनुष्याला कालावधी मिळतो, ज्यात तो आपल्या गुणांचा विकास करू शकतो.आपल्या विकारांवर मनन करू शकतो. त्यांना ओळखून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या नकारात्मक विचारांवर पुनर्विचार करून ते दूर करू शकतो. 



*पृथ्वी - एक शाळा (ट्रेनिंग सेंटर)* 


'मनुष्यासाठी पृथ्वी जणू एक शाळाच आहे. इथं मनुष्याला आपल्या मनाला प्रशिक्षण द्यायचं असतं. त्याचं  मन अकंप, प्रेमन, निर्मळ आणि आज्ञाधारक बनवणं.' 


मनुष्य जन्म म्हणजे *‘ईश्वरीय कृपा’* असं अनेक आत्मसाक्षात्कारी संतांनी संबोधलं आहे. या जन्मात आपल्याला समज प्राप्त करण्यासाठी मन आणि बुद्धीला प्रशिक्षण देण्याची पूर्ण संधी मिळते. 


*परंतु* 

इथं आल्यावर मात्र आपण हा मूळ उद्देशच विसरून जातो. इतर लोकांना पाहून आपणही तसंच वागायला सुरुवात करतो. आपली सांसारिक (इहलौकिक) शिक्षण प्रणाली आणि सामाजिक वातावरण आपल्याला पूर्णपणे भौतिकवादी करून टाकतं. इथं आपण फक्त पैसे कमावण्याची कला शिकतो. स्पर्धेत पुढे जाण्यासाठी, दुसर्‍यांच्या खांद्यावर पाय देऊन, ईर्षा, द्वेष, कपट करायला शिकतो. याचाच अर्थ, आपण आलो होतो, खरंतर विकास करण्यासाठी पण अज्ञानामुळे आपलंच अधःपतन करून परत जातो. 


*इथं आपल्याला पृथ्वीवरील जीवनाचा उद्देश जाणीवपूर्वक समजून  घ्यायला हवा. आपणही आपल्या आयुष्यात येणार्‍या दुःखद आणि प्रतिकूल परिस्थितींचं महत्त्व जाणून, सापाला शिडी बनवण्याची कला शिकायला हवी. जेणेकरून आपल्या जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.* 


*(रामायण रहस्य)*

Thursday, February 8, 2024

सरलार्थः

 ॥ श्रीराम ||

*भावार्थ मनोबोध*

*श्री रविंद्रदादा पाठक*


*आज आपण मनोबोधातला  वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थमाउली म्हणते .*

करी काम निष्काम या राघवाचें । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥ करी छंद निर्द्वद्व हे गूण गातां । हरीकीर्तनी वृत्ति विश्वास होतां ॥


*समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने हरिकीर्तनाने मनुष्याची उत्क्रांती थेट भगवंतापर्यंत कशी होऊ शकते, याचे अप्रतिम वर्णन या श्लोकामध्ये करत आहेत.*

सरलार्थः

*समर्थमाउली म्हणत आहेत की, माझ्या रामाचे कीर्तन, माझ्या भगवंताचे कीर्तन, मनुष्याच्या अंतरंगाचा विकास* *मनुष्यतत्त्वापासून त्या शिवतत्त्वापर्यंत करते, त्या भगवंतापर्यंत करते. जे* *संसारामध्ये अगदी लिप्त आहेत. त्यांना असे वाटते की हा सर्व म्हातारपणाचा, जेव्हा रिटायरमेंट होईल त्यानंतर करायचा प्रकार आहे. पण हरिकीर्तन हे* *मनुष्याच्या जीवनाचे खरे इंधन आहे. भगवंताच्या नामस्मरणाने त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ज्या आत्मतत्त्वाची प्राप्ती होते, ते आत्मतत्त्व या जगातल्या कुठल्याही वस्तूने प्राप्त करता येऊ शकत नाही. ते केवळ आणि केवळ हरिभजनाने, हरिस्मरणाने त्याच्या नामचिंतनाने प्राप्त होऊ शकते.  काय होते  नेमके हरिकीर्तनाने ?*


*समर्थांनी या श्लोकामध्ये तीन अवस्था सांगितलेल्या आहेत ज्या केवळ भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या लीलांच्या वर्णनाने, त्याच्या एकंदरच सर्व व्यक्तिमत्त्वाच्या चिंतनाने जीवाला प्राप्त होतात. पहिली अवस्था ती म्हणजे आपली जी हवे-नकोपणाची वृत्ती आहे, या जगाकडून जो सर्व गोष्टींचा हव्यास आहे, ती वृत्तीच प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाने निष्कामतेमध्ये प्राप्त होते. दुसरा टप्पा असा प्राप्त होतो की, या जगामध्ये मी आहे आणि माझ्या अनुषंगाने हे सर्व विश्व आहे. माझा पती आहे, माझी मुले आहेत,माझी पत्नी आहे, माझे घर आहे, माझी गाडी आहे यामध्ये मी आणि ती वस्तू या दोघांचे रिलेशन आहे.*

*या प्रत्येक रिलेशनमध्ये मनुष्याच्या अपेक्षा आहेत. या दोघांमध्ये द्वैत आहे. भगवंताचे नाम दृष्टीतील द्वैत दूर करते. द्वैत दूर करून या सगळ्यांमध्ये जर आपण थोडेसा तत्त्वचिंतनाने विचार केला तर या प्रत्येक वस्तूला माझे म्हणण्यामध्येच त्या वस्तूचा अंतर्भाव माझ्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे ही वस्तू आणि मी खरेतर वेगळे नाहीच. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता आपण आसक्तीपोटी या दोन गोष्टी वेगवेगळ्या करतो. भगवंताच्या नामाचे खूप मोठे रसायन असे आहे की,*

करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ||

*तिसरा टप्पा तो देतो म्हणजे तो आपल्याला द्वंद्वविरहित करतो. मी आणि तू हा जो या जगाचा नियम आहे या नियमाच्या आधाराने जे द्वंद्व आपल्या जीवनात चालते या द्वंद्वाचाच तो निःपात करून टाकतो. तो आपल्याला निद्वंद्व करून टाकतो. असा हरिकीर्तनाचा महिमा समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितला आहे.*

करी काम निष्काम या राघवाचें ।

*मनुष्याला निरासक्त करणे, मनुष्याच्या जीवनातील सत्य* *पचवण्याची ताकद त्याला देणे, हे भगवंताच्या नामाचे काम आहे. हे केवळ त्याच्या स्मरणानेच प्राप्त होऊ शकते. नाहीतर मनुष्याला त्याच्या जीवनात दुःख पचवणे केवळ अवघड आहे. दुसरा टप्पा भगवंताचे नाम आपल्या जीवनात आणते तो म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये तो समत्व आणतो. हा भगवंतच या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये सामावलेला आहे, याबद्दल दुमत नाही, पण मनुष्याची दृष्टी ही देहबुद्धीची दृष्टी आहे. या देहबुद्धीच्या दृष्टीमध्ये द्वंद आहे. मी आणि तू हा व्यवहार आहे. जोपर्यंत मी आणि तू हा व्यवहार आहे तोपर्यंत रूप आणि स्वरूप यातील संघर्ष हा जीवाच्या दृष्टीने चालू राहतो. मी आणि माझा भगवंत हा संघर्ष त्याच्या दृष्टीने चालू राहतो. मी वेगळा आणि माझा भगवंत वेगळा हा संघर्ष त्याच्यामध्ये चालू राहतो. भगवंताचे नाम हे जीवाला या सृष्टीमध्ये पसरलेले स्वरूप आपल्यासकट दाखवतो. आपल्या महाराजांच्या* *संप्रदायामध्ये रामानंदमहाराज हे तितकेच अधिकारी संत जालनाक्षेत्री होऊन गेले. श्रीगोंदवलेकरमहाराजांनी या रामानंदमहाराजांना चातुर्मासाची दीक्षा दिली होती. या चातुर्मासाच्या दीक्षेसाठी ते किनोळा या गावी जायचे. या किनोळा गावी एक सईबाई देशपांडे नावाच्या विधवाबाई राहायच्या. लहानपणीच वैधव्य आलेले. त्यामुळे आपल्या भावाकडे - बापूराव कुलकर्णी म्हणून त्यांचे भाऊ, त्यांच्याकडे - त्या राहायच्या. त्या काळचा तो समाज. विधवा स्त्रीचे आयुष्य खरोखर एका अर्थाने*

*वाळीत टाकल्यासारखे आयुष्य. घराच्या बाहेरदेखील पडता येणे शक्य नसे. या बापूराव कुलकर्णीच्याकडे एकदा रामानंदमहाराज काही कारणाने गेले असताना बापूराव कुलकर्णीनी आपली बहीण सईबाईंना महाराजांच्या पायावर घातले आणि म्हणाले की हिला अनुग्रह द्या. हिला रामनाम द्या. यावरती ते म्हणाले की, अनुग्रहाचे आपण नंतर बघू पण बाई आता तुम्ही रोज तेरा हजार रामनाम घ्याल का? अशी विनवणी रामानंदमहाराजांनी केली. त्याप्रमाणे बाई नामाला लागल्या. नाम घेता घेता त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाले. काळ झपाट्याने जाऊ लागला. त्या काळचा तो समाज, त्या काळचे ते वैधव्याचे आयुष्य, त्यामुळे शरीराचे झालेले कुपोषण, या सगळ्यामुळे सईबाईंनी अंथरूण धरले. त्यांच्या लक्षात आले की आता आपल्या आयुष्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे. पण यामध्ये बराच काळ निघून गेला होता. प्रचंड नामस्मरण झालेले होते. गुरुकृपा झाली होती. अनुग्रह झाला होता. मग त्यांच्या अंतकाळाच्या वेळेला सद्गुरू त्यांच्या मस्तकाजवळ आले, त्यांची विचारपूस केली आणि म्हणाले, 'सईबाई, आपण कोण आहात?' यावरती सईबाई फक्त स्मितहास्य करत आपल्या देहाचे सारे कष्ट सांभाळत प्रभू रामचंद्रांच्या स्मरणात रामानंदमहाराजांना म्हणाल्या, 'महाराज आपल्या चरणप्रतापामुळे तुमच्या माझ्यासहित सर्वत्र आता मला रामरूपच दिसत आहे. एका वैधव्य आलेल्या स्त्रीच्या आयुष्यात झालेली क्रांती केवळ रामनामामुळे झाली. त्यामुळे* समर्थ म्हणतात की, 'करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥'.

संकलन आनंद पाटील

Wednesday, February 7, 2024

गाठोडे

 *सुंदर वाचनीय लेख*


*जीवनाचे गाठोडे.*


*एक माणूस त्याच्या जीवनातील समस्यांनी कंटाळून गेला होता. रात्रंदिवस चिंता करून, पत्नीशी बेबनाव, मुलांचे शिक्षणाची चिंता, व्यवसायातील चढउतार, वृद्ध आईवडिलांचे आजारपण या सर्वांच्या जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन चालता चालता कंटाळून गेला होता. त्याला जीवनात सर्वत्र अंधारच दिसत होता. यातून काही मार्ग सापडत नव्हता.*


*थोडक्यात, या सर्व ओझ्याखाली तो दबून गेला, परिणामी त्याने आत्महत्या करण्याचं निश्चित केलं.*


*आत्महत्या करण्याच्या इच्छेने, एकदा कोणीही घरी नसताना संधी साधून त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. मरण्यासाठी त्या गोळ्या कमी पडल्या की काय तो गाढ निद्रेत गेला. त्यावेळी त्याला दिसले, त्याच्या आजूबाजूला दिव्य प्रकाश पसरत आहे. ज्या दिशेने प्रकाश येत होता तिकडे नजर वळवली. पाहिले, तर काय ? तेजस्वी चेऱ्यावर मंद मंद स्मित असलेला परमकृपाळूक्ष परमात्मा उभा होता.*


*दोघांची नजरानजर होताच, ते म्हणाले, "बेटा! माझ्या प्रिय मुला! जो पर्यंत तुला बोलावले नाही, त्या आधी माझ्याकडे येण्याची तुला काय घाई आहे?*


*"हे प्रभू ! मला माफ करा! मी तुमच्याकडे येण्याची घाई करीत होतो, त्या बद्दल क्षमा करा. पण जीवनात एक ही पाऊल पुढे टाकण्याची हिम्मत माझ्यात राहिली नाही. माझ्या जबाबदाऱ्या, चिंता आणि दुःखाच हे गाठोडे तुम्ही पाहिले ?*


*स्वतःच्या खांद्यावरील मोठ्या ओझ्याकडे बोट दाखवत तो परमेश्वराला म्हणाला, "आता हा संसाराचा गाडा ओढण्याची शक्ती किंवा हिम्मत दोन्हीपैकी एकही माझ्यात राहिली नाही, म्हणून मी माझे जीवन संपवू इच्छित होतो."*


*भगवान हसून म्हणाले, " पण मी तर तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व चिंता माझ्याकडे सोपवा "असेच सांगितले. तू पण तुझ्या चिंता माझ्याकडे सोपवून रिकामा का होत नाही ?*


*"पण देवा! तुम्ही मलाच का सर्वात भारी गाठोडे दिले आहे ? मी तर माझ्या गाठोड्या इतकं भारी ओझं कधीच कुणाच्या खांद्यावर पाहिले नाही! रडवेल्या सुरात त्या माणसाने तक्रार केली.*


*बेटा! या दुनियेत प्रत्येक व्यक्तीला काही ना काही ओझे उचलण्यास मी दिलेलेच आहे आणि  ते जरुरी आहे बघ!*


*इथे तुझ्या खूप साऱ्या शेजार पाजाऱ्यांची गाठोडी आहेत. तुला असे वाटत असेल की, तुझेच गाठोडे सर्वात भारी आहे, तर तू त्याच्या ऐवजी या मधून दुसरे कुठले ही ओझे घेऊ शकतोस.  बोल, अशी अदलाबदल करायची आहे? गर्भित अर्थाने हसत, भगवान बोलले.*


*आश्रयचकीत भावाने त्या माणसाने, भगवंताच्या पायाजवळ पडलेल्या गाठोड्यांवर नजर टाकली. सर्वच गाठोडी त्याच्या गाठोड्या एवढीच दिसत होती. पण प्रत्येकावर एक नाव लिहलेले होते. ज्या व्यक्तीचे गाठोडे असेल, त्याचे नाव व पत्ता त्यावर लिहलेला होता. सर्वात पुढे असलेल्या गाठोड्यावरचे नाव त्याने वाचले.*


*त्याच्याच घराच्या बाजूला रहाणाऱ्या एका अतिशय सुंदर आणि सुखी दिसणाऱ्या स्त्रीचं नाव त्यावर लिहले होते. त्या स्त्रीचा पती खूप मोठा उद्योगपती होता. त्यांचे घर सुख समृद्धीने भरलेले होते. घरातील प्रत्येकासाठी स्वतंत्र अशी विदेशी कार होती. त्या स्त्रीच्या मुली किमती कपडे आणि आधुनिक दागिने वापरत होत्या. कॉलेज मध्ये शिकणारा तिचा मुलगा दर महिन्याला कार बदलत होता. त्यांचे  कुटुंब उन्हाळ्यात स्वित्झरलँड ला एक महिना राहत असत.*


*त्या स्त्रीचं गाठोडं घ्यावे असा विचार या माणसाच्या मनात आला. त्याने स्वतःचे गाठोडे बाजूला ठेवून या स्त्रीचे गोठोडे उचलले. जेव्हा त्याने ते उचलून धरले तेव्हा त्याला नवल वाटले. कारण ते गाठोडे हलके नसून स्वतःच्या गाठोड्या पेक्षा खूपच जड होते. कसेबसे त्याने ते खाली ठेवले.*


*नंतर देवासमोर बघत विचारले, "भगवान! इतक्या साऱ्या सुख सुविधा मध्ये राहणाऱ्या बाईचे गाठोडे पिसासारखे हलके असायला हवे होते. त्या ऐवजी ते इतके जड का बरे आहे ? मला कळत नाही.*


*"नाही समजत तर स्वतःच खोलून बघ!"  मार्मिक हास्य करत भगवान बोलले.*


*त्या माणसाने गाठोडे उघडले. बाहेरून खूपच सुखी आणि वैभवशाली जीवन जगणाऱ्या त्या स्त्रीच्या गाठोड्यात, रात्रंदिवस तिला त्रास देणारी कर्कश सासू दिसली. त्या बाईचा पती मद्यपी होता. कामानिमित्ताने देश-विदेशात त्याचे जाणे येणे होते व अत्यंत व्याभिचारी जीवन जगत होता. भयंकर रोग जडले होते. त्या स्त्रीला सुद्धा रोगाची लागण झाली. पति-पत्नी गुप्तपणे यासाठी लाखो रुपये खर्च करीत होते. त्यांच्या मुलाचे तस्करी संबंध होते. मुलगी कर्करोगाने पिडीत होती.*


*बस्! त्या माणसाने ताबडतोब गाठोडे बंद केले. तो पुढे पाहू शकला नाही. सहजपणे त्याच्या तोंडून शब्द निघाले,*

*भगवान! बाहेरून अत्यन्त श्रीमंत आणि सुखवस्तू दिसणाऱ्या या स्त्रीचं जीवन इतक्या यातनांने भरलेल आहे ? मी कल्पना ही करू शकत नाही.*


*भगवान हसले आणि म्हणाले, "मी तुला म्हटले ना...! प्रत्येकाच्या डोक्यावर ओझे हे असतेच! दुसऱ्याचं गाठोडे तुम्हला हलके वाटते. कारण ते तुमच्या खांद्यावर नसते. अजूनही तुला दुसऱ्या कुणाचं गाठोडं बघून ते घ्यायचे असेल तर घेऊ शकतोस!"*


*तो माणूस ज्या ज्या लोकांना सुखी आणि नशीबवान समजत होता, त्यांची नावे बघत बघत त्याने गाठोडी खोलून पाहिली. पण नवल असे घडले की, प्रत्येक व्यक्तीचे गाठोडे त्याला जास्त भारी आणि स्वतःपेक्षा अनेक पटीने विटंबनेने भरलेले दिसले.*


*एक एक करत अनेक गाठोडी शोधत राहिला, त्यावेळी भगवान मात्र मंद मंद हसत एकदम शांतपणे उभे होते.*


*खूप वेळानंतर अचानक त्याने गाठोडी तपासणे बंद केले. दीर्घ श्वास घेत म्हणाला, "प्रभू! मला माझेच गाठोडे द्या. मला वाटते या सर्वांपेक्षा तेच जास्त हलके आहे.*


*"असे म्हणतोस ? तर मग जीवन संपवून टाकावे, असा विचार करण्या इतका कुठला मोठा भार तुझ्या डोक्यावर आहे ? पाहूया तर खरे... यात काय भरलेले आहे. तुझे गाठोडे खोल" भगवान म्हणाले.*


*त्या माणसाने स्वतःचे गाठोडे उघडले. त्यात सोन्याच्या विटा होत्या. नोटांच्या अनेक थपप्या होत्या आणि दुसरे अगदी क्षुल्लक म्हणता येईल असे प्रश्नरुपी दगड होते.*


*बेटा! अत्यन्त मायाळू आवाजात भगवान म्हणाले, अनेक वर्षा पासून तू या सोन्याच्या विटा घेऊन फिरत होतास आणि ही नोटांची थप्पी जमवत होतास. इतके असूनही शेवटी जीवनाचा अंत करण्याचीच वेळ आली ना ? मग हे सोने नाणे पैसा अडका काय कामाचा ? कुणीतरी चोरून नेईल किंवा खर्च होईल या भीतीने तू हा भार वाढवला आहेस. आता तू तुझ्या दुनियेत परत जा. हा पैसा गरजू गोरगरिबांना वाटून टाक. जे भुकेने तडफडत आहेत. ज्यांना जीवनात काहीच मिळाले नाही. मी तुला खात्री पूर्वक सांगतो की, त्यांचा आनंद बघून तुझ्या आत्म्याला जे सुख आणि शांती मिळेल ते या तुझ्या दौलतीने तुला कधीच मिळाले नसेल. शिवाय सर्व काही दान केल्याने तुझ्या खांद्यावरचे ओझे कमी होईल. आणि हो! हे छोटे छोटे धारदार दगड कसले जमा केले ?* 


*त्या माणसाला लाज वाटली. शरमेने खाली बघत तो म्हणाला," प्रभू! हे माझ्या, अभिमान, स्वार्थ, पाप आणि द्वेषाचे दगड आहेत. ज्यांच्या धारेने मी दुसऱ्यांना दुखावण्याचे काम केले आहे.*


*भगवान हसू लागले. म्हणाले, " काही हरकत नाही बेटा! तू आरामात तुझ्या दुनियेत परत जा. पण हे छोटे दगड मला दे. आज मी ते सर्व तुझ्या कडून घेतो!"*


*असे म्हणत करूणावतार परमेश्वराने त्याचे पाप, राग-द्वेष, तसेच अभिमान वगैरे जे दगड होते ते स्वतःच्या हातात घेतले. ते दगड इतके धारदार होते की, परमेश्वराच्या हातातून पण रक्त येऊ लागले.*


*त्या माणसाला आता खूप हलके वाटत होते. परमेश्वराचे आभार मानून तो पाया पडला. मग स्वतःचे गाठोडे  खांद्यावर घेऊन पृथ्वी वर परत जावे म्हणून निघाला. थोडे अंतर चालल्यानंतर त्याला काहीतरी आठवलं.*


*मागे फिरत त्याने परमात्म्याला विचारले, प्रभू! माझे ओझे नेहमी माझ्या खांद्यावरच असते. मग बाकी सर्वांची गाठोडी इथे का पडून आहेत?* 


*आता भगवान खळखळून हसत म्हणाले, "माझ्या प्रिय मुला! हीच ती गोष्ट आहे जी, तू आता पर्यंत समजू शकला नाहीस. इथे प्रत्येकाकडे असह्य आणि तुझ्या करता पण जास्त पटीने  जड असे गाठोडे आहे. तरीही हे लोक छान जगत आहेत. कारण त्यांनी त्यांचा भार माझ्यावर टाकला आहे. तू मात्र तुझे गाठोडे खांद्यावर घेऊन फिरत आहेस.*


*त्या माणसाच्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडला. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. अलगद पावलाने तो मागे फिरला. खांद्यावरील गाठोडं उतरून ते परमेश्वराच्या चरणा जवळ ठेवले. नमस्कार केला आणि आज पर्यंत कधीही न अनुभवलेली दिव्य शांतीचा अनुभव घेत पृथ्वीवर परत येण्यासाठी निघाला.*


*त्याच क्षणी गुंगी उतरल्या मुळे त्याचे डोळे उघडले.*


  *बोध: मित्रांनो, जे आपणांस मिळाले आहे त्यातच जीवनाचा आनंद आहे. जे आपल्याकडे नाही  दुःख करण्यात काही अर्थ नाही. तुम्हीच ठरवा, कसे जगायचे!*

Monday, February 5, 2024

स्मरण

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*कर्तव्यात  परमात्म्याचे  स्मरण ।*


आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥


व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे । बाकी रामावर सोपवावे ॥


कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण । यातच सिद्धीचे बीज जाण ॥


असा करावा संसार । जेणे राम न होईल दूर ॥


देहाने कर्तव्याची जागृति । त्यात ठेवावी भगवंताची स्मृति । कर्तव्यात असते मनाची शांति ॥


कर्तव्याचा कधी न पडावा विसर । हृदयी धरावा रघुवीर ॥


ऐसे वागेल जो जनी । त्याने जोडला चक्रपाणि ॥


उद्योगाशिवाय राहू नये । कर्तव्याला चुकू नये । पण त्यात रामाला विसरू नये ॥


ठेवावा रामावर विश्वास । कर्तव्याची जागृति ठेवून खास ॥


देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान । हेच भक्तीचे लक्षण ॥


देह करावा रामार्पण । स्वतःचे कर्तेपण सोडून ॥


शास्त्री पंडित विद्वान झाला । भगवत्पदी न रंगला । व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे ॥


भगवंतापाशी राहावे रात्रंदिन । हाच सुखाचा उत्तम उपाय जाण ॥


रामाचे चरणी घ्यावी गति । हाच विचार आणावा चित्ती ॥


सुटावी प्रपंचाची आस । तेथे परमात्म्याचे प्रेम खास ॥


सर्व कर्मांत अधिष्ठान असावे देवाचे । तोच कल्याण करील साचे ॥


भले बुरे जे असेल काही । ते सोडावे रामापायी ॥


चित्त असावे रामापायी । देहाने खुशाल संसारात राही ॥


आपण व्हावे रामार्पण । सुखदुःखास न उरावे जाण ॥


धन्य त्याची जननी । ज्याने राम आणिला ध्यानी मनी ॥


रामाविण दुजे काही । आता सत्य उरले नाही ॥


भाव ठेवावा चित्तात । सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात ॥


ज्याने जिणे केले रामार्पण । त्यासी व्यवहार हेच खरे योगसाधन ॥ 


'माझे सर्व ते रामाचे' । मानून जगात वागणे साचे ।


अशास नाही कष्ट फार । मागे पुढे रघुवीर ॥


आपण व्हावे मनाने रामाचे । राम जे करील तेच घडेल साचे ॥


चित्त ठेवावे रामापायी । दुजे मनात न आणावे काही ॥


आता न सोडावी हरीची कास । होऊन जावे त्याचे दास ॥


दास्यत्वाचे मुख्य लक्षण । मालकावाचून न दुसऱ्याची आठवण ॥


भगवंताचा दास झाला । जग मानत त्याला ॥


म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास । हे उरी बाळगावे खास ॥


'एकच जगती माझा रघुपति' । याहून दुजा न करावा विचार । हाच ठेवावा निर्धार ॥


भाव ठेवता रामापायी । तो कधी कमी पडू देणार नाही ॥


मनाने जावे भगवंताला शरण । जो चुकवील दुःखाचे कारण ॥


राम माझी मातापिता । बंधु सोयरा सखा ।


तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी । याहून दुजा विचार मनात न आणी ॥


*५१ .   आता  सांभाळावे  सर्वांनी  आपण ।  रामाविण  जाऊ  न  द्यावा  क्षण ॥*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

एकाग्रता

 *॥श्रीहरिः॥*


मागच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला जो समत्वाचा योग सांगितला तो काही अर्जुनाला फारसा पटला नाही, 


*अर्जुन म्हणाला,* 

'हे मधुसूदना! तुम्ही सांगितलेला हा समभावाचा योग मला अव्यवहार्य आणि असह्य वाटतो. कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे.  


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता षष्ठोऽध्यायः 


*अर्जुन उवाच:*

*योऽयं योगस्त्वया प्रोक्तः* 

*साम्येन मधुसूदन ।*

*एतस्याहं न पश्यामि* 

*चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥* 

*॥६.३३॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयमयोग ६.३३) 


*भावार्थ:- अर्जुन भगवंताला म्हणाला की, हे मधुसूदना, हा जो समदर्शनाचा योग तू मला समजावून सांगितलास ना, तो माझ्या मनाच्या चंचल स्वभावापुढे टिकेल असे मला वाटत नाही.


*भगवंतांनी अर्जुनाला आत्मयोगात स्थापित होण्याची, सर्व प्राणिमात्रांबाबत समभाव बाळगण्याची जी शिकवण दिली आहे, ती ऐकायला तर खूप छान वाटतं.*


*परंतु* यातही एक समस्या आहे, 

या जगात जगत असताना, मोहमायेची चपराक झेलत (सहन करत) असताना, आयुष्यात या बोधाचा अवलंब कसा करावा? 


*कारण* ही समस्या केवळ अर्जुनाचीच नाही, तर त्या *प्रत्येक साधकाची* आहे, जो या प्रापंचिक मोहमायेच्या पाशातून स्वतःची सुटका करून घेण्याची इच्छा बाळगतो. ज्याला सत्यमार्गावरून मार्गक्रमण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो सत्संगास जातो, उत्तमोत्तम गोष्टींचं श्रवण करतो, ध्यान करतो. हे सर्व केल्याने त्याला शांत, प्रसन्नतेची जाणीव होते. मात्र जसं तो सत्संग केंद्राच्या बाहेर पडून बाह्यजगतात प्रवेश करतो, तसं एकाच झटक्यात त्याच्यातील सर्व शांतीचा भंग होतो.


*जसं,* 

एका साधकाला ध्यानकेंद्रात ध्यानस्थ बसल्याने, खूप हलकं आणि शांत जाणवत असे. प्रवचन ऐकून त्याने ठाम निर्धार केला होता, की आजपासून प्रत्येक जीवजंतूत

तो ईश्वरालाच पाहील. सर्वत्र समभावनेतच राहील. 


*असाच* विचार करत तो ध्यानकेंद्राच्या बाहेर पडला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की आपल्या स्कूटरसमोर कोणीतरी त्याची कार अशी पार्क केली आहे, ज्यामुळे आपली स्कूटर पार्किंगमधून काढता येणार नाही. त्याने ती स्कूटर बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आलं नाही. 


*हळूहळू* सत्संगाचा प्रभाव कमी होऊ लागला, त्याला क्रोध येऊ लागला आणि शेवटी सवयीनुसार त्याच्या मनाची बडबड सुरू झाली... 'कसे लोक आहेत... यांना गाडी कशी पार्क करावी याचीही अक्कल नाही... कुठं गेलाय हा अशी गाडी लावून... आता येऊ दे तर खरं, बघतोच त्याला...'


*अशा प्रकारे* स्कूटर काढण्याच्या नादात कारवर ओरखडे पडले. त्याचवेळी कारवाला तिथे आला. त्याने गाडीवर पडलेले ओरखडे पाहिले, तेव्हा त्यालाही राग आला. तो तर कधी सत्संगालाही गेलेला नव्हता. मग आता पुढचं दृश्य काय असेल, याची कल्पना तर आपण स्वतःच करू शकता. 


सत्संगास गेलेला मनुष्य जेव्हा भांडण-तंटा करून घरी पोहोचेल, तेव्हा त्याची मानसिक स्थिती कशी असेल? कदाचित तो असा विचार करेल, 


*अशा विचित्र लोकांमध्ये मी ईश्वर कसं पाहू?* 

'या तर सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. संसारापासून दूर राहणाऱ्या, जगापासून अलिप्त राहणाऱ्या साधू-संतांबाबत हे सगळं ठीक आहे; पण आपल्यासारखे प्रापंचिक, जे या जगात ईश्वराच्या नव्हे, तर राक्षसांच्या सान्निध्यात वावरत असतात, त्यांच्यासाठी किती कठीण आहे.'


अर्जुनदेखील याच कारणास्तव श्रीकृष्णांना म्हणाला,

*‘या जगात राहून मनाला उलट-सुलट विचार करण्याची, तर्क- कुतर्क लढविण्याची, सतत चलबिचल होण्याची इतकी सवय जडली आहे, की यातून सावरणं खूपच कठीण आहे.'* 


इतक्या वर्षांपासून असलेल्या या वृत्ती बळावल्याने त्यांच्यावर ताबा मिळवणं आता अत्यंत कठीण वाटत आहे. चौखूर उधळलेल्या बेलगाम मनावर नियंत्रण ठेवणं, म्हणजे सोसाट्याच्या वादळी वाऱ्याला रोखून शांत करण्यासारखंच आहे.


*समत्वस्थितीच्या विरोधी अर्जुन देत असलेले कारण -*

अर्जुन असे म्हणत आहे, की 

'हा समत्वयोग स्थिर स्थितीत राहणे - ही अगदी अंतिम स्थिती तू सांगत आहेस, पण माझी अडचण तर अगदी प्रारंभी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपासून आहे.' 


*मनाची एकाग्रता* होणे ही ध्यानयोगातील प्रथम साध्य करण्याची गोष्ट आणि ध्यानयोग हे समत्वयोग साध्य करण्याचे साधन. मनाच्या चंचलत्वामुळे एकाग्रता साधणेच मला अवघड आहे, त्यामुळे ध्यानयोग साधणेही कठीणअसताना, त्याच्यापुढचा समत्वयोग माझ्या या अवस्थेत साधला जाणे हे मला संभवनीय वाटत नाही.'

*पं. सातवळेकरांनी* या श्लोकावर विवरण करताना म्हटले आहे, 

'कोणतेही कलाकौशल्याचे काम मन एकाग्र केल्याशिवाय उत्कृष्ट होऊ शकत नाही. तर यापेक्षा (आत्मस्वरूपावर ते केंद्रित करणे हे) कितीतरी उच्च कार्य (मनाच्या चंचलत्वाला आवर घालून) ते पूर्ण एकाग्र केल्याशिवाय कसे होऊ शकेल? प्रबल झालेला नोकर स्वाधीन ठेवून त्याच्याकरवी आपल्या हिताचे काम कसे करून घ्यावे, हा प्रश्न नेहमीच मालकासमोर असतो. (मनाला ताब्यात ठेवून त्याच्याकडून काम करून घेणे) हे तर राक्षसाला सेवक ठेवण्यासारखे आहे.'


*मन हे केवळ चंचल आहे एवढेच नव्हे तर त्याला आवरणे कठीण करणारे अनेक दुर्गुण त्याच्यामध्ये आहेत. साधकाला मन आवरणे का कठीण जाते हे पुढच्या श्लोकात श्लोकात अर्जुन अधिक विशद करून मांडत आहे.*

*मनाचे चंचलत्व अर्जुन मांडतो हे विशेष का ?*

अर्जुन हा एकाग्रतेचे आदर्श प्रतीक (रोल मॉडेल) असे वस्तुतः म्हणता येईल.


द्रोणाचार्यांजवळ धनुर्विद्या शिकत असताना, एकदा द्रोणाचार्यांनी कापडाचा पक्षी करून उंच झाडावर ठेवला होता, आणि शिष्यांच्या धनुर्विद्येतील कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांना त्या पक्ष्याच्या डोळ्यात बाण मारायला सांगितले होते. कित्येकांना तर तो पक्षीच दिसत नव्हता. परीक्षेसाठी पुढे येणाऱ्या प्रत्येकाला द्रोणाचार्य विचारत, 

'तुला काय - काय दिसतआहे?' 


*तेव्हा* ते लहान वयातील कौरव-पांडव एकेक जण पुढे येऊन उत्तर देत होते, की 'झाड दिसत आहे, पाने दिसत आहेत, पक्षी दिसत आहे.' तेव्हा द्रोणाचार्य 'नको मारू बाण' असे सांगून पुढच्या शिष्याला बोलवत असत. शेवटी अर्जुन आला आणि तो एकाग्रतेने पाहू लागला. बाण मारण्यापूर्वी त्यालाही द्रोणाचार्यांनी प्रश्न विचारला, 

'तुला काय दिसत आहे?'

तेव्हा तो म्हणाला, 

'मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत आहे.'

तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, 

‘मग मार बाण!' आणि अर्जुनाने पक्ष्याच्या डोळ्यात बाण मारला. तेव्हा अर्जुनाला शाबासकी देत ते सर्व शिष्यांना म्हणाले, 

*‘धनुर्विद्येसाठी अशी एकाग्रता हवी.'*


*अर्जुनाने* पुढेही आयुष्यामध्ये मत्स्यभेद इत्यादी प्रसंगांतून विलक्षण एकाग्रता करण्यासाठीचे मनाचे संयमन करून दाखवले होते. तोच अर्जुन मनाच्या चंचलत्वाची प्रबलता आणि त्यामुळे समत्वयोग साधणे कठीण आहे असे या श्लोकात प्रकट करत आहे, हे विशेष आहे.


*मनाचे नियंत्रण करणे किती अवघड आहे, आणि का अवघड आहे, हे तो पुढच्या श्लोकात व्यक्त करत आहे.*


ध्यानयोग - स्वामी माधवानंद स्वरुपयोग प्रतिष्ठान. 

संपूर्ण भगवद्गीता - सरश्री 

  

*।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

Sunday, February 4, 2024

सुबुद्धी

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*सुबुद्धी क्षणातही पालटू शकते म्हणून मनात आले की करून टाकावे*


   *अधिक मास चालू होता. त्या निमित्ताने एकाने आग्रहाने चांदीची एक जाडजूड वाटी श्रीमहाराजांस अर्पण केली ती त्यांनी तेथल्याच कोनाड्यात ठेवून दिली. योगायोग असा की दुसऱ्याच दिवशी श्मश्रु करण्यास नेहमीचा नापित आला. त्याने सवयीप्रमाणे धोपटीतली पितळी वाटी पाण्यासाठी काढली. श्रीमहाराज त्याला म्हणाले, " अरे आज ती वाटी नको ; ती कोनाड्यात आहे ती वाटी घे. नापिताने ती वाटी घेतली आणि ती आपल्या उजव्या ( म्हणजे समोर बसलेल्या श्रीमहाराजांच्या डाव्या) हाताशी ठेवून आपले काम सुरू केले. त्या बिचाऱ्याला चांदीची वाटी ही एक अपूर्व, अलभ्य अशीच गोष्ट होती आणि त्याचे मन स्वाभाविकच त्या वस्तूवर गेले. ही गोष्ट सर्वज्ञानी श्रीमहाराजांच्या लक्षात आली. श्मश्रुकर्म संपल्यावर आपल्या डाव्या हाताशी असलेली ती वाटी नापिताला डाव्याच हाताने देत ते म्हणाले , " अरे घेऊन जा ही तुला. "*

      *तेथे एक पढिक शास्त्री होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि डाव्या हाताने दिलेले दान अशास्त्रीय आहे ही गोष्ट त्यांनी श्रीमहाराजांच्या नजरेस आणून दिली तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, " ही गोष्ट अशास्त्रीय असेल हे मी मान्य करतो पण ती तशी करण्याचे कारण असे की ती वाटी डाव्या हातातून उजव्या हातात घेण्याच्या अत्यल्प अवधीत सुध्दा देण्याची सुबुद्धी पालटून जाणे शक्य असते तो संभव टाळण्यासाठी मी असे केले. "*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Saturday, February 3, 2024

श्रीविष्णुसहस्रनाम

  *भीष्मद्वादशीच्या* 

शुभ पावन दिनी *श्रीविष्णुसहस्रनाम* या स्तोत्राचे पठण जास्त प्रमाणत करावे.


 त्या निमित्ताने *भीष्मद्वादशी* या तिथीचे माहात्म्य सांगणे हे औचित्यपूर्ण ठरेल. हस्तिनापूरचा कुरुवंशीय राजा शंतनू आणि साक्षात गंगामातेचा(नदी) पुत्र *देवव्रत*

म्हणजेच महाभारतात *पितामह भीष्म* या नावाने ज्यांना सन्मानपूर्वक संबोधले जात असे, अशा भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी या पवित्र दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या साक्षीने आपल्या देहाचा त्याग केला.महाभारताचं प्रसिद्ध असं महायुद्ध मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला सुरू झालं. हे युद्ध एकूण १८ दिवस चाललं होतं.युद्धाच्या पहिल्या दिवशीच विविध प्रश्नांनी ग्रासलेला अर्जुन समोर पितामह भीष्म,गुरूद्वय द्रोणाचार्य-कृपाचार्य आणि आपल्याच बांधवांना पाहून हतोत्साहित झाला.त्याची ती अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली,मोक्षदा एकादशीचा हा दिवस आपण *गीताजयंती* म्हणून साजरा करतो.या महायुद्धात कौरव-पांडव पराक्रमाची शर्थ करत होते. महावीर अशा पितामह भीष्मांना या युद्धात पराजित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना देखील हातात शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा करूनही रागाने रथाचे चाक हातात घ्यावे लागले होते.प्रत्यक्ष परमेश्वराच्या हातून मरण यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काय असू शकेल या कल्पनेने भीष्मही आनंदित झाले.पण नंतर कृष्णाच्याच सांगण्यावरून शिखंडीला( पूर्वाश्रमीची अंबा- अंबिका- अंबालिका या तिन्हीतील अंबा) भीष्मांच्या समोर उभं केलं गेलं. भीष्म जसे महापराक्रमी होते तसे ते महाज्ञानीही होते. शिखंडीच्या रूपातील अंबेला ओळखल्यामुळे आणि स्त्रीशी न लढण्याची त्यांची प्रतिज्ञा असल्यामुळे त्यांनी शिखंडीशी लढण्यास नकार दिला.मग श्रीकृष्णांच्या सूचनेनुसार शिखंडीच्या पाठी उभ्या राहिलेल्या अर्जुनाच्या बाणांनी भीष्मांच्या देहाची चाळण झाली,तो दिवस 

मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीचा होता. त्यावेळच्या कालमापनाच्या गणितानुसार तेव्हा सूर्य दक्षिणायनात होता.इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या पितामहांनी देहत्यागासाठी उत्तरायणाची वाट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी अर्जुनाने तयार केलेल्या शरशय्येवर ते सेहेचाळीस दिवस 

पहुडले होते. माघ शुद्ध अष्टमीला श्रीकृष्णांच्या आज्ञेवरूनच त्यांनी युधिष्ठिराला सोळा धर्मनियमांचा उपदेश केला. युधिष्ठिराच्या सहा प्रश्नांची उत्तरे दिली. ते प्रश्न असे होते- १)आपल्या मते परम धर्म कोणता? २)कोणत्या जपाने मनुष्याची जन्म- मरण बंधनातून सुटका होते? ३)सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले? ४)सर्वांचा आश्रय कोण?

५)कुणाची स्तुती करावी?

६) कुणाची पूजा करावी?

आणि या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे *विष्णू आणि विष्णुसहस्रनाम* आणि मग भगवंतांच्या सन्मुख महाज्ञानी भीष्माचार्यांना स्फुरलेले,भगवंतांच्या एक हजार नावांची सुरेख,अर्थपूर्ण गुंफण असलेले *श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र* त्यांच्या श्रीमुखातून स्रवत गेले. त्यामुळे *माघ शुक्ल अष्टमीला*   *श्रीविष्णुसहस्रनाम जयंती*  असे म्हटले जाते.हे अंत:स्फूर्तीतून निर्माण झालेले स्तोत्र लगेच तोंडपाठ होणे कुणालाच शक्य नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या पांडवांपैकी सहदेवाला त्याने केलेल्या भगवान शिवशंकरांच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झालेले *मणिपुष्पक नावाचे स्फटिकरत्न* त्याने गळ्यात धारण केलेले होते. या स्फटिकात अद्भुत अशी ध्वनिग्रहण क्षमता होती. महर्षी व्यासांनी महादेवांची संमती घेऊन या स्फटिकाद्वारे दिव्य अशा या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे श्रवण  केले आणि नंतर ते  महाभारतात समाविष्ट केले,असे सांगितले जाते. या स्तोत्राच्या निर्मितीनंतर लगेच त्याच दिवशी म्हणजे माघ शुद्ध अष्टमीला काही क्षणांतच सुमारे १८६ वर्षांच्या श्रेष्ठ भगवद्भक्त पितामह भीष्मांनी श्रीकृष्ण चरणी आपले आयुष्य समर्पित करून वसुलोकांत प्रयाण केले. या वीर क्षत्रियाचा अंतिम संस्कार माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आला .या द्वादशीला *गोविंद द्वादशी* म्हणूनही ओळखलं जातं.माघ शुक्ल अष्टमी ते माघ शुक्ल द्वादशी हे *भीष्मपंचक पर्व* म्हणून भारतातील कर्नाटकासारख्या अनेक प्रांतांमध्ये अजूनही साजरे केले जाते. या काळात पितामह भीष्मांचे स्मरण करून सोन्याची किंवा चांदीची श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती तयार करून कमळपुष्पांनी तिची षोडशोपचारी पूजा केल्याने योग्य अपत्य प्राप्त होते,रोग आणि पितृदोष नाहीसे होतात, सुख - समृद्धी प्राप्त होते असे पद्मपुराणात सांगितले आहे. भीष्मद्वादशीला आपल्या पूर्वजांना तिलोदक द्यावे म्हणजेच तिलतर्पण करावे असेही काही धर्मग्रंथांमध्ये नमूद केले आहे.सर्वांनी या पर्वाचा लाभ घ्यावा.धन्यवाद!🙏

            

         CR  डॉ.अपर्णा कल्याणी

                सोलापूर.

Friday, February 2, 2024

कर्म

 भगवंत काय सांगतात की कर्म सोडण्याच्या भानगडीत का पाडता तर त्या कर्माचा जो प्राण आहे त्याचे कर्तेपण, ते कर्तेपण सोडा. मग कर्म झाले काय किंवा न झाले काय. सगळा बदल कर्त्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि ह्याचेच नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे काय कर्म होईल पण कर्ता त्यात गुंतणार नाही.

 पंढरपूरला एक तपकिरी बुवा होते. ते तपकिर ओढत म्हणून तपकिरी बुवा हे नाव पडले. त्यांच्याकडे कोणी दर्शनाला आला की  ते पैसे मागायचे. सत्पुरुष आणि पैसे मागतो हे थोडे विचित्र वाटायचे.  हे काय करायचे दुपारच्या वेळेला भांड्यात  साठलेले पैसे चंद्रभागेत बुडवून टाकायचे. तेव्हा त्यांच्या शिष्याने विचारलं की हे पैसे गरिबांना न देता बुडवून का टाकता ? त्या वर

ते म्हणाले माणूस मला पैसे देतो  तो आपली वासना ठेऊन देतो. माणसाला वासना सोड म्हटलं तर तो ती सोडत नाही. अशी त्याची वासना घेऊन मी ती नदीत  बुडवतो. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले लॉटरी मध्ये तुम्ही १ रुपया देता आणि १०० रुपये घेता म्हणजे ९९ लोकांची वासना तुम्ही आपल्या घरात  आणता. ज्या पैशासाठी मी श्रम केले नाही तो पैसा मी लोकांकडून घेतला आहे, तो घ्यायचा म्हणजे त्या लोकांची वासना घरात घेण्यासारखं आहे. अशा माणसाला कधीही स्वस्थता मिळायची नाही, समाधान तर नाहीच नाही. सत्पुरुषाला ते दिसतं, म्हणून ते सांभाळून असतात.