TechRepublic Blogs

Sunday, March 31, 2024

Bhakti

 *मन हो रामरंगी रंगले*

*सौ. विनयाताई देसाई*

संकलन आनंद पाटील 


*भक्त, भक्ती आणि भक्तिभाव याची उकल त्याच भक्तिभावाने करून आपल्यापर्यंत* *पोहचवण्याचा प्रयत्न करते आहे. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे आहोत, पण पूर्वपुण्याईने नाम, भक्ती जाणून घेण्याचा* *प्रयत्न तरी करत आहोत. निस्सिम भक्त बनायचं असेल तर भक्त आणि त्याची भक्ती कशी हवी? यावर स्वामी स्वरुपानंद सांगतात, न होती भक्त, उच्चारुन नाम पोटी काम, क्रोध असे जरी, न होती ते भक्त, घालोनिया माळा भक्तीचा जिव्हाळा नसे जरी, स्वामी म्हणे व्यर्थ, पूजा घंटानाद भेटे ना* *गोविंद, भक्तीवीण | असे भक्तीनं सारे सूत्र हवे आणि भक्त पण खरे तळमळीचे हवेत. तरच मन रामरंगी रंगून जाईल यात शंकाच नाही.*


*भगवंताची भक्ती करणारे आपण सारे आहोत. प्रापंचिक आहोत, गुण दोषाने युक्त आहोत. आपल्यातील उणीवा,जाणिवा, गुण दोष*

*हे सगळं आपल्याला ठाऊक असतं. जसे आहोत तसे भगवंता ठाई, गुरुपायी परमेश्वर चरणी नतमस्तक होणं याचं नांव भक्ती. असे संपूर्ण शरणागत, समर्पित जगणं म्हणजे भक्तिमय होऊन जगणं. एक वेगळी समाधानाची अनुभूती जगताना यायला लागते. अशी सुंदर अवस्था रामाप्रती, नामाप्रती असलेल्या संपूर्ण श्रद्धाभाव असल्याने निर्माण होते. त्याही पुढे जाऊन जसा आपल्या अंतरंगात तो आहे तसा समोरच्यामध्ये*

*पण तोच आहे याची जाणीव असणं ही भक्तीची परिपूर्ण अवस्था.*


*भक्ती म्हणजे आतून होणारी प्रगती. आंतरीक इच्छा, प्रेरणा,वाटचाल आपल्या ध्येयप्राप्तीसाठी होत असेल तर तीच भक्ती. आपलं ध्येय साध्य काय करायचंय हे निश्चित समजलं की जी निश्चित निर्भय अवस्था प्राप्त होते ती भक्ती. भक्तीमधील शक्ती म्हणजे निर्भयता. सतत शंका, भय, अस्वस्थता म्हणजे भक्तीमय अवस्थेला आपण पूर्णपणे पोहोचलो नाही हे ज्याचे त्याने लक्षात घ्यायला हवे. भक्त आपल्या भक्तीभावाने इतका रममाण होऊन गेला पाहिजे की क्षुल्ल्लक मान,अपमान, जीवनातले चढउतार, बरेवाईट प्रसंग या बाबींचा परिणाम*

*रोजच्या जीवनावर व्हायला नको. अशी समतोल अवस्था प्राप्त झाली की ती भक्तीमय अवस्था, गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंताने सुंदर रितीने समजावले आहे. तसा भक्त होण्याचा प्रयत्न करू या. संकलन आनंद पाटील*

भाग्यवान

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*सर्व काही दिले मजला सुख संसारात*

*काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।*


*मोह माया दूर गेली मनी नाही लोभ*

*हाच तुझ्या सेवेमधला मिळाला रे लाभ*

*आणि जपू लागलो मी नाम अंतरात।।*

*काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।*


*धन संपत्तीची मजला आस नाही आता*

*दर्शन मिळाले तुमचे हेच सर्व काही*

*जपमाळ जपली नित्य माझिया उरात।।*

*काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।*


*नित्य सेवा तुमची घडते आम्ही भाग्यवान*

*जायचे न कुठे आता देई वरदान*

*रूप तुझे राहो माझ्या नित्य ह्रदयात*

*काय गुरूराया मागू तुझ्या मंदिरात।।*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

गृहस्थाश्रम

 श्रीमहाराजांचे प्रमुख अधिकारी शिष्य

पू. श्री तात्यासाहेब केतकर


तात्यासाहेबांचे चरित्र थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यासाहेब विद्वान नसून विद्वानांना वंद्य होते, संपत्ती नसून श्रीमंत होते, पुढारी नसून मार्गदर्शक होते, महंत नसून विरक्त होते, संन्यासी नसून निष्काम होते आणि योगादिकांचा अभ्यास न करताही केवळ शरणागत होऊन सद्गुरूंशी एकरूप झाले होते. व्यवहाराच्या दृष्टीने ते प्रपंचात राहिलेले दिसले, परंतु नाममात्र व्यवहाराचे पांघरूण घेऊन आपल्या आचाराने, विचाराने व उच्चाराने त्यांनी अक्षरश: हजारो प्रापंचिकांना नामाला लावले. श्रीतात्यासाहेबांनी आपला गृहस्थाश्रम वेदान्ताच्या आचरणाला शोभेल अशा आदर्श पद्धतीनें चालवला. श्रीसद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याचा प्रपंचच कसें परमार्थाचें रूप घेतो याचें हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.


तात्यासाहेबांचा जन्म २२ जानेवारी १८८५ रोजी माघ शुद्ध सप्तमीस (रथसप्तमी) झाला. शालेय शिक्षण गदगला व पुढे बडोद्यास झाले. तात्यासाहेबांचे वडील श्री. भाऊसाहेब केतकर हे निवृत्त झाल्यावर श्रींच्या सांगण्यावरून १९०३ साली सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. शिक्षण आटोपते घेऊन तेही गोंदवल्यास श्री. भाऊसाहेबांपाशी येऊन राहिले. ते प्रथम गोंदवल्यास आले तेव्हा श्रीमहाराजांचे दर्शन होताच त्यांना जो आनंद वाटला त्याचा पूर्ण व कायमचा ठसा त्यांच्या अंत:करणावर उमटला. गोंदवल्यास येऊन राहिल्यावर तात्यासाहेबांचे लग्न श्री. गोखले यांच्या मुलीशी श्रींच्या पसंतीने ठरले. ९ मार्च १९०४ रोजी आधी ठरलेल्या गोरजमुहूर्ताऐवजी अकल्पित रीतीने रात्री १२ च्या सुमारास श्रींनी मोठ्या कौतुकाने लग्न लावून दिले. श्रींनी तात्यासाहेब व त्यांच्या पत्नीकडून तेरा कोटी जपाचा संकल्प सोडवला. मिलिटरी अकाउंटसच्या ऑॅफिसमध्ये ३१ वर्षे नोकरी करून १९४८ साली पेन्शन घेऊन ते निवृत्त झाले.


तात्यासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत व प्रसन्न असे. त्यांना पाहिल्याबरोबरच लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटे. त्यांचा वेश अगदी साधा असे. सर्वांनी चारचौघांसारखे वागावे, चौफेर ज्ञान प्राप्त करावे, खेळात प्राविण्य मिळवावे, कलेत प्रगती करावी, सर्व गोष्टींमध्ये रस घ्यावा असे त्यांना मनापासून वाटे. ते स्वत: स्वच्छतेचे, टापटिपीचे व शिस्तीचे भोक्ते होते, पण त्यांनी कशाचाही अतिरेक केला नाही. प्रपंच टाकून व्यवहाराच्या विरुद्ध वागणे त्यांना आवडत नसे. व्यक्ती लहान असो की मोठी असो, स्त्री असो की पुरुष असो, तात्यासाहेब प्रत्येकाला मान व महत्त्व देऊन वागत. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना श्रींच्या सत्तेने घडते अशी त्यांची बालंबाल खात्री असल्याने अमुक व्हावे, अमुक होऊ नये, हा आग्रह त्यांनी कधीच ठेवला नाही. खरोखर त्यांची वृत्ती एखाद्या लहान मुलासारखी निरागस होती. आईच्या खांद्यावर बसलेले मूल विनाकष्ट प्रवास करते त्याप्रमाणे श्रींच्या भरवशावर त्यांनी आपले सबंध जीवन घालवले.


श्रीमहाराजांनी १९१३ साली देह ठेवल्यावर १९२५ साली तात्यासाहेबांच्या ठिकाणी श्रींचा आविष्कार होऊ लागला. श्रीच त्यांच्या मुखातून बोलत आहेत अशी प्रथम जवळच्या नातेवाईकांची खात्री झाली. बोलणे संपल्यावर या बरं बाळ! असे म्हणून तात्यासाहेब डोळे मिटीत व श्रींच्या समोरच्या फोटोपुढे डोके टेकून नंतर उठत. अनेकांना त्यांच्या अडीअडचणीतून मार्ग सुचवून नामस्मरणाचा खात्रीचा व सर्वांना सहज साधेल असा उपाय सुलभ रीतीने पटवून देऊन त्यांच्या मनाचे समाधान करणे, हे कार्य त्यांचेकरवी घडले. तात्यासाहेबांचा मीपणा पूर्णपणे विरून गेला. परमार्थात प्रपंच किंवा व्यवहार हा खरा अडथळा नसून आपल्या मीपणाचाच खरा अडथळा आहे असे त्यांना वाटे. तात्यासाहेब आता सर्वस्वी श्रींसाठीच उरले. त्यांच्या वागण्यात मूर्तिमंत अमानित्व दिसत असे. प्रपंचात अत्यंत अनासक्त वृत्तीने ते राहू लागले. आपल्या घरात पाहुण्यासारखे राहावे अशी श्रींची सूचना तात्यासाहेबांनी तंतोतंत पाळली.


श्रीमहाराजांच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित होऊन राहिलेले तात्यासाहेब वयाच्या ८३व्या वर्षी ३एप्रिल १९६७ रोजी हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेटच्या ऑॅपरेशननंतर काही दिवसांनी श्रींच्या चरणी विलीन झाले.

Saturday, March 30, 2024

परमात्मा

 *परमेश्वर..परमात्मा भाग २..*

संकलन आनंद पाटील 

*एक देव सोडल्यास ह्या जगांत कोण कोणाचा आहे ? बालकास जन्म देऊन माता मरण* *पावल्यावर त्या बालकाचे संगोपन करण्याची बुद्धी देवच इतरांना देऊन त्याचे संगोपन करवीत नाहीं कां? जग* *निर्माण करून त्याचे संरक्षण करून व शेवटी त्याचा लय करणारा देव नसून दुसरे कोण आहे ?

 समुद्रास मर्यादा घालून सीमा बांधून देणारा तो परमात्माच नव्हे काय ? इतर कोणाचे म्हणणे समुद्र ऐकेल ? परमात्म्याचे शासन नसते तर पृथ्वी कधीच पाण्यात विरघळून* *गेली असती नाहीं कां ? मनुष्य आपण स्वतःच कांही करू शकत नाही. त्याचे तोंड*.

*त्यालाच दिसत नाही तसेच त्याची पाठहि त्यास दिसत नाही. देहामधील व्यवहार त्यास समजत नाहीत. एखाद्या लहान दगडाची ठेच लागली तर झाड मोडून* *पडल्याप्रमाणे तो अडखळून* *खाली पडतो. अशा प्रसंगी त्याचे रक्षण करणारा कोण ? मेलेल्याच्या पापपुण्याचा* *विचार करून त्यास सद्गति किंवा दुर्गति देणार कोण ? राजाला किंवा लहानशा* 

*अधिकाऱ्याला आपण भिऊन वागतो मग आपण देवास किती भिऊन वागले पाहिजे बरें? राजा* *अधिकारी यांच्यासमोर किती विनयाने वाकून, नमून आपण वागतो। मग देवासमोर किती विनयाने व नम्रतेने वागावयास पाहिजे बरें! एखाद्या सावकाराचा आपणास*

 *फार मोठा आधार आहे असे आपण म्हणतो. मग देवाचा आपणास किती आधार वाटावयास हवा? आपल्यास जन्म देणाऱ्या, आपल्या जन्मास कारणीभूत असून आपले* *पालन-पोषण करणाऱ्या आपल्या* *आईवडिलांवर आपलें जेवढे प्रेम असते त्यापेक्षां परमात्म्यावर आपलें किती प्रेम असावें बरें!*

श्रीराम समर्थ

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा-- एक दिवस श्रीमहाराजांनी मला विचारले, कसे काय आहे? वास्तविक अष्टौप्रहर मी त्यांच्या संगतीत होतो; असे असूनही त्यांनी हा प्रश्न विचारला तेव्हां त्यात काहीतरी पेच असला पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे होते. पण आम्ही मूर्ख ! अज्ञान केवढे ! नोकरी होती, लोकांत मान्यता होती, मुलगा चांगला शिकत होता, तेव्हां म्हणालो, ठीक आहे. त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ठीक आहे, नाही; यापेक्षा चांगले असूच शकणार नाही असे वाटले पाहिजे. याचा अर्थ असा की आज मी ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती माझ्या कर्तृत्वाने नसून केवळ त्यांच्या कृपेमुळे आहे. माझे हित ते जाणतात. त्यामुळे सुखाने हुरळून जायचे कारण नाही आणि दुःखामुळे विषाद मानायचेही कारण नाही. आहे ती परिस्थिती परिपूर्णच आहे असे वाटले पाहिजे.*


*-- अध्यात्म संवाद*

Friday, March 29, 2024

चिंतन

 चिंतन 

              श्रीराम,

           आपले मन जर निःस्वार्थी असेल, समाधानी असेल तर आपल्याला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही किंवा दुसऱ्याचे सुख बघून आपल्याला कधीच दुःख होणार नाही. दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणे ही गोष्ट निरोगी मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. ज्यांचे चित्त प्रसन्न असते त्यांचे मन शांत असते. इतरांबरोबर त्यांना छान जुळवून घेता येते. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते त्यांचे ठरलेले असते. त्यांच्या मनावर त्यांचा पूर्ण ताबा असतो. तसेच जीवनातले ताण - तणाव, काळजी सहन करण्याची त्यांची क्षमता असते. हे सर्व गुण आत्मसात करायचे असतील तर ईश्वरापाशी शरणागती असावी लागते. हे आणि असेच अनेक सत्वगुणांचे स्वभाव विशेष माझ्या मध्ये आहेत का? ह्याचे आत्मपरीक्षण वेळोवेळी करावे लागते.

              मन शुद्ध आणि प्रसन्न ठेवायचे असेल तर पहाटे उठून निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे. सकाळच्या फ्रेश हवेत ईश्वराच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा...

                        ||श्रीराम ||

Thursday, March 28, 2024

नामप्रभात

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


       *आपण औषध घेत आहोत , पण ते पोटात जाऊ देत नाही . भजन , पूजन , नामस्मरण आपण करतो , पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही . चुकून जेवढे औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो. म्हणूनच केव्हातरी पुष्कळ साधना करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने , ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी , जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते . मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे . पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल , पण सवयीने ते तोंडात बसेल व याच स्मरणाचा पुढे ध्यास लागेल .*

     *🪷श्रीमहाराज 🪷*

Wednesday, March 27, 2024

स्वाभिमानी बाबा

 बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या  ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व  मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो.

त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं, म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला  कोणते तरी तेल लावले होते. त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने, हाताचे ठसे भिंतीवर उमटले. ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो "बाबा, भिंतीला हात न लावता चाला ना जरा. तुमचे हात लागून त्या किती घाण होतात !" 

माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटलं.

 ऐंशी वर्षाचे बाबा, एखादा लहान मुलगा चूक झाली असता जसा चेहरा करतो तसा करुन मान खाली घालून गप्प बसले.

छे! 'हे मी काय केले! मी असं नको म्हणायचं होतं असं वाटायला लागलं 

माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्यानी भिंतीला धरुन चालणं सोडून दिले.

पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले. त्यानी अंथरुनच धरले. पुढे दोन दिवसांनी त्यांनी इहलोक यात्रा संपविली.

भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्या सारखं वाटत राही.

दिवस ऊलटत राहिले. माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावे असे वाटू लागले. पेंटर आले सुद्धा. माझा मुलगा "जितूला आजोबा म्हणजे प्राण प्रिय. भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगविण्याचा हट्टच धरला त्याने.

शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले,  सर, काही काळजी करू नका.  त्या ठशाच्या भोवती गोल करून छान डिजाईन काढून देतो. तुम्हालाही ते आवडेल. शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही. 

पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिजाईन करून दिले.

पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणार्‍या पाहुणे, मित्रमंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले.

 आता पुढे जेव्हां भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हां त्या हाताच्या ठशाभोवतीचे डिजाईन बनविले जाऊ लागले.

सुरुवातीला मुलाच्या हट्टा पायी हे करत राहिलो तरी आमचंही समाधान  होई.

                          2 

दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहचलो. बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो. मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वाटू लागलं व मला आठवू लागलं, किती चिडून बोललो होतो बाबांना!   

म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो.

त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचे जाणवलं". 

अहो बाबा! बाहेर येताना भिंतीला धरून यायचं? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला ! " मुलाचे वाक्य कानावर पडले.

मी  जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता. जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी  ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले.आपोआप डोळ्यात पाणी साचले. तेवढ्यात आठ वर्षाची नात धावत आली.

आजोबा, आजोबा!  तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधील सोफ्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉईंगबुक दाखवत, आजोबा! आज क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईझ मिळालं असे म्हणाली.

हो का? अरे व्वा! दाखव बघू कोणतं ड्रॉईंग आहे? म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखविलं. भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती.

आणि म्हणाली, टीचरनी हे काय आहे म्हणून विचारले. 

मी सांगितले  माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय.

टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना भिंतीभर रेघोट्या, हातापायाचे चित्र काढत राहतात. मुलांच्या आईबाबाना त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण वयस्कर आई वडील, आजी आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे. त्यानी व्हेरी गुड श्रिया असे म्हणून माझे कौतुक केले.

श्रिया (आमची नात ) गोड गोड बोलत राहिली  तेव्हां माझ्या नाती पुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं.

मी माझ्या रूममध्ये आलो. दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन "मला क्षमा करा बाबा" असे म्हणत मन हलकं होई वरचेवर रडत बाबांची क्षमा मागत राहिलो ...... !


 *आई-बाबांना जपा एक दिवस आपण ही त्यांच्या जागी असणार आहोत* 🙏

अखंड नाम*

 श्रीराम समर्थ


               *अखंड नाम*


          जबलपूरच्या जवळ भेडाघाटावर एक महात्मा पडलेले असत. एकदा हृषिकेशचे महामंडलेश्वर स्वामी चैतन्यगिरि स्नान करण्यास नर्मदेकडे निघाले. तेव्हां हा तरुण साधु वाटेत पडलेला त्यांना आढळला. स्वामी त्याला म्हणाले *'अरे महात्मा ! तूं घरदार सोडून साधु झालास आणि नुसते भजनसुद्धा करीत नाहीस, स्वस्थ पडला आहेस !'* स्वामींचें बोलणें ऐकून त्या साधूनें डोळे उघडून किंचित स्मित केलें. त्यानें स्वामींना जवळ बोलावलें आणि आपला हात त्यांच्या कानावर ठेवण्यास सांगितलें. स्वामींनीं त्याचा हात आपल्या कानावर ठेवला. तेव्हां *त्यांच्या हातातून भगवंताचें नाम अखंड चाललेलें स्वामींना ऐकूं आलें.* नंतर त्या साधूनें आपलें डोकें, आपली छाती, आपले पाय यावर स्वामींचे कान ठेववले. *त्याच्या प्रतेक अवयवातून भगवंताच्या नामाचा स्पष्ट ध्वनि स्वामींना ऐकूं आला.* चैतन्यगिरिस्वामी तर चकित होऊन गेले. *हा कांहीं चमत्कार नाही. भगवंताच्या एकाच नामाचा चिकाटीनें अभ्यास केला तर शरीरातील पेशी तें नाम शोषून घेतात. मग त्या नामाची स्पंदनें शरीराच्या अवयवांमधून उमटतात.*


               ---------- *प्रा के वि बेलसरे*


               **********

संदर्भ: *साधकांसाठी संतकथा हें त्यांचेच पुस्तक पान ५६/५७*

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

Monday, March 25, 2024

परिणाम

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*संतांच्या  संगतीचा  परिणाम .*


जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत्‌ होते. त्याचप्रमाणे सत्पुरूषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते, आणि पुनः तो सत्पुरूष स्वतः शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही; म्हणजेच, नुसते विषय बाधक होत नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही, त्यांपासून परावृत्त करतो, तो संत. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संतसंगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत्प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार; पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजनपूजन करणार्‍यांची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठायी भगवद्‌भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकारामबुवा नुसते 'विठठ्‌ल विठठ्‌ल' म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संताना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना ? मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण 'सर्व ठिकाणी मीच आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आईपण जसे सगळीकडे सारखे, त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो; पण त्यांचे करणे निःसंशय असते, तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळयांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात; त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ, हितकारक असते; तसे आपण बोलावे.


*९६ .   आपली  भूमिका  थोडी  तयार  असल्यास  सत्संगतीचा  परिणाम  होण्यास  वेळ  लागत  नाही .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

संत

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩* 



*संत  कसे  असतात  ?*


आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो, तोच खरा गुरू. सदगुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही.


मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामार्‍या, सज्जनांचा छळ, संकटे, यांचे संतांना वाईट वाटत नाही. 'वाईट वाटत नाही' याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार, तशा जगात या घडामोडी होणारच, जगाची रहाटीच अशी आहे, हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना, मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही, तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे, तर त्याचा प्रयत्‍नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो.


विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत 'शोधण्याची' मुळीच जरूरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे; तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते; म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही; ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात, त्याचे आपण थोडेतरी पालन करू या.


*९५ .   संत  हा  जसे  बोलतो  तसे  वागतो‌ .  आपण  बोलतो  चांगले  आणि  वागतो  मात्र‌  त्याच्या  उलट .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, March 22, 2024

हकीगत

 पु.श्री.अंबुराव महाराज (बाबा) व पु.श्री.गुरुदेव रानडे ह्यांच्या संदर्भातील हकीगत. सोलापूर विजापूर मार्गावर होटगी येथील स्टेशनमास्तरांच्या कडे श्रीबाबांचा मुक्काम होता. त्यांच्या बरोबर श्री.लक्ष्मणभटजी होते. नेमाच्या आधी पाय धुण्यास श्रीबाबा मोरीकडे गेले. स्टेशनमास्तरांचा मुलगा त्यांच्या पायावर पाणी घालण्यासाठी गेला.

 पंधरा वीस मिनिटे झाली तरी श्रीबाबा का आले नाहीत म्हणून श्री.लक्ष्मणभटजी पहावयास गेले तर श्रीबाबा पाय धुत आहेत आणि चुळा भरत आहेत. असे पंधरा वीस मिनिटे चालले होते. पाण्याचे पिंप निम्म्यावर आले होते. मग श्रीबाबांना लक्ष्मणभटजींनी हाक मारून पाय धुणे पुरे झाले आता.

 असे म्हटल्यावर श्रीबाबा भानावर आले. श्रीबाबांच्या देहाच्या सर्व क्रिया यंत्रवत चालल्या होत्या आणि वृत्ती स्वरूपी लागली होती.पु.श्री.गुरुदेव रानडे यांची पण हकीगत अशा स्वरूपाची आहे.

 २ मे 1१९५७ ला सोलापूरची काही मंडळी निंबाळला गेली होती. श्री.गुरुदेव अत्यंत आजारी होते. पण तोंडावर तजेला होता. सिटिंगची (सत्संग ) वेळ झाली म्हणून घंटा वाजली. सर्वजण जमले. श्रीगुरुदेव खोलीतून बाहेर आले. चूळ भरून पाणी पिण्यास गेले. तिथे दोन पाण्याने भरलेला घागरी व घंगाळ होते. 

गुरुदेव घागरी समोर बसून हाताने घागर वाकडी करून चूळ भरून पाणी तोंडात घेतले व परत घंगाळात चूळ टाकली. त्यांना त्यातील  पाणी प्यायचे होते. ते पाणी प्यायचे पण पाणी पोटात न जाता चुळीच्या रूपाने बाहेर टाकावे लागत होते. असे चालूच होते. एक घागर संपली. दुसरी अर्धी झाली तरी ते पाणी घेतच होते. नंतर थांबले व म्हणाले " मी आज पाणी प्यावे अशी देवाची इच्छा नाही " तेथून उठून खोलीत निघून गेले.

Thursday, March 21, 2024

ज्ञानविज्ञानयोग

 *॥श्रीहरिः॥*


विविध देव-देवतांची उपासना करणार्‍या सकाम भक्ताविषयी भगवंत सांगतात.. 


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*यो यो यां यां तनुं भक्तः* 

*श्रद्धयार्चितुमिच्छति ।*

*तस्य तस्याचलां श्रद्धां* 

*तामेव विदधाम्यहम् ॥*

*॥७.२१॥*


*स तया श्रद्धया युक्तस्-*

*-तस्याराधनमीहते ।*

*लभते च ततः कामान्*

*मयैव विहितान्हि तान् ॥*


*भावार्थ:- जो जो सकामी भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करितो त्या त्या भक्ताची मी त्याच देवतेच्या ठिकाणी अद्धा स्थिर करतो.*


*अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करत असतो.*


*-----------------------------*



*भगवान श्रीकृष्ण सांगतात,*


जो मनुष्य ज्या देवतेला ईश्वरस्वरूप मानून पूजा करतो, त्याच देवासाठी मी त्याच्यामध्ये श्रद्धा स्थापित करतो. ज्यामुळे तो अधिक भ्रमित होऊ नये. मग त्या देवतांच्या माध्यमातून, मी त्याच्या इच्छित कामना पूर्ण करतो. 


*भक्त* ज्या रूपाची आराधना करतात त्या रूपातच भगवान त्यांची श्रद्धा दृढ करतात. ही श्रद्धा टिकवण्यामागे भगवंतांचा हेतू मनुष्याला सश्रद्ध करण्याचा असतो. मनुष्यामधे अनेक रस मुळातच असतात.भक्तिरस हा मात्र निर्माणच व्हावा लागतो.तो अंत:प्रेरणेनं निर्माण होतो. ईश्वरानंच तशी व्यवस्था केली आहे.तो कोणत्याही कारणानं निर्माण झाला तर सर्वप्रथम तो स्थिर करावा लागतो - मग श्रद्धा कुठे का बसेना! 


*मनुष्याचं क्षुद्रत्व नष्ट व्हावं आणि त्याचा अध्यात्ममार्गावर प्रवास प्रारंभित व्हावा हाही हेतू त्यामागे असतो.*



*भगवंत म्हणतात,*

वास्तवात भक्ताला फळ मीच देतो. परंतु तो मला जाणत नसल्याने त्याला वाटतं, अमुक देव प्रसन्न झाल्याने मला फळ मिळालं. त्यामुळे तो श्रद्धापूर्वक त्यांची पूजा करतो.


*जसं,*

एका घरात पाण्याचा सोर्स म्हणजे छतावर असणारी पाण्याची टाकी आहे आणि घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या बाथरूममध्ये अंघोळ करत असतात. तेव्हा एका नळातून अचानक पाणी यायचं बंद होतं. त्यावेळी तिथला मनुष्य ओरडतो, 


'माझ्या नळातून पाणी येत नाहीये..' 


त्याचवेळी दुसरा मोठ्या आवाजात म्हणतो, 


'पण माझ्या नळातून तर येतंय...' 


आता ज्याच्या नळातून पाणी येत नाही तो नळालाच दोष देऊ लागतो. 


'या नळामध्येच काहीतरी बिघाड आहे. उद्या दुसऱ्या बाथरूममध्ये अंघोळ करेन. तिथला नळ तर चांगला आहे.' 


प्रत्यक्षात अडथळा तर वर पाण्याच्या टाकीमध्येच असतो. मात्र लोकांना फळ मिळतं त्यावेळी त्यांना वाटतं, की आपल्या आराध्य देवानेच ते दिलं, प्रत्यक्षात फळ ईश्वराकडून व्हाया (via) देवतेकडून येतं.


*मनुष्य* जेव्हा अंतःकरणापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो, तेव्हा ती ईश्वरापर्यंत पोहोचते आणि पूर्णदेखील होते. ईश्वराची हीच इच्छा असते, की कमीत कमी या देवतांच्या मूर्तीच्या माध्यमातून तरी मनुष्यामध्ये श्रद्धा, प्रेम, भक्ती, विश्वास जागृत होऊन तो समर्पित व्हावा. परंतु अज्ञानी मनुष्याला असं वाटतं, की तो ज्या ईश्वराच्या मूर्तीची पूजा करतो, त्याच ईश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आहे.वास्तविक ईश्वर किंवा परमात्मा हा एकच असून ईश्वराच्या विविध मूर्ती हा त्या सत्याकडे केला गेलेला केवळ संकेत आहे, मात्र या गोष्टीपासून तो अनभिज्ञ राहतो.


*मनुष्याने* एखाद्या देवतेकडे काही याचना केली आणि त्याची ती इच्छा पूर्ण झाली नाही तर तो दुसऱ्या देवतेला शरण जाण्यासाठी तयार होतो. काही लोक असेही असतात जे म्हणतात, 


'अरे! तुझं ते काम झालं नाही का? मग अमुक मंदिर ट्राय कर... अमुक देवीच्या दरबारात जाऊन ये...' असे सल्ले देतात! 


लोकांकडे देवी-देवतांची इतकी भलीमोठी यादी असते, की प्रत्येक दिवशी त्यांना वेगवेगळ्या देवाची पूजा करता येईल. कारण ते देवतांनाच ईश्वर मानतात. जितक्या देवता तितके ईश्वर! वास्तविक यालाच अज्ञान म्हणतात.


*तसं* बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ईश्वराच कार्य करत असतो.भक्तामध्ये प्रार्थनेची अवस्था जागृत करणारा, त्याच्यात श्रद्धा स्थापित करणारा- देखील ईश्वरच आहे. तसंच त्याची प्रार्थना पूर्ण करणारा किंवा न करणारादेखील तोच एकमेव आहे. 


*जसजशी* उपासना, साधना वाढत जाते. ईश्वराविषयीची समज वृद्धिंगत होत जाते तसतसा त्याच्याविषयीचा प्रेमभाव, श्रद्धाभाव वाढीला लागतो आणि त्या श्रद्धेची फळं त्यांना त्या त्या देवतांच्या रूपानं परमेश्वरच देतो. 


*सारांश:-*

*जशी ज्याची श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते. देवता कोणतीही असो फळ देणारा परमेश्वरच असतो.* 



श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Monday, March 18, 2024

चष्मा

 एक चष्मा -- मनासाठी 


सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांचा "वेलकम होम" हा सिनेमा पाहत होते. तसा आधीही खूप वेळा बघितला होता. पण अतिशय संयत अभिनय, नैसर्गिक घरगुती वातावरण (अगदी रात्री उशिरा पर्यंत आई एकटीच, स्वयंपाकघरात वाल सोलत बसली आहे, किंवा हॉल मध्ये खाली गाद्या टाकून मंडळी झोपली आहेत, हे घराघरात दिसणारं चित्र) आणि परिपक्व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी - एवढ्या गोष्टी मला पुरतात. यात कोणीही खलनायक नाही, मारामारी नाही, मेलोड्रामा नाही! 


या सिनेमात शेवटची पाच मिनिटं, सुबोध भावे आहे. आणि त्याच्या संवादांसाठी मी हा सिनेमा पुन्हा पाहिला. संवाद लेखक - अर्थातच भावे आणि सुखठणकर. 


नवऱ्याला सोडून, आपली मुलगी आणि सासू यांना घेऊन, माहेरी परत आलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला, अमेरिकेत राहणारा हा भाऊ आश्वस्त करतो आहे की तुला या निर्णयाने बरं वाटणार आहे ना? मग झालं तर! तो तिला म्हणतो, 

" जेमतेम शंभर वर्षाचं आयुष्य. त्यातली पन्नास वर्ष झोपेत जातात. राहिलेली पंचवीस वर्ष झगडण्यात गेली तर मग आनंदासाठी कधी जगायचं? "  

मला हे खूपच पटलं आणि आवडलं. आलेल्या परिस्थितीवर किंवा अडचणींवर मात करून, मार्ग काढून आनंदाने जगणं हे आपल्याच हातात असतं. 

वयोमानानुसार डोळ्याला चष्मा लागतो, कानाला मशीन लागतं, knee caps, heart problems -- सगळ्या अवयवांची डागडुजी केली जाते. पण मनाची डागडुजी करतो का आपण? मानसिक आजार असणाऱ्यांबद्दल मी बोलत नाहीये. त्यांच्यासाठी व्यावसायिक सेवा उपलब्ध आहेत. सर्वसामान्य माणूस असा शोध घेतो का? 


खरं तर प्रत्येकाने, मनालाही एक चष्मा लावावा आणि आपणच आपल्याला लख्ख पाहावं. 


कुरकुऱ्या, दुख्खी, मख्ख, आक्रस्ताळा, हटवादी, घुम्या, दुसऱ्याला लागेल असं बोलणारा, मनमानी कारभार करणारा, दुसऱ्याची अजिबात सोय न पाहणारा, आत्मकेंद्री, अप्पलपोटा  -- काय दिसतंय मनाच्या चष्म्यातून ? स्वतःशी खरं बोला आणि ठरवा.


स्वतः आनंदाने जगणं आणि आनंद पसरवणं - दोन्ही यायला हवं. नाहीतर माझा मी आनंदी राहतो, तुम्ही बसा बोंबलत! असं नको व्हायला. 


या सिनेमात दीपा लागू म्हणतात, " आपल्याला तरी एकमेकांकडून काय हवं असतं? थोडीशी "समजूत",  दुसरं काय?"

किती खरं आहे हे. निदान कुटुंबातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यावं, नाहीतर त्यांना "आपलं" का म्हणावं? बघा चष्म्यातून, आपण समजून घेतो आहोत का ते. नाहीतर एका घरात राहूनही आपण परकेच की!

Sunday, March 17, 2024

श्रीहरिः

 *॥श्रीहरिः॥*


हे सर्व विश्व आत्मस्वरूप वासुदेव असले, तर तसे ज्ञान अन्य देवतांच्या उपासनेने का होत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात,


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना:* 

*प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।*

*तं तं नियममास्थाय* 

*प्रकृत्या नियताः स्वया ॥*

*॥७.२०॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२०) 


*भावार्थ:- आणि हे अर्जुना ! ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहेत, ते अन्य देव-देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात.


*अर्थार्थी आणि आर्त* भक्त हे कोणत्या ना कोणत्या कामनेच्या पूर्ततेसाठी ईश्वराची भक्ती करतात, हे आपण या पूर्वीही वाचलं आहे. आपल्या इच्छा किंवा दुःखांमध्येच ते इतके मग्न असतात, की खऱ्या ज्ञानाकडे त्यांचं लक्षही जात नाही. सर्वत्र वासुदेवच भरून आहे, हे जग वासुदेवमय आहे हे जाणूनही लोक अन्य *'देवदेवतांची'* पूजा करताना दिसतात. 


*कुणी* सोमवारी शंकराला जातात; तर कुणी मंगळवारी देवीचं किंवा गणपतीचं दर्शन घेतो. कुणी दत्तांचा उपासक असतो तर कुणी मारुतीरायाचा भक्त असतो.लोक ही अशी दर दिवशी वेगवेगळ्या देवतांची पूजा कशासाठी करतात? 



*याचं उत्तर देताना भगवंत सांगतात की,* 


"प्रत्येकजण जन्मत:च प्रकृतीबरोबर आपला स्वभाव घेऊन येतो. प्रकृतीनुसार त्याला इच्छा-आकांक्षा होतात.त्या इच्छा-आकांक्षा पूर्ती करण्यासाठी हे लोक त्या त्या देवतांची नियमानुसार पूजा करतात." 



*ज्यांना* बुद्धी हवी असेल ते गणपतीची भक्ती करतात.ज्यांना धनधान्य हवं असतं ते लक्ष्मीची पूजा करतात. संगीतामध्ये यश मिळवण्यासाठी सरस्वती देवीची आराधना करतात. बलोपासना करणारे मारुतीची भक्ती करतात. अध्यात्म क्षेत्रातले दत्तात्रयांची उपासना करतात. एखादी मागणी ताबडतोब पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर भोळासांब शंकर तयार आहेच,लग्न होत नसेल तर गौरीला (पार्वतीला) शरण जा,अडचणींनी घेरलेले असाल तर नक्कीच शनी देवाचा प्रकोप तर कोणी बुवा- महाराजांना शरण जातात.


*वेगवेगळ्या विभागांचे* जसे वेगवेगळे मंत्री असतात, त्याचप्रमाणे विविध कामनापूर्तीसाठी निरनिराळ्या देवी- देवता कल्पिल्या गेल्या आहेत. शिवाय त्या सर्वांच्या वेगवेगळ्या पूजा पद्धती आणि नियमदेखील बनवले गेले. ज्याचा जसा स्वभाव, ज्याची जशी आवश्यकता, तसा तो त्या विभागाच्या देवाला शरण जातो.



*परमेश्वर* हा केवळ मोक्षदाता आहे, संसारात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू किंवा इच्छा आहेत त्या त्या वस्तू किंवा इच्छांची पूर्ती करण्याची शक्ती देवतांमधेच असते, म्हणून देवतांचीच उपासना केली पाहिजे, अशी सामान्य जनांची समजूत असते. तथाकथित आध्यात्मिक पुरुष केवळ देवतांचीच नव्हे; तर एखाद्या बुवा - महाराजांचीही उपासना करायला सांगतात. पुष्कळ जण स्वतःचीही पूजा करून घेतात!


 

*श्रद्धेनुरूप किंवा परंपरेनुरूप* 

जे श्रद्धास्थान असतं त्याची उपासना अशा रीतीनं केली जाते. मग त्या त्या देवतांच्या उपासनेसंबंधी जे जे नियम असतात ते पाळले जातात. कुणी त्या देवतेचा जप करतो, कुणी पोथी वाचतो तर कुणी प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प करतो.कुणी कोटी बिल्वपत्र, लक्ष तुलसीपत्र वाहण्याचा संकल्प करतो तर कुणी प्रतिदिनी दर्शनविधी करतो. कुणी उपास-तापासानं देह झिजवतो तर कुणी कडक व्रताचरण करतो.


*अशातऱ्हेनं* जे लोक (केवळ स्वार्थासाठी) भक्ती करतात ते आर्त अथवा अगतिक किंवा अर्थार्थी असतात. त्यांना परमतत्त्वाशी काही घेणं-देणं नसतं.कर्मशुचितेशी काही कर्तव्य नसतं. आपला भौतिक उत्कर्ष कसा होईल आणि आपले सांसारिक प्रश्न कसे मिटतील, मन:शांती कशी मिळेल एवढ्यापुरतंच त्यांचं अध्यात्म असतं.


*एक सत्य हकीगत आहे.* 

एका मंत्र्याचा स्वीय सहाय्यक एका कंपनीत नोकरी करायचा. रोज कंपनीत जाऊन तो मस्टरवर सही ठोकून यायचा. कधी कधी दोन-तीन दिवसाच्या सह्याही एकदाच करून यायचा. कारण पेन्शन वगैरेसाठी ते करणं आवश्यक असायचं. त्याला कुणी बोलत नसे; कारण मंत्र्याचा पी.ए.! 


*पण* दत्तजयंतीच्या आधी नऊ दिवस अगदी न चुकता पोथीचं पारायण मात्र करायचा! म्हणजे कामचुकारपणा करायचा आणि पुण्य मिळवल्याच्या भ्रामक आनंदात रहायचं - धार्मिक म्हणून मिरवायचं! अशी भक्ती फलद्रूप होईल का? 


*प्राप्त, नियत कर्म* टाळायचं आणि पगार मात्र फुकटात पदरात पाडून घ्यायचा. वर गुरुचरित्राचं पारायण करून धार्मिक म्हणून मिरवायचं आणि असल्या विचारहीन कर्मकांडातून पुण्याची अपेक्षा बाळगायची! यातला खोटेपणा, कामचुकारपणा परमेश्वराला कळत नाही का? 



*हृदयात बसून जीवाचा हेतू आणि कर्माची नोंद तो करत असतो. पण अडाणी उपासकाला मात्र त्याचा पत्ताच नसतो! मेल्यावर त्याला केलेल्या कुकर्माची जाणीव होते. मग कर्मानुसार फळ मिळतं.*



*सारांश:*

*ज्याची जशी श्रद्धा तसा त्याचा देव असतो. स्वभाव आणि प्रकृतीनुसार मनुष्य त्या त्या देवतांची उपासना करतो. धार्मिक स्थळांचे उंबरठे झिजवतो. वरसंशोधनासाठी वरपिता जसा हिंडत असतो तसा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आर्त आणि अर्थार्थी भक्त इष्ट देवदेवतांची उपासना करीत हिंडत फिरतो.*



श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Thursday, March 14, 2024

निष्ठा

 श्रीराम समर्थ


          गोंदवल्यास दांडेकर* आडनावाच्या एक वृद्ध नामनिष्ठ बाई रहात असत. एक दिवस दुपारचे जेवण झाल्यावर ब्रह्मानंद महाराज दांडेकर बाईंच्या खोलीत विश्रांती घेत होते तेव्हां त्यांना बाईंच्या कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिले तर बाईंच्या अंगात खूप ताप होता. आता ताप सहन होत नाही असे त्या म्हणाल्या. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी श्रीमहाराजांना बोलावून आणले. *श्रीमहाराज म्हणाले, बाई, हे देहाचे प्रारब्ध आहे ते सोसले पाहिजे. यावर बाई म्हणाल्या की पण ते सोसवेल असे करा. श्रीमहाराज म्हणाले, करतो, पण तीन दिवसांऐवजी सहा दिवस ताप येईल. त्या ठीक म्हणाल्या आणि सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागले !*


         ब्रह्मानंद महाराजांनी ही घटना कोणासच सांगितली नाही. तरीदेखील कर्णोपकर्णी ही गोष्ट लोकांना समजली. तेव्हां श्रीमहाराज भाऊसाहेबांना म्हणाले, 'भाऊसाहेब सबंध दुपार मी तुमच्याबरोबर होतो ना ! आणि पहा, लोक काय वाटेल ते उठवतात.'


         बरे झाल्यावर दांडेकर बाई श्रीमहाराजांना म्हणाल्या की 'महाराज,आपण सदैव माझ्याबरोबर असावे.' तेव्हां *श्रीमहाराज म्हणाले, 'मी नेहमी असतोच. तुमची निष्ठा असली तरच माझे अस्तित्व जाणवते.'* 


         हे सांगून पू बाबा म्हणाले की ही निष्ठा येण्यास शरणागतीसारखा उत्तम उपाय नाही.


                *********

*श्रीआईसाहेबांच्या समाधीवर सीताबाई दांडेकर यांच्या पुढाकाने १९३५ चे सुमारास दगडी मंदिर बांधण्यात आले असा उल्लेख चैतन्य स्मरण १९८८ या स्मरणिकेत आहे. [पान २१]. वरिल गोष्टीतील दांडेकर बाई यांच असाव्यात असा अंदाज आहे.


               *********

संदर्भः *अध्यात्म संवाद भाग पहिला पान ५१ - ५२* 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Tuesday, March 5, 2024

नाभी सुगंध असता, कस्तुरी मृग फीरे जसा रांनी |

श्री.गरुदेव रानडे यांचे सोलापूरचे ज्येष्ठ साधक श्री.वामनराव कुलकर्णी हे निंबाळला श्रावण सप्ताहात महिनाभर राहिले होते. एक दिवस  संध्याकाळच्या परमार्थ बैठकीत त्यांना श्री.गुरुदेवांनी पद म्हणावयास सांगितले होते. श्री.देशपांडे यांनी कबिराचे तीन दोहे म्हटले. श्री.गुरुदेवांना ते फार आवडले. ते म्हणाले "वामनराव याचा अर्थ सांगा"  
श्री.वामनराव यांनी दोहा १चा अर्थ ज्या प्रमाणे मेंदीच्या पानांमध्ये तिचा लाल रंग लपलेला असतो तसे देवाचे रूप मनुष्य देहात गुप्त रुपात असते. 
दोहा २ चा अर्थ ज्या प्रमाणे ही मेंदी वरवंट्याने वाटल्या शिवाय त्यातील लाल रंग वर येत नाही त्याप्रमाणे जीवाला अनेक संकटातून नामस्मरण करीत पार केल्याशिवाय देवाचे रूप समोर दिसू शकत नाही. 

दोहा ३ चा अर्थ कस्तुरी मृग जसा स्वतःच्या नाभी मध्ये कस्तुरी असून सुध्दा अज्ञानामुळे त्या सुगंधाच्या ओढीने रानोमाळ भटकत राहतो त्याप्रमाणे मनुष्य देखील आपल्या देहात राम असूनसुद्धा त्याला शोधत सगळीकडे भटकत राहतो. ह्या दोह्याला अनुसरून श्री.वामनराव यांनी श्री.मोरोपंत यांची आर्या म्हणून दाखविली. 
देही देव असता, का रे फिरतोस असा रानी  |

नाभी सुगंध असता, कस्तुरी मृग फीरे जसा रांनी || ही मोरोपंतांची आर्या गुरुदेवांना फार आवडली.

Sunday, March 3, 2024

पराभव

 *पराभव* 



जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की "आपण ग्रामीण भागात जास्त लक्ष द्यावे."


बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठी काढायचे.


लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही डोंगराळ व जंगली भाग ही होते.


एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले, की एका डोंगराळ भागात 'बडेरी' नावाचे एक गाव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटर पर्यंत डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे.


मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे.


तिथे कोणीतरी पि. के. व्यास हे, मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि का कोण जाणे, ते  पद सोडायचं ही नव्हते. मी आदेश दिला की "त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये.  ही अचानक भेट असेल."


दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहन चालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जावे लागेल.


मी आणि माझे दोन सहकारी, चालत निघालो. जवळजवळ दीड तास होऊन गेला असेल. डोंगराळ कच्च्या रस्त्यावरून आम्ही वरती गावात जाऊन पोहोचलो.


समोरच शाळेची पक्की इमारत होती आणि जवळ जवळ दोनशे कच्ची घरे होती.

शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त तीनच वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा. चारी बाजूंनी हिरवीगार वनराई.


वर्गात गेलो तर तिन्ही वर्गात जवळपास दीडशेमुलं अभ्यासात गर्क होती. खरतर तिथे कोणीही शिक्षक नव्हता. एक वयस्क व्यक्ती व्हरान्ड्यात उभे होते. ते तिथे बहुधा शिपायाचे काम करीत असावेत.


त्याने सांगितलं मुख्याध्यापक गुरुजी येतच असतील.

आम्ही व्हरांड्यात जाऊन बसलो ,तेव्हा बघितलं की एक चाळीस-बेचाळीस वर्षाचे सद्गृहस्थ,आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता.


त्यांनी येताच आपला परिचय दिला, "मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचे पाणी जरा खालून विहिरीतून आणावे लागते. आमचे शिपाई दादा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही म्हणून मीच घेऊन येतो. कसरत ही होते.” ते हसून म्हणाले.


त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला व नाव ही ओळखीचे वाटले. मी त्यांच्याकडे पाहून विचारले, "तुम्ही प्रशांत व्यास  का? इंदूरच्या गुजराती कॉलेजमधले का?"


मी टोपी काढली. त्याने ओळखून आश्चर्याने विचारले, "आपण अभिनव आहात? अभिनव श्रीवास्तव !" मी म्हणालो, “होय भाऊ, मी तोच आहे."


वीस-बावीस वर्षांपूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत  होत. तो खूप हुशार आणि अभ्यासू होता. खूप मेहनत करूनही, कधीतरीच मला त्याच्या पेक्षा जास्त गुण मिळाले असतील.

आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची. ज्यात तोच नेहमी पुढे जात असे.


आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा- शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचे,जिंकल्याचे समाधान वाटत होते आणि खरं सांगायचं तर, मनातूनही मी खूप खुष  होतो.


मी सहजच विचारलं की “इथे कसा काय आणि घरी कोण कोण आहे?"


त्याने सविस्तर सांगायला सुरुवात केली, "एम. कॉमच्या वेळेस वडिलांची मालवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. कसेतरी शिक्षण पूर्ण केले. मार्क चांगले होते म्हणून सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. नोकरी सोडूही  शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशाही नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. या गावात बदली मिळाली.  आई-वडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोड कमी पैशात  निभावून जाईल.


मग तो हसत म्हणाला, "अशा दुर्गम गावात बदली, म्हातारे, आजारी आई-वडील, यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना. म्हणून लग्न नाही झालं. आणि बरोबरच आहे. कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती?

माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून घेऊ. मग इथेच स्थायिक झालो.


इथे आल्यानंतर काही वर्षांनी आई-वडील दोघेही देवाघरी गेले. जमले तशी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला."


"आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमून गेले. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्षारोपण करायला जातो. 


रोज संध्याकाळी शाळेच्या व्हरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गावात कोणीही निरीक्षर नाही. नशा मुक्ती चे अभियान ही चालवतो.


स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि पुस्तके वाचतो. मुलांना चांगले मूल्य शिक्षण मिळावे, चांगले संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी, बस एवढेच माझे ध्येय आहे.


मी सी. ए. नाही होऊ शकलो. पण माझे दोन विद्यार्थी सी.ए. आहेत. आणि काही जण चांगल्या नोकरीत ही आहेत."


"माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो. माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी व शाळेसाठी खर्च होतो.


तुला तर माहीतच आहे. कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. ती, या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटते."


मी मधेच म्हणालो, "आई वडील गेल्यानंतर लग्नाचा विचार केला नाही का?"


तो हसून म्हणाला, "जगातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. म्हणून जे समोर येते, ते चांगले बनवण्याचा प्रयत्न मी करीत असतो."


त्याच्या त्या सहज हसण्याने मला आत खोलवर चिंब भिजवून टाकले.


निघताना मी त्याला म्हणालो "प्रशांत! जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन".


तो हसून म्हणाला "आता खूप उशीर झाला आहे. आता इथेच, या लोकांमध्ये मी आनंदात आहे." असे म्हणून त्याने हात जोडले.


मला, माझ्या यशप्राप्ती मुळे निर्माण झालेला अहंकार, त्याच्यापुढे निघून गेल्याचा गर्व , हा भ्रम, हे सगळे काही क्षणार्धात विरून  गेले.


तो आपल्या जीवनात, त्रुटी, कष्ट  आणि  असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचे हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकीत  झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता.


आपण माणसांची पारख, सुख - सुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो. परंतु तो, या सर्वांशिवाय सुद्धा, परत मला मागे टाकून पुढे निघून गेला.


निघताना, त्या 'कर्मऋषी'ला हातजोडून, भारावलेल्या मनाने मी एवढेच म्हणू शकलो, "तुझ्या या पुण्य कामात, कधी माझी आवश्यकता वाटली, तर माझी आठवण जरूर ठेव, मित्रा!"


*सारांश:* 

*आपले प्रशासकीय पद काय आहे किंवा काय होते, हे खरोखरच महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे हे असते की, माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि कसे बनत आहोत.*

        

        ---------

Friday, March 1, 2024

सद्गुरुंच्या अस्तित्वाची जाणीव

 जगात आणि आपल्या जीवनात जे जे घडते ते त्यांच्या (सद्गुरुंच्या) सत्तेने घडते. आपण त्याला चांगले वाईट म्हणतो ते बरोबर नाही. सद्गुरूंना एकच गोष्ट अशक्य आहे ती म्हणजे ते कोणाचे अकल्याण करणार नाही. आपल्याला सद्गुरुंच्या अस्तित्वाची जाणीव एकसारखी राहिली पाहिजे. नामस्मरणाचा तो अर्थ आहे.

 मन जसजसे सूक्ष्म होत जाते तसतशी ती जाणीव सतेज होत जाते. श्री.बेलसरे यांनी कबिराच्या दोहा मधील एक ओळ " वो नाम कुछ और "  पु.श्री. गोंदवलेकर महाराजांना सांगितली.

 तेव्हा ते म्हणाले नाम तेच राहते त्यात बदल होत नाही घेणारा और वेगळाच होतो. सद्गुरूंचे अस्तित्व कसे असते ह्या संदर्भात श्री.बेलसरे यांनी एक हकीगत सांगितली.

 एक श्री.वैद्य नावाचे गृहस्थ बेलसरे यांना भेटायला आले होते. श्री.सीतारामपंत वालावलकर हे त्यांचे गुरू. त्यांनी नुकताच देह ठेवला होता. हे वैद्य त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला गुरूंना भेटावयास जात असत. पण गुरू देहात नसले तरी त्यांच्या घरी जाऊन यावे असे त्यांना  वाटले पण त्यांच्या मनात विचार आला की त्यांचा (गुरूंचा) मुलगा डॉक्टर व सून नोकरी करणारी त्यामुळे ती दोघेही कामावर गेली असणार त्यामुळे घर बंद असेल असे वाटून ते गेले नाही. 

पुढे दोन दिवसांनी त्यांचे गुरुबंधू त्यांना भेटले. ते त्यांना म्हणाले की नुकतेच स्वप्न पडले स्वप्नात गुरू आले होते आणि ह्या वैद्यांचे नाव घेऊन म्हणाले वैद्य आले नाहीत मी त्यांची वाट पहात होतो. खरोखर देहापलीकडच्या अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते.