TechRepublic Blogs

Friday, February 28, 2025

थोडा अंधार

 थोडा अंधार हवा आहे 


हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात.  त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं , आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.


मला आठवतं आहे , आमच्या लहानपणी इन्व्हर्टर , मोबाईल नव्हते. मेणबत्त्या , कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. "कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा ..आता हळूहळू  डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा , नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.


माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. "अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात..दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा".. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात , त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ५० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिसस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले , शिकले , नोकरी केली, आपला रस्ता शोधला . स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले , इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त  खड्डे दिसतात हेच खरं.


पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत.  अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.



Thursday, February 27, 2025

पिठल .....*



*पिठल .....*


महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात कधीही, केंव्हाही, अगदी कुठल्याही सुख दुःखात सदैव मदतीला धावून येणारा. तत्पर असा हा एकमेव जिव्हाळ्याचा पदार्थ.


म्हणजे बघा एखाद्याच्या घरी मयत झाली असेल तर त्यांच्या दुखावट्यात अन्न म्हणून पिठल भात नेऊन देतात किंवा करतात.


आणि दर गुरुवारी महाराजांना  प्रसाद म्हणून पिठल्याचाच नैवैद्य करतात.


बेसन हा या पिठल्याचा आत्मा.


पिठल्याचा तसा विशेष तामझाम काही नसतो.


पण याच्या जातकुळी सर्व दूर पसरलेल्या.


नांदेड जवळच्या एका दुर्गम भागात खाल्लेल पिठल आणि तेच कोकणातल्या खेड्यात चाखलेले पिठल किंवा अक्कलकोट सोलापूरला एकाच प्रकारे बनवल असल तरी चव मात्र वेगवेगळी असते. हे मी अनुभवलय.


तसे हा सर्वसामान्य पदार्थ असला तरी घरच्या गृहिणीला कधी ही पटकन मदतीला धावून येणारा.


तसे याचे भाऊबंद खुप म्हणजे बघा.


कांद्याच पिठ पेरुन केलल पिठल. लसणाच्या फोडणीचे पिठल. गोळ्याचे पिठल. वड्या पडतील अस केलेल पिठल. तव्यावरचे पिठल. घोटीव पिठल. रावण पिठल. ताकातल पिठल. असे आणि किती तरी प्रकार.


त्यातल्या त्यात म्हाळसाच्या हातच कांदा घालून केलेले घट्ट मऊ पिठल आणि बायकोच्या हातच वडया पाडून केलेले पिठल म्हणजे जिभेला पर्वणीच.


या कांद्याच्या मऊ घट्ट पिठल्यावर मस्त ताज़ी हिरवीगार कोथिंबीर पेरावी आणि त्यावर कच्च्या तेलाची चवी पुरती एक धार सोडावी. 


ते सगळ एकजीव करुन टम्म फुगलेल्या दुपदरी गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर एक घास तोंडात टाकला आणि तो जिभेवर पोहोचला की ब्रम्हानंद टाळी लागलीच म्हणून समजा. काय ऽऽ तोंडाला पाणी सूटल नां वो तो आयेंगाहीच.


प्रत्यक्ष ब्रम्हादेवालाही दुर्लभ असा हा मेनू.

https://chat.whatsapp.com/CS28587SOht6P7sdoBM19P

आणि त्या बरोबर तोंडी लावायला कांदा व हिरव्या मिरचीचा खरडा ( ठेचा नव्हे ... खरडा वेगळा, ठेचा वेगळा... त्यावर एक स्वतंत्र लेख तयार आहे पण तो पुन्हा कधीतरी. ) असेल तर खाणाऱ्या च्या दृष्टीने सुवर्ण कांचन योग.


हेच मऊ गरमागरम पिठल छान ताटात वाढून घ्याव. बाजूला वाफाळलेला पांढराशुभ्र भात असावा. या पिठल्यावर अर्धा चमचा कच्या तेलाची धार सोडावी. आणि थोड़ा भात थोड़ पिठल अस एकत्र कालवत. एकजीव करत हळूहळू आस्वाद घेत खाण्याची मजा नुसती अवर्णनीयच.


सगळ पिठल आणि सगळा भात भसकन एकत्र करून खाण म्हणजे त्या पिठल्याचा अनादर केल्यासारख.

https://chat.whatsapp.com/CS28587SOht6P7sdoBM19P

खरी मजा अशी लावून लावून खाण्यातच.


याच पिठल्यातला एक प्रकार म्हणजे तव्यावरच हिरवी मिरची लसुन याची फोडणी देवून केलेल पिठल. असल चमचमीत आणि खुसखुशीत असत की विचारु नका.


हे तव्यावरच पिठल खाताना अगदी सहज त्यात असलेला खरपुस लसुन जेंव्हा दाताखाली येतोना तेंव्हा ती जी काय चव असते. त्याच वर्णन शब्दात होऊच शकत नाही.


सहलीला जाताना नेहमी उपयोगी येणारा हा पिठल्याचा प्रकार.


या तव्यावरच्या पिठल्याचा मधला भाग खावून संपला की त्या तव्याचा गोलाकार कडेला जो खरपुस खमंग भाग असतो तो खरवडून खायला जी मजा आहे ती दुसऱ्या कशात नाही.

https://chat.whatsapp.com/CS28587SOht6P7sdoBM19P

लहानपणी आम्हा भावंडाची त्या साठी नेहमी भांडणे व्हायची ..


अर्थात हे तव्यावरच अस्सल जातिवंत पिठल खाव ते आपल्या आई किंवा आज्जी कडूनच त्यामागे त्यांचा चवीचा प्रदीर्घ अनुभव असतो.


आता हे पिठल तयार होत असताना ते तयार करणाऱ्या गृहिणीचा मूड पण फार महत्वाचा बर का.


रागात घोटून केलेले पिठल आणि प्रसन्न मनाने मन लावून घोटून केलेले पिठल या दोघांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक असतो.


तेंव्हा चविष्ट पिठल हवे असेल तर गृहलक्ष्मीचा मूड सांभाळला गेलाच पाहिजे.


कोकणात मिळते ते कुळीथाच पिठल त्याची चव वेगळी. ते भाकरी बरोबर खाताना एक वेगळीच मजा येते.


नुसतच पिठल भात खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याही पंचतारांकित पदार्थात नाही.


आणि हो. हे पिठल आणि त्याचे प्रकार म्हणजे पिठल भात वगैरे कुठल्या ही हॉटेलात विकत ही मिळत नाही.


*परब्रम्ह पिठल जिंदाबाद ....*



🍁🌈🛕⛱️🍁

आदरांजली

 आदरांजली...

     

      पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले 'हीट अँड रन' प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या...!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली...!  आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला..., जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता...आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला...त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते... पैशाने कायद्याला...माणुसकीला विकत घेऊ पहात होते...!  

       या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे...! 31 मे...राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती...!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे...!

     हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता.... असं मात्र वाटत रहातं...! 

     "राजमाता अहिल्यादेवी होळकर...!"एक आदर्श व्यक्तिमत्व ...! दानशूर...कुशल प्रशासक ... वीरांगना...अतिशय न्यायप्रिय... दूरदृष्टी असलेल्या... पुरोगामी विचाराच्या... शिवभक्त...आणि... प्रजाहितदक्ष...पुण्यश्लोक...  महाराणी  अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग...

      अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत  रथासमोर येते... वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू  मृत्यूमुखी पडते...!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात...! जवळच त्या वासराची आई... म्हणजेच गाय उभी असते...! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते... अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते...! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ  जातो... त्यांना हे दृश्य दिसते... आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे...!  त्यांना अतिशय वाईट वाटते... चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे...! त्या  अतिशय संतापतात...! आणि अतिशय रागात घरी येतात...आपल्या सुनेला विचारतात...."जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं ... आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली....तर काय न्याय द्यायला हवा...?"

    सून  म्हणते...,"  ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने  वासराला चिरडले ...त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा...!"

    अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात...!तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले...त्याच पध्द्तीने...!  मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते...! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा...त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही...! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात...! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो... त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो...!    

     शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात ... त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात...! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते...! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते...!कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते... ! जणू ती सांगते की...' हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे... एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये ...आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये ...! ' 

      ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात...!  अहिल्यादेवींची समजूत काढतात...! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात...!

       ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात...! प्रत्येक स्त्रीमध्ये एक 'आई 'असते...! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही...! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता...! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील...? मन किती खंबीर करावं लागलं असेल...!  खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे ...!

    आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे...पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी...! 

   आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे...  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने...!

    हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली ...आणि हेच कदाचित समाज प्रबोधनही असेल...!


     डॉ सुनिता दोशी✍🏻

सुवर्ण मध्य




👇

*सुवर्ण मध्य !*

👇


अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका 'पोस्ट'ला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही 'पोस्ट' लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतून भारताच्या एक दोन वाऱ्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज हृदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणाऱ्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसऱ्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्णमध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रविवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.


*- माधुरी बापट*

===


[संक्षिप्त परिचय: श्रीमती माधुरी बापट यांनी पुणे विद्यापीठातून न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम. एस्सी. केल्यानंतर ओहायो येथील राईट स्टेट युनिव्हर्सिटीतून प्लाझ्मा फिजिक्समध्ये

एम. एस. डिग्री.

..

त्यानंतर अमेरिकेत सलग ३५ वर्षे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका, ७ वर्षे गणिताच्या व ३ वर्षे खगोलशास्त्राच्या ही प्राध्यापिका. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त व त्यानंतर सातत्याने लेखन व संशोधन.]

Wednesday, February 26, 2025

योगशक्ति

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*'मी  फक्त  एका  नामातच  आहे .'*


मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात रहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापीही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही; तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण 'सर्व ठिकाणी मी आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदे जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही; शिवाय, साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने, संतांच्या अंतःकरणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे, हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना 'तुझा विसर न पडावा' हेच मागतात. तसेच रामदासस्वामी देवाला म्हणतात, 'तुझा योग, म्हणजे सहवास, मला नित्य घडू दे.' 'योग असणे' म्हणजे दुसरे काही नसून, मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारांत भरकटते, तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे, हीच योगशक्ति.


हुकूम कितीही कडक असेना का, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. नाम हे सर्व साधनांत सहीसारखे आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई. त्याला मी सांगितले, 'रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव, आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पहा !' आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर, नामात किती प्रचंड शक्ति आहे ! अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही; मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे-पुढे मी आहेच.


*१६७ .   तुम्ही  भगवंताचे  नाम  घ्यावे  ह्यापलीकडे ,  सत्य  सांगतो ,  मला  कसलीही  अपेक्षा  नाही .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Tuesday, February 25, 2025

श्रद्धांजली

 भावपूर्ण श्रद्धांजली


हजारो कोटी रूपयाची उलाढाल करणारे पुण्यातील उद्योगपती झवेर पुणावाला यांचा ड्रायव्हर गंगादत्त याचे निधन झाले.

गंगादत्तचे निधन झाले तेव्हा पुणावाला पुण्यात नव्हते.

एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला होते

.गंगादत्त निवर्तल्याची बातमी समजताच त्यांनी तत्काळ सर्व बैठका रद्द केल्या.

" मी येइ पर्यत अत्यंसंस्कार करू नका "

अशी विनंती गंगादत्तच्या कूटूबींयाना दुरध्वनीवरुन करत लगेच एका खाजगी हेलीकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.

आयुष्यभर ड्रायव्हर म्हणून काम करीत असुनही आपल्या दोन्ही मुलांना पदवीपर्यंत शिकवणारा,.. इतकेच नाहीतर आपल्या मुलीला सी .ए .बनवण्यासाठी प्रोत्साहन देणारा गंगादत्त व सी. ए. होवून वडीलांची इच्छा पुर्ण करणारी त्यांची मुलगी

अशा या कष्टाळू व जिद्दी गंगादत्त कुटूंबीया बद्दल पूणावाला यांना अभीमान होता.

गंगादत्तच्या आठवणी जागवतच पुण्यात परतलेल्या पुणावाला यांनी गंगादत्त चालवत असलेल्या लिमोझीन गाडीतूनच त्याची अंतयात्रा काढण्याची ईच्छा त्यांच्या कुटूबींयाकडे व्यत्क केली.

या अचबिंत करणार्या मागणीने गंगादत्तचे कुटूबिंय भारावुन गेले.

साश्रू नयनानीं त्यांनी होकार देताच तत्काळ लिमोझीन गाडी फुलांनी सजवली.

यानंतरची कृती पुणावाला यांची थक्क करणारी होती.

गंगादतचा शेवटचा प्रवास लिमोझीन मधून सुरु झाला.

आयुष्यभर आपली गाडी चालवणार्या गंगादत्तच्या घरापासून ते स्मशानभुमीपर्यंतच्या शेवटच्या प्रवासात पुणावाला यांनी स्वता: गाडी चालवत अनोखी आदराजंली वाहीली.

कृतज्ञतेच्या या अनोख्या सारथ्यातून व्यक्त झालेल्या माणूसकीचा गहीवर उपस्थीतांना हेलावून गेला.

उदरनिर्वाहासाठी नोकरीतून, व्यवसायातून पैसे सगळेच कमवतात. मात्र ज्याच्या जोरावर आपण कमावतो त्याच्या विषयी कृतज्ञता बाळगणारे कीती जण असतात.

अशा उद्योगपतीस आमचा सलाम।


🙏🙏👏👏

Sunday, February 23, 2025

वाढदिवस

 आजचे वाढदिवसावरून एक पोस्ट वाचली. गेल्या  2/4 दशकापासून सर्व ठिकाणी जन्म तारखेच्या नोंदी मिळत असाव्यात. ग्रामीण भागात तर पूर्वी सोयीसुविधांअभावी नोंदी मिळणे जिकीरीचेच असेल .. नोंद नसेल तर जन्मतारीखही अंदाजेच ...

..... अशा परिस्थितीत लग्न जमवणे अथवा पत्रिकेला अनुसरून एखादा मुहूर्त काढणे खरंच दुराप्रस्त असावे .... या परिस्थितीत पत्रिका न काढता  कुंडली न काढता न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं !.....  याचा अर्थ पत्रिका बघु नये असा  नाही माहिती उपलब्ध असेल आणि सोय असेल तर तेही एक शास्त्रच आहे आपल्या परंपरेनुसार त्याचा आधार घ्यावा ......... मात्र हे हि तेव्हडेच खरे आहे कि आपले विचार, कर्म, मनशक्ती आणि कर्तृत्व याचे जोरावर आयुष्यात नक्कीच यशस्वी होण्यास मदत होऊ शकते ......


*आज वाढदिवस असलेल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ... आपल्या सर्व इच्छा पुर्ण होवोत *🎉💐🎊🎂🎁

Saturday, February 22, 2025

मॅनर्स

 *कुटुंबातील मॅनर्स*

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.


पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.


सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.


आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.


पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.


बेसिन पाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.


पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.


खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.


घर सगळयांचं असतं. सगळी जवाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.


घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच).


ही एक संधी आहे. घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.


आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे घरातील कोणाकडेही मित्र मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे समजून त्यांचे आदरा तिथ करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घर पण म्हणतात.तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना ? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम अंदाजे वेळापत्रक उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.


 कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आदरातीथ्य असावे अशा प्रकार च्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.


संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं.

-----🙏🙏🙏🙏----

शरणांगती

 शरणांगती मध्ये प्रार्थनेला फार महत्व आहे. मोहाला टक्कर देण्याची शक्ती माणसाला नसते. हतबल होऊन केलेल्या प्रार्थनेने जीवाच्या ठिकाणी अध्यात्मिक शक्ती जागी होते. योगशास्त्रामध्ये त्या शक्तीला कुंडलिनी म्हणतात. " मी आता ईश्वराचा झालो" हा मनाचा निश्चय होणे ही शक्ती झाल्याची खूण आहे. शक्तीने जीव ईश्वराशी जडला म्हणजे त्या जडण्या मध्ये एक ईश्वर आपल्याला प्रेमाने जवळ करील ही खात्री असते. दोन तो जन्मभर आपला सांभाळ करील ही श्रद्धा असते. याचे दोन दृश्य परिणाम अनुभवास येतात. पहिला आतापर्यंत आपल्याकडून जे जे घडले ते सारे माणूस ईश्वराच्या चरणी अर्पण करतो. त्या अर्पणामुळे माणसाचे मागचे सर्व कर्मसंचित ईश्वराच्या स्पर्शाने बलहीन होते. जीवाची पाटी कोरी होते. अशा जीवाला ईश्वर अथवा सद्गुरू आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. दुसरा मागच्या कर्माचे ओझे ईश्वराच्या चरणी ठेवल्या कारणाने जीव आणि ईश्वर यांच्यात चालत आलेला विसंवाद एकदम नाहीस होतो. मग जीवाला ईश्वराच्या सहवासाची तहान लागते त्याच्या सान्निध्याची किंमत कळू लागते. म्हणून जीव ईश्वराच्या अनुसंधानाचा मार्ग व मार्गदर्शक शोधतो.

Friday, February 21, 2025

कापूर

 कापुराचे झाड  --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते

आता हे  झाड   शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात

इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य

हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.

एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच जास्त , भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.

रोप ऍमेझॉन वरून मागवता येते , हिरवे पुण्य नर्सरी नाशिक येथे मिळेल


Akash Ahale *कापूर रोपे बुकिंग फॉर्म  - हिरवेपुण्य नर्सरी.* 


* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा. 

* रोपे विक्री १५ जून पासून.  

* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे. 

* ज्यांना बस ने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.



किती योग्य?

 *पादुकांवर अनुग्रह -  किती योग्य ?* -- भाग १.

      आज एका श्रीभक्ताचा मेसेज आला - मी साई शक्तिपीठात सांगितलं की मी गोंदवलेकर महाराजांचा समाधीवर अनुग्रह घेतला आहे, तर त्यांनी विचारलं समाधीवरचा अनुग्रह हा काय प्रकार आहे ? अनुग्रह प्रत्यक्ष गुरूकडून घ्यायचा असतो, गुरुमंत्र हा गुरुमुखांतून संथा घेऊन शिकायचा असतो.

      ह्या श्रीभक्तासारखीच स्थिती इतरही काही भक्तांची होण्याची शक्यता आहे. ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे, त्यांच्याही मनात श्रीमहाराज देहरूपाने नसल्यामुळे समाधीपुढे श्रीमहाराजांच्या पादुकांवर मस्तक ठेवून मंदिरातील पुजार्‍यांकडून मंत्र घेणे कितपत योग्य आहे अशी शंका येण्याची शक्यता आहे. श्रीमहाराजांचे श्रेष्ठ साधकच ह्याबाबतीत प्रकाश पाडू शकतील याची खात्री आहे. पण तरीही माझ्या अल्प मतीप्रमाणे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतो.

       आपण आजारी पडलो की डॉक्टरच्या दवाखान्यात जातो. डॉक्टर तपासून बाहेर थांबायला सांगतात. थोड्या वेळाने डॉक्टरांचा कंम्पौंडर आपल्या हातात गोळ्यांच्या काही पुड्या देऊन त्या कशा घ्यायच्या ते समजावतो. आपण त्या गोळ्या घेऊन आजारातून बरे होतो. आपल्याला कोणी विचारलं," औषध कोणी दिलं ?" तर आपण डॉक्टरचं नांव सांगतो, कंम्पौंडरचं नाही, खरं ना ? जरी कंम्पौंडरने गोळ्या दिल्या तरी आपण डॉक्टरचं नांव सांगतो कारण आपली खात्री असते की डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्याच कंम्पौंडरने दिल्या असणार. आपण ते औषध घेतो कारण आपल्याला आजारातून बरे व्हायचे असते म्हणून.

      तद्वतच भवरोगापासून मुक्त होण्यासाठी आपण गुरू करतो. गोंदवल्यास आपण अनुग्रह घेतो तेव्हां समाधीमंदिरात श्रीमहाराजांच्या पादुकांवर आपण मस्तक ठेवतो. आपल्या डोक्याला व पादुकांना झाकण्यासाठी वर एक वस्त्र टाकलं जातं आणि गुरुजी आपणास त्रयोदशाक्षरी मंत्राची दिक्षा देतात. आता हा मंत्र मिळतो तो प्रत्यक्ष श्रीमहाराजांकडूनच मिळतो अशी आपली भावना असते. मी अनुग्रह घेतला तेव्हां कोण गुरुजी होते ते मला ठाऊक नाही आणि तसे जाणण्याची कधी आवश्यकताही वाटली नाही, कारण श्रीमहाराज मला अनुग्रह देत आहेत अशी माझी खात्री होती आणि अजूनही खात्री आहे.

      समाधीमंदिरातील गुरुजींची नियुक्ती पंचमंडळी करतात. आणि मुख्य म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच  गोंदवल्यात फक्त चार पंच नेमले जातात. श्रीमहाराज हे पाचवे आणि मुख्य पंच आहेत ही जाणिव आणि खात्री सर्वांनाच आहे. तर मग गुरुजींची नियुक्ती मुख्य पंच श्री गोंदवलेकर महाराजांनीच केली असे होत नाही का? मग ज्याप्रमाणे कंम्पौंडरने दिलेले औषध डॉक्टरनेच दिले असे आपण म्हणतो, त्याप्रमाणेच गुरुजींच्या माध्यमातून श्रीमहाराजच अनुग्रह देतात म्हटलं तर त्यात काहीच चूक नाही.

      आपल्याला पोस्टमनने मनीऑर्डरचे पैसे दिले, तरी कोणी पैसे दिले विचारल्यावर बाबांनी पैसे दिले असे म्हणतो, पोस्टमनने असे म्हणत नाही. तद्वतच अनुग्रह हा श्रीमहाराजच देत असतात, गुरुजी नव्हे.

            ----   डॉ. मनोहर वर्टीकर

Thursday, February 20, 2025

५२ पत्ते

 *५२ पत्ते बद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किवां पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा*

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.


 पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. 

*बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.     

 पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.


*1)* 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे

*2)* 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. 

प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

*3)* या सर्व पत्त्याची बेरीज 364

*4)* एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

*5)* 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

*6)* 52 पत्यातील 12 चित्र पत्ते

     म्हणजे 12 महिने

*7)* लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*

   

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

*1)* दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

*2)* तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

*3)* चौकी म्हणजे चार वेद

     (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेवेद)

*4)* पंजी म्हणजे  पंच प्राण

    (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

*5)* छक्की म्हणजे षड रिपू

   (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, 

    लोभ)

*6)* सत्ती- सात सागर

*7)* अटठी- आठ सिद्धी

*8)* नववी- नऊ ग्रह

*9)* दसशी- दहा इंद्रिये

*10)* गुलाम- मनातील वासना

*11)* राणी- माया

*12)* राजा-सर्वांचा शासक

*13)* एक्का- मनुष्याचा विवेक

                      आणि

          समोरचा भिडू - प्रारब्ध


मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघीतले असतील काहींनी खेळले असतील परंतू त्या पत्त्यांच्या संचा बद्दल माहीती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.

*पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!*

प्रार्थनेचे रहस्य

 'घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?


कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.


आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.


वैशिष्ट्ये :

(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता  वेगवेगळे आहेत.

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.

(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.

(५) यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.

(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.


आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया

१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे | 

प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन | 

भावे ओवाळीन म्हणे नामा |

वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे

अर्थ...

विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.


२) त्वमेव माता च पिता त्वमेव | 

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव | 

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव | 

त्वमेव सर्व मम देव देव |

हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ.. 

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.


(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा | 

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |

नारायणापि समर्पयामि ||

हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ… 

श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.


(४) अच्युतम केशवम रामनारायणं | 

कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी | 

श्रीधर माधवं गोपिकावल्लभं | 

जानकी नायक रामचंद्र भजे ||


वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ… 

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.


हरे राम हरे राम | 

राम राम हरे हरे | 

हरे कृष्ण हरे कृष्ण | 

कृष्ण कृष्ण हरे हरे |

हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे. (ख्रिस्तपूर्व काळातील असावे)

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.


अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो..

Wednesday, February 19, 2025

बिनाखर्चाची पाईपलाईन असते.

 झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.


१) *एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी _संपूर्ण पावसाळ्यात_ जमिनीत घेऊन जाऊ शकते.* _याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत._

म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.


२) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.* [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]  

  

३) *एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी.* _याचा *गणितीय हिशोब* सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.


४) *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.*    


५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.   

*झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल...!*

🙏 *झाडे लावा निसर्ग वाचवा.*  🙏🙏

Tuesday, February 18, 2025

कैरी आली

 बाजारात कैरी आली 

नटून थटून मिरवू लागली 


एक कैरी आंबट भलती 

मीठ मसाल्यात बुडली पुरती  

तिचे मस्त लोणचे केले 

बरणीमधे साठवून ठेवले  


एक कैरी बावरली 

कुकरमधे लपली  

उकडून तिचे पन्हे केले 

सर्वांनी मिळून पोटभर प्यायले

 

एक कैरी म्हणाली थांबा 

गोड साखरेत मला डुंबवा  

तिचा छान मोरांबा केला 

बरणीमधे भरुन ठेवला

  

बाकीच्या मात्र पेटीत शिरल्या  

आंबा बनून बाहेर पडल्या  

आमरस पुरीची मज्जाच न्यारी   

लहान थोर सर्वांना प्यारी  


सर्व हौशी भागवून  आता 

कैरी निघाली सासरी  

पुढच्या वर्षी मे महिन्याच्या 

सुट्टीत लवकर ये ग माहेरी.  

🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭


निनावी आहे

माया

 🌸💠🌹☘️🍁


                  *🎭 बोधकथा : माया

अथांग पसरलेला सागर. क्षितीजापलीकडील किनाऱ्यावर काहीतरी  भव्य-दिव्य असल्याची जाणीव झालेला एक तरुण, समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या एका वृद्ध नावाड्याला आपल्या मनाला झालेल्या त्या जाणीवेविषयी खातरजमा करतो. नावाड्याचे सकारात्मक उत्तर ऐकून आपली तिथे जाण्याची तीव्र इच्छा तो नावाड्याशी व्यक्त करतो. तो वृद्ध नावाडी लांब खुंट्याला बांधून ठेवलेल्या एका छोट्या नावेकडे बोट करतो आणि त्याला प्रवासासंबंधीच्या सर्व गोष्टी नीट समजावून देतो, आणि त्यातील एकही गोष्ट विसरायची नाही अशी समज देखील देतो. शेवटी, प्रवासामध्ये अगदीच अघटित काही जर घडलंच, तर माझ्या नावाने जोराने हाका मार, असं सांगून तो वृद्ध नावाडी त्याला शुभेच्छा देतो.


कधी एकदा त्या पैलतीरावर जाऊन पोहोचतो आणि ते ऐश्वर्य उपभोगतो ह्या तीव्र इच्छेपोटी तो तरुण लगबगीने त्या नावेत जाऊन बसतो. दुसरा कोणताही विचार न करता, लगेच झपाझपा वल्ही मारायला सुरुवात देखील करतो. लक्ष फक्त उसळणाऱ्या लाटांवर आणि पैलतीरावर. काही काळ जातो. हळूहळू थकवा जाणवू लागतो. पण काहीही झालं तरी वल्ही मारणं थांबवायचं नाही, पैलतीर गाठायचाच, ह्या निश्चयाने तो वल्ही मारणं सुरूच ठेवतो. पण आता शरीर थकायला लागलं होतं. हाता पायात गोळे येऊन अंगाचा थरकाप उडत होता. रात्र समोर ठाकली होती. दृष्टीपथात आता पैलतीर तर सोडाच, काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र नुसता अंधारच अंधार त्याच्या मनात, आपण काही चुकलो तर नाही ना?

अशी शंकेची पाल चुकचुकते. आणि शेवटी न राहावल्याने, जिवाच्या आकांताने तो नावाड्याला हाका मारायला लागतो.


"अरे, काय झालं बेटा?" असे त्या वृद्ध नावाड्याचे प्रेमळ शब्द त्या तरुणाच्या कानावर पडतात. आश्चर्याने तो मागे वळून पाहतो, तर तो नावाडी अगदी जवळ किनाऱ्यावरच रेतीवर बसला होता. त्या वृद्ध नावाड्याने हळूवार विचारलं, "अरे वेड्या, 

खुंट्याला बांधलेली दोरी नाही का आधी सोडायची? तू दोरी सोडलीच नाहीस. आणि वल्ही मारतोयस खुळ्यासारखा, नाव पुढं जाईल कशी?" आता ह्या गोष्टीचं मर्म लक्षात येऊ लागलंय.

 

अथांग सागर म्हणजे आपलं जीवन अस्थिर, अडचणींच्या लाटा, संकटांचे भोवरे असणारा, कधी संशयाचे मत्सराचे वादळी वारे तर कधी आल्हाददायक सुखाची झुळूक. तरी पण अथांग अंतहीन. तो उतावळा तरुण म्हणजे साधक अर्थातच आपण वृद्ध नावाडी म्हणजे सद्गुरु. पैलतीर म्हणजे आपल्या पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट अर्थात, अंतिम लक्ष्य, खुंटा म्हणजे अहंकार स्वत्व, मी पणा. वल्ही मारणं म्हणजे उत्तम आचरण, आणि सर्वात महत्त्वाचं, ती दोरी म्हणजे माया.


*📍तात्पर्य  :* ही मायेची दोरी जोपर्यंत आपण अहंच्या खुंट्यापासून सोडून, निष्ठेने आणि विश्वासाने सद्गुरुंच्या इच्छेनुसार आचरण घडवत नाही, नामस्मरण करीत नाही, तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचणं कठीण आहे.


_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



Monday, February 17, 2025

हाक मैत्रीची*

 *हाक मैत्रीची*नक्की वाचा..


काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी रात्री जेवून निवांत बसले  होते. दहा वाजले असतील. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. 


‘हलो, काय करते आहेस?’

‘काही नाही. बसले आहे. काय विशेष?’, मी म्हणाले.

‘आत्ता लगेच येऊ शकशील का घरी?’

‘हो, येते.’ आणि मी फोन बंद केला.


मी कपडे बदलले आणि गाडी बाहेर काढायला निघाले. मैत्रीण दुसऱ्या गावी रहात होती. जायला दीड दोन तास लागणार होते. लगेच बोलाविले आहे म्हणजे काहीतरी कारण नक्की असणार. काही पैसे, कॅश लागणार आहे का, बरोबर कोणाला घेऊन येऊ का, हे विचारण्यासाठी मी मैत्रिणीला परत फोन लावला.


‘हलो, आग मी स्टार्टर मारते, काही घेऊन यायला पाहिजे आहे काय?’

यावर ती काही बोलली नाही. पण रडू लागली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय घडले आहे कळेना. मी विचारले, ‘काय झाले?’ पण काही बोलेना. नुसतीच रडू लागली. मी गोंधळून गेले. काय करावे कळेना.


एवढ्यात फोनवर दुसरे कोणीतरी बोलले. मला अपरिचित आवाज होता. बहुदा मैत्रिणीची मैत्रीण  असावी

‘अहो ताई, काही झालेले नाही. काळजीचे कारण नाही. तुमची मैत्रीण  आनंदाने रडत आहे.’ मी अधिकच गोंधळून गेले.


‘थांब तुम्हाला सगळे सांगते म्हणजे समजेल,’ मैत्रिणीची मैत्रीण बोलत होती.


‘आम्ही सात आठ जनी बसलो आहोत. मैत्रीवर चर्चा चालू होती. बोलता बोलता एक पैज लागली. आत्ता प्रत्येकीने तिच्या बाहेर गावच्या मैत्रिणीला फोन करायचा. आणि लगेच ये म्हणून सांगायचे. ती मैत्रिण येते म्हणायला पाहिजे. *आणि पैजेतील महत्त्वाची अट म्हणजे त्या मैत्रिणीने, काय, कशाला, एवढ्या रात्री काय, सकाळी आले तर चालेल का, असे काहीही विचारता कामा नये.* आम्ही सगळ्यां जणींनी मैत्रिणींना फोन केले. पण प्रत्येकीने काय, कशाला म्हणून विचारले. 


फक्त तुम्हीच काहीही शंका न घेता येते म्हणालात. आणि काय आणू का विचारलेत. आम्ही स्पीकर फोनवर ऐकले. तुमच्या प्रेमा मुळे गहिवरून येऊन ती रडत आहे. ती पैज जिंकली  आहे. तुम्ही या परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाला आहात. तुमच्या मैत्रीला सलाम.’


आता मी रडू लागले. पहिल्या नंबरने पास झाल्याच्या आनंदात...

अशी मैत्रीण एक तरी असावी.

माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित.

लेखिका अज्ञात

Sunday, February 16, 2025

फ्रिज

 फ्रिज

असे म्हणतात की एखाद्या देशाची परीक्षा तिथल्या सार्वजनिक शौचालयावरून होते. त्या धर्तीवर मी म्हणेन की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते. माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.

त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.


माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:


आळशी फ्रिज :

या फ्रिजमध्ये काय सापडेल याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात आणि एकमेकाना तू इथे कधी पासून आहेस हा प्रश्न विचारतांना आढळतात. फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे ! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे "सडत" पडलेल्या असतात. हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो !


टापटीप फ्रिज


या फ्रिजमध्ये सर्व वस्तूंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते. प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रेमधल्या भाज्या फ्लॅट संस्कृती प्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा "गंध" देखील नसतो. 


बॅचलर फ्रिज

हा फ्रिज सहसा रिकामाच असतो. भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेलरूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घास पूस केलेली नसते. जाताना आईने करून ठेवलेली लोणची मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो. कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.


नवविवाहित फ्रिज


हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिज मध्ये स्वतःचे स्थान शोधत असतात. काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यां मध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.


NRI फ्रिज

इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज असतो. माहेरून आणलेली पिठं मसाले पापड लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज पिझ्झा जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो. मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो. अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा. तोच संभ्रम. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा !


ज्येष्ठ नागरिक फ्रिज


या सर्वात केविलवाणा असणारा. एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असते. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीमऐवजी फ्रीझर मध्ये मुलांनी भारत भेटीत दिलेला सुकामेवा असतो. सणावारांना मुलांच्या आठवणीं सारखीच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो कारण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रेला काही कामच नसते.


कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते !

नाडी गणपती

 तामिळनाडू मधील हे मंदिर "नाडी गणपती" म्हणून ओळखले जाते, त्याच्या नावामागच कारण ही तसच आहे.


पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी यांना सिद्धी विनायकाची मोठी मूर्ती स्थापित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, यासाठी त्यांना आवश्यक विधी आणि अभिषेक करावा लागणार होता..


पूज्य आदरणीय श्री मौनस्वामींनी प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू केली तेव्हा काही नास्तिकांनी दगडाच्या मूर्तीत जीव कसा आणता येईल असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. मग आदरणीय श्री मौनस्वामींनी त्यांना मूर्ती तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले.


सर आर्कबाल्ड एडवर्ड हे त्यावेळच्या प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर व्हीआयपी अतिथी म्हणून कार्यक्रमाला आले होते आणि तेही हे सर्व ऐकत होते आणि पाहत होते.


नास्तिकांनी पुतळ्याची नाडी तपासण्यासाठी ब्रिटीश डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी मूर्तीची कोणतीही नाडी तपासली असता नाडी आढळली नाही. तेव्हा पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी म्हणाले, आता मी प्राणप्रतिष्ठा करीन आणि मग तुम्ही पुन्हा तपासू शकता.


प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आरतीच्या वेळी मूर्ती हलत असल्याचे आणि मूर्तीच्या हालचालीही दिसत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले.. शिवाय, मूर्तीच्या नाडीसह हृदयाचे ठोके देखील मनुष्याप्रमाणेच स्पष्टपणे दिसले. ब्रिटीश वैद्यांनी आणि अगदी नास्तिकांनी देखील कसून तपासणी केली आणि त्यांच्या स्टेथोस्कोपद्वारे नाडीचे ठोके स्पष्टपणे आढळले. हे बघून उपस्थित असलेल्याना आश्चर्याचा धक्का बसला..


तिरुनेलवेली जिल्ह्यातील भूवैज्ञानिकांनी पुतळ्याचे परीक्षण केले आणि विचित्र घटनेची पुष्टी केली. ही नाडी काही तास चालू राहिली आणि नंतर पूज्य आणि आदरणीय श्री मौनस्वामींनी सांगितले की आता थांबेल आणि ती थांबली.


पुतळ्याचे परीक्षण करणारे वैद्य किंवा नास्तिक कोणीही त्याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ते विज्ञानाच्या पलीकडचे आहे हे त्यांनी मान्य केले..

उगाच नाही म्हंटले जात सत्य सनातन धर्म..🚩


गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा.. 

गणपती बाप्पा मोरया🙏

Saturday, February 15, 2025

म्हातारपण !*

 *इस्त्री केलेलं म्हातारपण !*


ट्रेनमधून लांबच्या प्रवासाला चाललो होतो. 

समोरच्या सीटवर एक काका होते. टी शर्ट, जीन्स, स्पोर्ट्स शूज, कानात pods, मनगटावर डिजिटल घड्याळ, पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, तुकतुकीत चेहरा.  


कुतूहल चाळवून मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. प्रवासात आमच्या गप्पा सुरु झाल्या. काका भलतेच गप्पिष्ट होते. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. राजकारण, क्रिकेट, प्रवास…गंमत म्हणजे ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. 

गप्पांमध्ये मी हळूच काकांना त्यांचं वय विचारलं. त्यांनी सांगितलं. मी उडालोच. 

‘सॉरी ! मी तुम्हाला आजोबा म्हणायला हवं होतं का?’ मी गमतीत म्हणालो. 

काका जोरात हसले. ‘तुम्ही मला रवि म्हटलंत तरी I am fine !’      

आम्ही दोघेही हसलो. 

काकांचं स्टेशन जवळ आलं. एक कडक शेकहॅण्ड करत काकांनी आमच्या दोघांचा एक सेल्फी घेतला. 


गाडी पुढे निघाली. मी ट्रेनमध्ये आजूबाजूला पाहिलं. सगळे म्हातारे खंगलेले ! इस्त्री गेलेल्या कपड्यासारखे. वैभव उडून गेलेल्या एखाद्या राजवाड्यासारखे ! 


योगायोग बघा. मी तेव्हा गुलज़ारच्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकत होतो. 

गाणी ऐकताना आपसूक गुलज़ारसाहेब डोळ्यासमोर येत होते. एका क्षणी एकदम मनात आलं, अरे या माणसाने इतकी वर्षं कशी सांभाळली असेल स्वतःची ‘इस्त्री’? 

आपण स्वतः कशी सांभाळणार आहोत स्वतःची इस्त्री? विचार ट्रेनच्या पुढे धावू लागले. 


एक म्हणजे स्वतःची तब्येत उत्तम ठेवणं. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप.

सध्याचं माहीत नाही, पण गुलज़ारसाहेब नियमित टेनिस खेळतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका स्पर्धेत ते जिंकले वगैरे होते. 


दुसरं म्हणजे, कार्यरत असणं. बँकेची पासबुकं भरायला स्टेट बँकेत लाईन लावणं याला मी कार्यरत नाही म्हणणार. आताच्या काळात तो वेळेचा अपव्यय आहे. टाईमपास आहे. कार्यरत म्हणजे तुमच्या आवडीच्या कामात creatively गुंतून राहणं. लिखाण, संगीत, शिकवणं, चित्रकला, स्वतःच्या गाडीचं सर्व्हिसिंग, बागकाम, वाचन… असं काहीही. रोजचं एक रुटीन असणं. रुटीन म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत बिनडोक टीव्ही सिरियल्स बघणे नव्हे. स्वतःला enrich करणारं, बुद्धीला आव्हान देणारं काहीतरी करत राहणं. गुलज़ारसाहेब रोज नियमितपणे लिहितात. ते कोणी वाचो वा न वाचो. 


तिसरं म्हणजे कुतूहल टिकवून कालसुसंगत असणं. टी शर्ट- जीन्स घालून मॉडर्न होता येत नाही. काळाशी सुसंगत राहण्यासाठी बाहेरचा वारा आत येण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवणे पण वाऱ्याने त्या खिडक्या उडून जाणार नाहीत याची काळजी घेणे. आमच्या - वेळी - असं - नव्हतं हे चार शब्द आपल्या डिक्शनरीमधून फाडून टाकणे म्हणजे कालसुसंगत राहणे. बिमल रॉय, सलील चौधरी, हेमंत कुमार यांच्याबरोबर काम केलेले गुलज़ारसाहेब विशाल भारद्वाज, रेहमान, शंकर-एहसान-लॉय यांच्याबरोबर तितक्याच सहजतेने काम करताना दिसतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात. जग बदललं. लोकांच्या sensibilities बदलल्या. तरीसुद्धा ऐंशी उलटून गेल्यावरही स्वतःचा दर्जा जराही घसरू न देता गुलज़ारसाहेब लिहिते राहिलेत. आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी ना त्यांनी कधी जीन्स घातली ना त्यांना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याची गरज भासली. आधुनिक वाऱ्यांनी त्यांची पिंपळपाने सळसळत राहतात पण त्यांचा सोनेरी पिंपळवृक्ष आपली मुळे मातीत घट्ट पाय रोवून उभा आहे. 

      

शेवटचं म्हणजे, आर्थिक स्वातंत्र्य. पैशाचा लोभ नव्हे, तर पैशावर प्रेम असणे. उत्तम जगण्यासाठी पैसा हवाच आहे. गुलज़ार  साहेब फाळणीनंतर मुंबईत आले. खिशात पैसे नव्हते, पण स्वप्नं होती. लेखणीच्या आणि बुद्धीच्या बळावर एक कवी, लेखक, दिग्दर्शक पाली हिलमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो, याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय.    

      

आपण सगळेच वयाने म्हातारे होण्याच्या मार्गावर आहोत. 

Growing old is mandatory but getting old is optional, असं म्हणतात. 

प्रत्येकाची आयुष्यं वेगवेगळी असतात. Circumstances वेगवेगळे असतात. त्यामुळे इच्छा असूनही काही लोकांच्या आयुष्याची इस्त्री बिघडतही असेल. पण बाकीच्यांनी आपलं म्हातारपण कडक इस्त्रीचं कसं राहील, याचा विचार आजपासूनच करायला काय हरकत आहे !    


गुलज़ार, राकेश मेहरा आणि विशाल भारद्वाज अशा तिघांचा एक कार्यक्रम Youtube वर आहे. कार्यक्रमाचं नाव होतं: 

कल आज और कल ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलज़ारसाहेब हातात माईक घेतात आणि म्हणतात, ‘कल आज और कल में ये दो कौन है पता नहीं, लेकिन वो ‘आज’ मै हूं !’ 

 

इस्त्री केलेल्या म्हातारपणाची इस्त्री कधीच मोडत नाही, ती अशी !


*एक अनामिक...*



डोही ....

 🍁🌈🛕⛱️🍁


*आनंदाचे डोही .....*


एक दोन तीन ... तीन तर नक्की झाली असावीत. आयुष्यातून कायमचे डिलीट करायला हवेत खरं तर ते दिवस. नितळ गो-या त्वचेवर पांढ-या कोडाचा काळा डाग ऊमटावा तस झालेल.


त्याचा दोस्त, सख्ख्या भावा ईतक्या जवळचा धंद्यातला पार्टनर. नोकरी सोडून दोघांनी धंद्यात ऊडी टाकलेली. आत्ता कुठं धंदा सेट होत होता. अचानक तो कोवीड नावाचा राक्षस ऊगवला. खाऊन टाकला त्यानं त्याच्या दोस्ताला.


संकटं ग्रुप डिस्कशनला यावीत तशी मिळून आलेली मोदीने एकतर्फी केलेला लाॅकडाऊन लावला कामगार पळून गेले मोदी सामान्य माणसाला धड जगूच देत नाही. लाॅकडाऊन पहिले अठ्ठावीस दिवस मग परत, मग परत, मग परत किती दिवस लावावा तर धंदा बसला डोक्यावर कर्जाचा डोंगर असं होणारा तो एकटा नव्हता तरी ही. त्यातनं बाहेर पडणा-या थोड्यांमधला तो एकटा होता. बाकीचे देशोधडीला लागले. खूप जणांनी जीव दिला.


तरी बर त्याच्या बायकोची नोकरी होती राबत तो आधी ही होता. ही दोन वर्ष घड्याळ विसरून गेलेला बुरा वक्त समझने के लिए घडी की क्या जरूरत ?


आता संकट फॅमिली मेंबर ईतकी फॅमिलीअर झालेली सवय झालेली सगळ्यांची कित्येकदा जीव द्यावासा वाटे.. नाही दिला.


मी गेल्यावर ..? त्यापेक्षा राबताना जीव गेला तरी परवडला. प्रत्येक संकटाला पुरून ऊरला बायकोनं खूप सांभाळला त्याला पैशापेक्षा मनानं सावरून घेतल समजून घेतलं सगळ त्याची घालमेल, चीडचीड, टेन्शन्स रोजच्या पोळीभाजी बरोबर वाटून खाल्ली दोघांनी


अख्खं घर मन मारून जगायच मौजमजा नाही की खरेदी नाही अगदी आवश्यक तेवढंच घरात यायच साधं अळणी जगण सवयीचं झालेल.


एकच नियम.. देण संपल्या शिवाय नवीन अनावश्यक काहीही घ्यायच नाही ती होती म्हणूनी.


मागच्या महिन्यात तो रिकामा झालाय. शेवटचा देणेकरी संपवलाय त्यान मणामणाच ओझ ऊतरवल्या सारख हलक वाटतय खर तर त्यान काहीच गुन्हा केलेला नव्हता.


तरी ही ताठ मानेन राममारूती रोडवरन हिंडून आला तो एका शोरूम पाशी थबकला जुने दिवस आठवले नवरात्रात बायको बरोबर या शोरूमची पायरी चढण व्हायचच व्हायच.


पैठणी नाहीतर कांजीवरम्. एकदम झकपक होऊ दे खर्च त्याचा चेहरा ऊतरला मागच्या आठवड्यात एक मोठं पेमेंट आल या सुखात आता कुणीही वाटेकरी नव्हता देण्याची नव्हे घेण्याची वेळ आलेली.

तो तडक शोरूममधे ..

मालकांनी केलेल हसून स्वागत 

तुम्ही विसरलात आम्हाला.

विसराव लागल.

त्यानं सगळं काही खरंखरं सांगून टाकल बर ते जाऊ दे. मला नऊ रंगाच्या नऊ साड्या हव्यात. कुठलं ही सिल्क चालेल बजेटची काळजी नको.


त्याला सगळाच हिशोब चुकता करायचा होता. मालक खूष साहेब तुम्ही चहा घ्या दहा साड्या तुमच्या आधी घरी पोहोचतील. दहावी साडी आमच्याकडनं' .. तो डबलखूष.


अजून एक ही लोकमान्य पगडी तुमच्यासाठी आमच्याकडून तुम्ही असेच यशस्वी व्हा एक सांगू का ? राग नका मानू. दुःखाचा खाऊ एका घासात पाण्याच्या घोटाबरोबर संपवायचा आनंदाच श्रीखंड मात्र चवीचवीन पुरवून पुरवून खायाच.


आजच ठीक आहे धंदेवाईक माणसानं 

अस ईमोशनल होवून चालत नाही. 

पटल ... एकदम पटल. पुन्हा नाही.


शेटजीचा निरोप घेतला शहराच्या दुःखद खड्डेरी रस्त्यांवर आनंदाचे नवरंग ऊधळत गाडी ऊडवत ऊडवत तो शून्य मिनीटांत घरी पोहोचला.


🍁🌈🛕⛱️🍁

Friday, February 14, 2025

लिफ्ट

 "लिफ्ट अन ती"


हल्ली हल्लीच 'ती' सुभाषला दिसू लागली होती. लिफ्ट मधे..


लिफ्ट मधे कोणी सोबत असेल तर ती दिसायची नाही. पण तो एकटा असेल तेंव्हाच दिसायची...


सुभाष अन राखीचा फ्लॅट बाराव्या मजल्यावर होता. त्यामुळे लिफ्टने जाण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. 


लिफ्टच्या मागच्या बाजूला, ब-याच लिफ्टमधे हल्ली असतो तसा, एक आरसा होता. येता जाता त्या आरशात स्वतःला पहात आपले केस ठीक आहेत का? शर्ट व्यवस्थित 'इन' आहे का? बेल्ट बरोबर 'सेंटर'ला आहे का? हे तो त्या आरशात पहायचा, खात्री करायचा. 


चार दिवसापूर्वी रात्री तो उशीरा सोसायटीत आला. साधारण दीड वाजला होता. सुभाष ऑफीसची पार्टी आटोपून आला होता. चार पेग झाल्याने थोडी किक बसली असली तरी तो तसा 'कंट्रोल' मधे होता. 


गाडी पार्क करुन तो लिफ्ट जवळ आला. लिफ्ट आठव्या मजल्यावर होती ती त्याने कॉल केली. दिवसभर कामाचा डोंगर, घेतलेले ड्रिंक्स व झालेला उशीर यामुळे त्याचं शरीर व मन दोन्ही थकलं होतं. लिफ्टमधे शिरुन त्याने लिफ्टचा पंखा सुरु केला व डोळे मिटले. लिफ्टवर बाराव्या मजल्याचे बटण दाबण्याआधीच कुणी तरी लिफ्ट कॉल केली व लिफ्ट वर जाउ लागली. 


'काय भेंडी..रात्री दिड वाजता कोण लिफ्ट कॉल करतय..' असे चिडून स्वतःशीच म्हणत त्याने बाराव्या मजल्याचे बटण परत दाबले 


पण आधी कॉल केल्याने आठव्या मजल्यावर लिफ्ट थ़ांबली. 

लिफ्ट उघडली. पण परत बाहेर कुणीच नव्हतं. 


लिफ्टच्या दाराकडे पाठ ठेउन परत त्याने चिडून एक सणसणीत शिवी हासडली व लिफ्ट बंद करण्याचे बटण दाबले. 

अन त्याला 'ती' दिसली..


त्याच्या समोर, त्या आरशात, लिफ्टच्या बंद होणा-या दरवाजामधे त्याला ती गाउन मधे उभी बाई दिसली. तिने सुभाष कडे अगदी अगतीकपणे पाहिले. जणू तिला लिफ्टमधे यायचं होतं पण कुणी तरी तिला त्या लिफ्टमधे येण्यापासून रोखत होतं. 


एक अपरिचीत स्त्री, तीही गाउनवर, रात्रीच्या दिड वाजता, लिफ्टच्या बाहेर..अन  तिच्या  चेह-यावर एक करुण अगतीकता होती..


सुभाषला ला दरदरुन घाम फुटला. 

त्याची चढलेली सारी दारु खाडकन उतरली. 


बाराव्या मजल्यावर लिफ्ट पोचताच तो सटकन लिफ्टमधून बाहेर आला व मागे वळून न पाहता आपल्या फ्लॅट कडे गेला. त्या घाबरलेल्या अवस्थेत त्याला खिशातून 'लॅच की' देखील पटकन काढता येईना. 


शेवटी चावी मिळाली,  व कस़बसं लॅच उघडून तो घरात शिरला. राखी बेडरुममधे झोपली होती. शांतपणे आवरुन, राखीला न उठवता तो बेडच्या दुस-या अंगाला झोपी गेला. 


अन आता हे तीनदा झालं होतं. 

तो आठवड्यातल्या ज्या दिवशी ड्रिंक्स घेउन यायचा त्या दिवशी 'ती' बाई त्याला आठव्या मजल्यावर दिसायची... तशीच..भकास चेह-याने.. गाउनवर उभी...


अन आज परत तेच झालं..

आठव्या मजल्यावर ती लिफ्ट थांबली. 


यावेळी मात्र ती बाई लिफ्टमधे घुसली. 

सुभाषकडे पहात तिने एक सुस्कारा सोडला व शांतपणे  म्हणाली..

'ड्रिंक्स घेउन आलाय ना? किती दिवस झाले दारु पिउन. नेहमी तुम्ही एकटे एकटे पिउन येता. माझ्यासाठी थोडी शिल्लक आहे का?'


सुभाषने मानेनेच नाही म्हणून उत्तर दिलं. 


तिने चक् असा विचीत्र आवाज काढला. त्याच्या नजरेत आपली नजर मिसळून थंडपणे म्हणाली..

'पुढच्या वेळी याल तेंव्हा माझ्यासाठी सुद्धा दारु घेउन या. टेरेसवर जाउन दोघेही पिउत. मी तुम्हाला कंपनी देइन..काय? ' 

त्याने परत मानेनेच होकार दिला. 

त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. 


लिफ्ट अजून जागेवरच म्हणजे आठव्या मजल्यावरच होती. 

तिने आठव्या मजल्याचे बटण बोटाने दाबून ठेवलं होतं..


आता मात्र तिने लिफ्ट उघडायचे बटण दाबले. 

लिफ्ट उघडली..

ती लिफ्टमधून बाहेर आली..

तिने त्याच्याकडे परत एकदा थंडपणे पाहिलं..

दार बंद झाले व लिफ्ट बाराव्या मजल्यावर आली.. 


या घटनेनंतर सुभाषचं ड्रिंक्स घेणं बंद झालय. 

योगायोगानं ती बाई त्याला दिसायचंही आता बंद झालय..


बाकी तुम्हाला सांगायला हरकत नाही..

आठव्या मजल्यावरच्या आपल्या मैत्रीणीला, अस्मिताला, व तिच्या सिनेमा नाटकात छोटे छोटे रोल करणा-या बहिणीला, अंकिताला, सुभाषच्या बायकोनं म्हणजे राखीनं नुकतीच एक छानशी पार्टी दिली. 


लिफ्टमधे सुभाषला दारुची डिमांड करणा-या अंकिताने त्या दिवशी राखीच्या पार्टीत मात्र दारु पिण्याची आपली मनीषा, मस्तपैकी रेड वाइन पिउन पूर्ण केली. 


®© सुनील गोबुरे



सूंदरम ...* 🔭

 🌈🛕⛱️


*सत्यं, शिवम, सूंदरम ...* 🔭


मृणालने लहानग्या ईरा साठी शब्द कोडे चित्रकोडे यांचे पुस्तक आणले होते आधी ईरा हरखून गेली. तीनं मग ते पुस्तक उघडले. पहिलाच खेळ होता मांजराला माश्याकडे मार्ग दाखवा. 


ईरा न पेंसिलीने रेघांच्या वेटोंळी ओलांडून क्षणात ते कोडे ओलांडल. पुढला खेळ होता योग्य जोड्या जुळवा. तिनं क्षणार्धात मोची आणि चप्पल, शिंपी आणि सदरा, डॉक्टर आणि औषध , सुतार आणि कपाट जुळवल. 


मृणाल कौतुकाने ते बघत होती. पुढ़च्या शब्द खेळाला ईरा थबकली. ती थोडीशी हिरमुसली. तीन ते पुस्तक बाजूला ठेवले. मृणाल ते बघत होती. काय झाल बाळा तुला नाही आवडल का पुस्तक. 


तस नाही अम्म्मू मला तो पुढला चित्र खेळ नाही आवडला. दोन चित्रातील फरक ओळखा. अम्म्मू मला दोन चित्रातला फरक नाही ओळखता येत. 


मृणाल म्हणाली अग सोपाय. बघ हया चित्रात चेंडू लाल रंगाचा आहे त्या चित्रात हिरवा. हया झाडावर पक्षी बसलेला आहे त्या झाडावर नाहीये. 


अम्म्मू मला फरक ओळखायला नाही आवडत. उलट दोन्ही चित्राताली साम्य किती आहेत. हया मुलाकडाची बॅट आणि त्या मुलाकडची बॅट सारखी आहे. दोघांची टोपी सारखी आहे. 


दोन्ही मैदानावर गवत आहे सुंदर हिरवे गार. दोन्ही चित्रात खुप खुप सुंदर सारखी झाड़े आहेत. दोन्ही कडे सूर्य सारखाच हसतोय. दोन्ही ढग सारखेच सुंदर आहेत. 


दोन्ही चित्रात इतकी अधिक साम्य असताना आपण जे थोडेशे फरक आहेत ते का शोधत बसतो. 


आता मृणाल एकदम चमकली. किती सहज सोप तत्वज्ञान आहे हे. आपण आपला पूर्ण वेळ चित्रातला फरक शोधण्यात घालवतो पण हे करताना आपण दोन चित्राताली साम्य जी चित्रातल्या फरकांपेक्षा अधिक आहेत ती लक्षात घेत नाही. 


मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी हेच करतो. ती समोरची मुलगी आपल्या मूलीपेक्षा अधिक उंच आहे. वर्गातल्या बाजूचा मुलगा गणितात अधिक हुशार आहे, ती दूसरी मुलगी माझ्या मुलीपेक्षा छान गाते. 


आपण केवळ आणि केवळ फरकच शोधत बसतो आणि साम्य स्थळ अगदी आणि अगदी विसरून जातो.


मृणाल ने तो चित्रखेळ पुन्हा उघडला. त्यावर दोन चित्रातील  फरक ओळखा मधील 'फरक' हा शब्द खोडून त्या जागी *'साम्य'* हा शब्द लिहिला. 


आता तो खेळ *' दोन चित्रातील साम्य ओळखा '* असा *गोजिरा झाला* होता. अन ईरकली ने हसुन तो खेळ सोडवायला घेतला. अम्म्मूने ईरकली ला जवळ घेतले. 


दोन्ही चित्र आता एक होऊन त्यातील फरक मिटला होता आता त्यात राहिले होते ते फक्त आणि फक्त साम्य आणि अमर्याद पॉजिटिव्हिटी.


अम्म्मू'ज बच्च्चा ..... 👧🏻


🍁🌈🛕⛱️🍁

Thursday, February 13, 2025

नशीब

 

*याला म्हणतात नशीब :-*

         *पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाच्या मुलींच्या क्रिकेटसंघाची कॅप्टन.*

         *नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल, तर ती घडल्याशिवाय रहात  नाही. राजाच्या घरात जन्माला येऊनही, एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते. पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एखादं अनाथ मुल ही मोठा इतिहास घडवून जातं. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं, तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात येते.* 

         *पुण्यासारख्या  मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई-वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं. पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं.* 

         *आज या मुलीला जन्म देणारे आई-वडील कदाचित अजूनही दारिद्र्यात खितपत पडले असतील. कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत.* 

         *ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू (Lisa Sthalekar) लीजा स्टालगरची. (सोबतचा फोटो बघा)*

         *१३ ऑगस्ट १९७९ रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लीजाचा जन्म झाला. लीजाचा स्वीकार करणं, तिच्या आई-वडिलांना शक्य नव्हतं, ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी-सकाळी त्यांनी पुण्यातील ‘श्रीवास्तव अनाथालया’त या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं.*

         *त्या दिवसांमध्ये ‘हरेन’ आणि ‘सू’ नावाचं एक अमेरिकन जोडपं देश भ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं पुणे इथे आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी ‘सू’ ची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सू ला तिच्या प्रेमात पाडलं.*

         *कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. ‘सू’ ने लैलाच नाव बदलून ‘लीज’ केलं. ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं.*

         *हरेनने लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजने क्रिकेट सुरु केलं. नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजला क्रिकेटचा प्रचंड वेड होतं. पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकच महत्त्व दिलं.* 

         *लीजने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरु ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीजपेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती. पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं, अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.*

         *प्रत्येक माणूस आपलं ‘नशीब’ घेऊन जन्माला येतो. आई-वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली. हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली. आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते.*


*संकलन : रा.ना.लळिंगकर; 

बाराव्वी पास...

 एखादं पोरगं किती कपाळ  करंटं असतं बघा..

दारू पिऊन दोन जीवांचा बळी घेतला...


बाप जेल मध्ये गेला..


आजोबा ला जेल मध्ये घातलं..


ड्रायव्हर ला डांबून राहावं लागलं.. पोलिसी चौकशीचा बांबू बसला..आता त्यालाही कोर्ट कचेरी आणि पोलिसांचे खिशे गरम करावे लागतील केस चालू असे पर्यंत..किती वर्षे सांगता येत नाही..निर्दोष सुटला तर बरे..नाहीतर दंड किंवा जेल होऊ शकते..


दारू पिऊन पण ब्लड रिपोर्ट नॉर्मल दिला म्हणून दोन डॉक्टर घरी बसले..


पोलीस तपासात दिरंगाई केली म्हणून दोन PI दर्जाचे पोलीस अधिकारी निलंबित झाले..


ज्या लॅब ने रिपोर्ट नील दिले ते पण चौकशीच्या फेऱ्यात येतीलच..


हे सगळं झाल्यावर गेल्या पाच सहा दिवसात..४९ पब कारवाई होऊन ते बंद झाले..


वास्तविक हे पब अनधिकृत सुरू होते..

अनधिकृत चालू असल्याचा साक्षात्कार पोलिसांना आता झाला..


४९ पब बंद झाले म्हणजे त्यांचे हप्ते पण बंद झाले..

एकूणच पोलिसांचे जब्रा नुकसान झाले..आणि ज्या नेत्याला वर पैसे जायचे त्याचे पण हप्ते बंद झाले की एकरकमी मोठी तोडी होऊन अजून बक्कळ माल मिळेल नव्या परवानग्या घ्यायला सांगता येत नाही..

काही दुकान आणि बार यांचे लिकर लायसन्स सस्पेंड झाले..

आयचा घो..

अगरवाल पोऱ्या चा accident लय महागात पडला ...

गोर गरीब दारू पिणाऱ्या पासून ते पब , बार चालवणाऱ्या मालक , नोकर , वेटर , नाचणाऱ्या पोरी..

विशेष सेवा देणाऱ्या पोरी अश्या सर्वांवर पानशेत धरण फुटल्या सारखी संक्रांत आली..😂😂😂


एवढ्यात बिचारा पुणे पोलीस आयुक्त वाचवला दादाने..

नायतर त्याचा पण नंबर होता..

आयुक्त वाचवणे गरजेचे होते..नाहीतर काय  इस्कोट झाला असता..😂😂

अगरवाल बाजूला राहिला असता आणि नको ते कांड बाहेर आले असते..😄😄😄


शेवटी बाराव्वी पास झाल्याची दारू पार्टी अशी इतक्या लोकांना महागात पडली..😜


आज धाव्वी पास झालेल्या पोरांच्या बापानी काळजी घ्या..

गाडीच्या चाव्या लपवून ठेवा..

उपकार होतील अख्ख्या पुण्यावर..😁😁😁

Wednesday, February 12, 2025

पाझर फुटूद्या...

 🙏 *पाझर फुटूद्या आपणांस माणुसकीचा.....,*

*लावूया हातभार सर्वांनी मदतीचा.......*🙏🤝🤝


         *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील,  निसोबाचा सडा, पळसंब खालचीवाडी)* येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील युवक व आमचे जिवलग मित्र *श्री जगन जंगले (वय 31 वर्षे )*  हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईला  *अशोकवन, चाळ क्रमांक 7, रूम नंबर 5, विजय नगर, अमराई, कल्याण पूर्व* येथे भाड्याच्या घरात राहत होते. कल्याण या ठिकाणी राहून *दादर पश्चिम येथील मॅजेस्टिक  बुक सेंटर* येथे महिना १५,०००/ पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. *सकाळी कल्याण ते दादर  व रात्री   दादर ते कल्याण* असा नियमितचा प्रवास. हल्लीच *फेब्रुवारी महिन्याच्या १७ तारखेला त्यांचा विवाह* होऊन त्यांनी आपला संसार थाटला होता. 


       नियमितप्रमाणे जगन जंगले *22 मे 2024* रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते. ट्रेन ला प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा टवाळखोर टोळक्याने मोबाईल चोरीच्या उद्देशाने घेतला. 


*ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे (कळव्याच्या दिशेने ) ट्रेन खूप स्लो झाली असताना टवाळखोरांनी  चोरीच्या उद्देशाने दांड्याने जोरात आघात केला. तो दांडा गेटवर उभे असलेल्या जगन जंगले यांच्या हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले. त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली  सापडले. तेथील उपस्थित लोकांनी जगन यांना लक्षात असणारा नंबर लावून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तेथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपचार नसल्याने  ठाणे येथील प्रायव्हेट रुग्णालयात हलविण्यात आले कारण तत्काळ उपचार होणे गरजेचे होते.*

        सध्या त्यांच्यावर *ठाणे पश्चिम येथील हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ढोकाळी  येथील खाजगी रुग्णालयात* उपचार सुरु आहेत. काल गुरुवार दिनांक 23/05/2024 रोजी त्यांच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करून दोन्ही पाय काढण्यात आले.


       परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या, नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. दोन्ही पाय गेल्याने अपंगत्व आले. कुटुंबासाठी आधार बनलेले हात कुठेतरी थांबले. अशी वेळ कोणावरही येऊ नये.


       मित्रहो, परिस्थितीपुढे अगतिक असलेल्या जगन जंगले यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. सध्याचा हॉस्पिटलचा खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. तसेच त्यांच्या यापुढे होणाऱ्या उपचारांसाठी देखील आर्थिक मदतीची गरज भासणार आहे.


    *आपणांस कळकळीची विनंती आहे की, आपण सर्वांनी फेसबुक, व्हाट्स अप ग्रुप, आपले मित्रमंडळी, नातेवाईक, दानशूर संघटना यांच्या माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत करून जगन जंगले यांना माणुसकीच्या नात्याने  हातभार लावावा असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.*🙏🙏



    

मदत खाली दिलेल्या बँक खाते किंवा गुगल पे  क्रमांकावर पाठवावी.....👇🙏


    *बँक तपशील*👇

Name- Mangesh Yashwant Jangale


Bank Name - State bank of india 

Account no. 37297033737

IFSC - SBIN0012965


   *गुगल पे क्रमांक*

मंगेश जंगले - 9768601156

तुषार जंगले -9653486856


_तुमचा एक मदतीचा हात,_

_जो देईल एका गरिबाला साथ....._

_ज्यांच्या डोळ्यात करुणा....._

_तेच जाणीती गोरगरीबांच्या_ _वेदना....._


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, February 11, 2025

कधी..

 एका इंग्रजी कवितेचा स्वैर अनुवाद.


कधी कधी


कधी कधी वाटतं, 

कालचक्र मागे फिरावं,

जुन्या गोष्टी बदलण्यासाठी नाही, तर जुन्या गोष्टी परत अनुभवण्यासाठी…..


कधी कधी वाटतं,

परत लहान बाळ व्हावं,

बाबागाडीत बसण्यासाठी नाही, तर आईचं तेव्हाचं सुंदर हास्य बघण्यासाठी.


कधी कधी वाटतं,

परत शाळेत जावं,

विद्यार्थी होण्यासाठी नाही तर, त्या बालपणीच्या मित्रांबरोबर अजून वेळ घालवण्यासाठी जे मला नंतर परत भेटलेच नाहीत.


कधी कधी वाटतं,

परत कॅालेजमध्ये जावं,

मौजमजा करण्यासाठी नाही तर मी नक्की काय शिकलो ते परत आठवण्यासाठी…..


कधी कधी वाटतं,

परत नोकरीचा पहिला दिवस यावा,

कमी काम करण्यासाठी नाही तर त्या पहिल्या पगाराचा आनंद अनुभवण्यासाठी….


कधी कधी वाटतं,

आपली मुलं लहान असायला हवी होती,

ती लवकर मोठी झाली म्हणून नाही, तर त्यांच्याशी अजून जास्त वेळ खेळण्यासाठी….


कधी कधी वाटतं,

जगण्यासाठी अजून जास्त वेळ हवा,

आयुष्य जास्त हवं म्हणून नाही, तर आपण लोकांच्या किती जास्त उपयोगी पडू शकतो हे कळण्यासाठी …..


खरंतर गेलेली वेळ परत येत नाही,

म्हणूनच आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण आनंदाने आणि पूर्ण उपभोगायला हवा

न जाणो परत येईल न येईल….


चला उरलेलं आयुष्य, उरलेले दिवस, उरलेले क्षण आनंदाने जगूया.

जगण्याचा उत्सव करूया, निदान करण्याचा प्रयत्न तरी करूया.

Monday, February 10, 2025

आठवण

 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट. 

 लेखांक -६.

लेखांक - सहावा.

************************

 नामाचेही असेच आहे. जसे दुधात लोणी लपलेले असते पण ते प्राप्त करण्यासाठी त्या दुधातील सायीवर रई लावून ते सतत घोटावे लागते त्याप्रमाणेच अगदी नामातच नामाचे प्रेम व ईश्वर दडलेला असतो. जर आपण सातत्याने व भावपूर्ण अंत:करणाने नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते. प्रपंचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य ह्यांना महत्त्व आहे तेवढेच महत्त्व या परमार्थात नामस्मरणाला आहे. हा प्रपंच केवळ स्वामींचाच आहे व आपण केवळ त्यामधे निमित्त आहे असे गृहीत धरून प्रपंच करावा म्हणजे तो छान होतो. तेवढ्याच प्रेमाने तो करताना वाचेने अक्षय-अव्याहत गोड स्वामीनाम घ्यावे. एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामी नामात दंग झालो की नाम आपले काम करतेच करते व त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंत:करणात उमटतात. महाराजच आपल्या नकळत ह्र्दयासनावर येऊन बसतात. ते आपला योगक्षेम तर पहातातच पण त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात-दु:खात आपली काळजी घेऊन 

" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "

ह्या आश्वासनाची प्रचीती देतात व आपल्यावर कृपा करतात आणि त्याचबरोबर आपल्याजवळच असल्याची खुणगाठ " नामावताराने " देतात. एक महान ग्रंथ म्हणजे " श्रीगुरुलीलामृत  " हा आहे. श्री स्वामीसमर्थ, अक्कलकोट स्वामींच्या सर्व भक्तांना ज्ञात असलेला असा हा सोपा, सुबोध ग्रंथ आहे. या ग्रंथात वामनबुवा वैद्य यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीलांचे वर्णन केले  आहेत. त्यात ग्रंथामध्ये श्री स्वामी महाराजांचे चमत्कार व स्वामी लीलांच्या कथांचाही समावेश आहे. वचनबोध पाहताना चमत्कार कथांचा फारसा उल्लेख केलेला नाही. कारण हे चमत्कार सिद्ध पुरुषांचे असले तरी ते ज्याचे त्याला उपकारक असतात. मात्र एक प्रसंगाचा  येथे मुद्दाम उल्लेख केला आहे. त्यात व्यापक स्वरूपात प्रापंचिक माणूस आणि सद्गुरू कृपा यांच्या समन्वयाचे एक रूपक दडले असल्याने त्याविषयीची प्रतिकात्मकता येथे स्पष्ट केली आहे. प्रसंग असा आहे की, मुंबई-ठाण्याकडील राहणारा एक लक्ष्मण नावाचा कोळी होता. तो खलाशी होता. त्याचा व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर होता. समुद्रातून जहाज / आगबोट याद्वारे तो व्यापार करीत असे. एकदा जहाजात पुष्कळ माल भरलेला होता आणि त्याचबरोबर काही प्रवासीही होते. वाटेत मोठे वादळ सुटले आणि जहाज समुद्रात बुडू लागले. लक्ष्मण कोळी खरंतर एक मोठा धैर्यवान व्यक्ती जरी होता तरी पण तो यावेळी मात्र अतिशय घाबरला व त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले कारण प्रसंग तर मोठा दुर्दैवी ओढवला होता.


 दैववशात त्यासि झाले स्मरण । 

श्रीमददत्तात्रेय  स्वामीस अनन्य शरण । होऊनि म्हणे त्रैलोक्यात तारण । आपणाविण नसेचि ॥ 

नवस केले देवाधिदेवी । 

करू लागला योगीश्वरांचा धावा ।

 वदे गुरू मायबापा धावा हो धावा ।

 पावा मज संकटी ॥ 

त्याच काळी अक्कलकोटात । 

प्रिय भक्त चोळाप्पाचे सदनी स्थित ।

 आनंद खेळत असता अवधूत ।

एकाएकी गडबडून उठले ॥ 

त्वरेने उजवा हात खाली घालून ।

 आवेशाने ‘हुं-हुं-हुं’ ऐसे म्हणून । 

तात्काळ दिधले उचलून ।

 आश्चर्य जन पाहाता ते ॥ 

जैसें हनुमंते पृथ्वीत घालून कर । 

द्रोणागिरी उचलिला सत्वर ।

 तैसे दत्तात्रेय स्वामींनी अभयकर ।

 त्वरे उचलिलि जहाजे तदा ॥’

 (अ. ४१ ओवीबंध २४ ते २८)


अशा तऱ्हेने तो लक्ष्मण कोळी तरला तर  लोकही वाचले. पुढे आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांना त्यांनी साष्टांग दंडवत घातले. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या गावी परतला. आता त्यातले रूपक पाहू या.

" तुम्ही आम्ही सर्वजण प्रापंचिक आहोत. लक्ष्मण कोळीप्रमाणेच या भवसागरात आपली देहनौका हाकीत आहोत. कधीकधी दु:ख , संकटे व प्रतिकूलता यांच्या वादळ-वाऱ्यात आपली देहनौका सापडते. मन वैतागते. बुद्धी डळमळीत होते. " 

अशावेळी आपण काय करतो ? तर उपासनेचे जे दैवत असेल, वा सद्गुरू असतील, त्यांना आर्तपणाने हाक मारतो. साद घालतो. त्यावेळी भक्ताचा धावा ऐकून देव त्याच्या साहाय्यासाठी धावून येतो. अशा वेळी प्रत्यक्ष देव धावून येतो. म्हणजे काय? तर, कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन तो आपल्याला संकटातून सोडवतो. संसारीकाला ही देवकृपा म्हणा वा सद्गुरूकृपा म्हणा अशा दैविय शक्ती नेहमीच साहाय्य करत असतात. अशावेळी आपण मनोमन देवाचे किंवा आपल्या सद्गुरूंचे ऋण मान्य करतो. त्यांचे ऋण फेडण्यासाठी वा उतराई होण्यासाठी त्यांच्या दर्शनार्थ जातो. सेवा म्हणून तन-मन-धन अर्पण करतो. लक्ष्मण कोळ्याने शतरौप्यमुद्रा, वस्त्रालंकार, फळे या स्वरूपात श्रीस्वामी समर्थांच्या पायी अर्पण करून ऋण मान्य केले व ते अंशत: का होईना फेडण्याचा प्रयत्न केला. 

 यात धन, वस्त्रे, फळे यांचे महत्त्व नाही पण आपण भाव भक्तीने जे काहीही अर्पण करतो तो भाव मात्र महत्त्वाचा आहे. आपणही आपल्यापरीने पूजा-नैवेद्य-प्रसाद या स्वरूपात देवाचे / सद्गुरूंचे ऋण मान्य करून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. प्रपंच म्हटला की, त्यात सुख-दु:ख आलेच, त्यातही

 " सुख जवा एवढे व दु:ख पर्वताएवढे " 

हा बहुतेकांचा अनुभव आहे. मग अशा दु:खप्रसंगी व संकटप्रसंगी आपण त्यांचे निवारण व्हावे म्हणून कुलदेवतेला व गुरूदेवतेला नवस बोलतो पण नवस बोलला असेल, तर आपण दु:ख-संकटांचा परिहार झाल्यावर तो लक्षात ठेवून अगदी कटाक्षाने फेडला पाहिजे. अन्यथा त्याची ‘आठवण’ घडेल अशाप्रकारची ‘प्रतिकूल परिस्थिती’ निर्माण होते. म्हणून बोललेला नवस हा फेडलाच पाहिजे असेही स्वामी समर्थांचे सांगणे आहे. देवदर्शन घडण्यासाठी सद्गुरूंची कृपा कार्यास येते परंतु त्याच्यासाठी आचार, विचारांची शुद्धता अपेक्षित आहे.  

श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील ४० पैकी २१ वर्षे अक्कलकोट येथे घालवली. शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली समाधी घेतली व ते निजानंदी निमग्न झाले. समाधीपूर्वी  एक वर्ष अगोदरपासूनच त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्तमंडळीत सुरू केली होती. अवतारसमाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी ‘अखंड नाम-भजन’ सुरू ठेवले. देहप्रकृती ही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला. त्यांनी अन्नत्यागही केला. नंतर मंगलस्नान करून ते ध्यानमग्न झाले. त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की, आपण बरे केव्हा व्हाल? तेव्हा स्वामी उत्तरले,

" जेव्हा पंढरी जळेल । 

अथवा डोंगर बोलतील । 

तेव्हाच आराम पडेल । 

दु:ख विव्हळ का होता”


म्हणजेच देहसमप्तीनंतर त्यांचे जगदोद्धाराचे कार्य आणखी अनेक वर्षे चालू राहणार आहे. भक्तांची समजूत घालून श्रीस्वामींनी त्यांना दु:खी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकांचा उच्चार केला.


‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्’


अनन्यभावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम मी चालवेन, असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे. हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेत त्यांनी आपल्या शाश्वत देहाचा त्याग केला. त्या दिवशी मंगळवार, चैत्र वद्य त्रयोदशी ही तिथी होती.

~ प्रस्तुती व निवेदन :-

 श्री वामन रूपरावजी वानरे.


अध्यात्म

 छान पोस्ट आहे

    *अध्यात्म म्हणजे काय* ?


      *अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*

       *अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*

       *अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.* 

      *अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*

      *अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.* 

     *अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*

     *अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*

     *अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*

       *अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*

       *अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*

       *अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*

       *अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*

        *अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*

        *अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.* 

        *अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*

        *अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.* 

        *अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.*   

    *अध्यात्म म्हणजे* 

          *साधं*.........

          *सोपं*........

          *सरळ*.........

           *आणि*

          *निर्मळ* ..........*असणं - दिसणं आणि वागणं.*      

        *अध्यात्म म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*......

        *अध्यात्म म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.*

        *अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.*   

         *थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य  कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.*

              *Il शुभम भवतु ll*

                      🙏🙏

Sunday, February 9, 2025

आदरांजली ...

 आदरांजली...

     

      पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले 'हीट अँड रन' प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या...!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली...!  आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला..., जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता...आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला...त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते... पैशाने कायद्याला...माणुसकीला विकत घेऊ पहात होते...!  

       या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे...! 31 मे...राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती...!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे...!

     हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता.... असं मात्र वाटत रहातं...! 

     "राजमाता अहिल्यादेवी होळकर...!"एक आदर्श व्यक्तिमत्व ...! दानशूर...कुशल प्रशासक ... वीरांगना...अतिशय न्यायप्रिय... दूरदृष्टी असलेल्या... पुरोगामी विचाराच्या... शिवभक्त...आणि... प्रजाहितदक्ष...पुण्यश्लोक...  महाराणी  अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग...

      अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत  रथासमोर येते... वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू  मृत्यूमुखी पडते...!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात...! जवळच त्या वासराची आई... म्हणजेच गाय उभी असते...! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते... अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते...! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ  जातो... त्यांना हे दृश्य दिसते... आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे...!  त्यांना अतिशय वाईट वाटते... चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे...! त्या  अतिशय संतापतात...! आणि अतिशय रागात घरी येतात...आपल्या सुनेला विचारतात...."जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं ... आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली....तर काय न्याय द्यायला हवा...?"

    सून  म्हणते...,"  ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने  वासराला चिरडले ...त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा...!"

    अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात...!तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले...त्याच पध्द्तीने...!  मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते...! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा...त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही...! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात...! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो... त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो...!    

     शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात ... त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात...! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते...! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते...!कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते... ! जणू ती सांगते की...' हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे... एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये ...आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये ...! ' 

      ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात...!  अहिल्यादेवींची समजूत काढतात...! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात...!

       ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात...! प्रत्येक स्त्रीमध्ये एक 'आई 'असते...! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही...! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता...! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील...? मन किती खंबीर करावं लागलं असेल...!  खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे ...!

    आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे...पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी...! 

   आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे...  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने...!

    हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली ...आणि हेच कदाचित समाज प्रबोधनही असेल...!


     डॉ सुनिता दोशी✍🏻

Saturday, February 8, 2025

उंबरठ्यावर....

 " चाळीशीच्या उंबरठ्यावर."

" मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे.." या ओळी वाचल्या किंवा नुसत्या कानावर जरी पडल्या तरी डोळ्यासमोर स्त्री सौंदर्य उभे राहते. व.पुं.नी एक विचार व्यक्त केला आहे, " फुलांचा सडा कसाही पडला तरी चांगला दिसतो.." तसंच, साडी नेसलेली, लांब केशसंभार, व त्यावर गजरा किंवा फुल असं परिधान केलेली स्त्री ही मेकअपचा थर जरी नसला तरी छानच दिसते.

 तारुण्य हे क्षणैक असते असं मला वाटतं. कारण, तारुण्यात जोश असतो, उमेद असते आणि महत्वाचे म्हणजे शरीर साथ देत असते. हे वाक्य पुरुष व स्त्री दोघांनाही लागू पडते. तारुण्यात प्रवेश केल्यावर लग्न, नोकरी या सर्व कसोट्यांवर उतरताना एक प्रकारचा उत्साह जाणवतो पण.. आता मुळ विषयाकडे वळू, जेव्हा तुम्ही चाळीशीत पदार्पण करता तेव्हा का कुणास ठाऊक पण शरीरात एक प्रकारचा जडपणा जाणवतो. आत्ता पर्यंत डॉक्टर तुमच्या मागे लागले नसतील पण काही ना काही पथ्य सुरू होतात.. आयुष्याभर केलेले कष्ट, मिळालेले अनुभव हे सर्व त्या वयात आठवतात. 

 व.पुं.नी अजून एक विचार मांडला आहे, " आयुष्यातले काही दिवस अगदी स्वतः साठीच जगावे.." मला सांगा, तुम्ही समजा वयाच्या पंचवीस वर्षांपासून नोकरी करताय, म्हणजे ती नोकरी मिळण्यासाठी धडपड करताना अनेकदा चांगला पगार मिळतो म्हणून कुटूंबाच्या सुखासाठी देखील आपल्या हौसांचा त्याग करावा लागतो, पुढे लग्न होते, मुलं होतात, मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च या सगळ्यात आपलं स्वतःसाठी जगणेच राहून जाते. हे झालं पुरुषांचं. स्त्री म्हटलं की अनेक जबाबदाऱ्या या आल्याच. आता इथे व.पुं.नी लिहिलेला आणखीन एक विचार मांडते, " बाई हा विषयच मुळात सुंदर. आणि कामात दंग झालेली बाई तर विलक्षण देखणी दिसते.." यामध्ये, आपल्या सारख्या मध्यमवर्गीय स्त्रीयांना चाळीशीत अनेक समस्या भेडसावतात. एक स्त्री वेळेला दोन व्यक्तींचं आयुष्य जगत असते. नवरा हा जर साथ देणारा असला तर तिचा त्रास कमी होतो पण त्याची साथ नसेल तर मात्र स्ट्रेस, काळज्या यामुळे ती पिचून जाते. अशी वर्ष जेव्हा सरत जातात तेव्हा कळतं अरेच्चा आपली चाळीशी पार होते आहे. मग " मेनोपाॅझ " सुरू झाला आहे हे लक्षात येते. अशा वेळी वजन वाढणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे, अन्न नको वाटणे या दिव्यातून ती जात असते. म्हणून मला वाटते, वयाचा विसर पडायला लावणारा चित्रपट म्हणजे आयुष्य..

 पुरुष असो किंवा स्त्री, चाळीशी ओलांडताना दोघांनाही काही प्रमाणात त्रास होतो. पण अशा वेळी गरज असते ती आधाराची. मग व.पु. परत म्हणतात, " माणसाला बळ देतं ते दुसरं माणूसच.." पुरुष आपल्या व्यथा चारचौघात सांगू शकत नाहीत. पण जेव्हा पत्नीचा आधाराचा हात पाठीवर पडला की ते देखील सुखावतात. तसं म्हटलं तर, दोघांनाही असे वाटते की, कोणीतरी म्हणावं, थांब, श्वास घे. मेहनत करणाऱ्या या दोन प्रवाशांना असं एक मुक्कामाचं ठिकाण हवं असतं जिथे ते विसावा घेऊ शकतात. बऱ्याचदा, काही लोकं म्हणतात, चाळीशी आली तरी अजून स्थिर नाही. पण स्थिर होण्यासाठी करावी लागणारी मेहनत ही त्या व्यक्तीलाच माहित. कारण, नंतर जरी स्थिर झाले तरी आयुष्यातले मौल्यवान क्षण वाळू प्रमाणे निसटून गेले ही सल मनात राहते. 

 " बाईपण भारी देवा.." या चित्रपटात एक डायलॉग आहे, ३६५ दिवसांपैकी एक दिवस सेलिब्रेशन ते असतं वाढदिवसाला आणि उरलेले ३६४ दिवस फक्त काळज्या, स्ट्रेस एवढंच.. म्हणूनच ही चाळीशी प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाते हे खरं.. 

                              .. मानसी देशपांडे 

                                             

कालजयी

 *⚛️ कालजयी...*


*प्रा डॉ श्रीकांत तारे*


वपुंसोबत शेअर केलेलं असंख्य अविस्मरणीय क्षण मी मनाच्या गाभाऱ्यांत जपून ठेवले आहेत. मधूनच कुणीतरी भेटतं, वपुंचा विषय निघतो, नवीन काही आठवणी बाहेर येतात, अलगद मी भूतकाळांत शिरतो. ‘ज्या चहेत्यांमुळे आज आपण एका विशिष्ट उंचीला पोहोचलोय, ते चहेते म्हणजे आपलं सर्वस्व’ हे ब्रीदवाक्य असणारा आणि माणुसकी जपत आभाळाची ऊंची गाठणारा असा एक ‘कालजयी’ माणूस त्याच्या निर्वाणापर्यंत आपल्या मित्रपरिवारांत होता याकरता स्वत:चाच हेवा वाटू लागतो.


काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमांत, मंगला गोडबोल्यांची मुलाखत घ्यायला आलेली लेखिका नीलिमा बोरवणकर भेटली. कार्यक्रमानंतर एकत्र बसून जेवताना मी वपुंचं नाव घेतलं आणि नीलिमा रोमांचित झाली. खांदे उडवत म्हणली,


‘वपुंच्या ऐन उमेदीतील हा किस्सा तुला ठाऊक नसणार’. प्रीमियर ऑटोमोटिव्ह कंपनीचे उपाध्यक्ष होते केशव पोळ. पुण्यात कोथरूडला रहायचे. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर किडनी बिघडल्या आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’

‘बाप रे, वय वाढत गेलं की डायलिसीस कठीण होत जातं.’ मी ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळलं.


‘हो ना. त्यातून तीस वर्षांपूर्वीचं  डायलिसीस आजसारखं सोपं नव्हतं. पेशंटचे हाल व्हायचे. दोन दिवस दवाखान्यात रहावं लागायचं. घरी आलं की पुढल्या डायलिसीसची मानसिक तयारी करावी लागायची.


दवाखान्यातील त्रासाच्या धसक्यानं रात्र रात्र झोप लागायची नाही. पोळांची पत्नी मग वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचे पाय चेपत बसायची, वपुंनी सांगितलेली कथा डोक्यात घोळवीत, पोळ झोपी जायचे.’

माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. वपुंच्या कॅसेट्ची किमया मी स्वत: कितीदातरी अनुभवली आहे. एकबोटे, भदे, दामले, नळात जाऊन बसलेली भुताची पोरं वगैरे पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद मला अक्षरश: तोंडपाठ होते. कॅसेटच्या रूपाने वपु आमच्या घरांत शिरले आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. मी नीलिमाला हे सारं सांगणारच होतो, तर मला हाताने थांबवत ती म्हणली,


‘थांब, रे, ही नुसती प्रस्तावना होती, खरा किस्सा तर पुढे आहे. पोळांची दगदग कमी व्हावी म्हणून प्रीमियर कंपनीनं त्यांना घरीच डायलिसीसचं मशिन बसवून दिलं. ओळखीचे एक डॉक्टर, बरोबरीला एक सहाय्यक, एक नर्स अशी टीम यायची, पोळांना घरीच डायलिसीस लावलं जायचं. गंमत म्हणजे, या दरम्यानही वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचं दुखणं हलकं करण्याचा प्रयत्न केला जायचा.’


मी ऐकतच राहिलो. तीस वर्षापूर्वी घरच्या घरी घरी डायलिसीस करता यायचं ही बातमी माझ्यासाठी आजही थक्क करणारी होती. मी माझं आश्चर्य नीलिमाला बोलून दाखवलं आणि तिनं समोरच्या टेबलवर हलकीशी थाप मारली.


‘बरोबर हेच वपुंना वाटलं. म्हणजे झालं काय की पोळांच्या पत्नीने वपुंना फोन केला एकदा. नवऱ्याचा आजार, घरी लावलेली मशीन, डायलिसीसचे निश्चित दिवस. हे सगळं बोलून झाल्यावर त्यांनी वपुंचे मनःपुर्वक आभार मानले. तुमच्या कथांचा आणि त्या रंगवून सागणाऱ्या तुमच्या आवाजाचा खूप आधार वाटतो माझ्या नवऱ्याला, डायलिसीस होत असतां मी त्यांचे पाय चेपते पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येतं ते तुमच्या आवाजाने. तुमचे ऋण फेडणं कठीण आहे वगैरे बोलल्या. वपुंनीही अगत्याने पोळांच्या प्रकृतीची माहिती करून घेतली, बाईंना धीर दिला. डोळे पुसतच, अतीव समाधानाने बाईंनी फोन ठेवला.’


निलीमा बोलत होती आणि मला वपुंबरोबर माझे टेलिफोनवर घडणारे संवाद आठवत होते. आपल्या चहेत्यांचे फोन घेताना एक नैसर्गिक आनंद त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवायचा. वाचकाने केलेली त्यांच्या लेखनाची तारीफ, समीक्षा, आलोचना, त्याचे व्यक्तिगत प्रश्न, सल्ले, वपु श्रद्धेनं ऐकायचे. एखाद्या वाचकाशी बोलताना त्यांनी वेळेचा विचार केलेला माझ्या ऐकिवात नाही. वपुंच्या मधाळ आवाजाने, आणि आपण त्यांचे ‘खास’ आहोत या जाणीवेनं तृप्त होऊन वाचक फोन ठेवायचा. आठवून माझ्या चेहऱ्यावर आगळी चमक आली असावी, कारण आणि नीलिमा हसली. माझ्या मनातले विचार तिने नेमके ओळखले. माझी उत्कंठा पुरेशी ताणली गेलीय याची खात्री करून घेत तिने पुन्हा सुरुवात केली,

‘तर, या टेलिफोन संवादानंतर दोनेक आठवडे उलटले आणि एके दिवशी अचानक, वपुंचा फोन आला पोळांकडे. कथाकथनाच्या कार्यक्रमा निमित्त पुण्यांत येतोय, कार्यक्रम रात्री आहे, पण पोळसाहेबांच्या डायलिसीसचा दिवस असल्याने डायलिसीस मशीन ऑपरेट होताना बघण्याची इच्छा आहे अश्या अर्थाचा तो फोन होता. वपु आपल्या घरी येणार या नुसत्या कल्पनेनं पोळांकडे उत्साहाला उधाण आलं. त्याकाळी मोबाईल हातात आले नव्हते पण मुंबईहून ते येणार म्हणजे मुंबईहून कितीही लवकर निघाले तरी सकाळी दहा साडे दहाच्या आधी त्यांचं येणं शक्य नाही असा अंदाज पोळ कुटुंबीयांनी बांधला. आपला आवडता लेखक, कथाकथनसम्राट प्रत्यक्ष आपल्या घरी येणार म्हणून शक्तिहीन पोळही वेगळ्याच विश्वात वावरत होते. आणि तुला गंमत सांगते श्रीकांत, सकाळी आठ वाजताच पोळांच्या दारांत वपु हजर होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी मुंबई सोडलं आणि सकाळी लवकर डायलिसीस करायचं असतं हे ठाऊक असल्यामुळे स्पेशल टॅक्सी करून वपुंनी पोळांची ही वेळ गाठली.’


‘माय गॉड. व्हेरी इंटरेस्टिंग.’

‘हो ना. पोळांकडे हीsSSS धांदल. डॉक्टर येऊन बसलेले, सहायक कामाला लागले आणि वपु घरात. एका खुर्चीवर शरीराचा डॉक्टर बसलेला तर दुसरीवर मनाचा. श्री व सौ पोळ यांना तर काय करावं सुचेना,डायलिसीस नित्याचं असलं तरी आज उडालेली त्यांची तारांबळ काही वेगळीच होती.’

निलिमाच्या कथेत मी गुंगत चाललो. पोळ कुटुंब, वपु आणि डॉक्टर यांचे सोबत एका खुर्चीवर मीही जाऊन बसलो. पोळांकडील गड्याने वपुंसोबत मलाही चहा दिला, घड्याळाकडे बघत असलेल्या डॉक्टरांना आग्रहाने मी चहा दिला, वातावरण अधिकाधिक खेळकर करणाऱ्या मस्त गप्पा मारत वपुंनी चहा संपवला, आपला आजार विसरून पोळ, वपुंच्या बोलण्याला, कोट्यांना खळखळून दाद देताहेत, टाळी घेण्यासाठी पुढे केलेला हात माझा आहे कि वपुंचा याकडे लक्ष न देता उत्साहाने टाळी देताहेत हे सारं मला स्पष्ट दिसत होतं. वपु माझ्या घरी आल्यावर होणारी धावपळ आठवत, काही वेळासाठी मी पोळांच्या घरचा एक सदस्य झालो. निलिमाचंही असचं काहीसं झालं होतं. या क्षणी माझ्याबरोबर बहुधा तीही पोळांकडे पोहोचली असावी. तिचा स्वर गंभीर झाला. रणांगणावरील देखावा धृतराष्ट्राला सांगताना संजयचा झाला असेल तसा.


‘तर डायलिसीसची तयारी झाली, पोळांना पलंगावर झोपवलं, सौ पोळांनी कपाटातून कथाकथनाची कॅसेट काढली आणि टेपरेकॉर्डरच्या खटक्याचा आवाज ऐकून, आतापर्यंत डायलिसीस मशीनचं सूक्ष्म निरीक्षण करत असलेले वपु अचानक पलंगापाशी आले. सौ पोळांना थांबवत म्हणाले, आज कॅसेट नाही, वपु आज स्वत: पोळांजवळ बसून नवीन कथा त्यांना सांगतील. सौ पोळ ह्बकल्याच हे ऐकून, मग भानावर येत त्यांनी गड्याला खुर्ची लावायला सांगितली, पोळांच्या डोक्याशी खुर्ची ठेवली गेली, आणि वपुंनी नम्रपणे ती खुर्ची नाकारली. सौ पोळांसाठी राखीव खुर्चीवर पोळांच्या पायाशी बसू द्यायची त्यांनी विनंती केली आणि सौ पोळ गहिवरल्या. डोळे पुसतच त्यांनी पायथ्याची खुर्ची रिकामी केली. वपुंची कथा प्रत्यक्ष त्यांचेकडून फक्त आपल्याला ऐकायला मिळणार या अवर्णनीय आनंदानं डॉक्टर, त्यांचे सहकारी, सौ पोळ प्रचंड भारावले. पोळांचं डायलिसीस सुरु झालं, त्यांच्या पायाशी वपु बसले, आपलं चिरपरिचित स्मित चेहऱ्यावर खेळवीत, धीरगंभीर आवाजांत त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.’

किस्सा सांगता सांगता नीलिमा थबकली. शब्दांची जुळवाजुळव तिला करावी लागत असावी. ‘श्रीकांत, आणि....आणि कथा सांगता सांगता वपु चक्क पोळांचे पाय चेपू लागले. चारच श्रोते, पण सारेच अंतर्बाह्य थरारले, स्वप्नातही कल्पना न करू शकणारं दृश्य आपण आज बघतोय याची जाणीव तिथल्या साऱ्यांनाच होत होती. वपुंची कथा विनोदी असूनही श्री व सौ पोळांच्या डोळ्याला धार लागली.’


किस्सा संपवताना निलिमाच्या अंगावरील रोमांच मला स्पष्ट दिसत होता. माझ्या तर संवेदनाच खुंटल्या होत्या. मागे कधीतरी वपुंशी बोलत असतां, ’माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कथाकथनाच्या प्रयोगाला फक्त चारच श्रोते हजर होते’ असं त्यांनी म्हटलेलं मला नेमकं तेव्हाच आठवलं, कधीच सुटणार नाही म्हणून मनाच्या कोपऱ्यांत दडवून ठेवलेलं कोडं अचानक उलगडलं.


माणसं समजून घेत त्यांना आनंदात ठेवण्याची सातत्याने धडपड करीत जगलेल्या या ग्रेट लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

Friday, February 7, 2025

स्मरण

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*भगवंताचे  स्मरण  ही  सद्‍बुद्धी .*


परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते; कारण जी व्यक्ति नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते.


बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की, परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? याला उत्तर असे की, बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे; पण त्या बुद्धीची सद्‍बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश-काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्‍बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून, बुद्धीदाता परमेश्वर हे जरी खरे असले, तरी सद्‍बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे; आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे, हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे, ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणे, याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय, आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी की, "देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको."


*१४७ .   नाम  व  अनुसंधान  चोवीस  तास  चालायला  पाहिजे .  तेथे  दुसरी  एखादे  गोष्ट  वेळेवर  न  झाली  तर  त्याचा  आग्रह  नसावा .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, February 6, 2025

श्वास

 व.पुं.नी एक विचार मांडला आहे, " कोणत्याही वस्तूची किंमत ठरवता येते पण श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही.." तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा तिथे आपली माणसं असतात म्हणजेच आपण त्यांच्या सहवासात असतो. पण एखादी जीवाभावाची व्यक्ती आपल्या पासून दूर असेल तर तिच्या सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

कारण, जसं व.पुं.नी म्हटलं आहे, श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही. बघा, सहवास हा अनेक नात्यांमध्ये असतो. जसं की पती पत्नी मधील सहवास, मित्र मैत्रिणींमधील सहवास, नातवंडांना लाभलेला आजी आजोबांचा सहवास आणि प्राण्यांचा सहवास. किती उदाहरणे आहेत नाही!!

 आता, पती पत्नी मधील सहवास म्हणजे " तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना.." हे नातं इतकं वेगळं आहे की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. आपण जर विचार केला तर, समजा, पती पत्नी मध्ये छोटंसं भांडण झालं तर तो राग जास्त वेळ टिकतो?

 तर नाही. याचे कारण म्हणजे, दोघांपैकी एक जण जरी गप्प असला तरी कुठेतरी चुकचुकल्या सारखं वाटतं. का तर सहवास.. म्हणून व.पु. लिहितात, " कित्येकदा एकमेकांशी कडाडून भांडलो,पण एकमेकांशिवाय नाही कुठेच रमलो.." 

 दुसरं नातं म्हणजे आजी आजोबा आणि नातवंडे. अनुभवांची भरगच्च शिदोरी ज्यांच्या जवळ असते ते म्हणजे आजी आजोबा. शाळेत जाताना हळूच थरथरत्या हाताने नातवाच्या किंवा नातीच्या हातावर १० रु. २० रु.

 ठेवून खाऊ खा हं असं प्रेमाने सांगणारे. त्यांचा सहवास हा कितीही लाभला तरी कमीच असतो हो. मला आठवतंय, मी शाळेतून घरी आल्यावर गरम गरम वरणभात देणारी व शाळेच्या पहिल्या दिवशी बटाट्याची भजी तळणारी माझी आजी. या सुखाला तोडच नाही. या प्रेमाची, सहवासाची मोजणी होऊच शकत नाही. फक्त ते सुख अनुभवणं म्हणजे पर्वणीच असते. व.पु. म्हणतात तसं, " नभांगणातल्या  चांदण्या मोजत बसायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे ह्या आनंदात विहार करायचा असतो.."

 पार्टनर मधील एक ओळ आहे, " लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.." हे नातं म्हणजे मैत्रीचं. जिथे सुख दुःख अगदी हक्काने व्यक्त करता येतं. मैत्रीची अनेक उदाहरणे देता येतील. जसं की, ही दोस्ती तुटायची नाय म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री.

 मैत्रीमध्ये जेव्हा सहवास वाढतो तेव्हा ती अधिक घट्ट होते. तिथे व्यवहार नसतो. असते ते फक्त प्रेम.. तुम्हाला माहित आहे, प्राण्यांना बोलता येत नाही पण तरीही त्यांना स्पर्शाची भाषा चांगली समजते. घरातली एखादी व्यक्ती लवकर आली नसेल तर तो मुका जीव दाराशी वाट पाहत बसलेला असतो. कारण, त्यांना देखील त्या सहवासाची, प्रेमाची सवय झालेली असते. हा सहवास खरंच लाखमोलाचा असतो. 

 अशी नाती मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. कारण ती जीव ओवाळून टाकावी अशी असतात. सहवासाचं कोंदण असते ना त्यामध्ये.. शेवटी काय तर, सहवासाने नाती बहरतात तर प्रेमाचं शिंपण पडलं की ते टवटवीत होते.

 जसं, आपण नवीन रोप आणतो, त्यात जसं खत लागतं, सुर्यप्रकाश लागतो तसंच पाणी देखील लागते. कारण, वेळच्या वेळी पाणी घातले नाही तर झाड सुकते,कोमेजते. तसंच, नात्यात संवाद, सहवास आणि ओढ नसेल तर ते नाते देखील सुकून जाते. म्हणून ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवली पाहिजे पाहिजे..

                                   .. मानसी देशपांडे