*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा-- एक दिवस श्रीमहाराजांनी मला विचारले, कसे काय आहे? वास्तविक अष्टौप्रहर मी त्यांच्या संगतीत होतो; असे असूनही त्यांनी हा प्रश्न विचारला तेव्हां त्यात काहीतरी पेच असला पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे होते. पण आम्ही मूर्ख ! अज्ञान केवढे ! नोकरी होती, लोकांत मान्यता होती, मुलगा चांगला शिकत होता, तेव्हां म्हणालो, ठीक आहे. त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ठीक आहे, नाही; यापेक्षा चांगले असूच शकणार नाही असे वाटले पाहिजे. याचा अर्थ असा की आज मी ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती माझ्या कर्तृत्वाने नसून केवळ त्यांच्या कृपेमुळे आहे. माझे हित ते जाणतात. त्यामुळे सुखाने हुरळून जायचे कारण नाही आणि दुःखामुळे विषाद मानायचेही कारण नाही. आहे ती परिस्थिती परिपूर्णच आहे असे वाटले पाहिजे.*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment