🙏 *पाझर फुटूद्या आपणांस माणुसकीचा.....,*
*लावूया हातभार सर्वांनी मदतीचा.......*🙏🤝🤝
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील, निसोबाचा सडा, पळसंब खालचीवाडी)* येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील युवक व आमचे जिवलग मित्र *श्री जगन जंगले (वय 31 वर्षे )* हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईला *अशोकवन, चाळ क्रमांक 7, रूम नंबर 5, विजय नगर, अमराई, कल्याण पूर्व* येथे भाड्याच्या घरात राहत होते. कल्याण या ठिकाणी राहून *दादर पश्चिम येथील मॅजेस्टिक बुक सेंटर* येथे महिना १५,०००/ पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. *सकाळी कल्याण ते दादर व रात्री दादर ते कल्याण* असा नियमितचा प्रवास. हल्लीच *फेब्रुवारी महिन्याच्या १७ तारखेला त्यांचा विवाह* होऊन त्यांनी आपला संसार थाटला होता.
नियमितप्रमाणे जगन जंगले *22 मे 2024* रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते. ट्रेन ला प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा टवाळखोर टोळक्याने मोबाईल चोरीच्या उद्देशाने घेतला.
*ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे (कळव्याच्या दिशेने ) ट्रेन खूप स्लो झाली असताना टवाळखोरांनी चोरीच्या उद्देशाने दांड्याने जोरात आघात केला. तो दांडा गेटवर उभे असलेल्या जगन जंगले यांच्या हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले. त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली सापडले. तेथील उपस्थित लोकांनी जगन यांना लक्षात असणारा नंबर लावून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तेथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील प्रायव्हेट रुग्णालयात हलविण्यात आले कारण तत्काळ उपचार होणे गरजेचे होते.*
सध्या त्यांच्यावर *ठाणे पश्चिम येथील हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ढोकाळी येथील खाजगी रुग्णालयात* उपचार सुरु आहेत. काल गुरुवार दिनांक 23/05/2024 रोजी त्यांच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करून दोन्ही पाय काढण्यात आले.
परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या, नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. दोन्ही पाय गेल्याने अपंगत्व आले. कुटुंबासाठी आधार बनलेले हात कुठेतरी थांबले. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
मित्रहो, परिस्थितीपुढे अगतिक असलेल्या जगन जंगले यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. सध्याचा हॉस्पिटलचा खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. तसेच त्यांच्या यापुढे होणाऱ्या उपचारांसाठी देखील आर्थिक मदतीची गरज भासणार आहे.
*आपणांस कळकळीची विनंती आहे की, आपण सर्वांनी फेसबुक, व्हाट्स अप ग्रुप, आपले मित्रमंडळी, नातेवाईक, दानशूर संघटना यांच्या माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत करून जगन जंगले यांना माणुसकीच्या नात्याने हातभार लावावा असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.*🙏🙏
मदत खाली दिलेल्या बँक खाते किंवा गुगल पे क्रमांकावर पाठवावी.....👇🙏
*बँक तपशील*👇
Name- Mangesh Yashwant Jangale
Bank Name - State bank of india
Account no. 37297033737
IFSC - SBIN0012965
*गुगल पे क्रमांक*
मंगेश जंगले - 9768601156
तुषार जंगले -9653486856
_तुमचा एक मदतीचा हात,_
_जो देईल एका गरिबाला साथ....._
_ज्यांच्या डोळ्यात करुणा....._
_तेच जाणीती गोरगरीबांच्या_ _वेदना....._
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment