श्रीराम समर्थ
वासनेचे चार प्रकार
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले, *'जगात चार प्रकारचे लोक असतात.*
*पहिला प्रकार*
पाप वासना अगर वाईट विचार मनात आल्या बरोबर त्यांचे हातून लगेच कुकर्म घडते. तिथे विवेक अजिबात गैरहजर असतो.
*दुसरा प्रकार-*
वाईट वासना मनात येतात परंतु विवेकाने त्या दाबल्या जातात. त्यामुळे पापकर्म हातून सहसा घडत नाही.
*तिसरा प्रकार-*
ज्या वासना येतात त्या सद्वासनाच असतात.
*चोथा प्रकार-*
भगवंताखेरीज अगर सद्गुरुखेरीज त्यांच्या चित्तात दुसरा विचारच येत नाही.असे पुरुष हे सिध्द पुरूष असतात. त्यास संत म्हणतात.
*मनापासून नामस्मरण केल्याने हलके हलके या जिन्याच्या पायऱ्या चढता येतात.*
*******
संदर्भः *पू.श्री.ल ग तथा बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित*
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment