जगात आणि आपल्या जीवनात जे जे घडते ते त्यांच्या (सद्गुरुंच्या) सत्तेने घडते. आपण त्याला चांगले वाईट म्हणतो ते बरोबर नाही. सद्गुरूंना एकच गोष्ट अशक्य आहे ती म्हणजे ते कोणाचे अकल्याण करणार नाही. आपल्याला सद्गुरुंच्या अस्तित्वाची जाणीव एकसारखी राहिली पाहिजे. नामस्मरणाचा तो अर्थ आहे.
मन जसजसे सूक्ष्म होत जाते तसतशी ती जाणीव सतेज होत जाते. श्री.बेलसरे यांनी कबिराच्या दोहा मधील एक ओळ " वो नाम कुछ और " पु.श्री. गोंदवलेकर महाराजांना सांगितली.
तेव्हा ते म्हणाले नाम तेच राहते त्यात बदल होत नाही घेणारा और वेगळाच होतो. सद्गुरूंचे अस्तित्व कसे असते ह्या संदर्भात श्री.बेलसरे यांनी एक हकीगत सांगितली.
एक श्री.वैद्य नावाचे गृहस्थ बेलसरे यांना भेटायला आले होते. श्री.सीतारामपंत वालावलकर हे त्यांचे गुरू. त्यांनी नुकताच देह ठेवला होता. हे वैद्य त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला गुरूंना भेटावयास जात असत. पण गुरू देहात नसले तरी त्यांच्या घरी जाऊन यावे असे त्यांना वाटले पण त्यांच्या मनात विचार आला की त्यांचा (गुरूंचा) मुलगा डॉक्टर व सून नोकरी करणारी त्यामुळे ती दोघेही कामावर गेली असणार त्यामुळे घर बंद असेल असे वाटून ते गेले नाही.
पुढे दोन दिवसांनी त्यांचे गुरुबंधू त्यांना भेटले. ते त्यांना म्हणाले की नुकतेच स्वप्न पडले स्वप्नात गुरू आले होते आणि ह्या वैद्यांचे नाव घेऊन म्हणाले वैद्य आले नाहीत मी त्यांची वाट पहात होतो. खरोखर देहापलीकडच्या अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते.
No comments:
Post a Comment