श्रीराम,
सत्कर्माचा शेला म्हणजे जबाबदारीचा परमार्थ होय. त्यासाठी कोणतेही कर्म करताना स्वधर्माचे पालन करून जर आपण आपले काम १००%टक्के योगदान देऊन केले असेल तर आपोआप शांती, समाधान मिळते. महाराज म्हणतात - माझे ते सर्व रामाचे असे मानून जगात राहिले तर फार कष्ट करावे लागत नाही. एकच जगती माझा रघुपती |याहून दुजा न करावा विचार |हाच ठेवावा निर्धार |भाव ठेवता रामापाशी, तो कधी कमी पडू देणार नाही. असा विचार करीत विणलेला शेला आपल्या सद्गुरूंना नक्की पांघरायला आवडेल. मग मी कोणता शेला सद्गुरूंना द्यावा? लौकिकाने जगातील सर्वात महाग शेला सद्गुरूंसाठी आणायचा की स्वधर्माचे आचरण करून रामनाम घेत विणलेला सत्कर्माचा शेला अर्पण करायचा?
तसेच मानसपूजाच करीत असल्याने सद्गुरूंना माळ घालताना हिरे माणके असलेल्या लाखभर रुपयांची माळ घालायची की नामस्मरणाची माळ घालायची आहे? शुद्ध भावाने नामस्मरण करीत साधी तुळशीची किंवा अगदी बकुळीची माळ घालावी? हा विचार कायम जागृत असला पाहिजे.
कारण मानसपूजा करताना आणि प्रत्यक्ष पूजा करताना देखील सद्गुरूंना किमती माळ किंवा महाग शेला पोहचत नाही तर त्या मागचे भाव पोहोचतात.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment