चिंतन
श्रीराम,
मी बरोबरच आहे.. मी चुकतच नाही असा अहंकार स्वतःच्या चुका शोधू देत नाही. कोणी चुक दाखवली तर आपणच कसे बरोबर आहोत, हे सांगण्यासाठी वाद-भांडण सुरू करतात.
समर्थ म्हणतात - अहंता गुणे वाद नाना विकारी |तुटे वाद संवाद तो हितकारी ||
हे सर्व टाळून शांत, आनंदी, समाधानी, तृप्त जीवन जगायचे असेल तर माझ्यात अहंकार आहे हे आधी स्वतःच्या मनाला सांगावे लागते. मी काही अहंकारी नाही हे वाटणे हा देखील एक अहंकारच आहे.
भक्तीमार्गावरून चालताना 'अहंकाराचा वारा न लागो मनाला' असं समजावलं की जगणं उज्जवल होतं. अहंकारात अहं म्हणजे'' मी 'प्रभावी असतो. व्यक्ती स्व भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा मी इतरांना तुच्छ मानू लागतो. मी' चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी 'कोणीच नाही ही भावना असावी, असे आपले संत सांगतात. अहंचा त्याग केला की आपण सोऽहं च्या मार्गावरून जातो.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment