TechRepublic Blogs

Monday, February 3, 2025

पुनर्जन्म

 *मनुष्य कितीही वेगाने धावत असला तरी त्याचे पूर्वजन्मीचे कर्म त्याचा पाठलाग करीत असते. तो झोपला तर ते* *त्याच्यासह झोपते. चालू लागला की चालते. त्याने जे कर्म केले असेल ते त्याला एकट्यालाच भोगावे लागते. शास्त्रीय*

*बुध्दीला हा विचार कितपत पटेल हे सांगता येत नाही. कारण पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यावर अनेकांचा विश्वास असला तरी शास्त्रीय प्रमाणांनी ते सिध्द करता येत नाही. हे गृहीत धरून सुध्दा केलेले कर्म कधीतरी फळते हे मात्र सिध्द करता येते.*


*पन्नास वर्षांपूर्वी कोणाला तरी आपण साह्य केलेले असते.* *संकटातून वाचवलेले असते तो मनुष्य किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी रुपात,ध्यानीमनी नसताना आपल्या विपत्तीच्या काळी*



*आपल्या पाठीशी समर्थपणे उभा राहतो. केव्हातरी* *कोणावर अन्याय केलेला असतो. पण कालांतराने त्या अन्यायाची विषारी फळे मात्र* *चाखावी लागतात. काटे पेरल्यानंतर काट्यांचीच झुडपे उगवावीत हे तर्कशुद्ध नव्हे काय?*

*चोरी, दरोडा, खून, बलात्कार, हिंसा काही काळ निर्वेधपणे करता येत असेल, पण केलेली ही नीचकर्मे हळूहळू माणसाच्या जीवनात, त्याच्या प्रत्येक रक्तबिंदूत, विष कालवीत असतात. एक दिवस त्यांचा उद्रेक होतो. काही*

*कर्मांची फळे ताबडतोब मिळतात, काहींचे फळ मिळायला पुष्कळ वर्षे लागतात. वाममार्गाने सत्ता अणि संपत्ती भोगलेल्या माणसाला आपल्या मुलांवर चांगले संस्कार करता येत नाहीत. आज व्यसनात संपत्ती उधळून कंगाल झालेला बाप आणि मुले कृतकर्माची आठवण करीत रडत आहेत.*

*कर्मफल काहीही मिळो अथवा न मिळो चांगली वाट धरल्याचा एक सात्त्विक आनंद मात्र माणसाला लाभत असतो. तो त्याने सोडू नये, सत्पुरुषाच्यांच्या* *मार्गदर्शनाखली परमार्थ वाटेवर चालावे, भगवंताच्या स्मरणात नितिधर्माने आपला व्यवहार करत प्रपंच करावा,हाच याचा अर्थ.*

*संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment