TechRepublic Blogs

Wednesday, February 5, 2025

श्रद्धाबळ

 *श्रवणांत सावधानता असेल तर सर्व बोधामृत मिळेल. शिव* 

*भगवंताकडून हरिकथा श्रवण करतांना अचानक पार्वतीची सावधानता गेली, तीला झोप लागली. परिणामी, ती*

 *हरिकथामृताला मुकली. परंतु, एका पोपटानें पूर्ण सावधनेतेने श्रवण केलं आणि त्या कथामृतानें शुकमुनीच्या अवतारानें हीच भागवतकथा सर्व मानवजातीला श्रवणासाठी उपलब्ध झाली.*


*सावधानतेप्रमाणें श्रद्धाबळ अतिशय महत्त्वाचे आहे. श्रवण कसं करावं याचा आदर्श कल्याण स्वामी! समर्थांनी अंबाजीला झाडीची फांदी उलट्या बाजुला बसून तोडायला सांगितली. त्यामुळे, मी विहीरीत पडेल,*

 *पोहता येत नसल्यानें बुडून मरेल ही शंका त्याच्या मनांत आली नाही. समर्थांनी सांगितलं ते ऐकणं या श्रद्धेनें वागणारा अंबाजी समर्थांनी "कल्याण" करून टाकला. तेंव्हा, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर श्रद्धा दृढ असावी.*

No comments:

Post a Comment