TechRepublic Blogs

Tuesday, March 5, 2024

नाभी सुगंध असता, कस्तुरी मृग फीरे जसा रांनी |

श्री.गरुदेव रानडे यांचे सोलापूरचे ज्येष्ठ साधक श्री.वामनराव कुलकर्णी हे निंबाळला श्रावण सप्ताहात महिनाभर राहिले होते. एक दिवस  संध्याकाळच्या परमार्थ बैठकीत त्यांना श्री.गुरुदेवांनी पद म्हणावयास सांगितले होते. श्री.देशपांडे यांनी कबिराचे तीन दोहे म्हटले. श्री.गुरुदेवांना ते फार आवडले. ते म्हणाले "वामनराव याचा अर्थ सांगा"  
श्री.वामनराव यांनी दोहा १चा अर्थ ज्या प्रमाणे मेंदीच्या पानांमध्ये तिचा लाल रंग लपलेला असतो तसे देवाचे रूप मनुष्य देहात गुप्त रुपात असते. 
दोहा २ चा अर्थ ज्या प्रमाणे ही मेंदी वरवंट्याने वाटल्या शिवाय त्यातील लाल रंग वर येत नाही त्याप्रमाणे जीवाला अनेक संकटातून नामस्मरण करीत पार केल्याशिवाय देवाचे रूप समोर दिसू शकत नाही. 

दोहा ३ चा अर्थ कस्तुरी मृग जसा स्वतःच्या नाभी मध्ये कस्तुरी असून सुध्दा अज्ञानामुळे त्या सुगंधाच्या ओढीने रानोमाळ भटकत राहतो त्याप्रमाणे मनुष्य देखील आपल्या देहात राम असूनसुद्धा त्याला शोधत सगळीकडे भटकत राहतो. ह्या दोह्याला अनुसरून श्री.वामनराव यांनी श्री.मोरोपंत यांची आर्या म्हणून दाखविली. 
देही देव असता, का रे फिरतोस असा रानी  |

नाभी सुगंध असता, कस्तुरी मृग फीरे जसा रांनी || ही मोरोपंतांची आर्या गुरुदेवांना फार आवडली.

No comments:

Post a Comment