आजचे वाढदिवसावरून एक पोस्ट वाचली. गेल्या 2/4 दशकापासून सर्व ठिकाणी जन्म तारखेच्या नोंदी मिळत असाव्यात. ग्रामीण भागात तर पूर्वी सोयीसुविधांअभावी नोंदी मिळणे जिकीरीचेच असेल .. नोंद नसेल तर जन्मतारीखही अंदाजेच ...
..... अशा परिस्थितीत लग्न जमवणे अथवा पत्रिकेला अनुसरून एखादा मुहूर्त काढणे खरंच दुराप्रस्त असावे .... या परिस्थितीत पत्रिका न काढता कुंडली न काढता न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं !..... याचा अर्थ पत्रिका बघु नये असा नाही माहिती उपलब्ध असेल आणि सोय असेल तर तेही एक शास्त्रच आहे आपल्या परंपरेनुसार त्याचा आधार घ्यावा ......... मात्र हे हि तेव्हडेच खरे आहे कि आपले विचार, कर्म, मनशक्ती आणि कर्तृत्व याचे जोरावर आयुष्यात नक्कीच यशस्वी होण्यास मदत होऊ शकते ......
*आज वाढदिवस असलेल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ... आपल्या सर्व इच्छा पुर्ण होवोत *🎉💐🎊🎂🎁
No comments:
Post a Comment