पु.श्री.अंबुराव महाराज (बाबा) व पु.श्री.गुरुदेव रानडे ह्यांच्या संदर्भातील हकीगत. सोलापूर विजापूर मार्गावर होटगी येथील स्टेशनमास्तरांच्या कडे श्रीबाबांचा मुक्काम होता. त्यांच्या बरोबर श्री.लक्ष्मणभटजी होते. नेमाच्या आधी पाय धुण्यास श्रीबाबा मोरीकडे गेले. स्टेशनमास्तरांचा मुलगा त्यांच्या पायावर पाणी घालण्यासाठी गेला.
पंधरा वीस मिनिटे झाली तरी श्रीबाबा का आले नाहीत म्हणून श्री.लक्ष्मणभटजी पहावयास गेले तर श्रीबाबा पाय धुत आहेत आणि चुळा भरत आहेत. असे पंधरा वीस मिनिटे चालले होते. पाण्याचे पिंप निम्म्यावर आले होते. मग श्रीबाबांना लक्ष्मणभटजींनी हाक मारून पाय धुणे पुरे झाले आता.
असे म्हटल्यावर श्रीबाबा भानावर आले. श्रीबाबांच्या देहाच्या सर्व क्रिया यंत्रवत चालल्या होत्या आणि वृत्ती स्वरूपी लागली होती.पु.श्री.गुरुदेव रानडे यांची पण हकीगत अशा स्वरूपाची आहे.
२ मे 1१९५७ ला सोलापूरची काही मंडळी निंबाळला गेली होती. श्री.गुरुदेव अत्यंत आजारी होते. पण तोंडावर तजेला होता. सिटिंगची (सत्संग ) वेळ झाली म्हणून घंटा वाजली. सर्वजण जमले. श्रीगुरुदेव खोलीतून बाहेर आले. चूळ भरून पाणी पिण्यास गेले. तिथे दोन पाण्याने भरलेला घागरी व घंगाळ होते.
गुरुदेव घागरी समोर बसून हाताने घागर वाकडी करून चूळ भरून पाणी तोंडात घेतले व परत घंगाळात चूळ टाकली. त्यांना त्यातील पाणी प्यायचे होते. ते पाणी प्यायचे पण पाणी पोटात न जाता चुळीच्या रूपाने बाहेर टाकावे लागत होते. असे चालूच होते. एक घागर संपली. दुसरी अर्धी झाली तरी ते पाणी घेतच होते. नंतर थांबले व म्हणाले " मी आज पाणी प्यावे अशी देवाची इच्छा नाही " तेथून उठून खोलीत निघून गेले.
No comments:
Post a Comment