परमार्थ मार्गात पुष्कळ लोक सत्पुरुषांकडे जातात. पण सगळेच खऱ्या अर्थाने चिकटत नाहीत. कोण किती चिकटला हे फक्त सत्पुरुषांनाच कळते. ह्या मार्गात स्थिर होण्यास येणाऱ्या तीन अडचणी .पहिली अडचण अशी आहे की आपलं मन आणि शरीर थकून जातं. कारण हा सगळा सूक्ष्माचा प्रांत आहे. या प्रपंचात राहणाऱ्याला, दृश्यात राहणाऱ्याला सूक्ष्मात राहणे झेपत नाही. नको वाटते. तो खालीच येतो.
दुसरं जर असेल तर मनाची संकल्प विकल्प करण्याची जी कला ते संकल्प विकल्प यायला लागतात. मी करतो आहे ते बरोबर का ! अत्ता पर्यंत जे काही केले त्याचा परिणाम दिसत नाही. आपलं सगळं जे करतो ते ईश्वराच्या दर्शनाकरता करतो ही मनात खोल इच्छा असतेच.
संकल्प करताना त्याच्या फळाची आशा सोडूनच संकल्प करायचा. मला माहित नाही माझ्या गुरूंनी सांगितलं आहे म्हणून मी करतो. हा प्रकार कमी असतो.श्रीमहाराज उदाहरण देत. एका राजाकडे एक साधू येत असे. त्यांना राजा म्हणाला " मला काही परमार्थ सांगा." तर ते साधू बर म्हणाले. संध्याकाळी दोघेजण गावाबाहेर टेकडी होती त्या टेकडीवर गेले. त्या टेकडी पलीकडे खड्डा होता.
साधूने राजाला सांगितले की टेकडीवरचे दगड ह्या खड्ड्यात टाक. मी आठ दिवसांनी येतो. ते साधू आठ दिवसांनी आले. तर राजा म्हणाला " हे दगड इकडून तिकडे टाकण्याचा परमार्थाशी संबंध काय? " ते म्हणाले "आणखी आठ दिवस दगड टाक."
पुन्हा आठ दिवसांनी आले आणि विचारलं " राजे साहेब ! कसं काय चालले आहे." राजाने परत तेच विचारले " याचा परमार्थाला उपयोग काय?" ते म्हणाले " आणखी आठ दिवस दगड टाक." ते साधू परत आठ दिवसांनी आले आणि राजाला विचारलं की " काय कसं काय आहे?" तर राजा म्हणाला " तुम्ही सांगितलं आहे ना दगड टाक तर टाका. मी विचार करणं सोडून दिलं आहे." तेव्हा साधू म्हणाले "आता पुरे ." म्हणजे फळाची आशा नाही. करा म्हटलं आहे ना तर करा.
तिसरी अडचण असेल फळ. तर मला फळाची कल्पनाच नाही. तुम्ही सांगितलं आहे ना, तुम्हाला आवडलं ना, तर करा. मला काय मिळेल याचा विचार नाही. या तीन गोष्टी अडचणी पार करील तो पुढे जाईल.
No comments:
Post a Comment