TechRepublic Blogs

Wednesday, January 31, 2024

प्राणायाम

 चिंतन 

     

   भगवान रमणमहर्षि म्हणतात - ज्याप्रमाणे पक्ष्याला पकडण्यासाठी पारधी त्याच्या मागे धावत नाही, तर जाळे टाकतो. जाळ्यामध्ये खाद्य टाकतो आणि दूर जाऊन बसतो. थोड्या वेळाने पक्षी जाळ्यामध्ये जाऊन अडकतो. हे जाळे पक्षी पकडण्यासाठीचे साधन होते.

 पक्ष्याप्रमाणेच अत्यंत स्वैर, उच्छृंखल मनावर निग्रह करण्यासाठी प्राणायाम हे प्रभावी साधन आहे. प्राणायाम जर उपासनेसाठी पूरक  साधन आहे तर मग प्राणायाम म्हणजे काय? 

केवळ श्वास व उच्छ्वास घेणे म्हणजे प्राणायाम नव्हे, कारण या दोन क्रिया आपण प्रत्येक जण क्षणाक्षणाला करीत असतो परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते. श्वास आणि उच्छ्वास जाणीवपूर्वक सावधानतेने करणे म्हणजेच प्राणायाम होय. यासाठी प्राण व अपानाचे निरीक्षण करावे लागते. भगवद्गीतेत भगवंत हीच साधना देतात. प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारीणौ ||५.२७||

                       प्राण आणि अपान हे दोन्ही सम करणे म्हणजे प्राणायाम!

              प्राणायामाच्या साधनेमुळे मनाचे भरकटणे थांबते. मन विषयवृत्तिरहित होते, म्हणून प्राणायामाची साधना उपासनेत साठी पूरक साधना आहे.

                

No comments:

Post a Comment