*परमेश्वर..परमात्मा भाग २..*
संकलन आनंद पाटील
*एक देव सोडल्यास ह्या जगांत कोण कोणाचा आहे ? बालकास जन्म देऊन माता मरण* *पावल्यावर त्या बालकाचे संगोपन करण्याची बुद्धी देवच इतरांना देऊन त्याचे संगोपन करवीत नाहीं कां? जग* *निर्माण करून त्याचे संरक्षण करून व शेवटी त्याचा लय करणारा देव नसून दुसरे कोण आहे ?
समुद्रास मर्यादा घालून सीमा बांधून देणारा तो परमात्माच नव्हे काय ? इतर कोणाचे म्हणणे समुद्र ऐकेल ? परमात्म्याचे शासन नसते तर पृथ्वी कधीच पाण्यात विरघळून* *गेली असती नाहीं कां ? मनुष्य आपण स्वतःच कांही करू शकत नाही. त्याचे तोंड*.
*त्यालाच दिसत नाही तसेच त्याची पाठहि त्यास दिसत नाही. देहामधील व्यवहार त्यास समजत नाहीत. एखाद्या लहान दगडाची ठेच लागली तर झाड मोडून* *पडल्याप्रमाणे तो अडखळून* *खाली पडतो. अशा प्रसंगी त्याचे रक्षण करणारा कोण ? मेलेल्याच्या पापपुण्याचा* *विचार करून त्यास सद्गति किंवा दुर्गति देणार कोण ? राजाला किंवा लहानशा*
*अधिकाऱ्याला आपण भिऊन वागतो मग आपण देवास किती भिऊन वागले पाहिजे बरें? राजा* *अधिकारी यांच्यासमोर किती विनयाने वाकून, नमून आपण वागतो। मग देवासमोर किती विनयाने व नम्रतेने वागावयास पाहिजे बरें! एखाद्या सावकाराचा आपणास*
*फार मोठा आधार आहे असे आपण म्हणतो. मग देवाचा आपणास किती आधार वाटावयास हवा? आपल्यास जन्म देणाऱ्या, आपल्या जन्मास कारणीभूत असून आपले* *पालन-पोषण करणाऱ्या आपल्या* *आईवडिलांवर आपलें जेवढे प्रेम असते त्यापेक्षां परमात्म्यावर आपलें किती प्रेम असावें बरें!*
No comments:
Post a Comment