एकदा श्री.काकासाहेब तूळपुळे यांनी श्री.गुरुदेव रानडे यांना विचारले की "सद्गुण वाढविण्यासाठी आपण काय करता ?" त्यावर श्री.गुरुदेव म्हणाले "त्यासाठी मी काहीही करीत नाही. काही सुध्दा करत नाही. फक्त नामस्मरण करतो. नामस्मरणाने चित्त शुद्ध होते व ईश्वराचे दर्शनही होते. दोन्ही गोष्टी एका नामस्मरणाने घडतात." पुढे त्यांनी विचारले की "उपासनेने अनुभव येतो.
अनुभव आहे तितकाच असताना त्यापासून कधी आनंद होतो तर कधी होत नाही असे का ?" त्यावर श्री.गुरुदेव म्हणाले " याचे कारण जेव्हा आनंद होतो त्यावेळेस तो तेजरुपात अधिक प्रकाश असेल किंवा नादरुपात अधिक झणझणात असतो. अधिक आनंद हा अनुभवाच्या गुणवत्तेवर असतो."
एकदा सूक्ष्म अहंकाराविषयी श्री.गुरुदेव म्हणाले "अहंकार जितका सूक्ष्म गोष्टीबद्दल असतो तितका सोडायला कठीण होतो. सर्वात सूक्ष्म अहंकार मी "साक्षात्कारी पुरुष आहे" हा. तो कोणीच खोटा ठरवू शकत नाही. हा अभिमान फार भयंकर. तो उत्पन्नच होऊ देऊ नये."
No comments:
Post a Comment