*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा : येथे (गोंदवले) नामस्मरण चांगले होते हा येथील वातावरणाचा परिणाम आहे. एका बँकेतले अधिकारी इंग्लंडमधील शाखेत सहा वर्षे होते. संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर आंघोळ करून ते जपास बसत. पण तरीदेखील त्यांचा जप सकाळच्या जपाइतका चांगला होत नसे. नाम हे फार नाजुक आहे.*
*साधन करतांना सुरुवातीला फार जपावे लागते, कारण त्या काळात वातावरणाचा आपल्या साधनावर फार परिणाम होतो. आपण नाम घेतो पण व्यवहारात उतरलो की नामाची पातळी टिकत नाही. गैरसोयी सोसून देखील माणसे येथे येतात त्याअर्थी त्यांच्यामधें परमार्थाचे बीज आहे. म्हणून आलेल्या या संधीचा फायदा कसा करून घ्यावा ते समजले पाहिजे. संधी कशी हुकते याची त्यांनी काही उदाहरणे दिली.*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment